नगर – हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी अल्तमस जरीवाला याच्यासह जिहादी प्रवृत्तींच्या लोकांवर गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी हिंदू सकल समाजाच्या वतीने ११ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की नुकत्याच झालेल्या रामनवमी मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मिरवणूक शांततेत पार पडल्याने जिहादी मानसिकतेच्या लोकांचा हिरमोड झाला असून नगर शहरात तणाव निर्माण
व्हावा व त्याचा फायदा या विघ्नसंतोषी लोकांना व्हावा या उद्देशाने या लोकांनी मिरवणुकीत कुठलाही वादग्रस्त फोटो
झळकावलेला नसताना व सदर मिरवणुकीत पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती, तसेच दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व आनंद कोकरे यांच्यासह शेकडो पोलीस अधिकारी कर्मचारी या मिरवणुकीत उपस्थित असताना कुठल्याही प्रकारचा वादग्रस्त फ्लेस त्यांना दिसून आला नाही. कारण तसा कुठलाही फ्लेस मिरवणुकीत नव्हता. त्यामुळे मॉर्फ केलेला फ्लेसचा फोटो दाखवून कोतवाली पोलीस ठाणे येथे मोठ्या प्रमाणात बेकायदा जमाव गोळा करुन पोलीस ठाण्याच्या आवारात उभे राहून नगर शहरातील नागरिकांना धमकावून शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नगर शहराचे नाव अहिल्यानगर असताना जाणून बुजून अहमदनगर असा उल्लेख करुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. तरी या प्रकरणाची वेळीच दखल घेऊन अहिल्यानगर शहर विभागावर याचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.