रेल्वे स्टेशनच्या महानगरपालिका शाळेत पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
नगर – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत महानगरपालिका शाळा क्रमांक ४, रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर येथे पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेतील पाककृतींचे परीक्षण शिल्पा धोपावकर
यांनी केले. स्पर्धेसाठी असणार्या निकषाप्रमाणे फोर्टीफाईड तांदूळ, तृणधान्ये, कडधान्ये, विविध पालेभाज्या
यांचा वापर करून नाविन्यपूर्ण पदार्थ पालकांनी बनवले. मिश्र डाळींचे थालीपीठ, दाल खिचडी,
पराठे अशा प्रकारे विविध पौष्टिक पदार्थ बनवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे
मुख्याध्यापक विजय घिगे, मनिषा गिरमकर, मेघना गावडे तसेच सीएसआरडी विद्यालयाचे विद्यार्थी
वैभव सुपेकर, श्रद्धा चव्हाण, नैना पी यांनी योगदान दिले