महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त व अरुण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी बाल सुधारगृहात अन्नदान व प्रार्थना

0
34

नगर – महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व अरुण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने नालेगाव येथील बालसुधारगृहात अन्नदान करून प्रार्थना करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्ह्याचे नेते सुनील  शिंदे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, प्रा.जयंत
गायकवाड, महेश भोसले, विकास रणदिवे, अतुल भिंगारदिवे, सुनील राऊत, योगेश घोडके,  किसन करपे, गंगाराम खंडागळे, शैलेश लाटणे, महेश कांबळे, सुजित घंगाळे, मनोज साळवे, प्रकाश विधाते, संदीप  आल्हाट, प्रणव पाडळे आदीसह फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेते व रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इतर खर्चाला फाटा देत बाल सुधारगृहात अन्नदानाचा
कार्यक्रम ठेवण्यात आला व अरुण जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांसमवेत प्रार्थना करण्यात आली. प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक मंदिर, मशिद, बुद्ध विहार, गुरुद्वारा येथे प्रार्थना करत आहे. लवकरच ते बरे होऊन परत शहरात यावे,
अशी सर्वांची मनापासून इच्छा असल्याची भावना रिपब्लिकन सेनेचे सुनील शिंदे यांनी व्यक्त केली.