निंबळक जवळील रेल्वेचा जुना पत्री पुलाच्या जागी नवीन पुल उभारण्याचे काम अखेर पूर्ण

0
42

नगर – एप्रिल २०२४ पासून दौंड-मनमाड हा रेल्वे मार्ग सोलापूर विभागातून पुणे विभागात वर्ग केल्यापासून या मार्गावर अनेक चांगले बदल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहेत. हा मार्ग संपूर्ण विद्युत करण्यात आलेला असून दुहेरीकरणाचे काम सुद्धा पूर्ण होण्याच्या मार्गावर असून या मार्गावरील रेल्वे आता पहिल्यापेक्षा जलद गतीने धावताना दिसून येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून निंबळक रेल्वेगेट क्रमांक ३० व निंबळक रेल्वे स्टेशन दरम्यान असलेला ब्रिटिश काळात उभारण्यात आलेला खूप जूना व ऐतिहासिक असलेला खारा नाल्यावरील संपूर्ण लोखंडी पूल अर्थात पत्री पूल म्हणून प्रसिद्ध असलेला पूल खूप जुनाट व धोकादायक झाल्यामुळे तो हटवून त्या ठिकाणी आधुनिक बनावटीचा सिंमेट काँक्रीटीचा मजबूत असा पूल उभारण्यात आला. येथील काम करण्यासाठी ४ दिवस अगोदरच तयारी करून त्या ठिकाणी अत्याधुनिक ३ मोठे क्रेन, ३ जेसीबी, २ पोकलेन, २ डंपर, खडी, स्लीपर व रेल्वे रुळ, पाण्याचा एक ट्रॅक्टर, गॅस कटर, वेल्डिंग, २ कंटेनर, १ टेम्पो, जवळपास शंभर पेक्षा जास्त रेल्वेतील व ठेकेदाराकडिल कर्मचारी, रेल्वेतील अभियंते, विद्युत विभागातील कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, या ठिकाणी उपस्थित होते. या कामासाठी मध्य रेल्वेकडून रविवार असल्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ३ पर्यंत मेगा ब्लॉक घेतला असल्याचे दिसून आले. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील सर्व गाड्यांचे येणे-जाणे सुरळीत सुरु झाले. निंबळक बायपास ने जाणाऱ्या येणाऱ्या अनेक लोकांनी आपली वाहने थांबवून मोठ-मोठ्या क्रेन च्या सहाय्याने सुरु असलेल्या पूल उभारणी कामाची कुतूहलाने पहाणी केली.