पाककला

0
22

पाकातले चिरोटे


साहित्य – अर्धा किलो मैदा, पाव किलो साखर, चवीपुरते मीठ, अर्धी वाटी डालडा, पाणी, अर्धा लिटर दूध, तळण्यासाठी तेल. पाव वाटी तांदळाची पिठी, बेकींग पावडर.

कृति – प्रथम मैदा चाळून घ्यावा. त्यात डालडा गरम करून पाव वाटी घालावे. पाव चमचा बेकींग पावडर मीठ घालून दूध घालावे व चपातीच्या कणकेप्रमाणे भिजवावे. नंतर एका ताटात उरलेला डालडा व तांदळाची पिठी फेसून ठेवणे. नंतर मैद्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करणे व लाटणे व प्रत्येक चपातीला तांदळाची फेसलेली पिठी लावून एकावर एक
ठेवणे व वळकटी करणे व गोल-गोल काप करावेत व ते गोल काप अलगदपणे लाटावेत. नंतर तेलात तळून काढणे व पाकात सोडणे. पहिले तळलेले पाकात टाकणे व दुसरे तळून होईपर्यंत ते पाकात मुरवत ठेवणे. अशा प्रकारे
सर्व चिरोटे तयार.