दैनिक पंचांग शनिवार, दि. २९ जून २०२४

0
132

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ कृष्णपक्ष, उ.भा.०८|४९
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल.

वृषभ : स्थायी संपत्ती संबंधी कामांना आज टाळा. दिवस सामान्य जाईल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या.

मिथुन : व्यापारात कर्मचार्‍यांवर जास्त विश्वास ठेऊ नका. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वृद्धि योग. आरोग्य नरम-गरम राहील.
राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. आरोग्य नरम-गरम राहील.

कर्क : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व
जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील.

सिंह : सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील.

कन्या : वाणी प्रभावामुळे लोकांना आपले मत पटवून द्याल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता ठेवाल.

तूळ : लांबच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी कळू शकेल. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता.

वृश्चिक : आर्थिक स्थिति चांगली राहील. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा. आपल्या सहकार्‍यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा.

धनु : धार्मिक कामात मन रमेल. शैक्षणिक क्षेत्रात येणार्‍या अडचणी संयमाने सोडवा. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी ठरेल.

मकर : ज्ञान, आध्यात्माच्या उच्चस्तरीय कामात गूढ अनुसंधान योग. नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ साधाल.

कुंभ : कर्मकांड अध्यात्म संबंधी कामात मन रमेल. कर्जाची चिंता कमी होईल. प्रेम संबंधात यश प्राप्ति. आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.

मीन : संबंधांना महत्व द्या. नवीन कार्ययोजनेचे प्रबळ योग. व्यापार व्यवसाय मध्यम राहील. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. काही नवीन संधी मिळतील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर