ओव्हन चॉकलेट वड्या
साहित्य – दूध एक कप, साखर एक
कप, ड्रिंकिंग चॉकलेट किंवा कोको पाव कप,
लोणी पाव कप, कॉर्नफ्लोअर किंवा आरारूट
पाव कप, काजूपूड पाव कप, साखर पिठी
दोन टेबलस्पून.
कृती – दूध, साखर, कोको, लोणी,
कॉर्नफ्लोवर एकत्र करून मंद विस्तवावर
ठेवावे. सारखे ढवळावे. घट्ट होऊ लागले की
विस्तव मध्यम ठेवावा. मिश्रण पातेल्यापासून
सुटू लागले व थर्मामीटरवर ११० सें.ग्रे.
तपमान झाले की खाली ते उतरवून खूप
घोटावे. ताटात पसरावे. वाटीने गुळगुळीत
करून वड्या कापाव्या. आवडत असेल तर
वरती पांढरी वर्खाचा कागद चिकटवावा.