पती-पत्नीतील सौहार्दासाठी

पती-पत्नीतील सौहार्दासाठी
* स्टडी टेबल भिंतीला चिकटलेले
असावे व त्याचे बुकशेल्फ बंद असावे.
* शयनगृहात पाणी असणारी वस्तू
म्हणजे माशांचा टँक किंवा झर्‍याचे वा
समुद्र किनार्‍याचे चित्र असता कामा नये.
यामुळे पती-पत्नीच्या आपसातील संबंधांवर
खूपच वाईट परिणाम होतात. जर आपल्या
शयनगृहात पाण्याचे भांडे वा चित्र असेल तर
तेथून उचलून दूर ठेवावे.
* बेडरुममध्ये शोभिवंत झाडे किंवा
मनीप्लँट लावण्याची फॅशन सध्या बोकाळली
आहे. ते प्रसंगी अतिशय घातक ठरते आणि
म्हणूनच ते टाळणेच श्रेयस्कर म्हणतात ना,
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन युअर.

मानेवरील त्वचा साफ करण्यासाठी

* नियमितपणे टोमॅटोचा ताजा रस
प्यावा आणि तो चेहर्‍यावर चोळावा. दहा
मिनिटांनी चेहरा धुवावा. यामुळे त्वचेचे आरोग्य
सुधारण्यास मदत होते.
* रोज सकाळ, संध्याकाळ कच्चे
दूध मानेला चोळल्याने मानेवरील त्वचा साफ
आणि नितळ दिसते.

पनीर दोन-तीन दिवस ताजे राखता येते

* उकळलेली चहा पावडर थोडेसे
पाणी टाकून उकळा व आरसे-काचा साफ
करायला वापरा
* पनीर ताजे राहण्यासाठी पनीर
पाणी भरलेल्या वाटीत ठेवावे. पाणी रोज
बदलावे. यामुळे पनीर दोन-तीन दिवस
ताजे राखता येते.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

तिकीट तपासणीस गाडीत आला.
‘आपलं तिकीट दाखवा’. तो एका प्रवाशाला म्हणाला.
‘ही घ्या दोन तिकिटं!’
‘तुमच्याबरोबर आणखी कोण आहे?’
‘कुणी नाही. मी एकटाच आहे.’
‘मग हे दुसरं तिकीट कोणासाठी?’
‘एक तिकीट हरवलं तर दुसरं असावं म्हणून.’
‘आणि जर दोन्ही हरवली तर?’
तर बचावासाठी हा काय पास काढून ठेवलाय!…’

दैनिक पंचांग रविवार, दि. १४ जुलै २०२४

चित्रा २२|०७, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, आषाढ शुलपक्ष,
दुर्गाष्टमी, सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

मेष : आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर बराच वेळ व्यतीत कराल.

वृषभ : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. चांगले भोजन मिळेल. मौजम
जेत दिवस व्यतीत होईल. आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. भूमी, घर विकत घेण्याचे योग.

मिथुन : ठरविलेले कामे पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल.

कर्क : आजचा दिवस आपल्या कार्य- योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. काळजीपूर्वक कार्य करा. आरोग्यात सुधारणा. मानसिक स्थिती उत्तम राहिल.

सिंह : बेपर्वाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. सामाजिक क्षेत्रात घवघवीत यश प्राप्त होईल.

कन्या : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

तूळ : आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल.

वृश्चिक : अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेटची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा.

धनु : आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आपल्या उतावीळ स्वभावाला आज नियंत्रीत करावे. पत्नीकडून उत्तम वैवाहिक सुख प्राप्ती होईल.

मकर : महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. मुले व पत्नीचा सहवास लाभेल.

कुंभ : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात.
वाहने व यांत्रिक उपकरणे सावधगिरीने हाताळावीत.

मीन : आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. मंदावेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

केस कापताना दुखत नाहीत पण ओढल्यावर दुखतात?

केस कापताना दुखत नाहीत पण ओढल्यावर दुखतात?

सलूनमध्ये कटींगला गेल्यानंतर तुमच्यापैकी सगळ्यांनीच हा अनुभव घेतलेला असेल. न्हावी सराईतपणे त्याची कात्री तुमच्या केशसंभारावर चालवत असतो आणि बिचारे (!) केस धारातीर्थी पडत असतात. पण लहानपणी तुम्ही डोके हलवत असाल आणि त्यामुळे केस ओढले जाऊन तुमच्यावर ‘आईऽऽगं’ असा चित्कार काढण्याची वेळ नक्कीच आली असेल. केस कापताना दुखत नाहीत, पण ओढल्यावर दुखतात; याचा अनुभव तुम्ही घेतलाच आहे, असे का होते ते पाहू. त्वचेतून केस बाहेर येतो. केस वाढण्याच्या अवस्थेतील न वाढ थांबलेले असे दोन प्रकार असतात. डोयाच्या एक लाख केसापैकी सुमारे १० टक्के केस वाढ थांबलेल्या प्रकारचे वा जणू ‘विश्रांती’ घेणारे केस असतात. त्वचेचे बाह्यत्वचा व अंतःत्वचा असे दोन भाग असतात. बाह्यत्वचेमध्ये पेशींचे पाच थर असतात. मात्र बाह्यत्वचेमध्ये रक्तपुरवठाही नसतो आणि मज्जातंतूही नसतात. पोषण आणि संवेदना यांसाठी हा थर अंतःत्वचेवरच अवलंबून असतो.

अंतःत्वचा जोडपेशी आणि सूक्ष्म तंतूमय भाग यांनी बनलेली असते. यात रक्तप्रवाहासाठी केशवाहिन्यांचे जाळे, संवेदनेसाठी मज्जातंतू आणि घाम निर्माण करणारी केशमुळे असतात. त्वचेच्या बाहेर दिसणारा केस हा या केशमुळातूनच बाहेर पडलेला असतो. केसाचे मूळ, खोड व टोक असे तीन भाग असतात. केसाच्या बाहेरच्या भागात केरॅटीनचा गोलाकार थर असतो. त्याच्या आतील भागात केरॅटीनचे उभे तंतू असतात व येथेच केसांचा रंग ठरवणारे रंगद्रव्य असते. सर्वात आतील थर खूप अरूंद असतो व कधीकधी नसतोच. वरील वर्णनावरून तुमच्या लक्षात येईल की, केसाच्या अंतःत्वचेमधील भागातच (केशमूळ) जिवंत पेशी असतात. तसेच अंतःत्वचेतच मज्जातंतूही असतात. बाह्यत्वचा वा त्या बाहेरील केसांमध्ये सजीव पेशी नसतात आणि मज्जातंतूही नसतात. साहजिकच केस कापल्यानंतर दुखत नाहीत. पण ओढल्यास केशमुळाला धक्का बसतो व त्याभोवतीच्या मज्जातंतूमुळे केस दुखतात.

सुविचार

खोटी प्रशंसा अत्यंत दुःख देणारी असते. : कवी कालिदास

नैसर्गिक अँटीबायोटिक

नैसर्गिक अँटीबायोटिक

फळांमध्ये मोठ्या प्रमाणांवर ‘क’
जीवनसत्व असतं. त्यामुळे शरीरात
रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी फळं
खूप मदत करत असतात.
म्हणून तुमच्या आहारात फळांचा समावेश
नक्की करा.

पुरणाची खीर

पुरणाची खीर

साहित्य : एक किलो हरबरा डाळ,
एक किलो बारीक चिरलेला गूळ, दोन नारळ,
एक चमचा जायफळ पूड, एक मोठा चमचा
वेलची पूड, एक वाटी काजू, एक वाटी ओल्या
खोबर्‍याचे पातळ काप, एक मोठा चमचा
साजूक तूप, चवीला मीठ, पाव चमचा हळद.
कृती : हरबर्‍याची डाळ दुप्पट पाणी,
मीठ आणि हळद घालून कुकरमध्ये शिजवून
घ्यावी. नारळाचं आठ-दहा वाट्या दूध काढून
घ्यावं. डाळ आणि गूळ एकत्र करून शिजवावं.
त्यात वेलची जायफळ पूड घालावी. तुपात
काजू, खोबरं परतून तुपासकट तेही पुरणात
घालावं आणि पुरणाची खीर खाली उतरावी.
खीर पातळ हवी असल्यास थोडं साधं दूध
घालावं. खीर गार आवडत असल्यास आदल्या
दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवावी. नाहीतर
आदल्या दिवशी फक्त पुरण तयार करून
ठेवता येतं.

फिशटँकला पर्याय

फिशटँकला पर्याय

फिशटँक म्हणजेच अ‍ॅवेरियम किंवा
पाण्याने भरलेली काचेची बरणी हॉलमध्ये
अवश्य ठेवावी. ते शय नसेल, तर पूर्वे
कडील भिंतीवर गोल्डफिशचे पोस्टर लावावे.
हा सर्वोत्तम मार्ग. कारण फिशटँकमधील
माशांची काळजी घ्यावी लागते. त्यातले पाणी
बदलावे लागते. माशांना वेळेवर खाद्य लागते.
मत्स्यपालनाची पुरेशी माहिती नसेल, तर
आणल्याच्या दुसर्‍या दिवशीच मासे मरतात.