नगर – कर्तव्यदक्ष म्हणून घेणारे आयुक्त यशवंत डांगे यांनी आपल्या दालनासाठी चक्क २० लाख रुपयांचा खर्च कामे करून एक प्रकारे नगरच्या जनतेची मोठ्या व प्रमाणामध्ये दिशाभूल केली आहे. अहिल्यानगर महापालिकेकडे महावितरण चे २०० कोटी रुपये बिल थकीत आहे, पैसे भरत नाही म्हणून वारंवार महावितरण वीज पुरवठा खंडित करतात. इतके कर्ज
महापालिकेकडे असताना स्वतः च्या दालनाला नुतनीकरणाला खर्च करणे कितपत योग्य आहे
असा सवाल नितीन भूतारे यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे पाणीपट्टी, घरपट्टी भरली नाही तर सर्वसामान्यांचे
नळ कनेशन तोडायचे दुसरीकडे आपल्या ऐश आरामात बसण्याकरिता कार्यालयाला दालनाला करोडो रुपये खर्च करायचा अश्या बेफिकीर वागणार्या आयुक्तांची या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी कारवाई करण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचे नितीन भुतारे यांनी सांगितले.
महापालिकेच्या अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे कर्मचार्यांना देण्यासाठी पगार नाहीत, तसेच पीएफ ग्रॅज्युटी साठी सुद्धा पैसे नाही तर पेन्शनसाठी आज कसेबसे सरकारी पैसे येतात त्यावर भाग भागव होते, आता तर अहिल्यानगर महापालिकेकडे पैसे नाही म्हणुन नगर शहरामध्ये थकीत घरपट्टी पाणीपट्टीच्या विरोधामध्ये आयुक्त यशवंत डांगे यांनी थेट कारवाई हाती घेतली आहे. आत्तापर्यंत हजारो थकबाकीदारांवर कारवाई करत वेळप्रसंगी थकीत मालमत्तांना सील ठोकणे किंवा नळ कनेशन बंद करणे असे प्रकार केलेले आहे सुरू आहेत. कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेला आता या महागाईच्या
काळामध्ये पैसे कुठून आणि कसे आणायचे याची चिंता पडलेली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यावर कारवाई नको म्हणून वेळप्रसंगी व्याजाने किंवा उधारीवर पैसे घेऊन आज सर्वसामान्य माणूस कर रूपाचे पैसे महानगरपालिकेमध्ये जमा करत आहे. एक एक रुपया महानगर पालिकेला महत्वाचा आहे.
महानगरपालिकेच्या आयुक्त डांगे यांनी आमच्याकडे पैसे नाही लाईट बिल भरायचे कसे असा प्रश्न महापालिकेच्या समोर आहे असे सांगितले आहे जर आयुक्त अशा प्रकारची महापालिकेची बिकट अवस्था जनतेसमोर मांडत असताना दुसरीकडे मात्र त्यांनी त्यांच्या दालनासाठी जवळपास २० लाख व त्या पेक्षा जास्त रुपये खर्च करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एक कोटी रुपयांचा खर्च आपल्या स्वतःच्या दालनासाठी केलेला
आहे. त्याबाबतच्या ठेका सुद्धा त्यांनी दिलेला आहे व सध्या हे काम प्रगतीपथावर चालू आहे.
एक प्रकारे शासकीय तिजोरीवर एक प्रकारे डल्ला मारण्याचा हा प्रकार नाही का? असा सवाल सुद्धा भुतारे
यांनी उपस्थित केला असून या सर्व प्रकरणाची चौकशी तात्काळ करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.
याकरता आपण मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, यांना या प्रकरणाची चौकशी
करावी व दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी माग णी सुद्धा केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महापालिका २०० कोटी कर्जात असताना आयुक्तांचा दालनासाठी लाखो रुपये खर्च
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व महिलांना स्वसंरक्षणाचे धडे आवश्यक
क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे यांचे प्रतिपादन; शासकीय परिचर्या महाविद्यालयात विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा, युवतींना स्वसंरक्षणासह कायदेविषयक, आरोग्य आणि विम्याचे मार्गदर्शन
नगर – आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे आवश्यक झाले आहे. यामुळे स्वतःचे रक्षण करुन समोरच्या व्यक्तीचा उद्देश हाणून पाडता येतो. स्वसंरक्षणाचे धडे घेतल्यास आत्मविश्वास वाढून शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित होतात. महिला-युवतींना कोणत्याही धोयापासून स्वतः चे संरक्षण करण्याची शक्ती आणि
क्षमता निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे घेणे, काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र, अहिल्या फाउंडेशन, उडान फाउंडेशन, जय युवा अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षण, कायदेविषयक मार्गदर्शन, आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन, विमा संरक्षण मार्गदर्शनावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
होते. जिल्हा रुग्णालय संचलित शासकीय परिचर्या महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा अधिकारी खिंडरे बोलत होत्या. याप्रसंगी विशेष जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेश लगड, अॅड. विद्या शिंदे, आरोग्य मार्गदर्शक आशिष घायवात, प्रज्ञा चव्हाण, विमा सल्लागार कांचन लद्दे, आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टीस्ट कावेरी कैदके, राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, वाबळे सर, रजनी ताठे, प्रशांत पालवे, प्राचार्य वैशाली कोरडे, सुवर्णा कैदके, आरती शिंदे, अश्विनी वाघ, अॅड.
महेश शिंदे आदीसह परिचर्या महाविद्यालयाच्या युवती उपस्थित होत्या.
आशिष घायवात यांनी सॅनिटरी नॅपकिन वापरताना कॉटन किंवा प्लास्टिक यातील फरक समजून घेतला
पाहिजे. सध्या कमी खर्चातील प्लास्टिकयुक्त सॅनिटरी नॅपकिन वापरामुळे कॅन्सरचा धोका वाढत आहे. तर इतर
अनेक आजार संभवतात. त्यामुळे महिलांनी पर्यावरण पूरक आयुर्वेदिक व कापूसचा समावेश असलेल्या
सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचे त्यांनी आवाहन केले. सरकारी वकील अॅड. सुरेश लगड यांनी महिलांसाठी
असणारे कायदे, पोटगी, कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग, अत्याचार, संपत्ती मधील हिस्सा आदी कायद्याबाबत सविस्तर
माहिती दिली. विमा सल्लागार कांचन मध्ये लद्दे यांनी कुटुंबाच्या स्वरक्षणासाठी आणि आरोग्यासाठी व जीवन मार्ग व्यवस्थीत
चालवण्यासाठी विमा संरक्षण प्रत्येकाने घेतले पाहिजे. कोणतीही घटना वेळ व काळ सांगून येत नाही, त्यासाठी विमा कवच असणे आवश्यक आहे. जीवन हे अमूल्य आहे, त्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याला विमा कवच असणे गरजेचे असल्यचे स्पष्ट करुन त्यांनी विमा धोरण विषयी माहिती दिली. प्रशांत पालवे यांनी उपस्थित युवतींना स्वसंरक्षणाचे
धडे प्रात्यक्षिकासह दिले. कावेरी कैदके यांनी युवतींना सौंदर्याबाबत शास्त्रोक्त माहिती, त्वचेची व केसांची काळजी व
केमिकल विरहित योग्य सौंदर्य प्रसाधने याची माहिती देऊन, सौंदर्य क्षेत्रात करियर म्हणून उत्तम संधी असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश शिंदे यांनी केले. आरती शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी
आमसिद्ध सोलनकर, भाऊराव वीर, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय
अधिकारी संकल्प शुला, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, पोपट बनकर, दिनेश शिंदे, राजकुमार चिंतामणी, जयेश शिंदे,
घनश्याम सानप, जयश्री शिंदे आदींचे मार्गदर्शन लाभल
‘अहिल्यानगरचे मानबिंदू’ या ग्रंथाचे मुंबईत प्रकाशन
नगर – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ५१ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केले. या ५१ ग्रंथांमध्ये नगर शहरातील इतिहास संशोधक प्रा.डॉ.नवनाथ काशिनाथ वाव्हळ यांच्या ’अहिल्यानगरचे मानबिंदू’ या ऐतिहासिक ग्रंथाचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने राज्यातील निवडक लेखकांच्या साहित्यकृतीचे प्रकाशन करण्यात आले. प्रा.डॉ. नवनाथ वाव्हळ लिखित ‘अहिल्यानगरचे मानबिंदू’ या पुस्तकास मान मिळाला. प्रा.डॉ. वाव्हळ यांनी अहिल्यानगर परिसरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक मानबिंदूचा संशोधनात्मक, चिकित्सक अभ्यास करून ग्रंथरूपाने मांडणी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून निवड झालेल्या ‘अहिल्यानगरचे मानबिंदू’ या ग्रंथाचा समावेश आहे. डॉ नवनाथ वाव्हळ हे न्यू आर्टस् कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. ‘अहिल्यानगरचे मानबिंदू’ या ग्रंथामध्ये आहे आपल्या अहिल्यानगरच्या स्वाभिमानाचे व अभिमानाचे मानबिंदू अस्सल ऐतिहासिक दस्तऐवजाच्या मदतीने
प्रकाशमान केले आहेत. अहिल्यानगर परिसरातील ऐतिहासिक मानबिंदू म्हणजे अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला, अहिल्यानगरचे गौरव चिन्ह चांदबिबी महाल, अहिल्यानगरचा ताज, फराहबक्ष महाल, अहिल्यानगर- मधील पूर्वीचे जलमहाल हस्त बीहस्त महाल, जगप्रसिद्ध ताजमहालासाठी अहिल्यानगरमधील या वास्तूची नक्षी वापरलेली आहे ती म्हणजे दमडी मज्जिद, अहिल्यानगरच्या (अहमदनगर) स्थापनेपूर्वीचे ग्रामदैवत विशाल गणपती, मुघल सम्राट औरंगजेब बादशहाची कान टोचणी करणारे स्थळ गुरुद्वारा, ब्रिटिश कालीन नावाजलेले चर्च यासारख्या दुर्मिळ धार्मिक वास्तूंचा इतिहास आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच सांस्कृतिक विभागांतर्गत जगातील दोन नंबरचे आणि आशियातील एकमेव रणगाडा संग्रहालय, ग्रामीण भारतातील पहिले खाजगी मालकीचे ’तारांगण’, अहिल्यानगरकरांचे तंदुरुस्तीचे पार्क- वाडिया पार्क, आधुनिक निसर्ग सौंदर्यानं नटलेली अहिल्यानगरच्या माळरानाला पडलेले हिरवे स्वप्न साईबन. यासारख्या सांस्कृतिक स्थळांची सखोल माहिती व विश्लेषण दिले आहे… आपल्या मातीचा!., आपल्या गावाचा…, आपल्या गौरवाचा वारसा जाणण्यासाठी वाचलेच पाहिजे असा हा ग्रंथ आहे. एका हाडाच्या इतिहास शिक्षकाच्या ऐतिहासिक ज्ञानाचा अविष्कार अहिल्यानगरचे मानबिंदू या ग्रंथातून दिसून येतो.
धर्मासाठी मृत्यूलाही कसे कवटाळावे हे संभाजी महाराज यांनी दाखवून दिले
नगर – हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन त्यासाठी जीवन समर्पण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला राज्यासाठी काय करावे? हे सांगतात तर त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज आपल्याला हिंदू धर्मासाठी मृत्यूलाही कसे कवटाळावे? हे स्वकृतीमधून दाखवून देतात, असे हभप योगेशबुवा कुलकर्णी यांनी नारदीय कीर्तनामधून सांगितले.
येथील बोरूडे मळ्यात नारदीय कीर्तन करताना ते बोलत होते. प्रवचनकार हभप मिलिंद चवंडके यांनी त्यांचा परिचय करून दिला. बोरूडे मळ्यात प्रथमच नारदीय कीर्तन होत असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. योगेशबुवा कुलकर्णी यांनी निरूपणासाठी देव करील दया…हा तंजावर येथील भगवत् भक्त गोपाळपंत अरणीकर यांचा अभंग घेतला होता. सृष्टी निर्माण करणारे भगवंत अत्यंत दयाळू आहेत. त्यांच्या दयेमुळे आपल्याला मानवी शरिर फुकट मिळते.
निसर्ग देवतेच्या कृपेने आपण ऑसिजन मनमुराद फुकट वापरतो. डॉटरने व्हेंटिलेटरवर ठेवल्यावर आपल्याला
ऑसिजनची किंमत कळते. जीवनात ईश्वराची कृपाप्राप्ती, खरा आनंद, खरे पुण्य कशाने प्राप्त होते? याचे उत्तर या अभंगात मिळते. भगवंताने माझ्यावर दया करावी असे नेहेमी वाटते त्यासाठी मी काय करावं? याचा मार्ग हा अभंग दाखवतो.
असे अनेक दाखल्यांआधारे सोप्या शब्दात सांगताना योगेशबुवांनी केलेले गायन उपस्थितांची ब्रह्मनंदी टाळी
लावणारे ठरले. गर्भवती माता अन्न खाते त्या अन्नातील पोषणद्रव्य बाळाला कोण पुरवते? आईच्या शरिरात दुध कोण
उत्पन्न करते? आपण डोळ्यांनी बघतो. कानांनी ऐकतो पायांनी चालतो. तोंडाने मधुर बोलतो हे कोणामुळे?
आपल्याला मधुर बोलण्यासाठी तोंड कोणी दिलं? साखर झोपेचा आनंद घेत आपल्याला कोण उठवतो?
याचे चिंतन केल्यास देवाने केलेली दया आपल्या लक्षात येते.
आपल्या डोळ्यांवर, कानांवर, दातांवर, पोटावर, पायांवर अशा शरिरातील कोणत्याही अवयवांवर तज्ज्ञ
डॉटर वैद्यकीय उपचार करण्यासाठी फी आकारतात तेव्हा आपल्याला देवाने हे संपूर्ण शरिर फुकट दिले,
ही देवाने केलेली दयाच आहे हे पटते. भगवंत वस्तुत्वाने पहायचा नाही तर अस्तित्वाने जाणायचा असतो. जे मुख भगवंताचे
नाम घेत नसेल त्याला मुख का म्हणावे? जे कान भगवंताचे गुणगान ऐकत नसतील तर त्यांना कान का म्हणावे? आपल्या मनामधून आपपरभाव दूर झाल्यास भगवंत कोठे हे कळेल? जे भक्त ते सर्व भगवंताचे अंश आहेत. भगवंताच्या भेटीसाठी संत नामदेवांसारखा निर्मल भाव तयार होईल तेव्हा देव आपल्यावर दया करील. भगवंताला अगोदरच सर्व समर्पण
करावं तो आपल्यासाठी धावून येतोच. या डोळ्यांनी निज पाहिला देव जेवला गं देव जेवला…हे नामदेवांनी देवाला जेऊ घातल्याचे सांगणारे भक्तिगीत योगेशबुवा गाऊ लागले तेव्हा तल्लीनतेने कीर्तनाचा आनंद घेणारांनी संगीताचे थीने चांगलाच
ठेका धरला होता. कीर्तनासाठी अच्युतराब घबाडे यांनी तबल्याची आणि कल्याण मुरकुटे यांनी हार्मोनियमची
सुरेल साथसंगत केली. विक्रम बोरूडे व सौरभ बोरूडे यांच्या हस्ते या कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
कीर्तन सोहळ्यास दिनेश बोरूडे, सत्यम बोरूडे, गणेश दळवी, ओंकार बोरूडे, रमेश बोरूडे, अनिल शिंदे,
शरद बोरूडे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त शालेय मुलींना चांगला व वाईट स्पर्शाबद्दल समुपदेशन
नगर – लायन्स लब ऑफ अहमदनगरच्या वतीने सावेडी, वाघ मळा येथील केशवराव गाडीलकर हायस्कूलमध्ये महिला दिनानिमित्त शाळेतील मुलींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल समुपदेशन करण्यात आले. अल्पवयीन मुलींवर सातत्याने होणार्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर जागृती होण्याच्या उद्देशाने लायन्स लबच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
डॉ. सिमरन वधवा यांनी मुलींना चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक तसेच आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगामध्ये प्रसंगवधान राखून कुणाचीही मदत मिळेपर्यंत स्वतः काय करायचे? याबद्दल माहिती दिली.
डॉ. अनघा पारगावकर यांनी आजच्या परिस्थितीत मुलींनी स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे यावर मार्गदर्शन करुन आपल्याला आलेली प्रत्येक अडचण आपण घरात आई वडील किंवा शाळेत शिक्षकांना निसंकोच पणे सांगण्याचे त्यांनी
आवाहन केले. बदलत्या जीवनशैलीमुळे बळवणारे आजारांपैकी थायरॉईडच्या आजाराचे निदान करण्यासाठी सातवी ते नववीच्या मुलींची स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना माणकेश्वर यांनी केले. आभार प्रिया मुनोत
यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल गायकवाड, जयश्री देशपांडे, बाबासाहेब शिंदे आदींसह शिक्षक, शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.
जागतिक महिला दिनानिमित्त मोफत सायबर सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा
नगर – महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे संलग्नित सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे गिगाबाईट कॉम्प्युटर, केडगाव यांच्या वतीने केडगाव व उपनगरांतील महिला बचत गट, एकल महिला, तसेच सर्व युवती, माता व भगिनी यांच्यासाठी सायबर सियुरिटी याविषयी मोफत कार्यशाळा घेण्यात आली. आर्टिफिशल इंटेलिजन्स युगात महिला वर्गांना जनधनचे खाते किंवा बँकिंग व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी. सध्या आर्थिक व्यवहारांमध्ये होणारे सायबर फ्रॉड हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवायचं. सेसटॉर्शन काय असते, ओटीपी फ्रॉड, चेहरा बदलून फोटो व व्हिडिओ तयार तयार करून महिलांना फसविले जाते. अशा वेगवेगळ्या विषयाची जाणीव व त्यातून
महिलांनी कसे जागरूक राहावे याविषयी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा फक्त महिला दिनानिमित्त न करता कायमस्वरूपी परिसरामधील बचत गटातील महिलांना मोफत शिकवले जाईल, अशी माहिती संस्थेचे संस्थापक संचालक बाबासाहेब वायकर यांनी सांगितल
ऑमलेट-पावची हातगाडी चोरी करणार्या आरोपीस पकडले
नगर – नगर शहरातील इम्पिरिअल चौक येथे बॉम्बे चिकन समोर लावलेली ऑमलेट-पावची हातगाडी चोरी करणारे
२ आरोपी कोतवाली पोलीसांनी पकडले आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेली हातगाडी हस्तगत करण्यात आली
आहे. सागर दिनकर बोठे (रा. ओझर ता. अकोले), निशांत बाळासाहेब पाखरे (रा.अंबरनाथ, कल्याण, दोघेही
हल्ली रा. केदार वस्ती, सोलापुर रोड, अहिल्यानगर) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत आलीम जाफर शेख (रा. बुरुडगांव रोड, अहिल्यानगर) यांनी ६ मार्च रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात
फिर्याद दिली होती. फिर्यादी हे माळीवाडा बसस्थानक उज्वल कॉम्प्लेस समोर आम्लेट पाव गाडी चालवतो. ४ मार्च रोजी
अतिक्रमण पथक आल्याने त्यांनी सदर गाडी इम्पिरिअल चौक येथे बॉम्बे चिकन समोर लावली होती. ती चोरीला गेली
होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना कोतवाली गुन्हे
शोध पथकाने सदर घटनेचे तांत्रिक विश्लेषण करुन सदरची आम्लेट पाव गाडी आरोपी सागर बोठे व निशांत
पाखरे यांनी चोरी केल्याचे उघड केले. या दोघांना पकडून त्यांच्याकडून आम्लेट-पाव हातगाडी हस्तगत केली.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. योगीता कोकाटे, पो.हे.काँ.
योगेश भिंगारदिवे, सलिम शेख, योगेश कवाष्टे, महिला पो.हे.कॉ.रोहिणी दंरदले, पो.काँ. अमोल गाढे, अतुल काजळे,
दक्षिण मोबाईल सेलचे पो.काँ. राहुल गुंडु यांनी केली आहे.
श्रीराम जन्मभूमी हिंदूंचे पवित्र तिर्थक्षेत्र
बाळासाहेब भुजबळ यांचे प्रतिपादन; अहिल्यानगरच्या रामभक्तांनी घेतले अयोध्या व काशी धामचे दर्शन
नगर – साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण झाले आहे. लाखो हिंदूंचे स्वप्न पूर्ण झाले आहे. प्रभू राम हे सर्वांचे आदर्श आहेत. प्रभू श्री रामचंद्र एक पत्नी, एक वचनी, प्रजा हित दक्ष, धर्म रक्षक राजा होते. प्रत्येकाने प्रभू श्रीरामासारखे आदर्श जीवन जगावे. आयोध्या येथे भव्य दिव्य असे राम मंदिर पाहून सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत.
प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी राम भक्तांनी मोठ्या संख्येने यावे.श्रीराम जन्मभूमी हिंदूंची पवित्र यात्रा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयोध्या व काशीधाम येथे मंदिर मार्ग प्रशस्त करून
भाविकांना मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केले आहेत. तसेच सर्व यात्रेकरूंची यात्रा सफल व होण्यासाठी रस्ते व रेल्वे सुविधा निर्माण केले आहेत. त्यांचे मी अभिनंदन करतो.असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी चे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले आहे. अहिल्यानगर येथील ६१ यात्रेकरूंनी आयोध्या धाम व काशी विश्वेश्वर धाम यात्रेचे उत्साहाच्या वातावरणात प्रभू श्रीरामाचे व काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. रामभक्तांनी अयोध्या येथे प्रवेश करताच जय
श्रीरामचा नारा दिला. प्रभू श्रीरामाच्या बालरुपाचे दर्शन घेऊन भाविक मंत्रमुग्ध झाले. प्रभू श्रीरामाचे मंदिर पाहून
सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले. न भूतो ने भविष्यतीअसा दर्शनाचा सोहळा रंगला होता. प्रभू श्रीरामाच्या दर्शना नंतर हनुमान गढ़ी, कनक महल, दशरथ महल, शिप्रा घाट येथे गंगा आरती, तसेच श्री काशी विश्वेश्वर मंदिर, श्री कालभैरव मंदिर, श्री ढुंडिविनायक गणपती मंदिर, श्री माता अन्नपूर्णा मंदिर, श्री संकटमोचन हनुमान मंदिर, श्री महामृत्युंजय
मंदिर, राजा हरिश्चंद्र घाट, छत्रपती शिवाजी महाराज घाट, अहिल्यादेवी होळकर घाट, राजा महाराणा प्रताप
घाट, मणिकर्णिका घाट असे सुंदर घाटाचे दर्शन घेतले. श्री काशी विश्वेश्वर येथील गंगाघाट येथील महाआरती ने
सर्व घाट उजळून गेला होता. अतिशय सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शंख नाद,
घंटानाद, मोर पीस फीरवून पंचारती करण्यात आली. घाटावरील गंगा आरतीने सर्वांचे डोळे दिपले होते.
यावेळी बाळासाहेब भुजबळ, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमोल भांबरकर, प्रकाश इवळे,
विनोद पुंड, चंद्रकांत पुंड, नारायण इवळे, अरुण गाडळकर, मनोज भुजबळ, रोहित पठारे, निनाद
गायकवाड, सूर्यकांत कांडेकर, रमेश शेरकर, पोपट शिंदे, इंजि. बाबासाहेब ससाने, माजी नगरसेविका
सुनंदाताई भुजबळ, ताराबाई शिंदे, विजया भांबरकर, शितल भुजबळ, सुरेखा वाघ, वैष्णवी कराळे, जयश्री
सातपुते आदी उपस्थित होते. यात्रेचे उत्कृष्ट नियोजन नाना सावंत आणि भक्ती ताई साळवी, विश्व हिंदू परिषद व बजरंगदलाचे कार्यकर्ते यांनी केले होते.
बिहारच्या महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी नगरमध्ये बौद्ध समाजाचे धरणे आंदोलन
२ मार्च रोजी मोर्चा काढणार, महाबोधी टेम्पल अॅट १९४९ रद्द करून व बुद्धविहार बौद्ध धर्मगुरूंच्या स्वाधीन करा, पूजेचा अधिकार नाकारणे अन्यायकारक
नगर – बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी बौद्ध समाजाच्या शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनकरण्यात आले. या आंदोलनात भन्ते, बौध्द भिख्कू,
उपासक, उपासिका आणि समाजबांधवांसह युवक सहभागी झाले होते. आंदोलकांनी बुद्धविहार मुक्तीसाठी निदर्शनेकेली. मधील महाबौध्दि बुद्धविहार येथे द बौद्ध गया टेम्पल अॅट १९४९ लागू आहे. त्यामध्ये पाच गैर
बौद्ध सदस्य असून, बौध्द धर्मगुरुंना आपल्या बुद्धविहारात विधीवत पूजेचा अधिकार मिळत नसल्याने हे एक प्रकारे बौद्ध धर्माचा अपमान आहे. संविधानानुसार सर्व समाजाला व धर्माला त्यांच्या धर्मा नुसार आपल्याधार्मिक स्थळात पूजा करण्याचा अधिकार आहे. मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारी, मस्जिदमध्ये मौलवी,
चर्चमध्ये पादरी आणि गुरुद्वारामध्ये शिख धर्मगुरू आपल्या धर्माप्रमाणे पूजा करत असतात. मात्र परंतु या
बौद्ध विहार मध्ये बौद्ध धर्मगुरुंना विधीवत पूजेचा अधिकार दिला जात नसून, हा एक प्रकारे अन्याय असल्याचे बौद्ध1
समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बौद्ध समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा धार्मिक स्थळ बौद्ध धर्मगुरूंच्या ताब्यात देण्याची गरज आहे. त्यामुळे तेथे दररोज बौद्ध धर्मगुरु विधीवत पूजा करु शकतील. बौद्ध धर्माची ही राष्ट्रीय धरोवर असून, ती बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी देशभर आंदोलन होत असून, केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे.
महाबोधी महाविहार टेम्पल अॅट १९४९ रद्द करून नवीन कायदा तयार करावा व महाबौध्दि बुद्धविहार
बौद्ध धर्मगुरूंच्या स्वाधीन करण्याची मागणी शहरातील बौध्द समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या
प्रश्नावर १२ मार्च रोजी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील महायुतीचे सरकार हे औरंगजेबाच्या जुलमी विचाराने चालणारे
नगर – राज्यातील ट्रिपल सीटचे सरकार हे जुलमी सरकार असून ते औरंगजेबाच्या विचाराने चालत आहे. आता आपल्याला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसारखे लढायचे आहे, या माध्यमातून पुन्हा काँग्रेसचे गत वैभव निर्माण करून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अहिल्यानगर शहरात आले असता त्यांचे शहर व जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, दीप चव्हाण, सुनील क्षेत्रे,संपतराव म्हस्के, बाळासाहेब भंडारी, आबासाहेब कोकाटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणले की’ माणसाने माणसासारखे वागावे, मानवतावादी भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली आणि इंग्रजां विरोधी लढा पुकारला. महान संविधान निर्माण झाले. दुसरीकडे’मुख्य तत्व बाजूला ठेवून सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सामाजिक तेढ निर्माण केला. पैशाचा गैरवापर, पारदर्शकतेचा अभाव या माध्यमातून खुर्चीवर बसले, यातून गुन्हेगारी-फुटीरवादी निर्माण झाले. पूर्वी क्रांतीसाठी चळवळ निर्माण व्हायच्या मात्र आता कोयता गँग, आका गँग, मुरूम गँग, वाळू गँग तयार झाले आहेत. हे सर्व नष्ट करण्यासाठी सकारात्मक संदेश घेऊन काँग्रेस जनतेमध्ये जात आहे, समाजामध्ये द्वेष, गुंडागर्दी पसरली असून संवाद नाहीसा झाला आहे. भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सद्भावना
यात्रेचे आयोजन केले असून मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा ८ ते ९ मार्चला संपन्न होणार असून बीड येथे सांगता होणार आहे.
ही सद्भावना यात्रा निवडणुकीसाठी नाहीतर काँग्रेसचे विचार जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आहे, येणारा काळ हा काँग्रेसचा असणार आहे, सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाही, ट्रिपल इंजिनचे सरकार दररोज एकमेकांमध्ये भांडताना दिसत
आहे हे काय जनतेचे काम करणार असे ते म्हणाले.













