LATEST ARTICLES

हसा आणि शतायुषी व्हा !

चौथीच्या वर्गात शाळेचे तपासणीस आले. त्यांनी फळ्यावर एक वाक्य लिहिले. “रामाने रावणाला मारून टाकली.” मग विद्यार्थ्यांना त्यांनी विचारले “या वायात तुम्हाली विशेष काय दिसले?” मुलांना चुकविण्यासाठी त्यांनी मुद्दामच व्याकरणाची चूक केली होती. पण अनेक मुलांच्या ती लक्षात आली नाही. शेवटी एक मुलगा हात वर करून म्हणाला, ‘’मी सांगतो सर.” तपासणीस आनंदाने म्हणाले, ‘’शाब्बास फळ्यावर मी जे वाक्य लिहिले आहे. त्यात तुला विशेष काय दिसलं?” ‘सर, मला हे विशेष दिसलं की तुमचं हस्ताक्षर वाईट आहे. तुम्हाला प्रॅटीस करायला पाहिजे.’

जीवनाचे रहस्य

एकदा एका कसायाकडे त्याचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी गेला होता. तिथे त्याने असे पाहिले की, एका मोठ्या पिंजर्‍यात खूप असे बोकड, मेंढ्या कैद आहेत आणि एकमेकांशी मस्ती करत आहेत. मोठ्या आनंदात ते प्राणी आहेत. दुसरीकडे त्याने असे पाहिले की त्याच पिंजर्‍यातून एकेक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्याचे मांस विकत आहे. कसायाच्या मित्राला ही गोष्ट पाहून कसेतरी वाटले. तो त्रस्त झाला कारण ज्यावेळी प्रत्येक बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंजर्‍यातल्या प्रत्येक बोकडाला दिसत होते पण तरीसुद्धा ते बोकड आपला कुणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात कसे राहत होते याचे त्या मित्राला राहून राहून आश्चर्य वाटत होते. बोकड आपल्याच मस्तीत खेळत, बागडत, आनंदात त्या पिंजर्‍यात राहतात कसे याचे त्या मित्राला कोडे पडले होते. शेवटी न राहवून त्याने त्या कसाई मित्राला याचे कारण विचारले असता कसाई म्हणाला, अरे मित्रा, फार सोपे कारण आहे. मी त्या प्रत्येक बोकडाच्या कानात असे सांगितले आहे की, सगळे बोकड मेले तरी हरकत नाही पण मी तुला काही कापणार नाही. त्यामुळे तू आनंदात राहा. तू एकमेव बोकड असा असशील की जो शेवटपर्यंत जिवंत राहशील. त्यामुळे ते प्रत्येक बोकड हे आपण जिवंत राहणार या आनंदात आहे आणि हे त्याचमागचे रहस्य आहे. तात्पर्य – शेवट हा अंतिम सत्य आहे त्यामुळे उरलेले आयुष्य दु:खात वाया घालाऊ नये.

सिलिकॉन या मूलद्रव्याचे उपयोग काय?

सलिकॉन हे मूलद्रव्य निसर्गात शुद्ध स्वरूपात सापडत नाही, पण निसर्गात सापडणार्‍या अनेक खनिजांत सिलिकॉन-डाय-ऑसाइड या स्वरूपात ते असते. पृथ्वीच्या कवचात फार मोठ्या प्रमाणात हे सिलिकॉन-डाय-ऑसाइड सापडते. हे सिलिकॉनय्डाय-ऑसाइड विद्युत ऊर्जेच्या सहाय्यानं तापवून, त्यापासून शुद्ध सिलिकॉन मिळवता येते. हे क्वार्टझ, अगेट, जास्पर, कार्नेलियन अशा स्वरूपात सापडत असते. क्वार्टझ हे स्फटिक रूपात सापडणारे सिलिकॉन- डाय-ऑसाइड. सिलिकॉनचे शुद्ध स्वरूपात इलेट्रॉनिक उद्योगात महत्त्वाचे उपयोग आहेत. पोलादात मिश्रण केलेले सिलिकॉन पोलादाची भारक्षमता वाढवते, तर सिलिकॉन व कार्बन यांचे मिश्रण हे पॉलिशिंग धंद्यात वापरले जाते. प्रकाशकीय घट आणि ट्रान्झिस्टर्स यांच्यामध्येही सिलिकॉन वापरले जाते. याशिवाय सिलिकासँडचा- यात क्वार्टझच्या वाळूचा समावेश आहे याचा उपयोग निरनिराळ्या प्रकारच्या काचा तयार करताना होतो. अनेक मानवी उपयोगाची खनिजे ही निरनिराळ्या मूलद्रव्यांची सिलिकेट्स असतात.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

दव कसे तयार होते? गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू किंवा कोळ्याच्या जाळ्यावर चमकणारे दवबिंदू किती छान दिसतात, नाही का? शहरातल्या मुलांना अनुभव नसेल कदाचित, पण हिवाळ्यात सकाळी गवत ओले असते. आपण यालाच ’दव पडले’ असे म्हणतो, पण प्रत्यक्ष दव पावसासारखे पडत नसते; तर हवेत जी पाण्याची वाफ असते त्यापासून हे पाण्याचे थेंब बनतात. रात्री पाने, गवताची पाती जी वाफ उच्छ्वासाद्वारे बाहेर टाकतात त्याचेही हे जलबिंदू बनतातच. शिवाय रात्री तापमान कमी झाल्यामुळे जे पृष्ठभाग गार बनतात त्यावरही हवेतल्या वाफेचे दवबिंदू बनतात. हे थेंब किंवा दवबिंदू वाफेचे पाणी होण्यास आवश्यक इतकं तापमान तयार झाल्याने तयार होत असतात.

सौंदर्य

त्वचेवर दररोज मध लावल्यास त्वचेवरील डाग कमी होतात. तसेच त्वचेचा रुक्षपणाही नाहीसा होतो. संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

वास्तू

0
मेन गेटच्या ठीक समोर लाकडी, लोखंडी खांब, विजेचा खांब, वृक्ष, पिलर असू नये. चिंच व मेंदीचे झाड असू नये, वाईट शक्तींचा वास या वृक्षांवर असतो.

सल्ला

0
स्वयंपाकासंदर्भात * कोणत्याही प्रकारच्या कोफ्त्याच्या साहित्यात बेसनासोबत थोडीशी दाट मलई मिसळल्यास कोफ्त्याचा स्वाद द्विगुणित होतो. * स्टीलची भांडी, सिंक व नळाच्या तोट्या इ. स्वच्छ करण्यासाठी सोडा वापरा. त्यामुळे ती नव्यासारखी चमकू लागतील.

पाककला

0
थंड इमली सरबत साहित्य – चिंच २२५ ग्रॅम, साखर ६७५ ग्रॅम, पाणी सव्वा लिटर, चवीला मीठ,जिरेपूड. कृति – चिंच स्वच्छ करा व धुवून घ्या. पाण्यात भिजत टाका. अर्ध्या तासाने चांगली कोळा व चोथा टाका. गाळा. त्यात उरलेले पाणी घाला. २० मिनिटे उकळा. साखर घाला. परत अर्धा तास उकळा. गाळा निवल्यावर थंड करा. मीठ व जिरेपूड घालून प्या किंवा थंड सोड्यात हे मिश्रण थोडे थोडे ढवळा व प्या.

आरोग्य

0
व्यायाम ठेवतो फ्रेश सकाळी ३० मिनिटे व्यायाम केल्यामुळे शारीरिक-मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. व्यायामामुळे इंडोर्फिन्स हार्मोन्स सक्रिय होते आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.

सुविचार

  प्रेम डोळ्यांनी नव्हे; पण हृदयाने पाहत असते. म्हणूनच प्रेम आंधळे असते, असे म्हटले जाते. – शेसपियर