दिल्लीत होणार्‍या साहित्य संमेलन विचार मंचाला अण्णाभाऊ साठे यांचे द्यावे

जिल्हाधिकारी यांच्याकडे डि.पि.आय.ची मागणी

नगर – दीन दलित कष्टकरी श्रमिक शोषित वंचिताच्या व्यथा आपल्या साहित्यात मांडणारे परिवर्तनवादी साहित्यिक लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे, छत्रपती शिवरायांचा पोवाडा परदेशात जाऊन गाणारे, मराठी भाषेचा झेंडा साता समुद्रापार फडकवणारे, जगातील सतावीस भाषेत ज्यांचे साहित्य प्रकाशित आहे असे लोकप्रबोधनकार
डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नाव यावर्षी दिल्ली येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसर किंवा साहित्य संमेलन प्रवेशद्वारा साहित्य संमेलन विचार मंच यापैकी कोणत्याही स्थळास वा ठिकाणास साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे देण्यात आले. निवेदनात म्हटले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषितांच्या व्यथा साहित्यात शब्दबद्ध करून साहित्य क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. मराठी भाषेला सातासमुद्रापार घेऊन
जाणारे ते साहित्यिक आहेत. व्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारणारे जनसामान्यातील नायक नायिका त्यांनी साहित्यात उभे केले. उपेक्षित जनतेला ऊर्जा देणारे त्यांचे वास्तववादी आणि परिवर्तनवादी साहित्य संपूर्ण जगाने स्वीकारले
आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन देशाच्या
राजधानी असणार्‍या दिल्ली मध्ये होणार्‍या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलन २०२५ च्या साहित्य संमेलन परिसरात प्रवेशद्वार
विचार मंच यापैकी कोणत्याही स्थळास वा ठिकाणास साहित्यरत्न
अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन
सादर करण्यात आले.
यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे अहिल्यानगर
जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाठ, शहर अध्यक्ष पावलस पवार, पाथर्डी
कार्यध्यक्ष साहेबराव केंदळे, राहुरी शहराध्यक्ष बाळू घोरपडे आदिसह
पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिल्लीमध्ये होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५ च्या
साहित्य संमेलन परिसरात प्रवेशद्वार विचार मंच यापैकी कोणत्याही स्थळास
वा ठिकाणास साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशा
मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. (छाया – सागर साळवे)

छावा’ चित्रपटाच्या स्वागतासाठी सावेडी गावातून छत्रपती संभाजी महाराज यांची काढली मिरवणूक

 

तरुणांचा मोठा सहभाग; शासनाने ट्रॅस फ्री करावा शालेय विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखविण्यात यावा : सावेडी ग्रामस्थांची मागणी

नगर – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात
छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास व जीवन चरित्राचे दर्शन घडविण्यात आले आहे. तरुणांना छत्रपती संभाजी
महाराजांचा प्रेरणादायी खरा इतिहास समजावा. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या पिढीसमोर यावा. यासाठी सावेडी ग्रामस्थांच्या वतीने छावा चित्रपटाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अश्वारूढ छत्रपती संभाजी महाराज, भालदार चोपदार, मावळे, भगवे झेंडे, पारंपरिक तुतारी व संबळ वाद्यांचा निनादात सावेडी गावातील तरुणांनी भगवा पंचा परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती
संभाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत सावेडी गावातून मोठ्या थाटामाटात छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक काढली. यानंतर मिरवणूक कोहिनूर मॉल येथे आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे
औक्षण करून फुलांची उधळण करण्यात आली. छावा चित्रपट बघण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा अमोल बारस्कर यांनी केली होती.
छावा चित्रपट पाहिल्याच दिवशी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील छत्रपती संभाजी
महाराज यांचा पराक्रमाचा इतिहास पाहून प्रेक्षक भारावून गेले. छावा चित्रपट शासनाने
ट्रॅस फ्री करावा. तसेच शालेय विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखविण्यात यावा, अशी
मागणी सावेडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

संत नरहरी महाराजांचे कार्य समाजाला प्रेरणादायी

सुवर्णकार समाजाच्यावतीने संत नरहरी महाराज पुण्यतिथी सप्ताहाची सांगता

नगर – आजच्या धकाधकीच्या युगात प्रत्येक जण प्रचंड वेगाने धावताना आमचा मनुष्य जन्माचा नेमका हेतू काय ? हेच विसरत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये संत न नरहरी महाराज यांनी निस्पृहपणे केलेलली विठ्ठल भक्ती,
त्यांचे विचार, त्यांचे कार्य जाणून घेतले आणि ते कृतीत आणले तर आपल्या जीवनाचा खर्या अर्थाने
उद्धार होईल. संत नरहरी महाराजांचे कार्य खर्या अर्थाने आजही समाजाला प्रेरणादायी ठरेल, असा विचार
ह.भ.प. जनार्दन महाराज माळवदे यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर येथील लाड  सुवर्णकार समाजाच्या वतीने संत
शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कोर्ट गल्ली येथील विठ्ठल रुमिणी मंदिरात आयोजित सप्ताहाच्या समारोपप्रसंगी काल्याचे किर्तन करताना ते बोलत होते. त्याप्रसंगी नगर शहर व जिल्ह्यातील समाज बांधव, भक्त मंडळ उपस्थित होते.  कार्यक्रमाचे औचित्य साधून लाड सुवर्णकार समाजाच्या विश्वस्त पदी नेमणूक झालेल्या नूतन सदस्य
शरद कुलथे (भिंगार), गणेश डहाळे (केडगाव), विनोद लिंबीकर (नगर), योगेश नागरे (केडगाव) यांचा समाजाचे विश्वस्त
सचिन देवळालीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच सप्ताह निमित्त स्वर्गीय राधाबाई निफाडकर यांच्या स्मरणार्थ महाप्रसादाची सेवा देणारे विश्वस्त मुकुंद निफाडकर आणि परिवाराचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी लाड सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय देवळालीकर, मुकुंद निफाडकर, प्रकाश देवळालीकर, सचिन देवळालीकर, सुरेश मैड, जगदीश देडगावकर, श्याम मुंडलिक आदीसह समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाड सुवर्णकार युवा संघटना, लाड सुवर्णकार समाज, हरिओम भजनी
मंडळ व शहरकर परिवार यांचे सहकार्य लाभले. स्वागत अध्यक्ष संजय देवळालीकर यांनी तर आभार सुरेश मैड
यांनी मानले

विद्यार्थीदशेत टाकलेला प्रत्येक पाऊल भविष्याचे भवितव्य घडविणारा

बाबासाहेब बोडखे यांचे प्रतिपादन; सारसनगरच्या विधाते विद्यालयातील १० वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन

नगर – स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झालेल्यांचा आदर्श  समोर ठेऊन, त्यांचे व्यक्तिमत्व व कष्ट पाहून प्रेरणा घ्यावी.
स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे. परिस्थितीला सामोरे जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध केल्यास यश प्राप्त होणार
आहे. सर्व विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे गुणवैशिष्ट्य आहे, ते गुण ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याची
गरज असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले. विद्यार्थी दशेत टाकलेला प्रत्येक पाऊल भविष्याचे
भवितव्य घडविणारा आहे. परीक्षेचे व जीवनाचे नियोजन केल्यास ध्येय प्राप्ती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयात इयत्ता
१० वीच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी
मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यालयातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन
करण्यात आले होते. शिक्षक परिषदचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शालेय संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजी
विधाते, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष
सुसे, तसेच शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक संतोष सुसे यांनी शाळेच्या दरवर्षी एसएससी बोर्डाच्या उत्कृष्ट
निकालाबद्दल माहिती दिली. वर्षभर विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी करुन घेण्यात आलेली
तयारी व विशेष तासामुळे विद्यार्थी उत्तमपणे परीक्षेला सामोरे जात असल्याचे त्यांनी
माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी
केले.
सचिन बर्डे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन कले. तर विद्यार्थ्यांनी
आपल्या भाषणात विद्यालय व मार्गदर्शक अध्यापकांबद्दल ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका गायकवाड यांनी केले, तर अमोल मेहेत्रे यांनी
पाहुण्यांचा परिचय करुन दिला. श्रुती पेंटा यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी
होण्यासाठी सर्व शालेय शिक्षकांनी परिश्रम घेतले

यश मिळेपर्यंत मेहनत करा

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचा सल्ला; आयएमएसच्या एमबीए विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहली दरम्यान संवाद

नगर – कोणत्याही परिस्थितीत यश मिळे पर्यंत
मेहनत केली पाहिजे. यश आज नाही तर उद्या नक्की
मिळेल असा सल्ला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
यांनी आयएमएस एमबीएच्या विद्यार्थांना दिला.
आयएमएसच्या विद्यार्थांची शैक्षणिक सहल
गोवा येथे नेण्यात आली होती. यावेळी गोवा सहकारी
दुध प्रक्रिया संस्था या कंपनीला भेट दिली. दरम्यान
मुख्यमंत्री सावंत यांनी देखील विद्यार्थ्यांशी पणजी येथील
मंत्रालयात संवाद साधला. यावेळी प्रा. विजय शिंदे, प्रा.
सुरेश खन्ना, कु. कृष्णा थोरे, विजय पाटोळे व विद्यार्थी
उपस्थित होते.
प्रा. शिंदे यांनी संस्थेच्या वतीने डॉ. सावंत यांचे
स्वागत केले.
डॉ. सावंत यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना
त्यांच्या आयुष्यातील शिक्षणाचा प्रवास व महत्व
सांगितले. पुढे ते म्हणाले कि यशासाठी कोणताही मंत्र
नाही फक्त मेहनत हीच एक गोष्ट कायम आहे. काम
आणि वैयक्तिक आयुष्य यांचा मेळ कसा घालावा यावर
देखील त्यांनी भाष्य केले. मंत्रालयात झालेल्या या
भेटीत विद्यार्थ्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात
आली होती. मंत्रालयात झालेल्या आदरातिथ्याने व
मुख्यमंत्र्यांच्या या भेटीने विद्यार्थी भारावून गेले.
यानंतर विद्यार्थांनी गोवा सहकारी दुध प्रक्रिया
या कंपनीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाच्या दृष्टीने
आवश्यक असणार्‍या गोष्टींची पाहणी केली. तेथील
अधिकारी संजय शहाणे व संशील यांनी विद्यार्थांना
एकूण प्रक्रियेची माहिती दिली. संपूर्ण कंपनी फिरून
त्यातील एकूण एक गोष्टीची, विविध उत्पादने व त्याची
गुणवत्ता याची विद्यार्थ्यांनी पाहणी केली. या भेटीमुळे
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. शिवाय
कॉर्पोरेट क्षेत्रातील आव्हाने व संधी याची देखील माहिती
मिळाली.
मुख्यमंत्री भेट मिळवण्यासाठी संस्थेला डॉ.
नितीन भोसले व डॉ. प्रशांत महांडूळे यांचे सहकार्य
लाभले. हि सहल यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक
डॉ. एम बी मेहता, उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस,
विभाग प्रमुख डॉ. प्रोनोती तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रा. विजय शिंदे यांनी र्ढीीश ङशर्ळीीीशी कंपनीचे अमित
यांच्या सहकार्याने नियोजन केल

सावित्री फातेमा सद्भावना विचार मंचच्यावतीने ‘महात्मा फुले आणि इस्लाम’ पुस्तकाचे प्रकाशन

नगर – साधारणत १४०० वर्षांपूर्वी अरबस्तानात पैगंबरांनी (स.) जी आदर्श सर्वांगीण क्रांति घडवली होती, त्या क्रांतिने अवघ्या जगातील समाज सुधारकांना आश्चर्य चकित केले. स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय प्रस्थापित झालेला
लोकांनी डोळ्यांनी पाहिले, प्रत्यक्ष  अनुभवला म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी सुध्दा पैगंबरांच
गुणगाण करणारा जहांमर्द मुहम्मद (स.) हा पहिला पोवाडा लिहिला. तद्वतच एकोणीसाव्या शतकातील महात्मा ज्योतिराव
फुलेंच्या कार्यात अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले. तन-मन धनाने फुले दांपत्याला सर्वतोपरी
सहकार्य केले. फुले दांपत्याला पडत्या काळात मोलाची साथ देणार्‍यांमध्ये उस्मान शेख, त्यांची बहीण फातेमाबी
शेख व मुन्शी गफ्फार बेग यांचा सिंहाचा वाटा आहे. ’महात्मा फुले आणि इस्लाम’ हा अ.कादर
मुकादम साहेबांचा लेख या संबंधी खूप महत्वाचा असून तो महाराष्ट्र शासनानेही ’शोधांच्या नव्या वाटा’ या
हरि नरकेंनी संकलीत केलेल्या ग्रंथात प्रकाशीत केला
आहे. म्हणूनच ’सावित्री फातेमा सद्भावना मंच’ तर्फे तो
पुस्तिकेच्या स्वरूपात जनसामान्यांसाठी प्रकाशित करत
आहोत, असे प्रतिपादन सावित्री फातेमा सद्भावना मंचाचे
अध्यक्ष अ‍ॅड. संभाजी बोरुडे यांनी केले.
सावित्री फातेमा सद्भावना विचार मंचाच्यावतीने
महात्मा फुले आणि इस्लाम या पुस्तकाचे प्रकाशन
करण्यात आले. याप्रसंगी मंचाचे अध्यक्ष अ‍ॅड. संभाजी
बोरुडे, डॉ.रफिक सय्यद, संजय
झिंजे, अशोक सब्बन, राजुभाई
शेख, अब्दुल रहीम साहब, बापू
चंदनशिवे, मुबीन खान आदी
उपस्थित होते.
डॉ. रफिक सय्यद मनोगत
व्यक्त करताना म्हणाले की,
नगर जिल्ह्याला सद्भावनेचा
मोठा इतिहास आहे. या जिल्ह्यात
अनेक हिंदू मुस्लिम संतांनी
सद्भावना द्विगुणीत करण्याचे कार्य
केलेले आहे. म्हणून आपणही त्या
कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले
पाहिजे. व त्यासाठीच सावित्री फातेमा सदभावना मंच
त्या दिशेने मागील अनेक वर्षापासून कार्य करत आहे. व
याला समाजातील प्रत्येक धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने
याच्यात सहभागी होत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सब्बन यांनी
केले. प्रास्तविक मुबीन खान यांनी केले. संजय झिंजे
यांनी आभार मानले.

सामुदायिक विवाहाची संकल्पना समाजात रुजविणे गरजेचे

ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे प्रतिपादन; कल्याण रोडवरील बालाजी, विठ्ठल-रुखमाई देवस्थानच्या बालाजी उत्सवात सामुदायिक विवाह

नगर – आज विवाह जुळवणे आणि ते पार पाडणे ही मोठी जिकरीची गोष्ट झाली आहे. मोठेपणा मिरविण्यासाठी अनेकजण
अनावश्यक खर्च विवाह सोहळ्यात करत असतात. हौसेला मोल नसते. परंतु आज समाज वेगळ्या
परिस्थितीतून जात आहे, अशा परिस्थितीत लग्नातील अनवश्यक खर्चास फाटा देत आज बालाजी
उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळा हा आदर्शवत असाच आहे. गेल्या ११
वर्षांपासून नळकांडे बंधू धार्मिक कार्याबरोबर सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देत आहेत. वधू-वरांच्या
पालकांचा खर्चाची बचत होऊन सामुदायिक विवाहाची संकल्पना आज समाजात रुजविणे गरजेचे
आहे, असे प्रतिपादन ह.भ.प इंदोरीकर महाराज यांनी केले.
कल्याण रोडवरील बालाजी, विठ्ठल-रुखमाई देवस्थानच्यावतीने
बालाजी उत्सवात सामुदायिक विवाह झाले. याप्रसंगी आयोजक राम
नळकांडे, माजी नगरसेवक शाम नळकांडे आदींसह सर्व परिवार
उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सर्वधर्मिय सामुदायिक
विवाह ही काळाची गरज आहे. बालाजी महोत्सवातील धार्मिक
कार्यक्रमाबरोबरच असा सामुदायिक विवाह सोहळ्याचा आदर्श
समाजापुढे ठेवला आहे. अशा उपक्रमामुळे समाजाला दिशा मिळणार
आहे. नळकांडे परिवाराचा यातील पुढाकार हा कौतुकास्पद असाच
आहे.
याप्रसंगी मनपा आयुक्त यशवंत डांगे, संभाजी कदम, भगवान
फुलसौंदर, संजय शेंडगे यांनीही बालाजी महोत्सवानिमित्त सर्वधर्मिय
सामुदायिक विवाह सोहळ्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले, दरवर्षी बालाजी
महोत्सव हा विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमातून
साजरा होत असतो. यात नगरसह परिसरातील नागरिक सहभागी
होत असतात. गेल्या ११ वर्षांपासून या उत्सवात सर्वधर्मियांचा
सामुदायिक विवाह सोहळ्यात ४५ विवाह लावण्यात येऊन वधूय्वरांच्या पालकांना दिलासा देण्याचे काम करत आहोत. तसेच हा
जो उत्सव पार पाडण्यासाठी आमच्या सर्व मित्र परिवार यांनी जे
सहकार्य केले ते खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले
या सामुदायिक विवाहाच्या अगोदर हभप इंदोरीकर महाराज यांचा
कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला होता.
या विवाह सोहळ्याप्रसंगी
आमदार संग्राम जगताप, हभप
इंदोरीकर महाराज, संजय शेंडगे,
उद्योजक नरेंद्र फिरोदिया, संभाजी
कदम, भगवान फुलसोंदर, अनिल
शिंदे, बाळासाहेब बोराटे, सचिन
जाधव, अनिल बोरुडे, सचिन
शिंदे, गणेश भोसले, पुष्पाताई
बोरुडे, संतोष गेनपा, संजय
चोपडा, मनोज कोतकर, सुरेश
तिवारी, दत्ता कावरे, संदीप
दातरंगे, महेश लोंढे, सुनील
लालबोंद्रे, रवी लालबोंद्रे, प्रकाश
फुलारी आदिंनी उपस्थित राहून
वधू-वरांना आशिर्वाद दिले.
राम नळकांडे यांनी प्रास्तविकात म्हणाले कि दरवर्षीप्रमाणे
यंदाच्या बालाजी उत्सवांतर्गत धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक
उपक्रम आयोजित केले होते. तसेच सामुदायिक विवाह सोहळा
सर्वांचे आकर्षण ठरला, तीन वधू-वरांचे विवाह लावण्यात आले.
या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमचा
उत्साही वाढत असल्याचे सांगितले.
सर्वांचे स्वागत वैशाली नळकांडे, मनिषा नळकांडे, सुरेखा
नळकांडे, सुवर्णा नळकांडे, शारदा गडाख यांनी केले. सूत्रसंचालन
प्रियंका पाटील शेळके, अंकुश साबळे यांनी केले. तर रामा गुंडू यांनी
आभार मानले. बालाजी उत्सव यशस्वीतेसाठी शंभुराजे प्रतिष्ठान,
शिवाजीनगरचा राजा मित्र मंडळ, नवग्रह प्रतिष्ठान, शाम नळकांडे
मित्र मंडळ व कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले

अहिल्यानगर मनपावर हिंदू धर्म विचाराची सत्ता बसविणार

आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन; प्रेमदान हडको येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व सभामंडप उभारणी कामाचे भूमिपूजन

नगर – केंद्र व राज्यामध्ये हिंदू धर्माचे संरक्षण करणारी सत्ता आहे आता पुढील काळात होणार्‍या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महापालिकेवर देखील हिंदू धर्म विचाराची सत्ता बसवणार आहे. शहर विकासाच्या योजनांबरोबरच
आध्यात्मिकतेचा वारसा अखंडितपणे पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे. मंदिर
उभे राहत असताना लोक वर्गणीची खरी गरज असून धार्मिकतेबाबत
आत्मीयता निर्माण होत असते. दक्षिण मुखी हनुमान मंदिर हे प्रेमदान हडको मधील नागरिकांचे श्रद्धास्थान
आहे. त्यामुळे या ठिकाणी धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे सुसंस्कृत पिढी  निर्माण होईल. अयोध्या
येथे श्री प्रभू राम मंदिराच्या उभारणीमध्ये प्रत्येक नागरिकांनी भाग घेतला आहे. तसेच प्रेमदान हडको
मधील नागरिकांनी देखील पुढाकार घेत दक्षिण मुखी हनुमान मंदिर उभारणीचे काम हाती घेतले आहे.
चुकीच्या गोष्टी सहन करणार नसून ‘जिधर आयेंगा आली उधर आयेंगा बजरंग बली’ अशी घोषणा आ. संग्राम
जगताप यांनी दिली प्रेमदान हडको येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व सभामंडप
उभारणी कामाचे भूमिपूजन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर
जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक सतीश शिंदे, करण कराळे, अंजली आव्हाड, विलास शिंदे, मयूर
कुलथे, सागर मुर्तडकर, सचिन जगताप, शिवजीत डोके, आप्पा खताडे, किशन गायकवाड, मयूर बांगरे, अमित खामकर, प्रसाद डोके, शुभम भगत, सागर शहाणे, सचिन तुपे, राज मुंडलिक, राहुल राऊत, अभिजीत शिंदे, संतोष शिंदे,
प्रसाद कुलकर्णी, मंगेश खिळे, संदीप थोरात, प्रथमेश ढेरे, हर्षल भिजय, बाळू खताळे, तात्या सेंदर आदी
उपस्थित होते विलास शिंदे म्हणाले की, प्रेमदान हडको येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिर हे ५० वर्षे पूर्वीचे असून
ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार व सभा मंडपाचे काम लोकवर्गणीतून होणार असून त्या
कामाची भूमिपूजन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. या भागातील नागरिक एकत्र येत वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. हनुमान जयंतीपर्यंत हे मंदिर उभे करण्याचा आमचा मानस आहे, असे ते म्हणाले.

मुंबई पोलीसांची आशिया खंडामध्ये चांगली कामगिरी करणारी ओळख आहे

हनीफ शेख यांचे प्रतिपादन; प्रथमेश धिवर याची निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधानाचे पुस्तक भेट देत सत्कार

नगर – विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला या स्पर्धेच्या युगामध्ये नोकरीसाठी खूप कष्ट घ्यावे लागते. हे काम प्रथमेश धीवर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्ण करून दाखवले सर्वसामान्य कुटुंबात वाढला असून आपले
शिक्षण पूर्ण करत पोलीस दलात जाण्याचे स्वप्न बाळगले होते आणि ते त्यांनी पूर्ण केले. त्याचे
वडील बाळासाहेब धीवर यांनी मोल मजुरी करून आपल्या मुलाला शिक्षण दिले त्यामुळेच तो पोलीस
दलात भरती झाला आहे. मुंबई पोलीसांची आशिया खंडामध्ये चांगली कामगिरी करणारी ओळख
आहे. त्याच्या हातून नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच देशाची चांगली सेवा घडावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाचे पुस्तक भेट देऊन प्रथमेश धीवर याचा सत्कार करण्यात आला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनीफ
शेख यांनी दिली. मुंबई पोलीस सेवेमध्ये प्रथमेश धीवर याची निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधानाचे पुस्तक भेट देऊन सत्कार करताना शहराध्यक्ष हनीफ शेख, शहर महासचिव अमर निरभवने, जिल्हा संघटक सूधिर ठोंबे, पिनु भोसले, संजय शिंदे, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, भिंगार शहराध्यक्ष बबलू भिंगारदिवे, बाबासाहेब धिवर,
जालू पाटोळे, आनंद धिवर, तेजस धिवर, आदित्य धिवर, श्रेयश धिवर, संकेत धिवर, सोमनाथ धिवर,
ईश्वर धिवर, किरण धिवर, बाळासाहेब धिवर, प्रविण ओरे आदी उपस्थित होते.
प्रथमेश धीवर म्हणाले की शालेय शिक्षण घेत
असताना पोलीस दलामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न
बाळगले होते ते मी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या
जोरावर पूर्ण केले आहे यासाठी आई-वडिलांचे
कष्ट कामाला आले. वंचित बहुजन आघाडी
पक्षातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्यासमोर संविधानाचे पुस्तक भेट देऊन सत्कार केला
या माध्यमातून पुढील चांगल्या कामासाठी मला ऊर्जा मिळाली
असल्याचे ते म्हणाले

शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळच दररोज होतेय वाहतुकीची कोंडी

वाहनचालकांना सहन करावा लागतोय मनस्ताप, मात्र वाहतूक शाखेला गांभीर्यच नाही

नगर – अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौक येथे असणारे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयालगत च्या पत्रकार चौक ते अप्पू हत्ती चौकापर्यंतच्या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालकांना तासन तास या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र याचे शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना कोणतेही गांभीर्य वाटत नसल्याने ते त्याकडे दुर्लक्ष करत असून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तसेच दहावी च्या परीक्षाही लवकरच सुरु होणार आहेत. शहरातील अनेक शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी या रस्त्यानेच जावे लागत असते. त्यातच सतत होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पत्रकार चौकापासून जवळ असणारे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रुग्णाला दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिकांची ये जा सुरु असते. या रुग्णवाहिकांना पण या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आणि अनेक वेळा रुग्णवाहिका रुग्णांना नेत असताना या वाहतूक कोंडी मध्ये अडकलेली पाहायला मिळते. जर एखाद्या रुग्णाला तातडीच्या उपचारांची आवश्यकता असेल आणि वाहतूक कोंडी मुळे त्याला वेळेवर हॉस्पिटल मध्ये दाखल करता न आल्याने तो जर दगावला तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वाहतूक शाखेचे अस्तित्व जाणवेना

पत्रकार चौक ते अप्पू हत्ती चौकापर्यंत रस्त्यावरील वाहतूक कोंडीबरोबरच अहिल्या नगर शहरामध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र कोणत्याच भागात शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी दिसत नाहीत.त्यामुळे बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी करण्यास वाव मिळतो त्याचे परिणाम सर्वसामान्य नगरकरांना दररोज भोगावे लागते. त्यामुळे शहरात वाहतूक नियंत्रण शाखेचे अस्तित्वच जाणवत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तत्काळ लक्ष घालून वाहतूक कोंडीवर उपायोजना करण्याचे आदेश शहर वाहतूक नियंत्रण शाखेला द्यावेत अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत.