नगर – अरुण जगताप यांच्या तब्येतीत चांगल्या प्रकारची सुधारणा व्हावी व त्यांना चांगले आरोग्य, दिर्घ आयुष्य लाभावे,
यासाठी सकल ब्राह्मण समाज सेवा संस्थेच्या वतीने सावेडीतील रेणुका माता मंदिरात सामूहिक प्रार्थना व आरती करण्यात
आली. यावेळी सकल ब्राह्मण समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ पोतदार, विजय देशपांडे, श्रिया देशमुख, अतुल शुल, हेमंत जोशी, दत्तात्रय कुलकर्णी, अनिल आवटी, केतन बडवे, योगेश दानी, प्रमोद कुलकर्णी, शाम रेणावीकर, मंगेश निसळ, प्रभाताई भोंग, कालिंदी केसकर, विलास देशपांडे, संजय देशपांडे, नरेंद्र श्रोत्री, सुहास देशपांडे, एकनाथ देशपांडे, अमोल पारनाईक, एन. डी. कुलकर्णी, सविता रसाळ, शोभा ढेपे, ज्ञानेश्वर देशमुख, मिलिंद जोशी आदी ब्राह्मण
समाज बंधू भगिनी उपस्थित होत्या.
अरुण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत. ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासन व जगताप कुटुंबीयांच्या
वतीने जाहीर करण्यात आले आहे. तेव्हापासून शहरातील त्यांचे चाहते विविध समाज बांधव व नागरिक त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सकल ब्राह्मण समाज सेवा संस्थेच्या वतीने ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. सावेडी येथील रेणुका माता मंदिरात एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना व आरती करण्यात आली.