नगरमध्ये बांगलादेशी घुसखोरांना कागदोपत्री आश्रय देणाऱ्या सेतू चालकांवर कारवाई करावी

नगर – नगर शहरात अनेक सेतू केंद्रे हे जिहादी वृत्तीच्या सेतू चालकांकडे आहेत जे नगर शहरासह आजू बाजूच्या परिसरात बांगलादेशी रोहिंग्यांना कागदोपत्री आश्रय देत आहेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात आ. जगताप यांनी म्हंटले आहे की, हे सेतू चालक या बांगलादेशी रोहिंग्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्राइव्हिंग लायसेन्ससह रेशन कार्ड देखील काढून देत आहेत. ज्यात तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग चिरीमिरीसाठी या सर्व कागदपत्रांना मंजुरी देत आहेत. हा सर्व प्रकार गंभीर असून आपण स्वतः यात जातीने लक्ष घालून बांगलादेशी रोहिंग्यांना कागदोपत्री आश्रय देणारे जे कोणी जिहादी वृतीचे सेतू चालक असतील अश्या सर्वांची कारवाई करून सेतू केंद्रे रद्द करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.

आपल्या देशात बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली असून महाराष्ट्र व त्यातल्या त्यात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात घुसखोर अधिक वाढल्याचे दिसून आहेत. नुकतेच पुण्यात स्वारगेट परिसरात एका बांगलादेशी घुसखोराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड सह मतदान कार्ड व ड्रायव्हिंग लायसेन्स देखील सापडले आहे. मालेगाव मधे एका घुसखोरास नकली जन्म दाखला दिल्याप्रकरणी तहसीलदारावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे, तसेच आपल्या अहिल्यानगर शहरात गेल्या काही महिन्यांपुर्वी जिहादी वृत्तीच्या सेतु चालकांमार्फत नकली शिक्के व बोगस आधारकार्ड बनवुन देण्याचा धक्का दायक प्रकार समोर आला होता. ज्याचा गुन्हा तोफखाना पोलिस स्टेशन येथे दाखल आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना नगर शहरात सेतू चालकांकडून असे गंभीर प्रकार घडत आहेत, ते थांबवा असे आ. जगताप यांनी म्हंटले आहे. यावेळी त्यांच्या समवेत सुरेश बनसोडे, सिद्धार्थ आढाव, सृजन भिंगारदिवे, ओंकार घोलप, गणेश कांबळे आदी उपस्थित होते.

निंबळक जवळील रेल्वेचा जुना पत्री पुलाच्या जागी नवीन पुल उभारण्याचे काम अखेर पूर्ण

नगर – एप्रिल २०२४ पासून दौंड-मनमाड हा रेल्वे मार्ग सोलापूर विभागातून पुणे विभागात वर्ग केल्यापासून या मार्गावर अनेक चांगले बदल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहेत. हा मार्ग संपूर्ण विद्युत करण्यात आलेला असून दुहेरीकरणाचे काम सुद्धा पूर्ण होण्याच्या मार्गावर असून या मार्गावरील रेल्वे आता पहिल्यापेक्षा जलद गतीने धावताना दिसून येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून निंबळक रेल्वेगेट क्रमांक ३० व निंबळक रेल्वे स्टेशन दरम्यान असलेला ब्रिटिश काळात उभारण्यात आलेला खूप जूना व ऐतिहासिक असलेला खारा नाल्यावरील संपूर्ण लोखंडी पूल अर्थात पत्री पूल म्हणून प्रसिद्ध असलेला पूल खूप जुनाट व धोकादायक झाल्यामुळे तो हटवून त्या ठिकाणी आधुनिक बनावटीचा सिंमेट काँक्रीटीचा मजबूत असा पूल उभारण्यात आला. येथील काम करण्यासाठी ४ दिवस अगोदरच तयारी करून त्या ठिकाणी अत्याधुनिक ३ मोठे क्रेन, ३ जेसीबी, २ पोकलेन, २ डंपर, खडी, स्लीपर व रेल्वे रुळ, पाण्याचा एक ट्रॅक्टर, गॅस कटर, वेल्डिंग, २ कंटेनर, १ टेम्पो, जवळपास शंभर पेक्षा जास्त रेल्वेतील व ठेकेदाराकडिल कर्मचारी, रेल्वेतील अभियंते, विद्युत विभागातील कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, या ठिकाणी उपस्थित होते. या कामासाठी मध्य रेल्वेकडून रविवार असल्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ३ पर्यंत मेगा ब्लॉक घेतला असल्याचे दिसून आले. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील सर्व गाड्यांचे येणे-जाणे सुरळीत सुरु झाले. निंबळक बायपास ने जाणाऱ्या येणाऱ्या अनेक लोकांनी आपली वाहने थांबवून मोठ-मोठ्या क्रेन च्या सहाय्याने सुरु असलेल्या पूल उभारणी कामाची कुतूहलाने पहाणी केली.

कॉटेज कॉर्नर येथे हिंदू महिलांना मारहाण करणाऱ्या जिहादी लोकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा

]

आ. संग्राम जगताप यांची मागणी

नगर – सिद्धार्थ नगर मधील हिंदू महिलांवर नागापूर कॉटेज कॉर्नर परिसरामध्ये जिहादी लोकांनी अमानुषपणे मारहाण केली. या घटनेतील इतर आरोपींना अटक करून सर्व आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी तोफखान्याच्या पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.

सिद्धार्थ नगर मधील हिंदू महिलांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आ. संग्राम जगताप यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन उपचार घेत असलेल्या महिलांची भेट घेत विचारपूस केली. मारहाण झालेल्या या महिला दिवसभर कष्ट करून उदरनिर्वाह करत असतात. काम केले तरच संध्याकाळची चूल पेटत असते, अशा हिंदू महिलांना त्यांची जात पाहून जिहादी लोकांकडून अमानुषपणे मारहाण करण्याचे काम केले आहे. हिंदू महिलांवर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आ. जगताप यांनी दिला. ‘सिव्हील’ मध्ये रुग्णांना चांगली आरोग्य सेवा द्या सिव्हील हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभारामुळे लाल टाकी येथील ४० वर्षीय सनी बोरुडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला वेळेवर उपचार मिळाले नाही. आदल्या दिवशी घशाच्या त्रासाने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारे उपचार करण्यात आले नाही, त्याच्या नातेवाईकांशी कोणत्याही डॉक्टरांनी साधी चर्चाही देखील केली नाही. ही बाब तेथे उपस्थित काहींनी आ. जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली. रुग्णांवर उपचारादरम्यान दिरंगाई होते या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचे मशिनरी असून देखील रुग्णांना त्याचा उपयोग होताना दिसत नाही. डॉक्टर अधिकारी कर्मचारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचा मृत्यू होतो, त्याचबरोबर युवकांना देखील आपला जीव गमावा लागतो, ही बाब चांगली नाही सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आ. जगताप यांनी दिल्या.

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका झेंडीगेट परिसरात पोलिसांची कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

 

नगर – कत्तल करण्याचे उद्देशाने पत्र्याचे शेडमध्ये दोरीने बांधुन ठेवलेल्या २ गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांच्या पथकाने सुटका केली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील झेंडीगेट परिसरात आर. आर.बेकरी जवळ ८ फेब्रुवारीला पहाटे १ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

या बाबतची माहिती अशी की झेंडीगेट येथील बेकरी जवळ राजु कुरेशी यांचे बंद पत्र्याचे शेडमध्ये काही गोवंश जनावरे डांबून ठेवलेली आहेत व त्यांची कत्तल केली जाणार आहे, अशी माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी तेथे पहाटेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे पोलिसांना काही गोवंश जनावरे दोरीने बांधुन ठेवलेले, तसेच त्यांच्या चारापाण्याची सोय सुविधा नसल्याचे दिसुन आले.पोलिसांनी तेथून २ जर्शी गायींची सुटका केली. या कारवाईत राजु कदीर कुरेशी, आणि गुड्डु कदीर कुरेशी यांना ताब्यात घेतले.त्यांच्या विरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात भा. न्या. सं. २०२३ चे कलम २७१ सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन १९७६ चे कलम ५ (क) ९ (अ) तसेच प्राण्याना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अंमलदार संदीप पितळे, सुरज कदम, दिपक रोहकले, तानाजी पवार, संकेत धीवर, राहूल शिंदे यांनी केली.

नगर तालुक्यात बिबट्याच्या भीतीने शेतीची कामे खोळंबली, पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके करपण्याची शक्यता

नगर – नगर तालुक्यात अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला असल्याने त्याच्या भीतीने शेतकरी, शेतमजूर रात्रीच नव्हे तर दिवसाही शेतात जायला घाबरू लागले आहेत, त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाल्याचे चित्र गावागावात दिसत आहे. परिणामी पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली गहू, हरबरा, ज्वारीची पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे शेतात जावे तर बिबट्याची भीती आणि नाही जावे तर पिकांचे नुकसान या दुहेरी संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे.

नगर तालुक्यातील कामरगाव परिसरात काळ्याचा डोंगर, विठ्ठलवाडी, शहा डोंगर, कामरगाव व पिंपळगाव कौडा गावच्या शिवेचा परिसर या भागात दररोज कुठेना कुठे बिबट्या दिसत आहे. ७ फेब्रुवारीला रात्रीही एका शेतकऱ्याला शेतात बिबट्या दिसला. त्याने त्याचा व्हिडीओ ही मोबाईल मध्ये काढून वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठविला आहे.

सारोळा कासार च्या बारेमळा परिसरातही गेल्या ३-४ दिवसांपासून एक मादी बिबट्या आणि त्याचे २ बछडे शेतकऱ्यांच्या नजरेस पडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मळ्यात राहणारे शेतकरी व त्यांचे कुटुंबीय सायंकाळ नंतर घराबाहेर पडायला घाबरत आहेत. अनेक जण रात्रीच नव्हे तर दिवसही शेतात जायला धजावत नाहीत. त्यामुळे या परिसरातही शेतीची कामे ठप्प आहेत.

अशीच परिस्थिती भोरवाडी गावच्या परिसरात भोरवाडी ते चास रस्त्यावरील डोंगर भागात आहे. याशिवाय मेहेकरी, बारदरी व चांदबीबी महालालगत असलेली गावे, जेऊर, ससेवाडी, चापेवाडी, मांजरसुंबा, विळद या परिसरातही बिबट्यांचा वावर असल्याने याचा परिणाम आता शेती व्यवसायावर झाला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतमजूर कामावर यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.

बिबट्यामुळे एकीकडे नागरिक घाबरले असताना विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली जात नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे उपलब्ध केले जातात पण त्यात ठेवलेल्या भक्षाची सर्व व्यवस्था परिसरातील शेतकऱ्यांनाच करावी लागत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

आई-वडीलांची सेवा केल्यावर देव भेटणारच… ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांचे प्रतिपादन; श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व पर्जन्येश्वर महादेव मंदिर यांच्या वतीने किर्तन सोहळा

 

नगर – जन्म, मृत्य, निसर्ग हे देवाच्या हातात आहे. पण जन्म आणि मृत्य यांच्या मधला जो काळ आहे. तो मानवाच्या हातात आहे. त्याला तीन टप्पे आहेत, पहिला बालपण, दुसरा तरुणपण व तिसरा म्हतारपण.

बालपण हे आई-वडीलांनी दिलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. तरुणपण हे तुमच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हतारपण हे केलेल्या पुण्याईवर अवलंबून आहे. देवाची पुजा केल्यावर देव मिळेलच अस नाही, पण आई-वडीलांची सेवा केल्यावर देव भेटणारच यात मात्र शंका नाही. संपत्ती मिळाल्यावर

सुख मिळेल, पण समाधान मिळेलच अस नाही, पण समाधान मिळाल्यावर देव मिळेलच यात शंका नाही, असे आपल्या किर्तनातून ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांनी सांगितले.

दातरंगे मळा येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व पर्जन्येश्वर महादेव मंदिर आयोजित किर्तन सोहळ्यात ह.प.भ इंदोरीकर महाराज बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे, भिमराज दातरंगे, अनिल दातरंगे, ठकाराम दातरंगे, गुलाब दातरंगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप दातरंगे, अशोक दातरंगे, सुरेश दातरंगे, दत्ता दातरंगे, गणेश दातरंगे, अशोक आगरकर, रमेश आगरकर, स्वप्निल दातरंगे, बाबा दातरंगे, चंद्रकांत दातरंगे, बंडू दातरंगे, बाळासाहेब दातरंगे, भरत आगरकर, रोहिदास दातरंगे, दिलीप दातरंगे, सोनू दातरंगे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी

महापौर रोहिणीताई शेंडगे, संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, जिल्हापमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभापती गणेश कवडे, गटनेते संजय शेंडगे, सहसचिव

विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, शाम नळकांडे,

सचिन शिंदे, संतोष ग्यानप्पा, परेश लोखंडे, अजय चितळे, अनिल बोरुडे, संजय चोपडा, सुरेश तिवारी, महेश लोंढे, अरविंद शिंदे, दत्ता कावरे, विष्णु फुलसौंदर, सूरज जाधव, सुनिल त्रिपाठी, संजय शेळके, विठ्ठल जाधव, संजय सांयगावकर, रमेश खेड़कर, अरुण झेंडे, अशोक दहीफळे, शंकर

ठाणगे , राजमल मुनोत, बबन खरमाळे, देवराम मेहेत्रे आदी उपस्थित होते.

यावेळी संदिप दातरंगे म्हणाले की, आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध

समाजोपयोगी उपक्रम राबवित असतो. त्यामध्ये धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, क्रिडा विषयक, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, नागरीकांना मदतीचा हात आदींच्या माध्यमातून जनसेवा करत आहोत. सुखी जीवन

जगण्यासाठी संतांचे विचार आपल्या सोबत असायला हवे. तसेच नागरीकांना संतांचे विचार समजावे, त्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वार्षिक सभेत सेवानिवृत्तांच्या प्रश्नांवर चर्चा

नगर राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहिल्यानगर विभागाची वार्षिक सभेत सेवानिवृत्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयाच्या सभागृहात विभागीय सचिव गोरख बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुनिलराव कोल्हे, माजी बँक संचालक डी.जी. अकोलकर, माजी वाहतूक निरीक्षक राजेंद्र माने, नवनिर्वाचित राज्य केंद्रीय सदस्य बलभीम कुबडे आदींसह सभासद उपस्थित होते. संघटनेचे मयत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहून बैठकीला प्रारंभ करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे याची राज्य केंद्रीय सदस्यपदी निवड झाल्यामुळे रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्ष पदावर तारकपूर आगाराचे माजी वाहक गंगाधर कोतकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वार्षिक हिशोब, सेवानिवृत पास पेन्शनबदल संघटनेचे सुरु असलेल्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. बलभीम कुबडे म्हणाले की, शंभर सभासदांची नोंदणी झाल्यामुळे राज्यात नगर विभागाचा तिसरा क्रमांक आल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. पुढील काळात सेवानिवृत्ती पास एक वर्षाचा व सर्व बसेसमध्ये त्याचा लाभ मिळण्यासाठी केंद्रीय सदस्यांच्या बैठकीत विषय मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सर्वांच्या सहकार्यामुळे केंद्रीय सदस्यपदी काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी संघटनेच्या माध्यमातून सेवानिवृत्तांच्या प्रश्नावर सुरु असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केला. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष गंगाधर कोतकर यांनी पुढील काळात सर्व पदाधिकारी यांना बरोबर घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अण्णासाहेब आंधळे यांनी प्रलंबीत प्रश्न सुटण्यासाठी व संघटना वाढीसाठी भावनिक आवाहन केले. शेवगांव आगाराचे के. के. जाधव यांनी स्वतः कोणत्या पदाची अपेक्षा न ठेवता एसटीच्या सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. गोरख बेळगे म्हणाले की, अत्यंत कमी असणाऱ्या पेन्शनमध्ये एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा औषधांचा देखील खर्च भागत नाही. त्यांना सन्मानाने जगण्यासाठी महागाईचा विचार करता योग्य पेन्शन मिळण्याची गरज आहे. यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नावर २०१६ ते २०२४ मधील कामगार करारातील फरकाच्या रक्कमा लवकर मिळणे बाबत मुठाळ यांनी आपली मागणी मांडली. माजी वाहक एकनाथ औटी यांनी कर्तव्य कवितेतून सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब चव्हाण यांनी संघटनेचे पदाधिकारी सभासदाच्या पाठपुराव्याने अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे विशद केले. सूत्रसंचालन अर्जुन बकरे यांनी केले. यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संघटनेसाठी नेहमीच सहकार्य करणारे कॉ. आनंदराव वायकर यांचे आभार मानण्यात आले. सदर बैठक यशस्वी होण्यासाठी विठ्ठल देवकर, खजिनदार श्रीदेवीदास डहाळे, ताकपेरे आदी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले

‘अहमदनगर जिल्हा साहित्य परिषदेतर्फे’ १० फेब्रुवारीपासून उर्दू सप्ताहाचे आयोजन

नगर – अहमदनगर जिल्ह्यात उर्दू प्रेमींच्या सहकार्याने उर्दू सप्ताह साजरा केला जाणार आहे. यात सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक सक्रियपणे सहभागी होतात. १० फेब्रुवारी रोजी उ‌द्घाटन, उर्दू भाषेच्या इतिहासाचे वर्णन.

भाषेचे महत्त्व आणि इतिहास याबद्दल माहिती प्रदान करणे. ११ फेब्रुवारी रोजी मुलांना पाठ्यपुस्तकातील कविता म्हणणे. १२ फेब्रुवारी रोजी उर्दू कॅलिग्राफी स्पर्धा, वाचन स्पर्धा. १३ फेब्रुवारी रोजी वैत बाजी आणि कविता वाचन स्पर्धा होईल.

१५ फेब्रुवारी रोजी पवित्र ग्रंथ स्तुती आणि पठण स्पर्धा. १७ फेब्रुवारी रोजी उर्दू लेखक आणि कींबद्दल माहिती. त्यांच्या नावांची यादी बनवुन आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहणे. १८ फेब्रुवारी रोजी उर्दू गीते, गझल आणि विनोदांचे पठण करने आणि ते लक्षात ठेवणे. २० फेब्रुवारी रोजी समारोप आणि पुरस्कार वितरण समारंभ घेतला जाईल असे अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे

अध्यक्ष सलीम खान पठाण यांनी सांगितले.

या सप्ताहात सहभागी होणाऱ्या मुलांचे तसेच या वर्षी ज्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत दाखल केले आहे त्यांचे विशेष स्वागत केले जाईल. सप्ताहात दररोज किंवा कोणत्याही एका दिवशी आपापल्या

शाळांमधून पदवीधर झालेले आणि उर्दू माध्यमाच्या पलीकडे उच्च शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी आणि आज समाजात चांगले पद भूषवणाऱ्या किंवा यशस्वी उद्योजकांना मुलांसमोर आमंत्रित केले जाईल आणि त्यांचे स्वागत केले जाईल, असे सचिव आबीद

दुलेखान यांनी सांगितले. या व्यतिरिक्त उर्दूच्या प्रचारासाठी योग्य वाटणारी कोणतीही कृती शाळेत करता येईल. या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळा प्रशासन समिती, शिक्षक आणि समाजातील दानशूर

व्यक्तींच्या सहकार्याने बक्षिसे दिली जाईल, असे सहसचिव डॉ. कमर सुरुर यांनी सांगितले. सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी या सप्ताहात सक्रिय असलेल्या सर्व शिक्षकांना जिल्हास्तरावर २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या समारंभात ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल, असे सलीम खान पठाण यांनी सांगितले.

हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी के. के. खान, शरफुद्दीन शेख, अन्सार शेख, नवीद मिर्झा, शाकीर अहमद शेख, इमाम सय्यद,

फैयाज शेख, शबनम खान, नर्गिस इनामदार, हनीफ शेख, नौशाद सैय्यद, अनिस शेख, बदर शेख, जमीर शेख, साजिद कुरेशी, वसीम शेख, हारुण कुरेशी, जावेद शेख, सुभान सय्यद, नाजमा शेख, तनवीर रजा शेख, मोहम्मद उमर बागवान, फिरोज खान पठाण, अरबाज पठाण, शाहनवाज गुलाम, इकबाल काकर, मुबशीर खान, शविस्ता शेख, जहीर शेख, आरिफ दस्तगीर, महमूद शेख, मुनव्वर शेख, मतीन मनियार, हुसेन मोमीन, इलियास शहा, साजिद शेख, जहीर काकर, फिरोज शेख, उसमान तांबोळी, सिद्दीक बागवान, वहिदा सय्यद, शाहीन शेख, अल्ताफ शाह, आसिफ शेख, जाकीर शाह, मिनाज शेख, अस्मा पटेल, आमरीन पठाण, यास्मिन शेख, नसरीन इनामदार, नाजिया शेख व जिल्ह्यातील परिषदेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

स्किल इंडियासाठी केंद्राची ८८०० कोटींची तरतूद

नगर – केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा स्किल इंडिया कार्यक्रमासाठी ८८०० कोटींची तरतूद केली आहे. आता ही योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायकराव देशमुख यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे सदर योजना पुढेही चालू ठेवण्यास आणि त्या योजनेत आवश्यक ती पुनर्रचना करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत १५ ते ५९ या वयोगटातील लाभार्थ्यांना विविध विषयांचे व्यावसायिक प्रशिक्षणदिले जाते. हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत असून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांना प्राधान्याने बँकेकडून कर्जही उपलब्ध करून दिले जाते. तसेच विविध उद्योगातील नोकरीच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत आंतरराष्ट्रीय गतिशीलतेवर भर देण्यात आला असून जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कौशल्यांनी सुसत्र मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. कौशल्य विकास व रोजगार मंत्रालयाने विविध देशांसोबत मोबिलिटी भागीदारी करार आणि सामंजस्य करार केले असून या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांच्या आंतरराष्ट्रीय गतिशीलता संधी वाढविण्यासाठी डोमेन कौशल्ये, संयुक्त प्रमाणपत्रे, भाषा प्राविण्य आणि सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण देण्यात येते. बेरोजगारी निर्मूलनासाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे. सदर योजना ग्रामीण भागातील पात्र युवक, युवतींपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत श्री. देशमुख यांनी व्यक्त केले.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत असतात. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याबाबत आपण ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्याशी बोलणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

गरुड हॉस्पिटलमध्ये जनजागृती व मोफत कॅन्सर तपासणी उपक्रम

UNJ

नगर – ४ फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिन च्या निमित्ताने गरुड कॅन्सर हॉस्पिटल आणि रेडिएशन सेंटर अहिल्यानगर यांच्यावतीने कॅन्सर जनजागृती आणि मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रांताधिकारी सुधीर पाटील, नायब तहसीलदार अभिजीत वांडेकर, डॉ. प्रकाश गरुड, स्त्री रोग कॅन्सर

तज्ञ डॉ. सौ. पद्मजा गरुड, रेडिएशन कॅन्सर तज्ञ डॉ. मनोज बिराजदार, कॅन्सर तज्ञ डॉ. अर्चना तांबोळी, कॅन्सर तज्ञ डॉ. प्रवीण बोस हे उपस्थित होते. हॉस्पिटल मधील सिस्टर लक्ष्मी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी हॉस्पिटल आणि सेंटर व कार्यक्रमाविषयी गौरवोद्वार काढले. हे सेंटर अहिल्यानगर येथे झाल्यामुळे आता कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी पुणे, मुंबई सारख्या शहरात जाण्याची आवश्यकता नाही. जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचार या सेंटरमध्ये उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. रुग्णांनी न घाबरता उपचार करून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. प्रकाश गरुड यांनी कॅन्सरबद्दल माहिती दिली, समाजामध्ये कॅन्सरबद्दल असलेले समज गैरसमज तसेच व्यसनाकडे चाललेली पिढी, याबद्दल विशेष करून माहिती दिली. वेळीच उपचार झाले तर कॅन्सर पूर्णतः बरा होऊ शकतो आणि वरील सर्व उपचारासाठी सेंटर मध्ये सर्जरी, केमोथेरपी, आणि रेडिएशन महात्मा फुले योजनेमध्ये तसेच विमा पॉलिसीमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले. पण त्यापेक्षा कॅन्सर होऊच नये यासाठी आपण आपल्या आहारात योग्य बदल करावा. सर्व पालेभाजी, फळे आहारात असावेत आणि घरीच बनवलेला आहार घ्यावा. तसेच रोज आपणास जो आवडेल तो व्यायाम करावा, असे सांगितले.

डॉ. पदराजा गरुड यांनी स्त्रियांनी स्वतःकडे लक्ष द्यावे, जर कसलेही प्रकारची गाठ किंवा काही त्रास होत असेल तर अशा वेळी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच निदान करून घ्यावे, जेणेकरून हे सर्व आपल्या कुटुंबासाठी पण आणि स्वतःसाठी पण योग्य राहील. वर्षातून एकदा तरी आपण स्वतःची आरोग्य

तपासणी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रेक्षकांमधून दोन रुग्णांनी, जे आता कॅन्सर मधून पूर्णतः बरे झालेले आहेत, अशा लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सहज योग ध्यान धारणा टीम उपस्थित होती. त्यानंतर रसाळकर सर यांनी ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून माहिती दिली. स्वतः साठी दररोज दहा मिनिटे वेळ काढून सहयोगच्या जे काही योग सांगितले आहेत, त्याप्रमाणे व्यायाम करण्याचे सांगितले. यामुळे नक्कीच पूर्ण शरीरावर चांगला प्रभाव पडतो असे सांगितले