बुर्‍हाणनगरच्या ‘अंबिका सांस्कृतिक भवना’वर जिल्हा प्रशासनाने केलेली कारवाई बेकायदेशीर

नगर – सत्तेचा व पदाचा गैरवापर
करून आ.शिवाजी कर्डिले यांनी प्रशासनाला
हाताशी धरून बुर्‍हाणनगर येथील विजय
भगत यांच्या मालकीच्या जागेतील अंबिका सांस्कुतिक
भवन गुरवारी सकाळी जमीनदोस्त केले. तुळजाभवानी
देवीच्या विविध उत्सवासाठी तसेच धार्मिक कार्यक्रम
ांसाठी या सांस्कृतिक भवनाचा वापर आम्ही करत असू.
तिथे रहिवासी खोल्याही होत्या. हे बांधकाम पूर्णपणे
कायदेशीर असून प्रशासनाच्या, ग्रामपंचायची परवानगी
यास आहे. आ.कर्डिले यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत
व जिल्हा प्रशासनास ही बेकायदेशीर प्रशासनास ही
कारवाई करण्यास भाग पाडले आहे. यामध्ये आमचे
करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. आ.शिवाजी कर्डिले
हे गेल्या अनेक वर्षांपासून बुर्‍हाणनगरच्या तुळजाभवानी
देवी मंदिराचे पुजारी असलेल्या भगत कुटुंबियांना
मानसिक व राजकीय त्रास देत आहेत. त्यांच्या विरोधात
निवडणुकीत काम केल्यानेच आ.कर्डिले यांनी द्वेषाने
ही बेकायदेशीर कारवाई केली आहे. सत्तेचा व बळाचा
वापर करत ते दादागिरी करत आहेत. अनेकदा त्यांनी
आम्हाला जीवे मारण्याच्या धमयाही दिल्या आहेत.
त्यामुळे कदाचित ते आमचा संतोष देशमुख करतील,
असा गंभीर आरोप बुर्‍हाणनगर येथील तुळजाभवानी
देवी मंदिराचे पुजारी अ‍ॅड.अभिषेक भगत यांनी पत्रकार
परिषदेत केला.
अहिल्यानगर तालुयातील बुर्‍हाणनगर येथील भगत
कुटुंबियांच्या माकालीच्या जगात उभारण्यात आलेल्या
अंबिका सांस्कृतिक भवन उपविभागीय अधिकारी सुधीर
पाटील यांच्या आदेशाने प्राशासकीय यंत्राने मार्फत
गुरवारी सकाळी बुलढोझरच्या सहाय्यने जमीनदोस्त
करण्यात आले. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा
आरोप करत अ‍ॅड.विजय भगत, अभिषेक भगत यांनी
माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अंबडचे माजी आमदार
शिवाजी चोथे, माजी सभापती सुभाष झिने यांच्या
उपस्थितीत गुरवारी पत्रकार परिषद घेतली. हे प्रकरण
न्याय प्रविष्ट असताना जिल्हा प्रशासनाने कोणतीही पूर्व
नोटीस न देता बेकायदेशीरपणे ही कारवाई केल्याचा
आरोप अभिषेक भगत यांनी केला.
यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले,
आ.शिवाजी कर्डिले यांनी सत्तेचा वापर करून भगत
परिवारावर ही बेकायदेशीरपणे कारवाई केली आहे. देवीचे
पुजारी असलेल्या हिंदू समाजच्या परिवारावर अन्याय
करणे हेच का भाजपाचे हिंदुत्व? प्रत्यक्षात आ.कर्डिले
रहातात त्या घराचाही वरचा मजला बेकायदेशीर आहे.
मग प्रशासनाने अद्याप का नाही त्यांच्या घरावर कारवाई
केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यात
भाजपाकडे असलेल्या पाशवी बहुमता मुळेच भाजपाचे
आमदार सर्वसामान्य व अल्पसंख्याक कुटुंबियांवर अशी
दादागिरी करत बेकायदेशीर कारवाई करत आहेत, असा
आरोप त्यांनी केला.
माजी आमदार शिवाजी चोथे म्हणाले,
आ.कर्डिले व भगत परीवारात बर्‍याच
वर्षांपासून वाद आहेत. ते समजुतीने सोडवण्यासाठी मी
मध्यस्थी केली. पण आ.कर्डिले ऐकायला तयार नाहीत
ते द्वेषाने राजकारण करत भगत कुटुंब उध्वस्त करण्यास
निघाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पक्षाच्या
आमदारांचे असे घाणेरडे राजकारण दिसत नाही का ?
या विरोधात लवकरच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे.
यावेळी अभिषेक भगत यांनी २०१३ मध्ये सर्व रीतसर
परवानग्या घेऊनच अंबिका सांकृतिक भवन बांधले असल्याचे
सांगत पूर्णपणे कायदेशीरच आहे. जिल्हा प्रशासनाने
आ.कर्डिलेंच्या दबावामुळे केलेली कारवाई बेकायदेशीर आहे.
अंबिका सांस्कृतिक भवनात आमच्या अनेक महत्वाच्या
वस्तू होत्या. देवी देवतांचे फोटो व मुर्त्या होत्या. या वस्तू
व मुर्त्या काढण्याचाही अवधी प्रशासनाणे आम्हाला दिला
नसल्याने सर्व वस्तूंची मोडतोड व मूर्त्यांची विटंबना झाली
आहे. त्यामुळे आमचे दीड कोटीहून अधिक नुकसान झाले
आहे. अंबिका सांकृतिक भवनाच्या कारवाईची नोटीस
उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी १८ फेब्रुवारीलाच
काढली होती. पण अधिकार्‍यांनी ती नोटीस सांकृतिक भवन
पूर्णपणे पडून झाल्यावर गुरवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारस
आमच्याकडे आणून दिली. याचा अर्थ प्रशानाची हात मिळवणी
या प्रकरणात झाली आहे. या बेकायदेशीर कारवाई विरोधात
मी कोर्टात दाद मागणार असल्याचे अभिषेक भगत यांनी
सांगितल

रेल्वे स्टेशनच्या महानगरपालिका शाळेत पाककृती स्पर्धा

रेल्वे स्टेशनच्या महानगरपालिका शाळेत पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

नगर – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत महानगरपालिका शाळा क्रमांक ४, रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर येथे पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेतील पाककृतींचे परीक्षण शिल्पा धोपावकर
यांनी केले. स्पर्धेसाठी असणार्‍या निकषाप्रमाणे फोर्टीफाईड तांदूळ, तृणधान्ये, कडधान्ये, विविध पालेभाज्या
यांचा वापर करून नाविन्यपूर्ण पदार्थ पालकांनी बनवले. मिश्र डाळींचे थालीपीठ, दाल खिचडी,
पराठे अशा प्रकारे विविध पौष्टिक पदार्थ बनवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे
मुख्याध्यापक विजय घिगे, मनिषा गिरमकर, मेघना गावडे तसेच सीएसआरडी विद्यालयाचे विद्यार्थी
वैभव सुपेकर, श्रद्धा चव्हाण, नैना पी यांनी योगदान दिले

राष्ट्रीय महामार्गावरील तो “खड्डा” बनलाय मृत्यूचा सापळा अनेकदा होताहेत लहान मोठे अपघात, महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष

नगर – नगर – कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर शहराजवळ असलेल्या ठाणगे पेट्रोल पंपासमोर गेल्या अनेक दिवसांपासून पडलेला एक मोठा खड्डा वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. हा खड्डा चुकवितांना अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसह संबधित यंत्रणेचे या अपघातप्रवण खड्ड्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हा कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग असल्याने अनेक लांब पल्ल्याची वाहने तसेच अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातील वाहनांची या महामार्गावर रात्रंदिवस ये जा सुरु असते. दिवसा उजेडी वाहनचालकांना या खड्ड्याचा काहीसा अंदाज येतो, मात्र रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने वाहने त्यात आढळून अपघात होत आहेत.

१८ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास या जीवघेण्या खड्ड्यामध्ये एक दुचाकी चालक आदळून गंभीर अपघात झाला. खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो दुचाकी चालक सुमारे २० ते ३० फूट लांब उडून पडला. गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झालेल्या या दुचाकीस्वारास आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

या खड्ड्यामुळे आजवर अनेक छोटे मोठे अपघात झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितले. हा खड्डा तात्काळ बुजविण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक व युवराज शिंदे यांनी केली आहे.

संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त अहिल्यानगर येथील अकोळनेरला मिळाला अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचा मान

अकोळनेर येथे होत असलेल्या हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्यानिमित्त सरपंच प्रतिक
शेळके यांना मानाचे श्रीफळ देताना देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष रामदास महाराज
मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, वंशज अनिकेत महाराज मोरे, माऊली महाराज कदम

नगर – संतश्रेष्ठ तुकोबांच्या वैकुंठ गमनाला सन २०२४ – २५ दरम्यान ३७५
वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने संतकवी दासगणू महाराज यांची जन्मभूमी असलेल्या
अहिल्यानगर तालुयातील अकोळनेर गावाला अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा
पारायण सोहळ्याचा मान मिळाला आहे. या ठिकाणी १६ ते २३ एप्रिल या कालावधीत
हा भव्यदिव्य सोहळा पार पडणार असल्याची माहिती ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम
(छोटे माऊली) यांनी दिली.
या सोहळ्याच्या नियोजनाची बैठक अकोळनेर येथे पार पडली यावेळी देहू येथील
संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष रामदास महाराज मोरे, विश्वस्त भानुदास
महाराज मोरे, वंशज अनिकेत महाराज मोरे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि आष्टी
तालुयातील सुमारे १०० गावांमधील भजनी मंडळे, प्रमुख पदाधिकारी यांना मानाचे
श्रीफळ दिले.
श्रीक्षेत्र देहु येथून हेलिकॉप्टरद्वारे आणणार तुकोबारायांच्या पादुका अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्ये सांगताना
माऊली महाराज कदम म्हणाले, या धर्मसोहळ्यास १५ एप्रिल रोजी श्री जगद्गुरु तुकोबाराय
पादुकांच्या रूपाने अहिल्यानगर जिल्ह्यात हेलिकॉप्टरद्वारे श्रीक्षेत्र देहु येथून अकोळनेर
येथे आणण्यात येणार आहे. तसेच श्री क्षेत्र देहू येथून अकोळनेर येथे १०८ तरुणांच्या
हस्ते ज्ञानज्योत आणण्यात येणार आहे. या दिव्य पादुकांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार
आहेत. या दिवशी दुपारी ३ ते ५ यावेळेत दिव्य पादुका आणि ज्ञान ज्योत यांची भव्य
शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये ३७५ धर्मध्वजधारी, ३७५ कलश धारी, ३७५
तुळशीधारी, ३७५ कीर्तनकार, ३७५ टाळकरी, ३७५ मृदंगसेवक, ३७५ ब्रम्हवीणाधारी,
३७५ चोपदार असणार आहेत. शोभायात्रेनंतर धर्मध्वजारोहण होणार आहे.
५ हजार वाचकांचे भव्य दिव्य संगीत गाथा पारायण
१६ एप्रिल पासून अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सुरु होईल. या काळात
दररोज ५००० वाचकांचा भव्य दिव्य संगीत गाथा पारायण सोहळा संपन्न होणार आहे.
भारतातील प्रमुख चार पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित
करण्यात आले आहे. तसेच राज्यातील मान्यवर देवस्थानचे मठाधिपती यांनाही निमंत्रित
करण्यात आले आहे.
१ लाख भाविकांना पुरणपोळीचे भोजन देणार
अखंड हरिनाम सप्ताहमध्ये ५०० गावांचा २४ तास तुकाराम नावाचा अखंड भजन
पहारा गजर होणार आहे. दररोज ५०० टाळकरी व २५ मृदंग वादक कीर्तन सेवा देणार
आहेत. या काळात दररोज ५० हजार भाविकांना आमटी भाकरीचे अन्नदान करण्याचे
उद्दिष्ट असून २३ एप्रिल रोजी १ लाख भाविकांना पुरणपोळीचे भोजन देण्यात येणार
आहे. श्री जगद्गुरु तुकोबाराय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन या काळात केले जाणार
आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदाच इतया मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार
असल्याने भाविकांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री जगद्गुरु तुकोबाराय
त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठगमन सोहळा समितीच्यावतीने करण्यात आलेले
आहे

हद्दपार असलेल्या दोघांना शिवजयंती मिरवणुकीत पकडले

जल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानाही शहरात शिवजयंती मिरवणुकीत
आलेल्या आरोपीला पकडल्यानंतर त्याच्या समवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.

नगर – शिवजयंती उत्सव शांततेत व व्यवस्थित
पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कोतवाली, तोफखाना,
भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश
करण्यास मनाई करण्यात आलेली असताना, हद्दपार केलेले
दोघे शिवजयंती मिरवणुकीत फिरताना आढळून आल्याने
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई १९ फेब्रुवारी
रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान आशा
टॉकीज चौक आणि कापड बाजार येथे केली.
शिवजयंती उत्सव शांततेत व व्यवस्थित पार
पाडण्याच्या दृष्टिकोनातून हद्दपार केलेला संकेत सूर्यकांत
जाधव (वय २६, रा. मल्हार चौक, स्टेशन रोड) हा आशा
टॉकीज चौक येथे शिवप्रतिष्ठान स्टेशन रोड या मंडळाच्या
मिरवणुकीमध्ये फिरताना आढळून आल्याने कोतवालीचे
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पो.कॉ. दीपक रोहकले,
तानाजी पवार, सोमनाथ राऊत यांनी त्यास ताब्यात घेतले.
त्यास शहरात प्रवेश केल्याबाबत हद्दपार प्राधिकरण तथा
पोलीस अधीक्षक यांची परवानगी घेतली आहे काय, अशी
विचारणा केली असता तशी कोणतीही परवानगी त्याने
घेतली नसल्याचे त्याने सांगितले.
त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी संकेत जाधव यांच्याविरुद्ध
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ नुसार गुन्ह्याची
नोंद केली. पुढील कारवाई पोलिस हवालदार संदीप पितळे करीत
आहे
दुसर्‍या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस
निरीक्षक दिनेश आहेर, स.पो.नि. हेमंत थोरात, पोलीस
अंमलदार संदीप पवार, रवींद्र घुंगासे, गणेश लोंढे, गणेश
धोत्रे, शाहिद शेख, पंकज व्यवहारे, जालिंदर माने, सागर
ससाणे, रोहित येमुल, विशाल तनपुरे, महिला पोलीस
अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे यांना मिळालेल्या
माहिती नुसार त्यांनी कापडबाजार येथील एम जी रोडवरील
कोहिनूर कापड दुकान समोर हद्दपार असलेला सुनीलसिंग
जीतसिंग जुन्नी (रा. संजय नगर, काटवण खंडोबा, अ.नगर)
यास ताब्यात घेतले.
जिल्ह्यात प्रवेश करण्यासंबंधीची परवानगी घेतली
अगर कसे याबाबत विचारपूस केली असता त्याने माझ्याकडे
कोणतीही परवानगी नसल्याचे सांगितले. पोलिसांनी
त्याच्या हद्दपारीच्या आदेशाबाबत खात्री केली असता त्यास
उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग यांनी दोन वर्षाकरिता
संपूर्ण नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याचा आदेश
पारित केलेला आहे असे समजले. याप्रकरणी पो. कॉ.
रवींद्र घुंगासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील सिंग जुन्नी
याच्याविरुद्ध म. पो. का. कलम १४२ अन्वये गुन्ह्याची नोंद केली.

धार्मिक सप्ताहामुळे मनुष्याच्या जीवनात अनेक अमुलाग्र सकारात्मक बदल घडतात

भगवान फुलसौंदर यांचे प्रतिपादन; महाशिवरात्रीनिमित्त फुलसौंदर मळा येथील अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

नगर – जीवनात आध्यात्माला फार महत्व असून,
सुख-शांतीसाठी भगवंतांचे नामस्मरण करण्यासाठी
अखंड हरिनाम सप्ताह हा महत्वाचा भाग आहे. गेल्या
२६ वर्षांपासून वैष्णव मित्र मंडळाच्यावतीने सातत्याने
शिवरात्रीनिमित्त या उपक्रमातून नागरिकांना लाभ मिळवून
देत आहोत. नामवंत किर्तनकार-प्रवचनकारांच्या
किर्तनाने जीवनाला दिशा मिळत असल्याने या सप्ताहामुळे
मनुष्याच्या जीवनात अनेक अमुलाग्र सकारात्मक बदल
घडत आहेत. त्याचबरोबर धार्मिक कार्याला सामाजिक
कार्याची जोड देत विविध आरोग्य शिबीराच्या माध्यमातून
नागरिकांचे आरोग्य आबाधित राखण्याचा प्रयत्न यानिमित्त
होत आहे. धार्मिक व आरोग्यदायी उपक्रमातून जनसेवेची
संधी आम्हाला गेल्या २६ वर्षांपासून नागरिकांच्या
उत्स्फुर्त प्रतिसादातून मिळत आहे. वर्षानुवर्ष वाढत
चालेला या सप्ताहाचा लौकिक आमचा उत्साह वाढविणारा
ठरत आहे, असे प्रतिपादन प्रथम महापौर भगवान
फुलसौंदर यांनी केले.
महाशिवरात्री उत्सवानिमित्त फुलसौंदर मळा येथे
वैष्णव मित्र मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे
उद्घाटन भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी
भिंगार बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर, ह.भ.प.
बालयोगी अमोल महाराज, प्रल्हाद फुलसौंदर, भानुदास
फुलसौंदर, दत्तात्रय फुलसौंदर, बाळासाहेब फुलसौंदर,
इंजि.अनिल साळुंके, राजेंद्र फुलसौंदर, भास्करराव
गायकवाड, एल.के.आव्हाड, अविनाश ठोकळ, रघुनाथ
केदार, जालिंदर वाघ, अविनाश फुलसौंदर, एस.टी.बोरुडे,
सुनिल फुलसौंदर, सचिन लगे, दिपक लोंढे, अवधुत
फुलसौंदर, वैभव गाडीलकर, रामा बनसोडे, महेश शिंदे,
धनंजय फुलसौंदर, अशोक खाडे, यश चौधरी, ओंकार
फुलसौंदर, अशोकराव बाबर, महादु मिसाळ, भरत
फुलसौंदर, प्रसाद फुलसौंदर, कृष्णा फुलसौंदर, विवेक
फुलसौंदर, अक्षय फुलसौंदर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विष्णू फुलसौंदर म्हणाले, प्रत्येकजण
आपआपल्या दैनंदिनीत व्यस्त असतांना काही वेळ हा
स्वत:साठी भगवंताच्या भक्तीत घालविण्यासाठी अखंड
हरिनाम सप्ताह उपयुक्त ठरत आहे. त्यामुळेच गेल्या
२६ वर्षांपासून सर्वांच्या सहकार्याने हे अखंड कार्य
सुरु आहे. आणि भगवंतांच्या कृपेने हे कार्य असेच
सुरु ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. या सप्ताहातील
विविध कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घेऊन आमचा उत्साह
वाढवावा, असे आवाहन केले.
प्रारंभी प्रतिमा पुजन, ग्रंथपुजन, ध्वजपुजन, विणा
पुजन, तुलसी पुजन, दिपप्रज्वलन आदिंनी या सप्ताहास
प्रारंभ झाला. पारायण व्यासपीठ नेतृत्व अमोल महाराज
जाधव करत आहेत. या सप्ताह काळात ह.भ.प. रामदास
महाराज रक्ताटे, ह.भ.प.हरिदास महाराज पालवे शास्त्री,
ह.भ.प.मच्छिंद्र महाराज राऊत, ह.भ.प.बबन महाराज
बहिरवाल, ह.भ.प.पुंडलिक महाराज जंगले शास्त्री,
ह.भ.प. योगेश महाराज पवार शास्त्री, ह.भ.प.स्वामी
महाराज अमृतानंद सरस्वती आदिंची किर्तन सेवा घडणार
आहे. तसेच बालयोगी ह.भ.प.अमोल महाराज जाधव
यांचे २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता काल्याचे
किर्तनाने समारोप होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे
वाटप होणार आहे.
सप्ताह कालावधीमध्ये बाळासाहेब उबाळे, लक्ष्मणराव
आव्हाड, रघुनाथ केदार, माणिकराव मुंडे, अशोक पालवे,
बाबासाहेब इंगोले, राजेंद्र फुलसौंदर, इंजि.अनिलराव
साळुंके, शिवाजीराव मुळे, ज्ञानेश्वर अहिरराव,
मच्छिंद्रनाथ फुलसौंदर, संजय चाफे, पुरुषोत्तम चाफे
आदींचे या सोहळ्यासाठी सहकार्य मिळत आहे. पारायण
सोहळ्यासाठी सुधाताई फुलसौंदर, आशा फुलसौंदर,
संगिता फुलसौंदर, सुनिता फुलसौंदर, सुरेखा चौरे,
कुसूम काळे, अनुसया फुलसौंदर, प्रभाताई भोग, कविता
चौधरी, वैशाली माने परिश्रम घेतत आहेत.कार्यक्रम
यशस्वीतेसाठी महाशिवरात्री उत्सव समिती व श्री वैष्णव
मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

माऊंट लिटेरा झी स्कूल अरणगावमध्ये ‘शिवजयंती उत्सव’ उत्साहात साजरा

नगर – अरणगाव, दौंड रोड, अहिल्यानगर येथे माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध सांस्कृतिक आणि शौर्य प्रदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पोवाडे, लाठीकाठी प्रात्यक्षिके, ढोल वादन, लेझीम पथक, नृत्य, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून शिवजयंतीचे औचित्य साधले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला.
प्राचार्या प्रा. शैलजा लोटके यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर  भाष्य करताना विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करणे हीच खरी शिवजयंती आहे, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्रातून
शिकण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील लोटके उपस्थित होते. या कार्यक्रमाला पालक आणि
विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. संपूर्ण शाळेत शिवरायांच्या जयघोषाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रम
यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

टाळ मृदुंगाच्या गजरात रंगली आयुर्वेद पुस्तकांची ग्रंथांची दिंडी

स्व.वैद्य पंचानन गंगाधरशास्त्री गुणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आलेल्या आयुर्वेद ग्रंथ दिंडी सोहळ्यास प्रारंभ करताना संस्थेचे अध्यक्ष अरुण जगताप.

नगर – गुणे आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयाचे संस्थापक स्व.वैद्य पंचानन गंगाधरशास्त्री गुणे यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त गुणे महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉटर विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत-गाजत
आयुर्वेद पुस्तकांच्या ग्रंथदिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. दिंडीच्या पालखीत स्व. गुणेशास्त्रीची प्रतिमा व
यांनी लिहिलेले दुर्मिळ आयुर्वेद ग्रंथ ठेवण्यात आले होते. आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण जगताप
यांनी स्व.गुणेशास्त्रींच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. यावेळी
डॉटर, विद्यार्थी व विद्यार्थिनी भगवे झेंडे हातात घेऊन वारकर्‍यांच्या वेशात टाळ मृदुंगाचा व विठ्ठल नामाचा
गजर करत होते. यातील विद्यार्थीनी साडी परिधान करुन डोयावर तुळशीवृंदावन घेऊन पारंपरिक वेशभूषेत
दिंडीत सहभागी झाल्या होत्या. या ग्रंथदिंडीमध्ये गुणेशास्त्रींनी लिहिलेल्या औषधी
गुणधर्म शास्त्र, भिषग्विलास, चरक संहिता, सुश्रृत संहिता, वाग्भट संहिता हे जुने व दुर्मिळ आयुर्वेदीय ग्रंथ
दिंडीतील पालखीत ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वारकर्‍यांची वेशभूषा करुन टाळ-मृदूंगाच्या
गजरात ज्ञानोबा माऊली… तुकाराम महाराजांच्या जयघोषाबरोबरच गुणे शास्त्रींचाही जयघोष करत होते.
ही दिंडी वाजत गाजत ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा महाविद्यालयात आली. गणपती
मंदिर परिसरात व महाविद्यालयाच्या प्रांगणात ग्रंथ दिंडीचे झालेले गोल रिंगण यावेळी रंगले.
यावेळी मंडळाचे सचिव डॉ.विजय भंडारी, सहसचिव सचिन जगताप, संचालक यशवंत सुरकुटला,
ज्ञानदेव पांडूळे, अरविंद शिंदे, वैशाली ससे, ज्ञानेश्वर रासकर, प्राचार्य डॉ.दत्तात्रय लोडे, डॉ.ए.टी.देशमुख,
डॉ.रुपाली म्हसे, डॉ.उत्क्रांती सलगरे, डॉ.नितीन जाधव, डॉ.सुरज ठाकूर, डॉ.समीर होळकर, डॉ.पौर्णिमा
जगताप, माजी प्राचार्य डॉ.अंजली देशमुख व डॉ.प्रमिला नलगे, कार्यालयीन व्यवस्थापिका प्रतिभा भारदे,
योगेश दाणी आदिंसह प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी वैद्य सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना अरुण जगताप म्हणाले, कै.
गुणे शास्त्री यांनी १०० वर्षांपूर्वी गोर-गरीब, गरजू
रुग्णांना चांगले आयुर्वेदीक उपचार मिळावे, तसेच
या महाविद्यालयातून तज्ञ वैद्य घडावेत यासाठी
त्याकाळी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत व तळमळीने हे
आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय सुरु केले. अत्यल्प
दरात गुणे शास्त्रींनी गोर-गरीब रुग्णांवर दर्जेदार
आयुर्वेद उपचार केले. आजही स्व.गुणेशास्त्रींच्या
विचारावरच हे रुग्णालय व महाविद्यालय काम करत असून,
आम्ही मोठ्या अभिमानाने त्यांचा वारसा पुढे चालवत
आहोत. आजही पूर्वीप्रमाणेच आयुर्वेद महाविद्यालयातून
अत्यंत अल्पदरात सर्व रोगांवर आयुर्वेदीक उपचार केले
जात आहेत. वैद्य गुणेंच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रंथ दिंडी
काढून महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्गाने
त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला आहे.

केडगावात उभा राहिला शिव जन्मापासून ते स्वराज्य निर्माणाच्या पराक्रमाचा इतिहास

जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची रंगली मिरवणूक; युद्ध कलेच्या धाडसी थरारक प्रात्यक्षिकाचे सादरीकरण

नगर – जैनाचार्य श्री शिवमुनीजी (जे.एस.एस.) गुरुकुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जयंती निमित्ताने केडगाव येथून मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत
विद्यार्थ्यांनी लाठी-काठी, तलवारबाजी, दानपट्टा यांसह युद्ध कलेच्या धाडसी
थरारक प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
केडगाव मधील अंबिकानगर, पाटील कॉलनी आणि केडगाव वेस
येथे विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी मर्दानी खेळाचे धाडसी प्रात्यक्षिक सादर केले.
या मिरवणुकीचे अंबिकानगर बस स्टॉप येथे संदीप कोतकर युवा मंचच्या वतीने
स्वागत करण्यात आले. तर मंचच्या वतीने झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी शिवाजी
महाराजांच्या जन्मापासून ते स्वराज्य निर्माणासाठी गाजवलेले पराक्रमाचा इतिहास नाट्यातून जिवंत केला.
संदीप कोतकर युवा मंचच्या वतीने झालेल्या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज
कुणाल मालुसरे, मिलिंद एकबोटे, राजेंद्र मोहिते, सचिन भोसले पाटील, संदीप कोतकर युवा मंचचे अध्यक्ष
भूषण गुंड, विद्यालयाचे प्राचार्य आनंद कटारिया निकिता कटारिया, मीरा थोरात, आयोध्या कापरे यांसह विद्यार्थी
पालक आणि केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या
आरतीने अभिवादन करुन कार्यक्रमास सुरुवात  करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पूर्वजांच्या
इतिहासाचा पराक्रम पाहून भारावलो.
आयुष्यात पुढे जाताना आपल्या
पूर्वजांचा पराक्रम प्रेरणा देणारा ठरणार
असल्याची भावना तानाजी मालुसरे
यांचे तेरावे वंशज कुणाल मालुसरे यांनी
व्यक्त केली.
प्राचार्य आनंद कटारिया यांनी
म्हणाले फक्त विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान
न देता त्यांना पराक्रमाचे धडे व संस्कार
देखील शाळेत दिले जात आहे. सर्व
महापुरुषांचे जयंती उत्सव विद्यार्थ्यांमध्ये
त्यांचे विचार रुजवून साजरी होत
असल्याचे त्यांनी सांगितले.
इयत्ता तिसरीच्या वर्गातील
विद्यार्थिनींनी बाळ शिवबा जन्मला गीत
सादर केले. तानाजी मालुसरे यांच्या
पराक्रमावर गड आला, पण सिंह गेला! हे नाटकाचे
सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थित
नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
विद्यार्थ्यांनी जामखेड येथील प्रशिक्षक प्रशिक्षक सुरेश
राऊत व आकाश सर यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसी
प्रात्यक्षिक सादर केले होते.

द आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन साजरा

नगर – आयकॉन पब्लिक स्कूलने
नुकताच आजी-आजोबा दिन उत्साहात
साजरा केला, नातवंडांचे जीवन
घडवण्यात आजी-आजोबा अमूल्य
भूमिका बजावतात. त्यांच्या सन्मानार्थ
हा कार्यक्रम घेण्यात आला. आयकॉन
पब्लिक स्कूलच्या प्री-प्रायमरी
विभागाच्या मुलांसाठी हा कार्यक्रम
घेण्यात आला.
उत्सवाची सुरुवात स्वागताने
झाली, यात विद्यार्थी आणि शिक्षकांनी
आजी-आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त
केली. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे
मुलांनी त्यांच्या आजी-आजोबांची
ओळख करून दिली, त्यांच्या मार्गदर्शन आणि प्रेमाबद्दल
मनापासून बोलले. शाळेने पालकांना बालपणीच्या
आठवणी सांगण्यासाठी आमंत्रित केले, सर्वांना काळाच्या
ओघात एका जुन्या प्रवासात घेऊन गेले.
कार्यक्रमात उत्साहाचा स्पर्श जोडत, ’पासिंग द
पार्सल’ हा एक मजेदार खेळ आयोजित करण्यात आला
होता, ज्यामध्ये आजी-आजोबा आणि मुले दोघांसाठी
परस्परसंवादी प्रश्नांचा समावेश होता. सहभागींनी त्यांच्या
आनंददायी प्रतिक्रिया दिल्याने वर्ग हास्य आणि आनंदाने
भरून गेला.
ग्रुप फोटोने या प्रसंगाची स्मृती टिपली, पिढ्यानपिढ्या
असलेले सुंदर बंध जपले. त्यानंतर जुन्या गाण्यांचा आणि
अंताक्षरीचे एक सत्र झाले. यात आजी-आजोबांनी
उत्साहाने भाग घेतला आणि संगीताच्या माध्यमातून
त्यांच्या सोनेरी आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सांगता आभार मानून आणि अल्पोपहार
देऊन झाली. आयकॉन पब्लिक स्कूल मजबूत कौटुंबिक
मूल्ये जोपासण्याची आणि आजी-आजोबा त्यांच्या
नातवंडांच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहतील याची
खात्री करण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत आहे.
शाळेचा असा ठाम विश्वास आहे की असे उत्सव पिढ्यां-
मधील बंध मजबूत करतात, विद्यार्थ्यांसाठी प्रेमळ आणि
संगोपन करणारे वातावरण तयार करतात. कार्यक्रमाच्या
शेवटी, मुख्याध्यापिका दीपिका नगरवाला यांनी पालक
आणि आजी-आजोबांचे त्यांच्या अतूट प्रेम, पाठिंब्याबद्दल
आणि उपस्थितीबद्दल मनापासून आभार मानले.