नगर – नगरमध्ये स्थायिक असलेल्या विदर्भवासियांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या विदर्भ मित्र मंडळाच्या केडगाव लिंक रोड साईनगर येथील नूतन सांस्कृतिक भवनात श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा १० एप्रिल रोजी
उत्साहात पार पडला. श्री रामकृष्ट ट्रस्टचे पदाधिकारी मोहनलाल मानधना, निळकंठ देशमुख (सराफ) यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच केडगावकर भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सकाळी ८ वाजता या सोहळ्यास प्रारंभ झाला सुरुवातीला वास्तुशांती पूजा व नंतर श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे सर्व
कार्यक्रम विधिवत करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. या सोहळ्यास उपस्थित असलेल्या
सर्व भाविकांचे मंडळाचे अध्यक्ष डॉ.एस.बी.कोलते यांनी स्वागत केले. तसेच सर्व देणगीदारांना धन्यवाद
दिले. यानंतर सांस्कृतिक भवन निर्माण करण्यासाठी योगदान देणारे प्रमुख देणगीदार किरण कथडे, डॉ. नरेंद्र
वानखडे, श्रीमती मंदाकिनी किलोर, श्रीमती सिंधुताई देशमुख, श्री व सौ. अनिल साळवे, साकेत सपकाळ
यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यासाठी विदर्भ मित्र मंडळाचे सर्व सभासद विशेष करून अध्यक्ष डॉ.
शरद कोलते, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वानखडे, सचिव आनंद किलोर, धकाते, इंगळे, कुंभारे, सराफ, विजयकर,
उमक, तांदूळकर, राजू धुमणे, सचिन गोळे, वडाळकर, शंकरराव धूमणे, देऊळकर, सागर वानखडे, अनिल
साळवे, भस्मे, डेंगेकर, दीपक धनभर आदींनी परिश्रम घेतले.
डॉ.कोलते म्हणाले, विदर्भ मित्र मंडळाची स्थापना एप्रिल १९९७ मध्ये करण्यात आली. सुरुवातीला
मंडळाची सभासद संख्या कमी होती त्यानंतर सभासद संख्या वाढली तसेच मंडळाचा आकार सुद्धा वाढला. कार्यक्रमाची संख्या वाढली. मंडळातर्फे विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची एक हक्काची वास्तू असावी अशी सर्व सभासदांची
इच्छा असल्याने २०१२ मध्ये मंडळांनी स्वतःची जागा घेतली. २०२३ मध्ये या जागेवर का सांस्कृतिक भवन निर्माण करण्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आले. आज या जागी अतिशय दिमाखदार सांस्कृतिक भवन व श्री गजानन महाराजांचे मंदिर साकारले आहे. आजमितीस मंडळाची सभासद संख्या २६० एवढी झाली आहे. सांस्कृतिक भवनात सार्वजनिक वाचनालय व निशुल्क चिकित्सालय सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ.कोलते यांनी सांगितले.