नगर – अरणगाव, दौंड रोड, अहिल्यानगर येथे माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध सांस्कृतिक आणि शौर्य प्रदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पोवाडे, लाठीकाठी प्रात्यक्षिके, ढोल वादन, लेझीम पथक, नृत्य, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून शिवजयंतीचे औचित्य साधले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला.
प्राचार्या प्रा. शैलजा लोटके यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर भाष्य करताना विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करणे हीच खरी शिवजयंती आहे, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्रातून
शिकण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुनील लोटके उपस्थित होते. या कार्यक्रमाला पालक आणि
विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. संपूर्ण शाळेत शिवरायांच्या जयघोषाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रम
यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले.