महावीर चषक परिवार व सकल जैन समाज बांधवांतर्फे अरुणकाका जगताप यांच्यासाठी आनंदधाम येथे प्रार्थना

0
26

नगर – पुणे येथे माजी आमदार अरुण जगताप यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती लवकरात
लवकर सुधारावी, यासाठी आनंदधाम येथे प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली. आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधीस्थळावर सकल जैन समाज बांधवांच्या वतीने ही प्रार्थना करण्यात आली. यावेळी जैन बांधव उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन अरुण जगताप यांना बळ मिळावे, यासाठी मनोभावे साकडे घातले. जगताप कुटुंबियांच्या आरोग्यासाठी
आणि अरुणकाका लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी समाजातून सदिच्छा व्यक्त होत आहेत.

अरुण जगताप यांची प्रकृती अचानकपणे बिघडली असून, त्यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
आहे. त्यांच्याबद्दल समाजामध्ये असलेले ऋणानुबंध व प्रेम भावना पाहता ते समाजाच्या हितासाठी काम करत असतात. यासाठी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन ते पुन्हा आपल्या माणसांमध्ये यावे, यासाठी आनंदधाम येथे महावीर चषक परिवार आणि सकल जैन बांधवांच्या वतीने मनोभावे प्रार्थना करण्यात आली असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी केली. अरुण जगताप यांना समाजाबाबत संवेदना आहे. ते नेहमीच चांगल्या कामासाठी समाजाला पाठिंबा देऊन ते काम पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घेत असतात, ही बाब कौतुकास्पद असते. त्यासाठी त्यांची प्रकृती लवकर बरी होऊन ते चांगले काम करण्यासाठी समाजामध्ये लवकर यावे, यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली असल्याचे मत अलोकऋषीजी महाराज यांनी व्यक्त केले.