टाळ मृदुंगाच्या गजरात रंगली आयुर्वेद पुस्तकांची ग्रंथांची दिंडी

0
46

स्व.वैद्य पंचानन गंगाधरशास्त्री गुणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आलेल्या आयुर्वेद ग्रंथ दिंडी सोहळ्यास प्रारंभ करताना संस्थेचे अध्यक्ष अरुण जगताप.

नगर – गुणे आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयाचे संस्थापक स्व.वैद्य पंचानन गंगाधरशास्त्री गुणे यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त गुणे महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉटर विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत-गाजत
आयुर्वेद पुस्तकांच्या ग्रंथदिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. दिंडीच्या पालखीत स्व. गुणेशास्त्रीची प्रतिमा व
यांनी लिहिलेले दुर्मिळ आयुर्वेद ग्रंथ ठेवण्यात आले होते. आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण जगताप
यांनी स्व.गुणेशास्त्रींच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. यावेळी
डॉटर, विद्यार्थी व विद्यार्थिनी भगवे झेंडे हातात घेऊन वारकर्‍यांच्या वेशात टाळ मृदुंगाचा व विठ्ठल नामाचा
गजर करत होते. यातील विद्यार्थीनी साडी परिधान करुन डोयावर तुळशीवृंदावन घेऊन पारंपरिक वेशभूषेत
दिंडीत सहभागी झाल्या होत्या. या ग्रंथदिंडीमध्ये गुणेशास्त्रींनी लिहिलेल्या औषधी
गुणधर्म शास्त्र, भिषग्विलास, चरक संहिता, सुश्रृत संहिता, वाग्भट संहिता हे जुने व दुर्मिळ आयुर्वेदीय ग्रंथ
दिंडीतील पालखीत ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वारकर्‍यांची वेशभूषा करुन टाळ-मृदूंगाच्या
गजरात ज्ञानोबा माऊली… तुकाराम महाराजांच्या जयघोषाबरोबरच गुणे शास्त्रींचाही जयघोष करत होते.
ही दिंडी वाजत गाजत ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा महाविद्यालयात आली. गणपती
मंदिर परिसरात व महाविद्यालयाच्या प्रांगणात ग्रंथ दिंडीचे झालेले गोल रिंगण यावेळी रंगले.
यावेळी मंडळाचे सचिव डॉ.विजय भंडारी, सहसचिव सचिन जगताप, संचालक यशवंत सुरकुटला,
ज्ञानदेव पांडूळे, अरविंद शिंदे, वैशाली ससे, ज्ञानेश्वर रासकर, प्राचार्य डॉ.दत्तात्रय लोडे, डॉ.ए.टी.देशमुख,
डॉ.रुपाली म्हसे, डॉ.उत्क्रांती सलगरे, डॉ.नितीन जाधव, डॉ.सुरज ठाकूर, डॉ.समीर होळकर, डॉ.पौर्णिमा
जगताप, माजी प्राचार्य डॉ.अंजली देशमुख व डॉ.प्रमिला नलगे, कार्यालयीन व्यवस्थापिका प्रतिभा भारदे,
योगेश दाणी आदिंसह प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी वैद्य सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना अरुण जगताप म्हणाले, कै.
गुणे शास्त्री यांनी १०० वर्षांपूर्वी गोर-गरीब, गरजू
रुग्णांना चांगले आयुर्वेदीक उपचार मिळावे, तसेच
या महाविद्यालयातून तज्ञ वैद्य घडावेत यासाठी
त्याकाळी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत व तळमळीने हे
आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय सुरु केले. अत्यल्प
दरात गुणे शास्त्रींनी गोर-गरीब रुग्णांवर दर्जेदार
आयुर्वेद उपचार केले. आजही स्व.गुणेशास्त्रींच्या
विचारावरच हे रुग्णालय व महाविद्यालय काम करत असून,
आम्ही मोठ्या अभिमानाने त्यांचा वारसा पुढे चालवत
आहोत. आजही पूर्वीप्रमाणेच आयुर्वेद महाविद्यालयातून
अत्यंत अल्पदरात सर्व रोगांवर आयुर्वेदीक उपचार केले
जात आहेत. वैद्य गुणेंच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रंथ दिंडी
काढून महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्गाने
त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला आहे.