नगर – अहमदनगर जिल्हा पांचाळ सुवर्णकार स्नेहवर्धक मंडळ अहिल्यानगरतर्फे १५ फेब्रुवारीला श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३९ वी पुण्यतिथी सोहळा, साई मंदीर, संदेशनगर, वसंत टेकडी, अहिल्यानगर येथे साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधव उपस्थित होते. अध्यक्ष प्रकाश पारखे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत श्री नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरवात झाली.
तसेच प्रथम समाजातील महिलांचे सौ. वैजयंती घोडके यांचे नेतृत्वाखाली (नरहरी भजनी मंडळा तर्फे) सुश्राव्य
भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ह. भ. प. महेश कस्तुरे महाराज यांचे प्रवचन झाले. त्यात त्यांनी इतर
सर्व संतांनी हरी व हर एैय गृहित धरले होते हे सांगीतले मात्र संत श्री नरहरी महाराजांनी ते स्वतः अनुभवले व
नंतर स्विकारले. हे नरहरी महाराजांचे वैशिष्ट्य सांगितले.
प्रथम ते निस्सीम शिवभक्त होते. या कार्यक्रमास सुनिल त्रंबके, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुध्दे व रूपाली वारे इत्यादी उपस्थीत होते. त्यांचा सत्कार समाजाचे अध्यक्ष प्रकाश पारखे यांच्या हस्ते करण्यात आला. नंतर समाजातील गुणवंत
विद्यार्थी व कर्तृत्ववान समाज बांधव व जेष्ठांचा सत्कार व पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यात प्रामुख्याने
सहाय्यक संचालक नगररचना सौ. पुनम पंडीत, शहर अभियंता मनोज पारखे, आर्किटेचर किशोर घोडके,
उपअभियंता संतोष पोतदार, हॉर्स रायडर विराज पारखे तसेच नृत्य विशारद अश्लेशा पोतदार, कलाकार
वरद महामुनी (नरहरी महाराजांची उत्कृष्ट रांगोळी प्रतिमा रेखाटल्याबद्दल) तसेच ज्येष्ठ
श्रीधर पंडीत मांडवगणकर यांचा व समाजासाठी झटणारे तरूण व हरहुन्नरी
व्यक्तिमत्व व ज्यांनी समाजासाठी जागा मिळवुन देण्यामध्ये मोठे योगदान
दिले ते वैभव जडे इत्यादींचा सत्कार करण्यात आला. समाजाच्या संस्थेचे रजिस्ट्रेशन
टिकविण्यात मोठे योगदान दिलेले व ज्यांच्या अनुभवी नेतृत्वात संस्थेची
शासकिय मान्यता टिकुन ठेवणारे (अन्यथा समाजास जागा मिळु शकली
नसती) अध्यक्ष प्रकाश पारखे यांचा सत्कार ह.भ.प. महेश कस्तुरे महाराज
यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास अनिल महामुनी, राजेंद्र
दिक्षीत, मुकुंद महामुनी, महेश दाळिंबकर, प्रशांत पोतदार,
संदिप घोडके, रतिकांत मेहेत्रे, अविनाश पोतदार, वैभव
टंकसाळे, सौ. प्रकाशीनी घोडके इत्यादी उपस्थीत
होते. सुत्रसंचालन रमेश पळसे यांनी केले. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी रेवननाथ पानगे, वैभव जडे, रमेश पळसे,
किशोर घोडके यांनी परिश्रम घेतले. आर्किटेचर किशोर
घोडके यांनी आभार मानले व नंतर महाआरती करुन
महाप्रसादाचे वाटप करण्यात आले