दैनिक पंचांग शनिवार, दि. ४ मे २०२४

0
80

वरुथिनी एकादशी, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, चैत्र कृष्णपक्ष, पू.भा.२२|०७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो.

वृषभ : संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. आर्थिक बाबतीत उन्नती होईल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल. व्यापार्‍यांसाठी परिस्थिती साधारण. आपणास
गरज असेल तेव्हा कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा.

कर्क : यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शयता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल.

सिंह : आपली योजना बनवण्यात सावधगिरी बाळगा. जोडीदाराशी वादविवाद टाळा. कार्यातील अडचणी दूर होतील. आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल.

कन्या : अधिकार्‍यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. वाहने व उपकरणे जपून वापरा. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील.

तूळ : व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल. घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. कार्यात सहकार्यांचा सहयोग मिळेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल.

वृश्चिक : आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

धनु : अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या. मान-सन्मानात वाढ होईल.

मकर : बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल.

कुंभ : आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील. आपणास एखाद्या योजनेसाठी इतरांचे सहकार्य हवे असेल तर तसे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. मित्रांचे सहकार्य मिळेल. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल.

मीन : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. धार्मिक भावना वाढेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.