दैनिक पंचांग रविवार, दि. १६ जून २०२४

0
45

दशहरा समाप्ति, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, ज्येष्ठ शुलपक्ष, हस्त ११|१३
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. व्यवसाय क्षेत्रात अधिकारी व सहकारी नकारात्मक वागतील.

वृषभ : आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील.

मिथुन : मोठ्यांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात असलेल्या संततीच्या शुभवार्ता मिळतील. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

कर्क : विशेषतः धंदा-व्यवसाय करण्यार्‍यांना आज फारच लाभदायक दिवस आहे. मित्राच्या भेटीतून आनंद मिळेल. अजीर्णचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन यात रस वाटेल.

सिंह : भेटीचे योग येतील. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास होतील. काम करायला उत्साह वाटणार नाही. मित्र व स्नेही
भेटल्यामुळे आनंदात असाल.

कन्या : रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांबरोबर संघर्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील.

तूळ : आज नवीन कामे सुरू करू नका. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. सरकार विरोधी कारवायांपासून दूर
राहणच आज फायदेशीर होईल.

वृश्चिक : शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल.

धनु : प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. चर्चा- वादविवाद यातही तुमचा प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. धन आणि किर्तीची हानी होईल. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.

मकर : हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता.
आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. दोघांपैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही याकडे लक्ष द्या.

कुंभ : आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे यावेळी आपल्यासाठी फलदायी आहे. कामात
सांभाळूनच पुढे चला.

मीन : जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर