चेरी ज्युबिली

चेरी ज्युबिली

साहित्य – क्रीम दूध ५०० मि.ली.,
कस्टर्ड पावडर १ टेबलस्पून, साखर पाऊण
कप, व्हेनिला इसेन्स २ टी स्पून, क्रीम ५००
मि.ली., बिया काढलेली चेरी २ कप, अर्धा
कप साखर.
कृति – अर्धा कप दुधात कस्टर्ड व
साखर मिसळा. उरलेले दूध गरम करा. जेव्हा
ते उकळू लागेल तेव्हा त्यात साखर मिसळा व
सतत ढवळत पुन्हा एक उकळी द्या. यानंतर
जाळ मंद करून अर्धा मिनिट शिजवा. नंतर
जाळ बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. आता
दोन कप चेरीत अर्धा कप साखर मिसळा व
थोडेसे शिजवून घ्या. जेव्हा मिश्रण थंड होईल
तेव्हा त्यात क्रीम, व्हॅनिला इसेन्स व चेरी
मिसळून घट्ट झाकणाच्या कंटेनरमध्ये ठेवा व
फ्रिजरमध्ये गोठण्यासाठी ठेवा. जेव्हा मिश्रण
गोठेल तेव्हा फ्रिजमधून काढून ब्लेंडरमध्ये
व्यवस्थित घुसळून घ्या. नंतर पुन्हा कंटेनरमध्ये
भरून फ्रिजरमध्ये ठेवा. जेव्हा मिश्रण गोठेल
तेव्हा चेरी व फ्रूटस्ने सजून सर्व्ह करा.

काळ्याभोर केसांसाठी

काळ्याभोर केसांसाठी
कपभर मेंदी, दोन चमचे दही, चमचाभर
कॉफी पावडर, मोठा चमचा आवळा पावडर
आणि छोटा चमचा काताची पावडर हे सारे
एकत्र करून भिजवून ठेवावे. नंतर केसांच्या
मुळाशी व केसांना लावून एका तासाने केस
स्वच्छ धुवावेत. हा प्रयोग आठवड्यातून एकदा
करावा. केस काळेभोर व सुुंदर होतील.

कपड्याला च्युईंगम चिकटले असेल तर

जर कपड्याला च्युईंगम चिकटले असेल
तर ते काढण्यासाठी कपडा एखाद्या पॉलिथीन
बॅगमध्ये ठेवून काही तास फ्रीजमध्ये ठेवा.
यामुळे च्युईंगम कडक होऊन कपड्यापासून
वेगळे होईल.

वास्तू

* स्नानगृह पूर्व दिशेस असावे. धुण्याचे
कपडे वायव्येस ठेवावेत. पाणी तापवायचा
बंब, गीझर, हीटर हे आग्नेय दिशेस असावेत.
स्नानगृहातील आरसे दक्षिणेकडे असू नयेत.
पूर्व अथवा उत्तरेकडे असणे श्रेयस्कर ! मुळात
स्नानगृहात शौचालय संडास असू नयेत,
असा पूर्वापारचा वास्तूशास्त्र संकेत आहे.
स्नानगृहात वायव्य कोपर्‍यात साबण, शांपू,
फिनाईल, ब्रश, खराटा इत्यादी सफाईच्या
वस्तू ठेवाव्यात.
* स्नानगृहाचे दार पूर्व, उत्तर किंवा
ईशान्येला असावे. स्नानगृहाचा दरवाजा
दक्षिणेला असू नये. स्नानगृहात पूर्व अथवा
उत्तर बाजूकडे स्नान करावे. स्नानगृहातील
पाण्याचा साठा नैर्ऋत्येला असावा.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

बाळासाहेब : माफ करा हं!… आमच्या या ठोकाठोकीनं
तुम्ही डिस्टर्ब झाला असाल! त्याचं काय आहे, आम्ही फ्रेम
लावण्यासाठी खिळा ठोकतोय.
बंडोबा : ठीक आहे… तुमचं चालू द्या. खिळ्याच्या दुसर्‍या
टोकाला आम्ही फ्रेम लावली तर तुमची हरकत नाही ना?
म्हणून विचारायला आलो होतो.

दैनिक पंचांग शनिवार, दि. १५ जून २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ शुलपक्ष, उत्तरा ०८|१४
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : पैसा खर्च होईल. संतती बरोबर मतभेद किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. सामाजिक क्षेत्रात अपयश येणार नाही याकडे लक्ष द्या.

वृषभ : नवीन कामाची सुरूवात करण्याला अनुकूल दिवस. मित्रांबरोबर दिवस आनंदात घालवाल. मागील देणी वसुल होतील. आर्थिक विवादातून नुकसान संभव. कामात मित्रांचा सहयोग मिळेल.

मिथुन : विद्यार्थ्यांना आज अभ्यासात रस वाटणार नाही. शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. आध्यात्मिकतेतून शांती मिळेल.

कर्क : मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहली यातूनही आज आनंद मिळवू शकता.

सिंह : आध्यात्मिकतेच्या मदतीने विचारातील नकारात्मकता दूर करा. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल.

कन्या : स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबातील लोकांशी मतभेद संभवतात. मिळणार्‍या फायद्यात नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्या.

तूळ : देण्या-घेण्याचे निर्णय विचारपूर्वक घ्या. अपघात व गैरसमज यापासून दूरच राहा. वाहने सावकाश चालवावीत. नवे काम, विचार, योजना लांबणीवर ठेवा.

वृश्चिक : शारीरिकस्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील.

धनु : आज अध्यात्माकडे कल राहिल. जुने मित्र व नातेवाईक यांच्या सहवासामुळे दिवस आनंदात व्यतीत होईल. तब्येत सांभाळा.

मकर : उतावीळ स्वभावावर नियंत्रण ठेवून कार्ये शांततेत केल्यास आजचा दिवस हा यशदायी ठरेल. उधारी वसुल होईल. व्यापाराच्या विस्तारासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.

कुंभ : हितशत्रुंपासून पिडा संभवते. संततीसौख्य लाभेल. कोर्ट-कचेरी आदी गोष्टींपासून लांब रहा. व्यावसायिक स्थिति चांगली राहील.

मीन : आर्थिक व्यवहार करताना अनोळखी व्यतीवर विश्वास ठेवू नका. आध्यात्मिक आनंदही आज आपल्या जीवनात भरून राहील. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धि राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

पानात काहीतरी खायला देऊन, व्यक्तीजवळच्या वस्तू, चोर लांबवतात; हे खरे आहे काय?

पानात काहीतरी खायला देऊन, व्यक्तीजवळच्या वस्तू, चोर लांबवतात; हे खरे आहे काय?

रेल्वेत शेजारी दोन-तीन लोक येऊन बसतात, ओळख होते व गप्पा रंगतात. नंतर यात्रेला गेल्याचे सांगून ते लोक प्रसाद खायला देतात किंवा विडा खायला देतात. नंतर तुमच्याजवळचे सामानसुमान चोरून पलायन करतात. अशा बातम्या वृत्तपत्रात तुम्ही वाचल्या असतील. खरेच असे होते का? काही विषपदार्थ असे आहेत की जे वर उल्लेखल्याप्रमाणे वापरले जातात. धोतर्‍याचे झाड तुम्ही पाहिले असेल. हे झाड विषारी असते, पण त्यातही फळ व बिया जास्त विषारी असतात. या बियांमध्ये लिव्होहायोसॅमीन, हायोसीन वा स्कोपोलामीन तसेच अ‍ॅट्रोपीन नावाचे घटक असतात. बिया व फळे खाल्ल्याने व्यक्ती हाडासारखी शुष्क, बीटासारखी लाल, गरम व भिजवलेल्या कोंबडीसारखी वेडपट बनते; असे गमतीने म्हटले जाते. या विषबाधेत घसा व तोंड कोरडे पडते, बोलता येत नाही, गिळता येत नाही, बुब्बुळे मोठी झाल्याने नीट दिसत नाही, माणूस दारू प्यायल्यासारखा चालतो, झोपाळू बनतो, विचित्र वर्तन करतो. १०० ते १२५ बिया खाल्ल्यास प्रौढ व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. वर उल्लेखलेली लक्षणे पाहिल्यावर चोर याचा का उपयोग करत असतील हे लक्षात यायला वेळ लागणार नाही. पानातून, खाद्यपदार्थातून वा द्रवपदार्थातून या बियांची पावडर दिल्यास त्या व्यक्तीत उपरोक्त लक्षणे दिसून येतात. त्यांच्या जवळच्या वस्तू पळवणे मग खूप सोपे असते. बरं, त्यानंतर त्यांना धड सुसंबद्धपणे काही बोलू शकत, ना नीट चालू शकत. क्वचित प्रसंगी दारू प्यायलाय असे वाटून लोक वा पोलीसही त्याच्याकडे दुर्लक्षच करतात. म्हणूनच हुशार चोर या विषाचा वापर करतात व पलायन करतात. अशा विषबाधेमध्ये पोटात गेलेले विष उलट्या करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. दवाखान्यात नळीने पोटात पोटॅशियम परमँगनेट वा टॅनिक अ‍ॅसिड टाकून नंतर पोटातील विष त्याच नळीने बाहेर काढले जाते. निओस्टीग्मीनसारखे विशिष्ट औषधही उपयोगी ठरते. आता लक्षात आले का, आई-बाबा असे का सांगतात की, प्रवासात कोणी काही दिले तर खाऊ नका ते?

सुविचार

फुलाच्या पाकळ्या तोडणार्‍याला फुलाचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

आरोग्यदायी गुळाचा चहा

हिवाळ्यात गुळाचा चहा आरोग्यदायी
हिवाळ्यात गुळाचा चहा पिण्याने
रक्तातील मेटाबॉल्जिम व्यवस्थित राहण्यास
मदत मिळते. गुळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध
होते. तसेच रक्तातील मेटाबॉल्जिम व्यवस्थित
राहण्यास मदत होते. तसेच रक्ताशी संबंधित
सर्व आजार नष्ट होण्यास मदत होते. विशेष
म्हणजे गूळ रक्तामध्ये लगेच मिसळत नाही.
त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.
सर्दीपासून मिळते मुक्ती. गूळ हा उष्ण पदार्थ
आहे.
त्यामुळे हिवाळ्यात गुळाचा चहा
प्यायल्याने थंडी वाजत नाही. तसेच त्यामुळे
हिवाळ्यात थंडीमुळे होणार्‍या सर्दी-पडशापासून
आपला बचाव होतो. हिवाळ्यात नाक बंद
झाल्यास गुळाचा चहा प्यावा. त्यामुळे तुम्हाला
नक्की फायदा होईल.

गुजराथी मैसूर

गुजराथी मैसूर

साहित्य – बेसन पीठ एक कप, साखर
पाऊण कप, तूप दीड कप, पाणी पाकासाठी
एक तृतीयांश कप, दूध एक टेबलस्पून, तूप,
रवा काढण्यासाठी दोन चहाचे चमचे, एक
चमचा वेलदोडे.
कृती – दूध व दोन चमचे तूप एकत्र
करून डाळीच्या पिठाला हाताने चोळावे.
रव्याच्या चाळणीने चाळावे. एक कप पिठाचे
अर्धा कप रवा होतो. मेसूर दुपारी करावयाचा
असेल तर सकाळी असा रवा करून घ्यावा.
मैसूर करावयाच्या वेळी प्रथम हा रवा दोन
चमचे तुपावर गुलाबी भाजावा. साखरेचा
दोनतारी पाक करावा. त्यात भाजलेला रवा
घालून दोन मिनिटे ढवळावे. मग त्यावर
कडकडीत गरम केलेल्या दीड कप तुपाची
धार करून मिश्रण ढवळत राहावे. थोडा
वेळाने मिश्रण पितळी चाळणीत ओतावे.
त्यावर गार पाण्याचे शिंतोडे शिंपडावे म्हणजे
जाळी चांगली सुटते. वड्या कापून कोमट
असतानाच काढाव्यात.