डाळ मेथ्या

डाळ मेथ्या

साहित्य : एक वाटी मेथी दाणे,
पाच वाट्या तूर डाळ, पंधरा-वीस लाल
सुया मिरच्या, अर्धी वाटी कढीलिंबाची पानं.
पंचवीस-तीस लसूण पाकळ्या ठेचून, एक
वाटी सुकं खोबरं, चवीला तिखट, मीठ, गूळ,
चिंचेचा कोळ, दोन मोठे चमचे गोडा मसाला,
फोडणीसाठी पाऊण वाटी तेल, मोहरी, हिंग,
हळद, सजावटीसाठी कोथिंबीर.
तयारी : मेथी दाणे रात्रभर पाण्यात
भिजत घालावे. सकाळी चाळणीत उपसून
फडयात बांधून ठेवावे. सात-आठ तासात
मोड येतील. तूर डाळ दोन-तीन तास भिजत
घालावी. सुकं खोबरं किसून, भाजून पूड
करावी.
कृती : भिजवलेली तूर डाळ चाळणीत
उपसावी. थोडासा पाण्याचा हपका मारून
मेथ्यांसकट कुकरमध्ये शिजवावी. शिजताना
थोडं मीठ घालावं. डाळ शिजेल तरीही संबंध
दाणा राहील. तेलाची फोडणी करून त्यात
लसूण, मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेला
कढीलिंब घालून परतून घ्यावं आणि चारय्पाच वाट्या पाणी घालावं. त्यात चवीप्रमाणे
तिखट, थोडं मीठ, चिंच, गूळ, मसाला, खोबरं
घालून उकळवावं. डाळ घालून एक उकळी
द्यावी आणि खाली उतरवावं. अंगाबरोबर रस
असावा. कोथिंबीर घालावी.

त्वचेच्या सौंदर्यासाठी

त्वचेच्या सौंदर्यासाठी
* त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी
त्वचेला मालिश करतात. यासाठी क्रीम किंवा
तेल वापरावे असे नाही, तर ऋतूप्रमाणे त्यात
बदल करावा. उन्हाळ्यात टाल्कम पावडरमध्ये
टोमॅटो, काकडी किंवा संत्रे यातील एकाचा
रस मिसळून या पेस्टने चेहरा, गळा, मान
याला चांगले मालिश करा.
* नियमितपणे टोमॅटोचा ताजा रस
प्यावा आणि तो चेहर्‍यावर चोळावा. दहा
मिनिटांनी चेहरा धुवावा. यामुळे त्वचेचे आरोग्य
सुधारण्यास मदत होते.

फ्रीजमधील खाद्यवस्तूचा वास दूर करण्यासाठी

* फ्रीजमध्ये ठेवलेल्या खाद्यवस्तूचा
वास दूर करण्यासाठी फ्रिजमध्ये लिंबू कापून
ठेवावे किंवा थोडासा बेकिंग सोडा ठेवावा.
* उन्हाळ्यात स्नानाच्या पाण्यात
लिंबाचे थोडे थेंब पिळून त्या पाण्याने स्नान
करा. दिवसभर फ्रेश राहाल.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

बेडरूमच्या भिंतींचा रंग

* बेडरूमच्या भिंतींचा रंग पतीय्पत्नीच्या चित्तवृत्ती उल्हासित करणारा असावा.
उदा. पिंक किंवा लव्हेंडर.

हसा आणि शतायुषी व्हा!

प्रवासी : काहो, पर्वती दर्शनाला कोणती बस जाते?
नागरिक : १०१ नंबरची.
प्रवासी बस मोजतो संध्याकाळ होते. तोच सकाळचा नागरिक
परत बस स्टॉपवर येतो तर तोच सकाळचा प्रवासी त्याला तिथे
दिसतो.
नागरिक : काय, अजून १०१ नंबरची बस आली नाही वाटतं?
प्रवासी : आतापर्यंत फक्त ९० बसेस गेल्यात. १० बसेस गेल्या
की १०१ नंबरची येईलच की!

दैनिक पंचांग मंगळवार, दि. १६ जुलै २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, आषाढ शुलपक्ष,
विशाखा २६|१४, सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे.

वृषभ : मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.

मिथुन : पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा.

कर्क : कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात.

सिंह : अधिक जोखमीचे कार्ये टाळा. आरोग्य नरम-गरम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

कन्या : व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका.

तूळ : धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा.

वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे. निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा.

धनु : अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. दिवस कालच्या इतका आनंदात जाणार नाही.

मकर : महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.

कुंभ : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. आनंदाची बातमी मिळेल.
कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल.

मीन : विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी येणार्‍या अडचणी दूर होतील. राजकीय व्यतीची ओळख कामी येईल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

माणसाच्या डोयाचं वजन किती असतं?

माणसाच्या डोयाचं वजन किती असतं?

माणसाच्या डोयाचं वजन किती असतं? हे तो माणूस किती जाडा किंवा भारदस्त आहे, यावर नाही का अवलंबून असणार, असं आपल्याला वाटेल; पण ते तितकंसं खरं नाही. कारण माणसाचं वजन जेव्हा वाढत जातं तेव्हा ते बहुतांश त्याच्या धडाचं असतं. त्यातही पोटाच्या आसपासच्या भागाचं वजनच जास्त वाढत जातं. पोट, मांड्या, छाती, हात या अवयवांवर चरबीचे थर जमत जातात आणि वजन वाढत जातं. ज्यावेळी अशी स्थूल व्यक्ती व्यायाम आणि मिताहार यांच्या मदतीनं आपलं वजन कमी करते, सडपातळ होते, तेव्हा तिच्या डोयाच्या आकारात तसाच लक्षणीय फरक पडल्याचं दिसतं का? त्यामुळे प्रौढ व्यक्तीच्या डोयाचं वजन फारसं वेगवेगळं नसतं, यात शंका नाही. लहान मूल आणि प्रौढ व्यती यांच्या डोयाचं वजन यांच्यात लक्षणीय फरक आढळून येईल, कारण त्या मुलाची संपूर्ण वाढ झालेली नसते. त्याच्या सगळ्याच शरीराची प्रमाणबद्ध वाढ होते. त्यामुळे डोयाचा आकार आणि त्याचं वजनही वाढत जातं. तरीही नुसत्याच डोयाचं वजन कसं करायचं? असा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहील. कारण, धडापासून फक्त डोकं अलग करून त्याचं वजन कसं करायचं? फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात गिलोटीननं शिरच्छेद करण्यात येत असे. त्या वेळी अशा धडापासून अलग होऊन पडलेल्या डोयांचं वजन केलं गेलं असतं तर कदाचित त्याविषयीची अचूक माहिती देण्याचं श्रेय त्या राज्यक्रांतीच्या प्रणेत्यांना देता आलं असतं. आता ते द्यायला हवं ‘न्यू सायंटिस्ट’ या नियतकालिकाच्या संपादकवर्गाला, कारण त्यांनी डोयाचं वजन टक्कल पडलेल्या एकाची या प्रयोगासाठी निवड केली. त्यानंतर त्यांनी एक बादली पाण्यानं काठोकाठ भरली. त्या पाण्याचं तापमान जवळजवळ शून्य अंश सेल्सिअस असेल; पण तरीही ते पाणी गोठलेलं नसेल, याची खातरजमा करून घेतली. ती बादली त्यांनी एका भल्या मोठ्या परातीत ठेवली. त्यानंतर त्या सहकार्‍याचं डोकं उलटं धरून हनुवटीपर्यंत पुरतं बुडेल अशी व्यवस्था केली. त्या सहकार्‍याला आपला श्वास रोखून धरायला सांगण्यात आलं होतं. त्याचं डोकं पाण्यात बुडल्याबरोबर त्या डोयाच्या आकारमानाइतकं बादलीतलं पाणी बाजूला सारलं गेलं. हे आर्किमिडीजच्या तत्वानुसारच होतं. बादलीतून बाहेर पडलेलं पाणी परातीत साठवल्यामुळे ते गोळा करून त्याचं आकारमान मोजलं गेलं. ते त्या डोयाच्या आकारमानाइतकं असल्यानं त्याचं मोजमाप मिळालं. आता डोयात कवटीचा भाग सोडल्यास मुख्यत्वे मेंदुसारखा मऊ अवयवच असतो. त्यातही पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे डोयाची घनताही शून्य अंश सेल्सियस इतकं तापमान असलेल्या पाण्याइतकीच असावी, हे गृहीत धरून त्यांनी डोयाचं वजन गणितानं शोधून काढलं. ते ४.२५ किलोग्रॅम भरलं.

सुविचार

पात्रतेशिवाय केलेली प्रशंसी म्हणजे छुपी मस्करीच होय.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी

डोळ्यांच्या आरोग्यासाठी
अ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक
भाजी खाल्ल्याने डोळ्यांचे स्वास्थ्य चांगले
राहते. तसेच रातांधळेपणा या विकारावर
पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे.
पालकाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
अंगावर गाठ येऊन सूज आली असेल, तर
अशा वेळी पालकच्या पानांचे पोटीस गरम
करून त्या जागी बांधावे.

पालक भात

 

पालक भात
साहित्य : चार वाट्या बासमती तांदूळ,
पालकाच्या दोन जुड्या, दोन वाट्या बारीक
चिरलेला कांदा, पंधरा-वीस लसूण पाकळ्या,
पाव किलो पनीर, एक मोठा चमचा लिंबाचा
रस, एक चमचा तिखट, एक मोठा चमचा
आल्याचा कीस, एक मोठा चमचा हिरव्या
मिरचीचा ठेचा, एक वाटी भिजलेले शेंगदाणे,
चवीला मीठ, एक मोठा चमचा गरम मसाला,
अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी तूप, एक मोठा
चमचा शहाजिरं.
तयारी : तांदूळ धूऊन ठेवावेत. पालक
निवडून धुऊन बारीक चिरावा. पनीरचे तुकडे
करून त्यांना मीठ, तिखट लिंबाचा रस लावून
ठेवावा.
कृती : तूप तापवून शहाजिरं घालावं
आणि धुतलेले तांदूळ परतावे. सहा वाट्या
उकळतं पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून
भात शिजवून घ्यावा. भात मोकळा करून
पसरावा आणि त्यावर गरम मसाला घालून
भात कालवून घ्यावा. तेल तापवून त्यात
लसूण परतावा. आलं मिरची घालून परतावं.
कांदा घालावा. कांदा परतून झाल्यावर पालक
घालावा. झाकण न ठेवता शिजवून घ्यावा.
पनीरचे तुकडे मसाल्यासकट घालून भाजी
कोरडी झाली की त्यात भात घालून हलया
हातानं ढवळून एक वाफ द्यावी.