अहिल्यानगरमधील यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयातील विद्यार्थी राज्यामध्ये झळकल

नगर – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या बीडीएस चतुर्थ वर्ष २०२३ – २०२४ पदवी परीक्षेसाठी घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय, अहिल्यानगर या महाविद्यालयातील कु. पाचांळ ध्रुवी हिने दुसरा क्रमांक आणि कु.

गुंड वैष्णवी यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला.

या गुणवंत विद्यार्थीनींच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या .

उपाध्यक्षा कु. नेहल प्रशांत गडाख पाटील, मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन शंकारराव गडाख पाटील, कार्यकारी विश्वस्त डॉ. सुभाष देवढे पाटील, तसेच अधिष्ठाता डॉ. राजहंस निलिमा श्रीपाद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

‘काळेज्‌ ऑर्किड रिसॉर्ट’ पर्यटन म्हणून पाहिले जाईल

पद्मश्री पोपटराव पवार यांचे प्रतिपादन नगर – शिर्डी रोडवरील विळद येथे काळेज् ऑर्किड रिसॉर्ट हे नगरच्या जिरायत भागात पर्यटन म्हणून पाहिले जाईल, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

ते नुकत्याच रिसॉर्टच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई काळे व त्यांच्या कन्या कु. सई व कु. राजनंदिनी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले. यावेळी सुजय विखे पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, शाहीर विजय तनपुरे, जि. प. सदस्य संदेश कार्ले, शिक्षक आप्पा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी पुढे बोलतांना पवार म्हणाले की, नगरकरांना आता महाबळेश्वर, लोणावळाखंडाळा येथे जाण्याची गरज राहणार नाही.

येथे त्या हिलस्टेशन सारखाच थंडगार फील येत आहे.

सुजय विखे पाटील म्हणाले की, नाशिकच्या धर्तीवर बॅकवॉटरला जसे टुरिझम झाले आहे तसे विळदलाही पर्यटन वाढेल व त्यामुळे नगर शहरात पर्यटन वाढण्यास नक्की हातभार लागेल. काळे कुटुंबांनी केलेला पर्यटनवाढीसाठी केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमास अभय आगरकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते रिसॉर्टच्या वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले. सौ. मनिषा बारस्कर-काळे यांनी आभार मानले

श्री साईबाबा मंदिरात ९ वा वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

भिंगार – सालाबादप्रमाणे भिंगार पंचक्रोशीतील राधानगरी नागरदेवळे येथील श्रद्धास्थान ‘श्री साईबाबा मंदीरचा नववा वर्धापन दिन सोहळा’ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री साई चरित्र पारायण, सौ. धनश्री शिंदे (सनातन संस्था) यांचे साधना विषयक प्रवचन, हरिपाठ तसेच शुक्रवारी सायंकाळी ७वाजता रामायणाचार्य हभप गोरक्षनाथ दुतारे महाराज यांच्या वाणीतून भजन संध्या कार्यक्रम झाला. साई मंदिराचे संस्थापक, अध्यक्ष महेश राजेंद्र झोडगे, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, शास्त्रीय संगीत विशारद ओंकार देऊळगावकर, मंदिराचे पुजारी देशपांडे गुरुजी, आशुतोष गलांडे, ओंकार आव्हाड, गौरव त्रिमुखे, आदित्य कापरे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते, सर्व भजनी मंडळ नागरदेवळे व भिंगार तसेच साई भक्तगण उपस्थित होते. भजन संध्येत साई तुझ्या दर्शनाची ओढ लागली, तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे…, साई तुझे नाव गोड आदी साईंच्या भजनांनी राधानगरी दुमदुमली. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता श्री साईंची पालखी मिरवणूक व ग्रामप्रदक्षिणा होणार आहे. तसेच रविवारी सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी साई भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन साई मंदिराचे संस्थापक अध्यक्ष महेश झोडगे यांनी केले आहे

नगर मध्ये उद्योजकाला भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर लुटले सोन्याची चेन, २ अंगठ्या दुचाकीवरील दोघांनी केल्या लंपास

नगर – एमआयडीसी मधील उद्योजकाला दोघांनी भरदिवसा आणि मोठी वर्दळ असलेल्या आनंदधाम रस्त्यावर लुटल्याची घटना शुक्रवारी (७ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. राजाराम राय (वय ६२, रा.एमआयडीसी, नगर) असे या उद्योजकाचे नाव आहे. त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याची सोन्याची चेन आणि प्रत्येकी १ तोळ्याच्या सोन्याच्या २ अंगठ्या या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की उद्योजक राजाराम राय यांचा एमआयडीसी परिसरात राजलक्ष्मी इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे अनेक ग्राहक शहर परिसरात आहेत. राय हे शुक्रवारी कामानिमित्ताने नगर शहरात आले होते व चाणक्य चौक मार्गे आनंदधाम रस्त्याने भवानीनगर येथे त्यांच्या ओळखीचे अजित कर्नावट यांच्या कडे आपल्या मोपेडवर जात होते. दुपारी १२ च्या सुमारास माजी खा. स्व. दिलीप गांधी यांच्या घराच्या समोरील बाजूस त्यांच्या पाठीमागून पल्सर मोटारसायकल वर दोघेजण आले. त्यातील एकाने डोक्यात हेल्मेट घातलेले होते.

त्यांनी मोटारसायकल राय यांच्या मोपेडला आडवी लावून त्यांना थांबविले व पोलिस असल्याच्या थाटात त्यांना तुम्ही हेल्मेट का नाही घातले? तुमचा वाहन चालविण्याचा परवाना दाखवा असे दटावले. त्यानंतर तुम्हाला कळत नाही का, या भागात किती चेन स्नॅचिंग च्या घटना घडत आहेत. तरीही तुम्ही गळ्यात सोन्याची चेन, हातात अंगठ्या घालून फिरता. कालच या परिसरात चेन स्नॅचिंग झाली आहे. त्यामुळे तुम्ही गळ्यातील चेन आणि अंगठ्या काढून ठेवा असे म्हणत त्यांना त्या काढायला लावल्या. त्यानंतर खिशातून एक कागद काढला व यात ठेवा त्या वस्तू असे म्हणत त्यांना वस्तू कागदात ठेवायला लावल्या.

त्यानंतर तुमच्या गाडीची डिक्की उघडा असे म्हणाले. त्यामुळे राय यांनी डिक्की उघडली. त्यावेळी त्यांनी कागदाची पुडी त्यांच्या हातात देत हे दागिने डिक्कीत ठेवा आणि या परिसरातून पुढे घेल्यावर ते गळ्यात आणि हातात घाला. असे म्हणून तेथून मोटारसायकलवर निघून गेले. काही वेळाने राय यांना शंका आल्याने त्यांनी डिक्कीतील कागदाची पुडी उघडून पाहिली असता त्यात दागिन्यांच्या ऐवजी दगड होते.

त्या दोघा भामट्यांनी आपली नजर चुकवून हातचलाखी करत दुसरीच पुडी आपल्या हातात देवून आपली फसवणूक केल्याचे राय यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या ओळखीचे अजित कर्नावट यांना सांगून त्यांच्या सोबत कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात दोघा भामट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दररोज बिबट्याच्या भीती खाली जगतेय जनता, वनविभागकडे रेस्क्यू टीम आहे का ?

पालकमंत्री साहेब, वनविभाग काय केडगावची पुनरावृत्ती व्हायची वाट बघतोय का ?

नगर – नगर शहर परीसरासह नगर तालुक्याच्या गावागावात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असताना वन विभागाकडून फक्त पाहणी करून बिबट्यांच्या ठशांचे फोटो काढणे, काही ठिकाणी पिंजरा लावला तर लावणे अशी थातूरमातुर कामे केली जात आहेत. मात्र दररोज बिबट्याच्या भीती खाली वावरणाऱ्या नागरिकांना दिलासा काही मिळत नाही. मागील वर्षी प्रमाणे जर केडगाव सारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर नगरच्या वन विभागाकडे पीआरटी (प्रायमरी रिसपॉन्स टिम) आणि रेस्क्यू टीम आहे का? जर नसेल तर पालकमंत्री साहेब यात लक्ष घालणार का? की केडगावच्या घटनेची  पुनरावृत्ती व्हायची वाट पाहताय? असा सवाल उपस्थित होत आहे.

मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यातच केडगावच्या नागरी वसाहतीमध्ये बिबट्याची मध्यरात्री झालेली एन्ट्री  त्यानंतर परिसरातील नागरिक मध्ये पसरलेली दहशत आपण पाहिलीच असेल .पहिल्यांदाच नगरच्या उपनगरात नागरी वसाहतीमध्ये बिबट्याची झालेली इंट्री केडगाव मधील अनेक नागरिकांना याची कल्पना देखील नव्हती. त्यामुळे सकाळी सकाळी कामासाठी घराबाहेर ज्यावेळेस आपण पडू त्यावेळेस आपण बिबट्यासाठी एक सावज बनू ही त्यांच्या ध्यानीमनी देखील आले नसेल ज्या घराच्या आडोशाला दब धरून बिबट्या बसला होता त्यातील अनेक घरांनी व शेजारीपाजाऱ्यांनी पाहिल्यामुळे याची माहिती परिसरातील नागरिकांना फोन द्वारे कळवल्यामुळे अनेकजण सावध झाले खरे पण ज्यांना याची कल्पना नव्हती ते मात्र बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले.

अनेक नागरिक झाले होते बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

अनेक नागरिकांवर  या बिबट्याने हल्ला चढवत घायाळ करून सोडले. त्यावेळेस देखील बैल गेला आणि झोपा केला याची प्रचिती केडगावकरांना वनविभाग एक तास उशिरा आल्यानंतर आली. वनविभाग, नागरिक तसेच पोलीस प्रशासनामध्ये थोडी बाचाबाची देखील झाली. प्रशासनाला यावेळी नागरी रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून बिबट्याने दहशत माजवत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अनेक नागरिकांना घायाळ केले होते. वन विभागाकडे पिंजरा व बिबट्याला पकडण्यासाठी जाळ्या शिवाय काहीही नव्हतं. त्यानंतर बिबट्याची दहशत पाहता व नागरिकांचा वाढत चालेला रोष यांची दखल घेत नगरच्या वन विभागाने तात्काळ संगमनेरच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले.

 

नगर मध्ये उद्योजकाला भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर लुटले सोन्याची चेन, २ अंगठ्या दुचाकीवरील दोघांनी केल्या लंपास

नगर – एमआयडीसी मधील उद्योजकाला दोघांनी भरदिवसा आणि मोठी वर्दळ असलेल्या आनंदधाम रस्त्यावर लुटल्याची घटना शुक्रवारी (७ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. राजाराम राय (वय ६२, रा.एमआयडीसी, नगर) असे या उद्योजकाचे नाव आहे. त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याची सोन्याची चेन आणि प्रत्येकी १ तोळ्याच्या सोन्याच्या २ अंगठ्या या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की उद्योजक राजाराम राय यांचा एमआयडीसी परिसरात राजलक्ष्मी इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे अनेक ग्राहक शहर परिसरात आहेत. राय हे शुक्रवारी कामानिमित्ताने नगर शहरात आले होते व चाणक्य चौक मार्गे आनंदधाम रस्त्याने भवानीनगर येथे त्यांच्या ओळखीचे अजित कर्नावट यांच्या कडे आपल्या मोपेडवर जात होते. दुपारी १२ च्या सुमारास माजी खा. स्व. दिलीप गांधी यांच्या घराच्या समोरील बाजूस त्यांच्या पाठीमागून पल्सर मोटारसायकल वर दोघेजण आले. त्यातील एकाने डोक्यात हेल्मेट घातलेले होते.

त्यांनी मोटारसायकल राय यांच्या मोपेडला आडवी लावून त्यांना थांबविले व पोलिस असल्याच्या थाटात त्यांना तुम्ही हेल्मेट का नाही घातले? तुमचा वाहन चालविण्याचा परवाना दाखवा असे दटावले. त्यानंतर तुम्हाला कळत नाही का, या भागात किती चेन स्नॅचिंग च्या घटना घडत आहेत. तरीही तुम्ही गळ्यात सोन्याची चेन, हातात अंगठ्या घालून फिरता. कालच या परिसरात चेन स्नॅचिंग झाली आहे. त्यामुळे तुम्ही गळ्यातील चेन आणि अंगठ्या काढून ठेवा असे म्हणत त्यांना त्या काढायला लावल्या. त्यानंतर खिशातून एक कागद काढला व यात ठेवा त्या वस्तू असे म्हणत त्यांना वस्तू कागदात ठेवायला लावल्या.

त्यानंतर तुमच्या गाडीची डिक्की उघडा असे म्हणाले. त्यामुळे राय यांनी डिक्की उघडली. त्यावेळी त्यांनी कागदाची पुडी त्यांच्या हातात देत हे दागिने डिक्कीत ठेवा आणि या परिसरातून पुढे घेल्यावर ते गळ्यात आणि हातात घाला. असे म्हणून तेथून मोटारसायकलवर निघून गेले. काही वेळाने राय यांना शंका आल्याने त्यांनी डिक्कीतील कागदाची पुडी उघडून पाहिली असता त्यात दागिन्यांच्या ऐवजी दगड होते.

दैनिक पंचांग मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२५

दुर्गाष्टमी, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, पौष शुलपक्ष,
रेवती १७/५०, सूर्योदय ०६ वा. ३२ मि. सूर्यास्त ०५ वा. ५० मि.

मेष : अचानक जुने मित्र भेटतील. कुटुंबातील सदस्यांबरोबर
आनंदाचे क्षण अनुभवाल.
वृषभ : स्पर्धात्मक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाल. सामाजिक
कार्यात सहभागी व्हाल.
मिथुन : जोडीदाराला समजावून घ्याल. तुमचे व्यक्तिमत्त्व आज बहरेल. चिकाटीने
कार्यरत राहाल.
कर्क : मानसिक ताण शय. कठोर बोलणे वा सहकार्‍यांशी गैरवर्तणूक महागात
पडेल. मैदानी खेळात सहभागी व्हाल.
सिंह : आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. नात्यामध्ये कटुता निर्माण होईल.
कन्या : आर्थिक गुंतवणुकीतून योग्य तो मोबदला मिळेल. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक
कराल.
तूळ : वाहने व उपकरणे जपून वापरावीत. जोडीदाराबरोबर रोमँटिक
क्षण अनुभवाल.
वृश्चिक : सहकार्‍यांशी आपुलकीने वागाल. अति खाणे टाळाल. मागील उधारी
वसुल होईल.
धनु : शारीरिक व्यायामाचे महत्त्व लक्षात घ्याल. काही प्रमाणात प्रवास करावा लागेल.
मकर : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक स्थितीमध्ये बदल घडतील.
कुंभ : अनावश्यक गोष्टींचा विचार केल्याने मनस्ताप संभवतो. मानसिक बळ
वाढेल. नोकरीत अनुकूल स्थिती राहील.
मीन : कर्जाऊ रक्कम दिल्याने फसवणूक होईल. व्यवसायात भागीदारी तूर्तास नको.
वैवाहिक चांगले बहरेल.

संकलक :  अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा

शस्त्राचा धाक दाखवून २ घरांवर दरोडा; सोन्याचे दागिने, रोकडसह ऐवज लंपास

नगर – इसळक (ता. नगर) शिवारातील खारेकर्जुने रस्त्यावरील खपके वस्तीवर सात जणांच्या टोळयाने शनिवारी (दि.४) पहाटे चांगलाच धुमाकूळ घातला. शस्त्राचा धाक दाखवून दोन घरावर दरोडा टाकून सोन्याचे दागिने, रोकड असा ९१ हजाराचा ऐवज लांबविला. चोरट्यांच्या दहशतीमुळे इसळक शिवारात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अनिल सुधाकर खपके (वय ४५, रा. खपके वस्ती, खारेकर्जुने रस्ता, इसळक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात अनोळखी दरोडेखोरांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दरोडेखोरांची ओळख पटलेली नसून त्यांचा शोध एमआयडीसी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून घेतला जात आहे. शुक्रवारी रात्री अनिल खपके हे कुटुंबासह घरात झोपी गेले होते. शनिवारी पहाटे सव्वा एक ते सव्वा दोनच्या सुमारास सहा ते सात चोरट्यांनी अनिल यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांच्या हातात कुर्हाड, लाकडी दांडके, कटर होते. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून घरातील १८ हजार ५०० रूपयांची रोकड, १.५ ग्रॅमचे सोन्याचे जोडवे, चार ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण, १५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी व एक जाकिट असा ८९ हजाराचा ऐवज चोरला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शेजारी असलेल्या रामकिसन वसंत खपके यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या घराच्या कंपाऊंडची तार तोडून व घराची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यांना शस्त्राचा धाक दाखवून घरातील सामानाची उचकापाचक केली. रामकिसन यांच्या घरात चोरट्यांना दोन हजाराची रोकड मिळून आली. दोन्ही घरातून चोरट्यांनी ९१ हजाराचा ऐवज चोरल्यानंतर ते पसार झाले. सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक मोंढे, उपनिरीक्षक विनोद परदेशी, जाधव यांनी पोलीस अंमलदारांसह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.

एचएमपीव्ही विषाणू चिंतेचे कारण नाही, नगरकरांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी

श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी महानगरपालिकेच्या सूचनांची अंमलबजावणी करावी : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन

नगर – चीनमध्ये मानवी मेटान्यूमो व्हायरसचा (एचएम पीव्ही) उद्रेक झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. चीनमधून आलेल्या या नवीन विषाणुमुळे चिंतेचे कारण नसले तरी, नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी. या प्रकरणी भितीचे वातावरण निर्माण करू नये, महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. एचएमपीव्ही हा एक हंगामी रोग आहे. जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने केंद्राच्या आरोग्य विभागाने ३ जानेवारी रोजी निवेदन प्रसिध्द केले आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे. नागरिकांनी हे करावे : १) जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. २) साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत. ३) ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे. ४) भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक अन्न खावे. ५) संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी हे करू नये : १) हस्तांदोलन करू नये. २) टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये. ३) आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा. ४) डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे. ५) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. ६) डॉटरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नये

 

२ कत्तलखान्यावर पोलिसांचे छापे

नगर – शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या दोन कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून ५ जणांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील २ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.५) करण्यात आली. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या गोवंश जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणार्‍या दोन कत्तलखान्यांवर कारवाई केली. या कारवाईत अफवान इस्माईल कुरेशी (वय २७), मुज्जाहिद नुरमोहमंद कुरेशी (वय ३०), आरफाद अश्पाक कुरेशी (सर्व रा. रा.खाटीक गल्ली, शेवगाव), एक विधी संघर्षित बालक, बब्बु अजीज शेख, (वय ५५, रा.दादेगाव रोड, शेवगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३१० किलो गोमांस, २ गायी, १ कालवड, १ वासरू व ४ सुरे असा २ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात २ वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद केली.