नगर – कत्तल करण्याचे उद्देशाने पत्र्याचे शेडमध्ये दोरीने बांधुन ठेवलेल्या २ गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांच्या पथकाने सुटका केली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील झेंडीगेट परिसरात आर. आर.बेकरी जवळ ८ फेब्रुवारीला पहाटे १ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या बाबतची माहिती अशी की झेंडीगेट येथील बेकरी जवळ राजु कुरेशी यांचे बंद पत्र्याचे शेडमध्ये काही गोवंश जनावरे डांबून ठेवलेली आहेत व त्यांची कत्तल केली जाणार आहे, अशी माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी तेथे पहाटेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे पोलिसांना काही गोवंश जनावरे दोरीने बांधुन ठेवलेले, तसेच त्यांच्या चारापाण्याची सोय सुविधा नसल्याचे दिसुन आले.पोलिसांनी तेथून २ जर्शी गायींची सुटका केली. या कारवाईत राजु कदीर कुरेशी, आणि गुड्डु कदीर कुरेशी यांना ताब्यात घेतले.त्यांच्या विरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात भा. न्या. सं. २०२३ चे कलम २७१ सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन १९७६ चे कलम ५ (क) ९ (अ) तसेच प्राण्याना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अंमलदार संदीप पितळे, सुरज कदम, दिपक रोहकले, तानाजी पवार, संकेत धीवर, राहूल शिंदे यांनी केली.