धार्मिक सप्ताहामुळे मनुष्याच्या जीवनात अनेक अमुलाग्र सकारात्मक बदल घडतात

0
40

भगवान फुलसौंदर यांचे प्रतिपादन; महाशिवरात्रीनिमित्त फुलसौंदर मळा येथील अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

नगर – जीवनात आध्यात्माला फार महत्व असून,
सुख-शांतीसाठी भगवंतांचे नामस्मरण करण्यासाठी
अखंड हरिनाम सप्ताह हा महत्वाचा भाग आहे. गेल्या
२६ वर्षांपासून वैष्णव मित्र मंडळाच्यावतीने सातत्याने
शिवरात्रीनिमित्त या उपक्रमातून नागरिकांना लाभ मिळवून
देत आहोत. नामवंत किर्तनकार-प्रवचनकारांच्या
किर्तनाने जीवनाला दिशा मिळत असल्याने या सप्ताहामुळे
मनुष्याच्या जीवनात अनेक अमुलाग्र सकारात्मक बदल
घडत आहेत. त्याचबरोबर धार्मिक कार्याला सामाजिक
कार्याची जोड देत विविध आरोग्य शिबीराच्या माध्यमातून
नागरिकांचे आरोग्य आबाधित राखण्याचा प्रयत्न यानिमित्त
होत आहे. धार्मिक व आरोग्यदायी उपक्रमातून जनसेवेची
संधी आम्हाला गेल्या २६ वर्षांपासून नागरिकांच्या
उत्स्फुर्त प्रतिसादातून मिळत आहे. वर्षानुवर्ष वाढत
चालेला या सप्ताहाचा लौकिक आमचा उत्साह वाढविणारा
ठरत आहे, असे प्रतिपादन प्रथम महापौर भगवान
फुलसौंदर यांनी केले.
महाशिवरात्री उत्सवानिमित्त फुलसौंदर मळा येथे
वैष्णव मित्र मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे
उद्घाटन भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी
भिंगार बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर, ह.भ.प.
बालयोगी अमोल महाराज, प्रल्हाद फुलसौंदर, भानुदास
फुलसौंदर, दत्तात्रय फुलसौंदर, बाळासाहेब फुलसौंदर,
इंजि.अनिल साळुंके, राजेंद्र फुलसौंदर, भास्करराव
गायकवाड, एल.के.आव्हाड, अविनाश ठोकळ, रघुनाथ
केदार, जालिंदर वाघ, अविनाश फुलसौंदर, एस.टी.बोरुडे,
सुनिल फुलसौंदर, सचिन लगे, दिपक लोंढे, अवधुत
फुलसौंदर, वैभव गाडीलकर, रामा बनसोडे, महेश शिंदे,
धनंजय फुलसौंदर, अशोक खाडे, यश चौधरी, ओंकार
फुलसौंदर, अशोकराव बाबर, महादु मिसाळ, भरत
फुलसौंदर, प्रसाद फुलसौंदर, कृष्णा फुलसौंदर, विवेक
फुलसौंदर, अक्षय फुलसौंदर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विष्णू फुलसौंदर म्हणाले, प्रत्येकजण
आपआपल्या दैनंदिनीत व्यस्त असतांना काही वेळ हा
स्वत:साठी भगवंताच्या भक्तीत घालविण्यासाठी अखंड
हरिनाम सप्ताह उपयुक्त ठरत आहे. त्यामुळेच गेल्या
२६ वर्षांपासून सर्वांच्या सहकार्याने हे अखंड कार्य
सुरु आहे. आणि भगवंतांच्या कृपेने हे कार्य असेच
सुरु ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. या सप्ताहातील
विविध कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घेऊन आमचा उत्साह
वाढवावा, असे आवाहन केले.
प्रारंभी प्रतिमा पुजन, ग्रंथपुजन, ध्वजपुजन, विणा
पुजन, तुलसी पुजन, दिपप्रज्वलन आदिंनी या सप्ताहास
प्रारंभ झाला. पारायण व्यासपीठ नेतृत्व अमोल महाराज
जाधव करत आहेत. या सप्ताह काळात ह.भ.प. रामदास
महाराज रक्ताटे, ह.भ.प.हरिदास महाराज पालवे शास्त्री,
ह.भ.प.मच्छिंद्र महाराज राऊत, ह.भ.प.बबन महाराज
बहिरवाल, ह.भ.प.पुंडलिक महाराज जंगले शास्त्री,
ह.भ.प. योगेश महाराज पवार शास्त्री, ह.भ.प.स्वामी
महाराज अमृतानंद सरस्वती आदिंची किर्तन सेवा घडणार
आहे. तसेच बालयोगी ह.भ.प.अमोल महाराज जाधव
यांचे २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता काल्याचे
किर्तनाने समारोप होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे
वाटप होणार आहे.
सप्ताह कालावधीमध्ये बाळासाहेब उबाळे, लक्ष्मणराव
आव्हाड, रघुनाथ केदार, माणिकराव मुंडे, अशोक पालवे,
बाबासाहेब इंगोले, राजेंद्र फुलसौंदर, इंजि.अनिलराव
साळुंके, शिवाजीराव मुळे, ज्ञानेश्वर अहिरराव,
मच्छिंद्रनाथ फुलसौंदर, संजय चाफे, पुरुषोत्तम चाफे
आदींचे या सोहळ्यासाठी सहकार्य मिळत आहे. पारायण
सोहळ्यासाठी सुधाताई फुलसौंदर, आशा फुलसौंदर,
संगिता फुलसौंदर, सुनिता फुलसौंदर, सुरेखा चौरे,
कुसूम काळे, अनुसया फुलसौंदर, प्रभाताई भोग, कविता
चौधरी, वैशाली माने परिश्रम घेतत आहेत.कार्यक्रम
यशस्वीतेसाठी महाशिवरात्री उत्सव समिती व श्री वैष्णव
मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.