पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन
नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतिसूर्य महात्मा
ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे पार पडला. महात्मा
फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन
दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर,
भाजप ओबीसी विभागाचे राज्य उपाध्यक्ष किशोर डागवाले, माजी नगरसेवक संजय चोपडा, श्री
विशाल गणपती मंदिराचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, मोहन कदम, फुले ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष दिपक खेडकर,
डॉ. सुदर्शन गोरे, राजेंद्र पडोळे, बाळासाहेब भुजबळ, डॉ. रणजीत सत्रे, अनिल इवले, बनकर सर, गणेश
कोहले, ब्रिजेश ताठे, मळू गाडळकर, किरण जावळे, संतोष हजारे, अशोकराव तुपे, भरत गारुडकर, संकेत
ताठे, संकेत लोंढे, ऋषिकेश ताठे, गणेश जाधव, विक्रम बोरुडे, महेश गाडे, किरण मेहेत्रे, महेश सुडके,
श्रीकांत आंबेकर, विश्वास शिंदे, दिनेश जोशी, अनुराग पडोळे, अतुल पडोळे, आकाश डागवाले, प्रकाश इवळे,
पंडितराव खरपुडे, रेणुकाताई पुंड, कल्याणी गाडळकर, अश्विनी दळवी, सुरंगा विधाते आदींसह युवा कार्यकर्ते
उपस्थित होते. आ. संग्राम जगताप म्हणाले की, फुले ब्रिगेडच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सामाजिक कार्य सुरू आहे. विविध
सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे. महापुरुषांच्या जयंती उत्सवातून त्यांचे विचार
रुजविण्याचे कार्य होत आहे. जयंती उत्सवातून नवीन पिढीला
महापुरुषांचे विचार व समाजाला दिशा मिळणार आहे. महाराष्ट्रात
महात्मा फुले यांनी पहिली शिव जयंती साजरी केली व महाराजांचा इतिहास समाजापुढे आणला.
शिवजयंतीचे जनक म्हणून प्रत्येकाच्या मनात महात्मा फुले यांचे नाव कोरले गेले असल्याचे
त्यांनी सांगितले. दीपक खेडकर म्हणाले
की, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा
फुले यांचा शिवसन्मान सोहळा
गेल्या अकरा वर्षांपासून मोठ्या
उत्साहात होत आहे. महात्मा
फुले यांनी शिवाजी महाराजांना
गुरु माणून त्यांचे कार्य पुढे नेले. त्यांनी शिवाजी
महाराजांच्या जीवनावरील पहिला कुळवाडी भूषण हा
एक हजार ओळींचा पोवाडा सादर करुन त्यांचे महान
कार्य जगासमोर ठेवले. आजही समाजात महापुरुषांच्या
विचारांचा अंगीकार करुन त्यांचे विचार पुढे घेऊन
जाण्याची गरज आहे. फुले ब्रिगेडच्या माध्यमातून
महापुरुषांच्या विचाराने समाजातील वंचित घटकांसाठी
कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले