अहिल्यानगर जिल्हा पांचाळ सुवर्णकार समाजातर्फे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

नगर – अहमदनगर जिल्हा पांचाळ सुवर्णकार स्नेहवर्धक मंडळ अहिल्यानगरतर्फे १५ फेब्रुवारीला श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३९ वी पुण्यतिथी सोहळा, साई मंदीर, संदेशनगर, वसंत टेकडी, अहिल्यानगर येथे साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधव उपस्थित होते. अध्यक्ष प्रकाश पारखे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत श्री नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरवात झाली.
तसेच प्रथम समाजातील महिलांचे सौ. वैजयंती घोडके यांचे नेतृत्वाखाली (नरहरी भजनी मंडळा तर्फे) सुश्राव्य
भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ह. भ. प. महेश कस्तुरे महाराज यांचे प्रवचन झाले. त्यात त्यांनी इतर
सर्व संतांनी हरी व हर एैय गृहित धरले होते हे सांगीतले मात्र संत श्री नरहरी महाराजांनी ते स्वतः अनुभवले व
नंतर स्विकारले. हे नरहरी महाराजांचे वैशिष्ट्य सांगितले.
प्रथम ते निस्सीम शिवभक्त होते. या कार्यक्रमास सुनिल त्रंबके, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुध्दे व रूपाली वारे इत्यादी उपस्थीत होते. त्यांचा सत्कार समाजाचे अध्यक्ष प्रकाश पारखे यांच्या हस्ते करण्यात आला. नंतर समाजातील गुणवंत
विद्यार्थी व कर्तृत्ववान समाज बांधव व जेष्ठांचा सत्कार व पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने
सहाय्यक संचालक नगररचना सौ. पुनम पंडीत, शहर अभियंता मनोज पारखे, आर्किटेचर किशोर घोडके,
उपअभियंता संतोष पोतदार, हॉर्स रायडर विराज पारखे तसेच नृत्य विशारद अश्लेशा पोतदार, कलाकार
वरद महामुनी (नरहरी महाराजांची उत्कृष्ट रांगोळी प्रतिमा रेखाटल्याबद्दल) तसेच ज्येष्ठ
श्रीधर पंडीत मांडवगणकर यांचा व समाजासाठी झटणारे तरूण व हरहुन्नरी
व्यक्तिमत्व व ज्यांनी समाजासाठी जागा मिळवुन देण्यामध्ये मोठे योगदान
दिले ते वैभव जडे इत्यादींचा सत्कार करण्यात आला. समाजाच्या संस्थेचे रजिस्ट्रेशन
टिकविण्यात मोठे योगदान दिलेले व ज्यांच्या अनुभवी नेतृत्वात संस्थेची
शासकिय मान्यता टिकुन ठेवणारे (अन्यथा समाजास जागा मिळु शकली
नसती) अध्यक्ष प्रकाश पारखे यांचा सत्कार ह.भ.प. महेश कस्तुरे महाराज
यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास अनिल महामुनी, राजेंद्र
दिक्षीत, मुकुंद महामुनी, महेश दाळिंबकर, प्रशांत पोतदार,
संदिप घोडके, रतिकांत मेहेत्रे, अविनाश पोतदार, वैभव
टंकसाळे, सौ. प्रकाशीनी घोडके इत्यादी उपस्थीत
होते. सुत्रसंचालन रमेश पळसे यांनी केले. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी रेवननाथ पानगे, वैभव जडे, रमेश पळसे,
किशोर घोडके यांनी परिश्रम घेतले. आर्किटेचर किशोर
घोडके यांनी आभार मानले व नंतर महाआरती करुन
महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे शिवसन्मान सोहळा साजरा

पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतिसूर्य महात्मा
ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे पार पडला. महात्मा
फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन
दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर,
भाजप ओबीसी विभागाचे राज्य उपाध्यक्ष किशोर डागवाले, माजी नगरसेवक संजय चोपडा, श्री
विशाल गणपती मंदिराचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, मोहन कदम, फुले ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष दिपक खेडकर,
डॉ. सुदर्शन गोरे, राजेंद्र पडोळे, बाळासाहेब भुजबळ, डॉ. रणजीत सत्रे, अनिल इवले, बनकर सर, गणेश
कोहले, ब्रिजेश ताठे, मळू गाडळकर, किरण जावळे, संतोष हजारे, अशोकराव तुपे, भरत गारुडकर, संकेत
ताठे, संकेत लोंढे, ऋषिकेश ताठे, गणेश जाधव,  विक्रम बोरुडे, महेश गाडे, किरण मेहेत्रे, महेश सुडके,
श्रीकांत आंबेकर, विश्वास शिंदे, दिनेश जोशी, अनुराग पडोळे, अतुल पडोळे, आकाश डागवाले, प्रकाश इवळे,
पंडितराव खरपुडे, रेणुकाताई पुंड, कल्याणी गाडळकर, अश्विनी दळवी, सुरंगा विधाते आदींसह युवा कार्यकर्ते
उपस्थित होते. आ. संग्राम जगताप म्हणाले की, फुले ब्रिगेडच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सामाजिक कार्य सुरू आहे. विविध
सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे. महापुरुषांच्या जयंती उत्सवातून त्यांचे विचार
रुजविण्याचे कार्य होत आहे. जयंती उत्सवातून नवीन पिढीला
महापुरुषांचे विचार व समाजाला दिशा मिळणार आहे. महाराष्ट्रात
महात्मा फुले यांनी पहिली शिव जयंती साजरी केली व महाराजांचा इतिहास समाजापुढे आणला.
शिवजयंतीचे जनक म्हणून प्रत्येकाच्या मनात महात्मा फुले यांचे नाव कोरले गेले असल्याचे
त्यांनी सांगितले. दीपक खेडकर म्हणाले
की, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा
फुले यांचा शिवसन्मान सोहळा
गेल्या अकरा वर्षांपासून मोठ्या
उत्साहात होत आहे. महात्मा
फुले यांनी शिवाजी महाराजांना
गुरु माणून त्यांचे कार्य पुढे नेले. त्यांनी शिवाजी
महाराजांच्या जीवनावरील पहिला कुळवाडी भूषण हा
एक हजार ओळींचा पोवाडा सादर करुन त्यांचे महान
कार्य जगासमोर ठेवले. आजही समाजात महापुरुषांच्या
विचारांचा अंगीकार करुन त्यांचे विचार पुढे घेऊन
जाण्याची गरज आहे. फुले ब्रिगेडच्या माध्यमातून
महापुरुषांच्या विचाराने समाजातील वंचित घटकांसाठी
कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले

तरुण देशभक्त हा खरी देश सेवा करतो

कार्तिकी पवार यांचे प्रतिपादन; डॉ.विखे पा. अभियांत्रिकीत देशभक्ती आणि तरुण या विषयावर व्याख्यान

नगर – भारत हा देश तरुणांचा देश आहे. ४२ कोटी तरुण या देशात आहेत. योग्य मार्गदर्शन व संस्कार मिळणे खूप
गरजेचे आहे. देश हा महासत्ता होण्यासाठी तरुणांची योगदान महत्त्वाचे आहे. विज्ञानाने जेवढी प्रगती केली तशी काही अधोगती होत आहे. विज्ञानाबरोबर चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी येतात त्यातून चांगल्या गोष्टी घ्या. मोबाईलमुळे
तरुणांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. तरुणांनी मातृभूमीवरील अन्याय सहन न करता लढा द्या. देशभक्ती
एक प्रेम आहे आजचा तरुण हा खरी देश सेवा करतो, असे विचार व्याख्यातिका कुमारी कार्तिकी पवार हिने
व्यक्त केले. विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी
देशभक्ती आणि तरुण या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कु.कार्तिकी पवार
हिने मार्गदर्शन करताना आपले विचार मांडले. पाच दिवस वेगवेगळया विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
केले. त्यांच्या व्याख्यानात मुख्यतः देशाचे व तरुणांचे प्रश्न, तसेच देशभक्ती आणि तरुण, छत्रपती शिवाजी
महाराज, मासाहेब जिजाऊ, मुलींचे विविध प्रश्न अशा विषयांवर सखोलपणे आपले विचार मांडले. तसेच या
व्याख्यानात युवा शक्ती, राष्ट्रशक्ती, राष्ट्र निर्माणासाठी युवकांची भुमिका यासारख्या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये ऐतिहासिक विषय, समाजातील बदल, तरुणांची राष्ट्रभक्ती, त्यांची भुमिका असे विषय मांडण्यात
आले. या कार्यक्रमासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे ६५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही व्याख्यानमाला
किती उपयोगी आहे हे विशद केले. तसेच त्याचा विद्यार्थ्यांनी त्यांच्या
दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन केले. असे
कार्यक्रम आयोजीत करणे आजचे तरुण पिढीला अधिक महत्वाचे
बनले आहे. असे ते म्हणाले डॉ.सतिश मरकड यांनी कु. कार्तिकी पवार यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्व समजावून सांगितले. तरुण पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याच्या दृष्टीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे सेक्रेटरी जनरल डॉ.पी.एम. गायकवाड,  डायरेटर टेनिकल सुनिल कल्हापुरे यांनी या कार्यक्रम
आयोजनासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागप्रमुख डॉ. सतिश मरकड, समन्वयक डॉ. संदिप उदावंत, प्रथम वर्ष अभियांत्रिकी को-ऑर्डीनेटर प्रा.गणेश शिरसाठ यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी कौतुक केले

पीओपीवर बंदी घालून हिंदू संस्कृती व गणेशोत्सव बंद पाडण्याचे षडयंत्र

वसंत लोढा यांचे प्रतिपादन; श्री गणेश मूर्तिकार संघटना, गणेश मंडळे व हिंदुत्ववादी संघटना यांचे संयुक्त बैठक

नगर – गणेशोत्सव संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत
असतो. स्वतःला पुरोगामी म्हणणार्‍या लोकांनी या उत्सवात अडथळा
निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्व.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी
१५ वर्षांपूर्वी अंधश्रद्धेच्या नावाखाली पीओपी वर बंदी घालून हिंदू
संस्कृती व गणेशोत्सव बंद पाडण्याचे षडयंत्र रचले आहे. पीओपी मुळे
कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. हे शास्त्रज्ञ डॉ.प्रमोद मोघे यांनी
निरीक्षणाद्वारे सिद्ध केले आहे. पीओपी नैसर्गिक आहे. पीओपी याचा
उपयोग शेतीचा पोत सुधारण्यासाठी केला जातो. उलट शाडू माती मुळे
होणारे प्रदूषण हे घातक आहे. शाडू मातीचे कुठल्याही प्रकारे संशोधन
न करता शाडू मातीचा वापर करावा, असे सांगितले जात आहे.
हे चुकीचे आहे. लोकमान्य टिळकांनी इंग्रजी राजवटीच्या विरोधात
आवाज उठवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला एकत्र करण्यासाठी
गणेशोत्सव सुरू केला. स्वातंत्र्याची ज्योत मनामनात पेटवली.
हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून १० दिवस जात पंथ दूर ठेवून सर्व समाज
एकत्र होतात. गणेश उत्सवात समाजाची एकता अखंडता देशात दिसून
येते. या गणेश मंडळांमुळे नगरसेवक, आमदार, खासदार असे नेतृत्व
मिळाले आहेत. या गणेश उत्सवाला कुठेतरी गालबोट लावण्यासाठी मोठे षडयंत्र सुरू आहे.
गणेशोत्सव हा हिंदूंच्या अस्मितेचा व हिंदू धर्माचा स्वाभिमानाचा विषय आहे. यासाठी मोठे
आंदोलन उभे करावे लागेल. सर्व गणेश मंडळे, हिंदुत्ववादी संघटना व सर्व राजकीय पक्षांनी
पक्षात काम करून मूर्तिकार संघटनेच्या मागे खंबीरपणे उभे राहावे, असे प्रतिपादन भाजपचे
वसंत लोढा यांनी केले आहे.
पीओपी गणेश मूर्ती वरील बंदी कायमस्वरूपी रद्द करावी, या मागणीसाठी अहिल्यानगर
शहरातील गणेश मूर्ती कारखानदार, गणेश मंडळ व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बैठकीचे
नियोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बापू ठाणगे, वसंत लोढा,
निखिल वारे, बाळासाहेब पवार, सचिन शिंदे, सुनील त्रंबके, महेश लोंढे, भाजपा ओबीसी
शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, राजू मामा जाधव, सचिन मुदगल, दिगंबर गेंट्याल,
दिलदारसिंग बिर, उत्कर्ष गीते, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर, भगवान
जगताप, गणेश देवतरसे, अंकुश साबळे आदींसह श्री गणेश मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी,
हिंदुत्ववादी संघटना तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
निखिल वारे म्हणाले, अवैध कत्तलखाणे पाडण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले
असताना देखील कारवाई होताना दिसत नाही. परंतु कष्टकरी, प्रामाणिक, गणेश मूर्ती
कारखानदारांवर कारवाईचा बडगा उभारला जातो. हिंदूंचे सरकार असताना गणेश मूर्ती
कारखानदारांना त्रास दिला जातो. हे दुर्दैव आहे. गणेश मूर्ती कलाकारांनी सुबक गणेश मूर्ती
तयार करून राज्याची बाजारपेठ अहिल्यानगर येथे तयार केली आहे या गणेश मूर्तींना
देशभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नियमांच्या नावाखाली कलाकारांना त्रास देण्याचा
प्रयत्न केला. तर सर्वांनी ताकतीने उभे राहू. पीओपी मुळे होणारे प्रदूषणापेक्षा एमआयडीसीत
होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. मूर्ती कलाकारांना जर कोणी अन्याय करत असेल तर
राजकीय मतभेद बाजूला ठेवू.
दिगंबर गेंट्याल म्हणाले, पीओपी वर बंदी आणून हिंदूंचे सण उत्सव बंदी आणण्याचा
हा कुटिल डाव आहे. रंगपंचमीमुळे पाण्याची नासाडी होते. होळी सणामुळे लाकडाचा मोठ्या
प्रमाणात वापर होतो. तसेच दिवाळीचे फटायांमुळे मोठे प्रदूषण होते, असे सांगून हिंदू
संस्कृतीवर व परंपरांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दिलदार सिंग बीर म्हणाले, गणेश मूर्ती या लोखंडाच्या तयार
होत नाही. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या आकाराच्या गणेश मूर्ती
तयार करता येतात. शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती एक ते दोन
फुटापर्यंतच तयार करता येतील. शाडू मातीचा वापर केल्यास प्रदूषणही
मोठ्या प्रमाणात होईल. तसेच मोठे गणपती नसल्याने गणेश मंडळाचा
उत्साह कमी होईल. हे संकट मंडप, व्यावसायिक, पूजा साहित्य या
सर्वांवर असून यासाठी जर आंदोलन करायचे असेल तर बागडपट्टीचा
राजा गणेश मंडळ संपूर्ण सहकार्य करेल.
सचिन शिंदे म्हणाले, गणेश मूर्ती कलाकारांना कुठल्याही
प्रकारचा त्रास अन्याय झाला तर ३६५ दिवस त्यांच्या मदतीसाठी
व सहकार्य करु. ज्या ज्या वेळेस आंदोलन करण्यात येईल त्या
त्या वेळेस त्यांच्यासोबत पुणे, मुंबई, दिल्ली येथे जाण्यासाठी तयार
असल्याचे त्यांनी सांगितले.
बापू ठाणगे म्हणाले हिंदूंनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज
आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने अहिल्यानगर येथे मोर्चा काढण्यात
येईल. हिंदू संस्कृती व हिंदू सणांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याला
संपूर्ण हिंदू समाज कडाडून विरोध करेल.
भरत निंबाळकर प्रास्ताविकात म्हणाले, गणेश मूर्ती कलाकार पी.ओ.पी च्या मूर्ती
वर्षभर बनवीत असतो त्यावर आमच्या हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो परंतु केंद्रीय
प्रदूषण नियंत्रण मंडळ व त्याच्या जाचक आटींमुळे पी.ओ.पी मूर्तीवर बंदी आल्यास आम्ही
आमच्या कुटुंबासह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून आम्हाला
बेरोजगार करण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा व महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात धार्मिक सण
उत्सव आणि त्यातील मूर्तीचे आकर्षण कमी होणार नाही याची दखल शासनासह प्रदूषण
महामंडळाने घेतली पाहिजे. आमच्या व्यवसायासह भारतीय नागरिकांच्या आनंदावर विरजण
घालणारी पी.ओ.पी मूर्ती वरील बंदी रद्द करावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान जगताप व गणेश देवतरसे यांनी केले. तर आभार
अंकुश साबळे यांनी मानले.

झेलम एसप्रेस १६ दिवसांसाठी रद्द : प्रवाशांनी व्यक्त केला संताप

श्रीरामपूर – पुण्याहून जम्मूतावीला जाणारी व जम्मूतावीहून पुण्याला येणारी झेलम एसप्रेस ही गाडी १६ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पत्रकात देण्यात आली आहे. जम्मू येथे रेल्वे यार्डचे मोठे काम सुरू असल्याने सुमारे ३७ दिवसांसाठी वेगवेगळ्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पुण्याहून जम्मूतावीला
जाणारी ११०७७ क्रमांकाची गाडी १७ फेब्रुवारी  ते ४ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे तर जम्मूतावीहून पुण्याला येणारी ११०७८ क्रमांकाची गाडी २१ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत बेलापूर म्हणजे श्रीरामपूर रेल्वे स्टेशनवर येणार नाही. त्यामुळे सर्व
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रवासी संघटनेने केले आहे. रेल्वेने झेलम रेल्वे १६ दिवस रद्द करण्याचा
निर्णय घेतल्याबद्दल नगर व श्रीरामपूर मधील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या भागातून मोठ्या
संख्येने प्रवासी वैष्णोदेवीसाठी या गाडीने जम्मूतावीला जातात तसेच दिल्ली आणि पंजाबमधील अनेक गावांना जाण्यासाठी ही थेट गाडी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे खात्याने ही गाडी पूर्णपणे रद्द न करता किमान नवी दिल्लीपर्यंत सुरू ठेवायला पाहिजे होती अशी अपेक्षा बंटी गुरुवाडा, सलीमखान पठाण, अशोक उपाध्ये,
राजेंद्र सोनवणे, अयाज तांबोळी यांनी व्यक्त केली. रेल्वेच्या या तुघलकी निर्णयाने प्रवाशांना अनेक गैरसोयीना सामोरे जावे लागणार आहे. सध्या लग्नसराई व परीक्षेचा कालावधी सुरू असल्याने या काळात होणार्‍या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी नाराजी
व्यक्त केली आहे.

तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही कॅमेरे व दरपत्रक लावा

एजंट व कर्मचार्‍यांच्या आर्थिक हितसंबधातून सर्वसामान्यांची लूट; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा : अखिल भारतीय मेहतर समाज संघटना

नगर – तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही (व्हॉइस रेकॉर्डिंगसह) कॅमेरे आणि दरपत्रक फलक
लावण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर कार्यालयात भ्रष्टाचार वाढला असून, नागरिकांची लूट
थांबविण्यासाठी तातडीने सदरची उपाय योजना करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने शिष्टमंडळाने मंडळ अधिकारी
वैशाली दळवी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी
खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा उपसचिव पवन सेवक, आकाश ठाकूर, आरपीआयचे भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, दिलीप सूर्यवंशी, गोविंद घोडके, विकास पंडित, महर्षी वाल्मिकी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष केशर नकवाल, उपाध्यक्ष कविता नकवाल, हेमा उदासी, भावना बैद, मंजु बैद, अनिता कुडिया, पूजा चंदेले, पूजा नकवाल, करिश्मा
संगेलिया, पुनम सेवक, सुनिता बैद, रिना सारवान आदींसह नागरिक उपस्थित होते.
भिंगार तलाठी कार्यालयातील दररोजच्या कामकाजावर कॅमेर्‍यांची निगराणी असणे अत्यंत महत्त्वाचे
आहे. सध्या या कार्यालयात उत्पन्न दाखला, जागेच्या नोंदी आणि इतर कागदपत्रांसाठी
नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जात आहेत. परंतु, येथे दरपत्रक सुद्धा लावलेले नाही, ज्यामुळे भ्रष्टाचार वाढला
आहे आणि नागरिकांची लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटनेचे म्हणणे आहे
की, तलाठी कार्यालयात बाहेरचे एजंट लोक कर्मचार्‍यांच्या मदतीने कामे करून घेत आहेत, ज्यामुळे
सामान्य जनतेची पिळवणूक केली जात आहे. अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सी.सी.टी.
व्ही कॅमेरे लावले आहेत, परंतु भिंगार तलाठी कार्यालयात अद्याप अशी व्यवस्था
नाही. संघटनेने प्रशासनाला निवेदन देत, सी.सी.टी. व्ही (व्हॉइस रेकॉर्डिंगसह) कॅमेरे आणि दरपत्रक फलक
लवकर लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ओढ्यात मैलमिश्रित पाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

सव्हिल हडकोच्या परिसरातील नागरिकांनी घेतली उपायुक्तांची भेट; मनपा प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन

नगर – ओढ्यामध्ये मैल मिश्रित पाणी सोडल्याने सर्वत्र दुर्गंधी
पसरुन, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असताना
स्थानिक नागरिकांनी उपायुक्त विजयकुमार मुंडे व शहर अभियंता
मनोज पारखे यांची भेट घेऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी
केली.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल
हडको परिसरातील गायकवाड कॉलनीसह नागरिकांच्या शिष्टमंडळाने
महापालिकेत संबंधित अधिकार्‍यांची भेट घेऊन सदरचा गंभीर
प्रश्न मांडला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लहामगे,
कामगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, कार्याध्यक्ष
विशाल म्हस्के, मुकुंद पालवे, अक्षय सूर्यवंशी, विजय औटी, अशोक
कर्डिले, राहुल दरेकर, शेखर शेंडे, प्रताप मारवाडी, राजेंद्र कचरे,
अशोक मुळे, प्रवीण रणखांब, हातवळणे, अमित कचरे, शिवम
देवगुणे आदीं उपस्थित होते.
सावेडीमधील सिव्हिल हडको भारत चौक परिसरात
ओढ्यामध्ये काही नागरिकांनी मैल मिश्रित पाणी सोडल्यामुळे
परिसरातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण
झाला आहे. डेंगूच्या डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या
या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याचा धोका
निर्माण झाला आहे. या घाण पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोयात
आले असून, सर्वत्र दुर्गंधी देखील पसरली असल्याचे स्पष्ट करण्यात
आले आहे. या ओढ्याच्या जवळून पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन
जात असल्याने नळाद्वारे देखील घाण पाणी येण्यास सुरुवात झाली
आहे. तर या घाणीतून सल्फरडाय ऑसाईड सारखी वायु निर्मिती
होत असल्याने भविष्यात नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम
उद्भवणार आहे. मैल मिश्रित पाणी ओढ्यात न सोडता सेप्टिक
टँक अथवा ड्रेनेजमध्ये बंदिस्त गटारी या कार्य पद्धतीने सोडण्याची
व्यवस्था करण्याचे म्हंटले आहे.
उपायुक्त मुंडे यांनी घेतला तातडीने निर्णय
नागरिकांच्या तक्रारीनंतर उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी
संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना तातडीने सदर परिसराची पाहणी
करुन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका
प्रशासन समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ते पावले
उचलणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

महिलेला मत्स्यमारीचा ठेका मिळण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरु

नियमांना डावलून व आर्थिक हितसंबंध साधून दुसर्‍या व्यक्तीला ठेका दिल्याचा आरोप; ठेका देण्याच्या प्रक्रियेत संदिग्धता?

नगर – गोळेगाव (ता.शेवगाव) येथील आदिवासी महिलेला मत्स्यमारीचा ठेका देण्यापासून डावलण्यात आल्याने,
सदर महिलेला नियमाप्रमाणे मत्स्यमारीचा ठेका मिळण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हा परिषद समोर उपोषण करण्यात आले. अधिकार्‍यांनी आर्थिक
हितसंबंध जोपासून व नियम डावलून लांबच्या व्यक्तीला ठेका दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपोषणात
कुसुम पवार या आदिवासी महिलेसह राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, अंकुश पवार, शरद पवार, वैजीनाथ बर्डे, दादासाहेब बर्डे, गोकुळ पवार, प्रमिला पवार, कुसूम पवार,
कौसाबाई पवार, केशरबाई पवार आदी सहभागी झाले होते. कुसुम पवार या गोळेगाव (ता. शेवगाव) येथील रहिवासी असून, गोळेगाव ग्रामपंचायत पाझर तलावावर २००५ पासून मत्स्यमारी व्यवसाय ठेका पद्धतीने चालवत
होत्या. २०२०-२१ मध्ये त्यांनी गोळेगाव ग्रामपंचायतीला ४ लाख १० हजार रुपये भरून मत्स्यमारी व्यवसायाचा ठेका घेतला.
मात्र, त्यावेळी कोरोना महामारीमुळे आणि त्यांच्या पतीला पॅरालिसिस झाल्यामुळे त्यांनी सदर व्यवसायाकडे दुर्लक्ष केले. अशा परिस्थितीमध्ये शेवगाव तालुयातील एका  व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या जलसंधारण
विभागाच्या अधिकार्‍यांशी आर्थिक हितसंबंध साधून मत्स्यमारीचा ठेका मिळवला असल्याचा आरोप उपोषणकर्त्या महिलेने
केला आहे. १८ ऑटोबर २०२२ रोजी जिल्हा परिषद उपविभाग नेवासा यांनी या ठेयाच्या
लिलावाची प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याचे सूचित केले. तथापि, गोळेगाव पाझर
तलावावर पाच वर्षांसाठी एकच अर्ज आला, आणि त्यावर संबंधित नियमांचे पालन करून
ठेका दिला गेला. या संदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार दहा किलोमीटरच्या परिसरातील व्यक्तींना मत्स्यमारी व्यवसायाचे
ठेका देण्याचा अधिकार असताना, सदर ठेका ३० किलोमीटर अंतरावरच्या संस्थेला दिला गेला आहे, जो संशयास्पद असल्याचे म्हंटले आहे. ६ जानेवारी रोजी गोळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शेवगाव पंचायत
समिती समोर या ठेयाच्या संदर्भात उपोषण करण्यात आले. संबंधित ग्रामसेवक आणि
बीडीओ यांनी चौकशी केली असता, गोळेगाव ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद
कडून कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे सांगितले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद यांना पत्राद्वारे कळविले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित ठेकेदार शासनाची फसवणूक करत असेल तर त्यावर कारवाई करावी,
तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर आदिवासी महिला कुसुम पवार यांना
मत्स्यमारी व्यवसायाचा ठेका पुन्हा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे

माळीवाडा बसस्थानकाबाहेर रिक्षा चालकांमध्ये हाणामारी दगड फेकून रिक्षाच्या काचा फोडल्या,मारहाणीत एक जण जखमी

नगर – नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकाबाहेर दोन रिक्षा चालकांमध्ये सोमवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी जोरदार हाणामारी झाली. यावेळी एकाने तर रिक्षावर दगड फेकून मारत रिक्षाच्या काचा फोडल्या. या मध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारच्या सुमारास माळीवाडा बसस्थानकासमोरील हॉटेल फेमस जवळ असणाऱ्या रिक्षा स्टँडवर हा प्रकार घडला. रिक्षाचालक मुद्दसर शकील शेख (रा. सदर बाजार, भिंगार) आणि वसंत मोकाटे (रा. हनुमाननगर, दौंडरोड)यांच्यामध्ये वाद सुरू झाला. शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन त्यानंतर हाणामारीत झाले. यावेळी मुद्दसर शेख याने वसंत मोकाटे यांना कुठल्या तरी टणक वस्तूने मारहाण केल्याने मोकाटे हे रक्तबंबाळ झाले होते. तर त्यांच्या रिक्षावर (क्र. एमएच १६ बी सी ३३१३) मुद्दसर याने मोठमोठाले दगड फेकून मारले. त्यामुळे रिक्षाच्या काचा फुटून या रिक्षाचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बघ्यांची गर्दी जमली होती. घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी दगडांचा साठा, काचेचे तुकडे आढळून आले. शेख आणि मोकाटे यांच्यामध्ये नेमका कोणत्या विषयावरून राडा झाला. घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही. दोन दिवसांपूर्वीही या दोघांमध्ये वाद झाले होते, असे तेथील एका व्यावसायिकाने सांगितले. या प्रकरणी वसंत मोकाटे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. दुपारी उशिरापर्यंत मोकाटे यांची फिर्याद घेण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरु होते.

सत्यमेव जयतेच्या नावाखाली चाललेल्या गैर आणी बेकायदेशीर कारभाराच्या निषेधार्थ केडगाव मध्ये १८ फेब्रुवारीला निषेध सभा

नगर – सत्यमेव जयतेच्या नावाखाली राज्यात आणि देशात चाललेल्या गैर आणी बेकायदेशीर कारभाराच्या निषेधार्थ अरुणोदय क्रांती सेवा संघाच्या वतीने केडगाव उपनगरात विठ्ठल पार्क, श्रीकृष्ण नगर मध्ये १८ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे.

अरुणोदय क्रांती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण खिची यांनी यासंदर्भात म्हंटले आहे की, सन १९४७ पासुन या लोकशाहीतील कायदा व सुव्यवस्था चालविण्याचे कायदेशीर अधिकार तसेच लोकांमध्ये योग्य रित्या राबविण्यासाठी ज्या चार स्तंभाची स्थापना झाली विधायिका,न्यायपालिका, कार्यपालिका व पत्रकारिकता या चार स्तंभाची ब्रिदवाक्ये – सत्यमेव जयते, सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय १०० अपराधी हे निर्दोष सुटले तरी चालेल पण एका निर्दोष व्यक्तीस शिक्षा होता कामा नये, निस्पक्ष व निर्भिडता अशी ७६ व्या वर्षाच्या कालावधित जशीच तशी चालविली जात आहे.

वास्तविक पहाता गत २० वर्षातील लोकशाहीत एक ना धड भाराभार चिंध्या अशी परिस्थिती निर्माण केली अथवा घडविण्याचे कार्य सुरु झाले.कोणालाच कोणाचा ताळमेळ राहीलेला नाही स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार घडण्याचे प्रमाण वाढले निती भ्रष्टांनी काहुर माजविला. प्रस्थापीत ब्रिदवाक्ये ही वेशीला टांगलेल्या फलका प्रमाणे या चारस्तभांच्या प्रमुख कार्यालयात दिसुन आली. संविधानिक घटना त्यामधील नागरिकांची हक्क कर्तव्ये ही बासनात गुंडाळुन ठेवली कि काय ? अशी सद्याच्या परिस्थितीची खरी हकिगत आहे.

२६ जानेवारी १९५० या गणराज्य या दिनापासुन भारतीय लोकशाहीचे प्रमुख ब्रिदवाक्य सत्यमेव जयते हे अंमलात आले आज हि तेच ब्रिदवाक्य आहे. का आहे कशासाठी आहे याचे भान उरले तर नाहीच शिवाय गांभिर्य नसल्याचे बाब गेल्या २४ वर्षापासुन निदर्शनास आली. या भारत देशाचा पुर्वोतिहास पहाता नेहमी नितीचा सत्याचा विजय हा होतो आणी या लोकशाहीचे मुख्य ब्रिद सत्यमेव जयते हेच आहे तर यदाकदाचित कायद्यामध्ये सत्यता, सभ्यता, नितीमत्ता हि असेल असा आत्मविश्वास बाळगून गेल्या ३० वर्षात स्वकिय नातेवाईकांकडुन मानसिक,आर्थिक त्रास वअन्याया विरुध्द सत्य मार्गानेच दाद मिळविण्याचा धैर्य निश्चित केला परंतु परिस्थिती ही तशी विपरित होती तरी कोणावर अन्याय करायचा नाही होणारा अन्याय हा सुध्दा सहन करायचा नाही. हा सिध्दांत कायम बाळगूण दहा वर्ष तक्रारी केल्या तरी योग्य ती चौकशी झाली नाही म्हणून डिसेंबर २०१० मध्ये सत्याचा विजय करण्यासाठी कायदा हातात घेण्याचे तसे पत्र दिले आणी सन २०११ पासुन वाढत्या भ्रष्टाचारा विरुध्द जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे जनआंदोलन “सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही” अशी घोषणा देण्यात आली.

येथील जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक, तसेच मुख्यमंत्री. गृहमंत्री विधी व न्याय मंत्रालय, मुंबई हाय कोर्ट, औरंगाबाद हाय कोर्ट, राज्य मानवाधिकार आयोग यांना तसेच विविध कार्यालयात पाठवलेल्या पत्रातुन १४ वर्षात कायद्याला, सत्यमार्गाला दडपविण्याचे कार्य हे नित्य घडले तसे घडविण्याचे प्रकार घडत आले. इतकेच नाही तर १४ वर्षात कायद्यांचे, सत्यमार्गाचे पालन करु नये कायदा हातात घेऊन मी गून्हेगार व्हावे अशी परिस्थिती हि निर्माण केली त्याविरोधात आणी लोकशाहीत सत्यमेव जयते या नावाखाली चाललेल्या निष्कृष्ठ अशा गैर आणी बेकायदेशीर कारभाराच्या निषेधार्थ १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५,३० वा. निषेध सभा घेण्याचे आयोजन केले आहे. तरी सदर निषेध सभेतुन देशाच्या संस्कृतीचे सत्यमार्गाचे पालन केल्यानंतर स्वतःमध्ये निर्भिडता निस्पक्षता कशी निर्माण झाली जागृत नागरिकांचे कर्तव्य कसे घडुन आले आदि विषयावर विशेष माहीती प्रकटन केल्यानंतर जरी सत्यमार्गाला न्याय नाही शिक्षा मिळाली तरी विजय हा सत्याचाच होणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तरी आपण या निषेध सभेत उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.