हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी जिहादी प्रवृत्तींच्या लोकांवर गुन्हा दाखल करावा

नगर – हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी अल्तमस जरीवाला याच्यासह जिहादी प्रवृत्तींच्या लोकांवर गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी हिंदू सकल समाजाच्या वतीने ११ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की नुकत्याच झालेल्या रामनवमी मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मिरवणूक शांततेत पार पडल्याने जिहादी मानसिकतेच्या लोकांचा हिरमोड झाला असून नगर शहरात तणाव निर्माण
व्हावा व त्याचा फायदा या विघ्नसंतोषी लोकांना व्हावा या उद्देशाने या लोकांनी मिरवणुकीत कुठलाही वादग्रस्त फोटो
झळकावलेला नसताना व सदर मिरवणुकीत पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती, तसेच दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व आनंद कोकरे यांच्यासह शेकडो पोलीस अधिकारी कर्मचारी या मिरवणुकीत उपस्थित असताना कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त फ्लेस त्यांना दिसून आला नाही. कारण तसा कुठलाही फ्लेस मिरवणुकीत नव्हता. त्यामुळे मॉर्फ केलेला फ्लेसचा फोटो दाखवून कोतवाली पोलीस ठाणे येथे मोठ्या प्रमाणात बेकायदा जमाव गोळा करुन पोलीस ठाण्याच्या आवारात उभे राहून नगर शहरातील नागरिकांना धमकावून शहराचे वातावरण बिघडवण्याचा  प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नगर शहराचे नाव अहिल्यानगर असताना जाणून बुजून अहमदनगर असा उल्लेख करुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तरी या प्रकरणाची वेळीच दखल घेऊन अहिल्यानगर शहर विभागावर याचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल नवनाथ दहिफळे ठरले बेस्ट कॉप ऑफ द मंथ

नगर – एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो.कॉ. नवनाथ दहिफळे यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांची मार्च २०२५ चे बेस्ट  कॉप ऑफ द मंथ  म्हणून निवड झाली. त्यांचा शेंडी येथील पोलीस मदत केंद्र उद्घाटन कार्यक्रमात विशेष पोलीस
महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे १०० दिवसांच्या कृती आराखडा उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी कर्मचारी
यांची त्यांच्या कामातील प्रेरणा वाढवून सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक राकेश
ओला यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले यांनी केलेल्या मूल्यांकनात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ दहिफळे यांची मार्च २०२५ चे
बेस्ट कॉप ऑफ द मंथ म्हणून निवड केली.

पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ दहिफळे यांनी चार गंभीर गुन्ह्यांमधील फरार आरोपींचा सोशल मीडियाचे तांत्रिक तपासणी व गुप्त बातमीदार याच्या सहाय्याने शोध घेऊन अटक केल्याची सर्वोत्तम कामगिरी केली.त्यामुळे त्यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यातील मार्च २०२५ महिन्यातील बेस्ट कॉप म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत शेंडी बायपास चौक येथे आयोजित पोलीस मदत केंद्र उद्घाटन कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक
दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. माणिक चौधरी यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

विदर्भ मित्र मंडळाच्या केडगाच्या सांस्कृतिक भवनात गजानन महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

नगर – नगरमध्ये स्थायिक असलेल्या विदर्भवासियांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या विदर्भ मित्र मंडळाच्या  केडगाव लिंक रोड साईनगर येथील नूतन सांस्कृतिक भवनात श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा १० एप्रिल रोजी
उत्साहात पार पडला. श्री रामकृष्ट ट्रस्टचे पदाधिकारी मोहनलाल मानधना, निळकंठ देशमुख (सराफ) यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच केडगावकर भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सकाळी ८ वाजता या सोहळ्यास प्रारंभ झाला सुरुवातीला वास्तुशांती पूजा व नंतर श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे सर्व
कार्यक्रम विधिवत करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. या सोहळ्यास उपस्थित असलेल्या
सर्व भाविकांचे मंडळाचे अध्यक्ष डॉ.एस.बी.कोलते यांनी स्वागत केले. तसेच सर्व देणगीदारांना धन्यवाद
दिले. यानंतर सांस्कृतिक भवन निर्माण करण्यासाठी योगदान देणारे प्रमुख देणगीदार किरण कथडे, डॉ. नरेंद्र
वानखडे, श्रीमती मंदाकिनी किलोर, श्रीमती सिंधुताई देशमुख, श्री व सौ. अनिल साळवे, साकेत सपकाळ
यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यासाठी विदर्भ मित्र मंडळाचे सर्व सभासद विशेष करून अध्यक्ष डॉ.
शरद कोलते, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वानखडे, सचिव आनंद किलोर, धकाते, इंगळे, कुंभारे, सराफ, विजयकर,
उमक, तांदूळकर, राजू धुमणे, सचिन गोळे, वडाळकर, शंकरराव धूमणे, देऊळकर, सागर वानखडे, अनिल
साळवे, भस्मे, डेंगेकर, दीपक धनभर आदींनी परिश्रम घेतले.

डॉ.कोलते म्हणाले, विदर्भ मित्र मंडळाची स्थापना एप्रिल १९९७ मध्ये करण्यात आली. सुरुवातीला
मंडळाची सभासद संख्या कमी होती त्यानंतर सभासद संख्या वाढली तसेच मंडळाचा आकार सुद्धा वाढला. कार्यक्रमाची संख्या वाढली. मंडळातर्फे विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची एक हक्काची वास्तू असावी अशी सर्व सभासदांची
इच्छा असल्याने २०१२ मध्ये मंडळांनी स्वतःची जागा घेतली. २०२३ मध्ये या जागेवर का सांस्कृतिक भवन निर्माण करण्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आले. आज या जागी अतिशय दिमाखदार सांस्कृतिक भवन व श्री गजानन महाराजांचे मंदिर साकारले आहे. आजमितीस मंडळाची सभासद संख्या २६० एवढी झाली आहे. सांस्कृतिक भवनात सार्वजनिक वाचनालय व निशुल्क चिकित्सालय सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ.कोलते यांनी सांगितले.

‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ १३ एप्रिलला एकपात्री नाट्य प्रयोग

नगर – सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय व हक्क परिषद अभियान अहिल्यानगर यांच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती औचित्य साधून १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता माऊली सभागृह, झोपडी
कॅन्टीन जवळ, अहिल्यानगर येथे महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेर गाजलेले ’मी सावित्री ज्योतिराव फुले’ एकपात्री नाट्य प्रयोग
आयोजित करण्यात आल्याची माहिती सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय व हक्क परिषदेचे मुख्य
संयोजक सुदाम लगड यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेहमत सुलतान फौंडेशन अहिल्यानगरचे अध्यक्ष
युनूसभाई तांबटकर हे असणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन विनयकराजं फौंडेशनचे अध्यक्ष उद्योजक विपुल वाखरे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भिंगार अर्बन को ऑफ बँकचे संचालक महेश झोडगे,
सातारा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, मार्कंडेय विद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब क्षेत्रे यांचे
प्रमुख उपस्थिती असणार आहे. या एकपात्री नाट्यप्रयोगास उपस्थित राहण्याचे आवाहन सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय व हक्क परिषद अभियान अहिल्यानगर यांच्यावतीने करण्यात आले.

 

महावीर चषक परिवार व सकल जैन समाज बांधवांतर्फे अरुणकाका जगताप यांच्यासाठी आनंदधाम येथे प्रार्थना

नगर – पुणे येथे माजी आमदार अरुण जगताप यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती लवकरात
लवकर सुधारावी, यासाठी आनंदधाम येथे प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली. आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधीस्थळावर सकल जैन समाज बांधवांच्या वतीने ही प्रार्थना करण्यात आली. यावेळी जैन बांधव उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन अरुण जगताप यांना बळ मिळावे, यासाठी मनोभावे साकडे घातले. जगताप कुटुंबियांच्या आरोग्यासाठी
आणि अरुणकाका लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी समाजातून सदिच्छा व्यक्त होत आहेत.

अरुण जगताप यांची प्रकृती अचानकपणे बिघडली असून, त्यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
आहे. त्यांच्याबद्दल समाजामध्ये असलेले ऋणानुबंध व प्रेम भावना पाहता ते समाजाच्या हितासाठी काम करत असतात. यासाठी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन ते पुन्हा आपल्या माणसांमध्ये यावे, यासाठी आनंदधाम येथे महावीर चषक परिवार आणि सकल जैन बांधवांच्या वतीने मनोभावे प्रार्थना करण्यात आली असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी केली. अरुण जगताप यांना समाजाबाबत संवेदना आहे. ते नेहमीच चांगल्या कामासाठी समाजाला पाठिंबा देऊन ते काम पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घेत असतात, ही बाब कौतुकास्पद असते. त्यासाठी त्यांची प्रकृती लवकर बरी होऊन ते चांगले काम करण्यासाठी समाजामध्ये लवकर यावे, यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली असल्याचे मत अलोकऋषीजी महाराज यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त व अरुण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी बाल सुधारगृहात अन्नदान व प्रार्थना

नगर – महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व अरुण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने नालेगाव येथील बालसुधारगृहात अन्नदान करून प्रार्थना करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्ह्याचे नेते सुनील  शिंदे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, प्रा.जयंत
गायकवाड, महेश भोसले, विकास रणदिवे, अतुल भिंगारदिवे, सुनील राऊत, योगेश घोडके,  किसन करपे, गंगाराम खंडागळे, शैलेश लाटणे, महेश कांबळे, सुजित घंगाळे, मनोज साळवे, प्रकाश विधाते, संदीप  आल्हाट, प्रणव पाडळे आदीसह फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेते व रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इतर खर्चाला फाटा देत बाल सुधारगृहात अन्नदानाचा
कार्यक्रम ठेवण्यात आला व अरुण जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांसमवेत प्रार्थना करण्यात आली. प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक मंदिर, मशिद, बुद्ध विहार, गुरुद्वारा येथे प्रार्थना करत आहे. लवकरच ते बरे होऊन परत शहरात यावे,
अशी सर्वांची मनापासून इच्छा असल्याची भावना रिपब्लिकन सेनेचे सुनील शिंदे यांनी व्यक्त केली.

अरुण जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी ब्राह्मण समाजातर्फे सामूहिक प्रार्थना व आरती

नगर – अरुण जगताप यांच्या तब्येतीत चांगल्या प्रकारची सुधारणा व्हावी व त्यांना चांगले आरोग्य, दिर्घ आयुष्य लाभावे,
यासाठी सकल ब्राह्मण समाज सेवा संस्थेच्या वतीने सावेडीतील रेणुका माता मंदिरात सामूहिक प्रार्थना व आरती करण्यात
आली.  यावेळी सकल ब्राह्मण समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष  राजाभाऊ पोतदार, विजय देशपांडे, श्रिया देशमुख, अतुल शुल, हेमंत जोशी, दत्तात्रय कुलकर्णी, अनिल आवटी, केतन बडवे, योगेश दानी, प्रमोद कुलकर्णी, शाम रेणावीकर, मंगेश निसळ, प्रभाताई भोंग, कालिंदी केसकर, विलास देशपांडे, संजय देशपांडे, नरेंद्र श्रोत्री, सुहास देशपांडे, एकनाथ देशपांडे, अमोल पारनाईक, एन. डी. कुलकर्णी, सविता रसाळ, शोभा ढेपे, ज्ञानेश्वर देशमुख, मिलिंद जोशी आदी ब्राह्मण
समाज बंधू भगिनी उपस्थित होत्या.

अरुण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत. ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासन व जगताप कुटुंबीयांच्या
वतीने जाहीर करण्यात आले आहे. तेव्हापासून शहरातील त्यांचे चाहते विविध समाज बांधव व नागरिक त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सकल ब्राह्मण समाज सेवा संस्थेच्या वतीने ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. सावेडी येथील रेणुका माता मंदिरात एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना व आरती करण्यात आली.

नाना पाटील वस्ताद तालिमच्यावतीने हनुमान जयंती साजरी

नगर – शक्ती आणि भक्तीचा मिलाप म्हणजे बजरंगबली होय. प्रभु रामचंद्रांची नि:स्सीम भक्ती करुन निष्ठा कशी असावी भगवंत हनुमानांनी आपल्या सेवेतून दाखवून दिले आहे. हा आदर्श आपल्या जीवनात अंगीकृत करण्याची गरज आहे. हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटपातून सामाजिक ऐय निर्माण होण्यास मदत होते. प्रसादाचे महत्म्य मोठे असल्याने
भाविकांना लाभ घेऊन तुप्त होत आहे. ही तृप्तीच आपणा सर्वांना समाधान देणारी आहे, असे प्रतिपादन मनपा माजी स्थायी
समिती सभापती गणेश कवडे यांनी केले.

हनुमान जयंतीनिमित्त नाना पाटील वस्ताद तालिमच्यावतीने कावडीने आणलेल्या पवित्र पाण्याने अभिषेक करण्यात
आला. याप्रसंगी मनपा माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, पै. मन्नी शिंदे, अनिल कवडे, पै. रामभाऊ नळकांडे,
बजरंग महाराज शेळके, राधेशाम धूत, पै. मळू वामन, दत्ता ठाणगे, अमर शिंदे, नितिन रोहकले, योगीराज वामन,
शिवाजी गुंजाळ, अरुण कदम, पुष्कर गुंजाळ, धीरज रोहकले, बंडू शेळके, निलेश काळे, अतुल वाकचौरे, राजु म्हस्के,
ननु काळे, बापू दिवेकर, ओंकार कवडे, पळसकर आदि उपस्थित  होते.

गणेश कवडे म्हणाले, हनुमान जयंतीची नालेगांवची मोठी परंपरा आहे. दरवर्षी नालेगांव येथील नाना पाटील
वस्ताद तालिम येथील युवकांनी सालाबाद प्रमाणे प्रवरासंगम येथून कावडीने पाणी आणून जलाभिषेक केला जातो.
युवकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमानाची उपासना करुन  अनेक कुस्तीची मैदानी गाजवली आहेत. नाना पाटील वस्ताद
तालिमचे जिर्णोद्धाराचे पूर्ण झाले असून लवकरच त्याचा लोकार्पण कार्यक्रम करण्यात येईल असे गणेश कवडे यांनी सांगितले.

माळीवाडा येथील शनी मारुती मंदिरात विशेष महापुजा

नगर – माळीवाडा येथील शनी-मारुती मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठिक ६ वा. जन्मोत्सवाच्यावेळी श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते
अभिषेक करुन महापुजा करण्यात आली. भजनी मंडळाच्या महिलांनी पाळणा हलवून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी देवस्थानचे सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त रंगनाथ फुलसौंदर, विजय कोथिंबीरे, नितीन पुंड, राजेश पारीख आनंद सत्रे, लक्ष्मीकांत हेडा आदिंसह भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसर फुलांसह आकर्षक सजावट करण्यात आली होती.

नगर शहरामध्ये विविध मंडळांनी हनुमान जयंतीनिमित्त विविध मंडळांनी आकर्षक अशा मुर्ती उभारुन जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शहरातील विविध तालिमीमध्ये आकर्षक रोषणाई करुन युवकांनी कावडीने आणलेल्या पाण्याने अभिषेक करण्यात आले. नगर शहरातील स्टेट बँक चौक, सर्जेपुरा, दिल्लीगेट, लक्ष्मी कारंजा, माळीवाडा, नेप्तीगेट, झेंडीगेट, नेता सुभाष चौक, नालेगांव, वारुळाचा मारुती, नवग्रह मंदिर, भुतकरवाडी, श्रमिकनगर, पावन हनुमान मंदिर, बालिकाश्रम रोड, खाकीदास बाबा मठ, नित्यसेवा सोसायटी, मार्कंडेय सोसायटी गुलमोहोर रोड,
तपोवन, भोसले आखाडा, अरणगांव रोड, रेल्वेस्टेशन, केडगांव, एकनाथनगर, भिंगार येथील रोकडेश्वर मंदिरावर
आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठीसाठी रांगा लावल्या होत्या. रुईच्या
पानांचा हार, मंदिराबाहेर नारळ, टरबुज-खरबुजाचा प्रसादाचे आयोजन करण्यात होते.कौठीची तालिम, नानापाटील वस्ताद, वाडिया पार्क तालिम, गणपतीची तालिम, सातपुते तालिम, झारेकरगल्ली आदी ठिकाणीची तालमींवर
रोषणाई करुन सजावट करण्यात आली होती.

हनुमान जयंतीनिमित्त गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर शहरात चौका-चौकात हनुमान चालिसा पाठाचे
आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ, लक्ष्मीनारायण सत्संग मंडळ, श्री रामभक्त हनुमान सत्संग मंडळ, मंगल भक्त सेवा मंडळ आदि मंडळाने शहरात व उपनगरात हनुमान चालिसाचे पठण करुन भाविकांना मंत्रमुग्ध केले. संकटमोचन हनुमान सत्संग मंडळाच्या वतीने माळीवाडा शनी-मारुती मंदिर येथे पहाटे हनुमान
चालिसाचे आयोजन करण्यात आले होते.

शनी मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्साहात

नगर – सालाबाद प्रमाणे तांगेगल्ली येथील शनि मारुती मंडळाच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात
आली. जयंतीनिमित्त शनि मारुती मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात आकर्षक फुलांची
सजावट करण्यात आली होती. तसेच रंगरंगोटी करण्यात आली होती. पहाटे हनुमान मूर्तीस लघु रुद्राभिषेक करण्यात आला. महाअभिषेक व पूजा करण्यात आली. याप्रसंगी हनुमान भक्त उपस्थित होते. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

दुपारी महाआरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी स्थायी समिती माजी सभापती गणेश
कवडे, माजी नगरसेवक संभाजी लोंढे, अजय चितळे, भाजपा ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, गणेश
शिंदे, आदिनाथ शिंदे, वैभव शिंदे, निखिल सोनवणे, कार्तिक जाधव, सचिन धरम, प्रतीक जाधव, धनंजय शिंदे, सचिन
घाडगे, ऋषिकेश शिंदे, आर्यन सोनवणे, सागर साळवे, सागर कदम, अरुण एडके, जनार्दन साळवे, अर्जुन स्वामी, मिलिंद
सुडके आदी उपस्थित होते.