नगर – सालाबाद प्रमाणे तांगेगल्ली येथील शनि मारुती मंडळाच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात
आली. जयंतीनिमित्त शनि मारुती मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात आकर्षक फुलांची
सजावट करण्यात आली होती. तसेच रंगरंगोटी करण्यात आली होती. पहाटे हनुमान मूर्तीस लघु रुद्राभिषेक करण्यात आला. महाअभिषेक व पूजा करण्यात आली. याप्रसंगी हनुमान भक्त उपस्थित होते. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दुपारी महाआरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी स्थायी समिती माजी सभापती गणेश
कवडे, माजी नगरसेवक संभाजी लोंढे, अजय चितळे, भाजपा ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, गणेश
शिंदे, आदिनाथ शिंदे, वैभव शिंदे, निखिल सोनवणे, कार्तिक जाधव, सचिन धरम, प्रतीक जाधव, धनंजय शिंदे, सचिन
घाडगे, ऋषिकेश शिंदे, आर्यन सोनवणे, सागर साळवे, सागर कदम, अरुण एडके, जनार्दन साळवे, अर्जुन स्वामी, मिलिंद
सुडके आदी उपस्थित होते.