
नगर – ४ फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिन च्या निमित्ताने गरुड कॅन्सर हॉस्पिटल आणि रेडिएशन सेंटर अहिल्यानगर यांच्यावतीने कॅन्सर जनजागृती आणि मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रांताधिकारी सुधीर पाटील, नायब तहसीलदार अभिजीत वांडेकर, डॉ. प्रकाश गरुड, स्त्री रोग कॅन्सर
तज्ञ डॉ. सौ. पद्मजा गरुड, रेडिएशन कॅन्सर तज्ञ डॉ. मनोज बिराजदार, कॅन्सर तज्ञ डॉ. अर्चना तांबोळी, कॅन्सर तज्ञ डॉ. प्रवीण बोस हे उपस्थित होते. हॉस्पिटल मधील सिस्टर लक्ष्मी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी हॉस्पिटल आणि सेंटर व कार्यक्रमाविषयी गौरवोद्वार काढले. हे सेंटर अहिल्यानगर येथे झाल्यामुळे आता कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी पुणे, मुंबई सारख्या शहरात जाण्याची आवश्यकता नाही. जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचार या सेंटरमध्ये उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. रुग्णांनी न घाबरता उपचार करून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. प्रकाश गरुड यांनी कॅन्सरबद्दल माहिती दिली, समाजामध्ये कॅन्सरबद्दल असलेले समज गैरसमज तसेच व्यसनाकडे चाललेली पिढी, याबद्दल विशेष करून माहिती दिली. वेळीच उपचार झाले तर कॅन्सर पूर्णतः बरा होऊ शकतो आणि वरील सर्व उपचारासाठी सेंटर मध्ये सर्जरी, केमोथेरपी, आणि रेडिएशन महात्मा फुले योजनेमध्ये तसेच विमा पॉलिसीमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले. पण त्यापेक्षा कॅन्सर होऊच नये यासाठी आपण आपल्या आहारात योग्य बदल करावा. सर्व पालेभाजी, फळे आहारात असावेत आणि घरीच बनवलेला आहार घ्यावा. तसेच रोज आपणास जो आवडेल तो व्यायाम करावा, असे सांगितले.
डॉ. पदराजा गरुड यांनी स्त्रियांनी स्वतःकडे लक्ष द्यावे, जर कसलेही प्रकारची गाठ किंवा काही त्रास होत असेल तर अशा वेळी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच निदान करून घ्यावे, जेणेकरून हे सर्व आपल्या कुटुंबासाठी पण आणि स्वतःसाठी पण योग्य राहील. वर्षातून एकदा तरी आपण स्वतःची आरोग्य
तपासणी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रेक्षकांमधून दोन रुग्णांनी, जे आता कॅन्सर मधून पूर्णतः बरे झालेले आहेत, अशा लोकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सहज योग ध्यान धारणा टीम उपस्थित होती. त्यानंतर रसाळकर सर यांनी ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून माहिती दिली. स्वतः साठी दररोज दहा मिनिटे वेळ काढून सहयोगच्या जे काही योग सांगितले आहेत, त्याप्रमाणे व्यायाम करण्याचे सांगितले. यामुळे नक्कीच पूर्ण शरीरावर चांगला प्रभाव पडतो असे सांगितले