जंतूचा शोध कुणी लावला?

0
72

जंतूचा शोध कुणी लावला?

१८६० च्या आधी कोणालाच जंतू म्हणजे काय याची माहिती नव्हती. रोग कशामुळे होतात, याबद्दलचे अनेक समज प्रचलित होते. देवाचा कोप, भूत-प्रेत यांची बाधा, जादूटोणा अशा अनेक कारणांचा यात समावेश होता. त्यामुळे रोगांवरचे उपाय हे दैवाची आराधना करणे, बळी देणे, मांत्रिकाकडून भूत उतरवणे, गळ्यात ताईत-गंडे बांधणे आणि गावातच कुणाला औषधी वनस्पतीबद्दल माहिती असेल तर त्याच्याकडून उपचार करून घेणे-याप्रकारचे असत. आपल्या देशातील आयुर्वेद उपचार पद्धतीतील त्रिदोष संकल्पनेनुसार खूप पूर्वीपासून उपचार केले जातात. सर्वप्रथम १८६० मध्ये लुईस पाश्चर या फ्रेंच सूक्ष्म जीवशास्त्रज्ञाने ‘हवेत जिवाणू असतात’ हे दाखवून दिले. त्यामुळे रोग का होत असावेत याचा नवीन विचार सुरु झाला. पाश्चरने रोगजंतूमुळे रोग होतात, या संकल्पनेचा विकास व पाठपुरावा केला. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने १८७७ मध्ये अँथ्रँस हा रोग जिवाणूपासून होतो हे दाखवून दिले. यानंतर सूक्ष्म जीवशास्त्राचे सुवर्णयुग सुरू झाले व एकामागे एक अनेक जीवजंतूंचा शोध लागला. या जंतूंचे जिवाणू इरलींशीळर व विषाणू तर्ळीीी हे दोन प्रकार पडतात. यापैकी विषाणू केवळ इलेट्रॉन सूक्ष्मदर्शिकेखालीच दिसू शकतात. जिवाणू मात्र साध्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली सुद्धा दिसतात. आकारातील बदलाखेरीज त्यांच्यात पुष्कळ फरक असतात. कॉलरा, टायफॉईड, क्षयरोग हे जिवाणूंमुळे होणारे रोग आहेत; तर पोलिओ, कावीळ, गोवर, गालफुगी हे रोग विषाणूंमुळे होतात. जिवाणूंना मारणारी प्रभावी औषधे आजकाल उपलब्ध आहेत पण विषाणूंना मारतील अशी प्रभावी औषधे आजही उपलब्ध नाहीत.