नगर – एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो.कॉ. नवनाथ दहिफळे यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांची मार्च २०२५ चे बेस्ट कॉप ऑफ द मंथ म्हणून निवड झाली. त्यांचा शेंडी येथील पोलीस मदत केंद्र उद्घाटन कार्यक्रमात विशेष पोलीस
महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे १०० दिवसांच्या कृती आराखडा उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी कर्मचारी
यांची त्यांच्या कामातील प्रेरणा वाढवून सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक राकेश
ओला यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले यांनी केलेल्या मूल्यांकनात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ दहिफळे यांची मार्च २०२५ चे
बेस्ट कॉप ऑफ द मंथ म्हणून निवड केली.
पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ दहिफळे यांनी चार गंभीर गुन्ह्यांमधील फरार आरोपींचा सोशल मीडियाचे तांत्रिक तपासणी व गुप्त बातमीदार याच्या सहाय्याने शोध घेऊन अटक केल्याची सर्वोत्तम कामगिरी केली.त्यामुळे त्यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यातील मार्च २०२५ महिन्यातील बेस्ट कॉप म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत शेंडी बायपास चौक येथे आयोजित पोलीस मदत केंद्र उद्घाटन कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक
दत्तात्रय कराळे (नाशिक परिक्षेत्र) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. माणिक चौधरी यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.