आ. संग्राम जगताप यांची मागणी
नगर – सिद्धार्थ नगर मधील हिंदू महिलांवर नागापूर कॉटेज कॉर्नर परिसरामध्ये जिहादी लोकांनी अमानुषपणे मारहाण केली. या घटनेतील इतर आरोपींना अटक करून सर्व आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी तोफखान्याच्या पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
सिद्धार्थ नगर मधील हिंदू महिलांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आ. संग्राम जगताप यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन उपचार घेत असलेल्या महिलांची भेट घेत विचारपूस केली. मारहाण झालेल्या या महिला दिवसभर कष्ट करून उदरनिर्वाह करत असतात. काम केले तरच संध्याकाळची चूल पेटत असते, अशा हिंदू महिलांना त्यांची जात पाहून जिहादी लोकांकडून अमानुषपणे मारहाण करण्याचे काम केले आहे. हिंदू महिलांवर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आ. जगताप यांनी दिला. ‘सिव्हील’ मध्ये रुग्णांना चांगली आरोग्य सेवा द्या सिव्हील हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभारामुळे लाल टाकी येथील ४० वर्षीय सनी बोरुडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला वेळेवर उपचार मिळाले नाही. आदल्या दिवशी घशाच्या त्रासाने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारे उपचार करण्यात आले नाही, त्याच्या नातेवाईकांशी कोणत्याही डॉक्टरांनी साधी चर्चाही देखील केली नाही. ही बाब तेथे उपस्थित काहींनी आ. जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली. रुग्णांवर उपचारादरम्यान दिरंगाई होते या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचे मशिनरी असून देखील रुग्णांना त्याचा उपयोग होताना दिसत नाही. डॉक्टर अधिकारी कर्मचारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचा मृत्यू होतो, त्याचबरोबर युवकांना देखील आपला जीव गमावा लागतो, ही बाब चांगली नाही सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आ. जगताप यांनी दिल्या.





]