महापालिका २०० कोटी कर्जात असताना आयुक्तांचा दालनासाठी लाखो रुपये खर्च

0
124

नगर – कर्तव्यदक्ष म्हणून घेणारे आयुक्त यशवंत डांगे यांनी आपल्या दालनासाठी चक्क २० लाख रुपयांचा खर्च कामे करून एक प्रकारे नगरच्या जनतेची मोठ्या व प्रमाणामध्ये दिशाभूल केली आहे. अहिल्यानगर महापालिकेकडे महावितरण चे २०० कोटी रुपये बिल थकीत आहे, पैसे भरत नाही म्हणून वारंवार महावितरण वीज पुरवठा खंडित करतात. इतके कर्ज
महापालिकेकडे असताना स्वतः च्या दालनाला नुतनीकरणाला खर्च करणे कितपत योग्य आहे
असा सवाल नितीन भूतारे यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे पाणीपट्टी, घरपट्टी भरली नाही तर सर्वसामान्यांचे
नळ कनेशन तोडायचे दुसरीकडे आपल्या ऐश आरामात बसण्याकरिता कार्यालयाला दालनाला करोडो रुपये खर्च करायचा अश्या बेफिकीर वागणार्‍या आयुक्तांची या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी कारवाई करण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचे नितीन भुतारे यांनी सांगितले.
महापालिकेच्या अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे कर्मचार्‍यांना देण्यासाठी पगार नाहीत, तसेच पीएफ ग्रॅज्युटी साठी सुद्धा पैसे नाही तर पेन्शनसाठी आज कसेबसे सरकारी पैसे येतात त्यावर भाग भागव होते, आता तर अहिल्यानगर महापालिकेकडे पैसे नाही म्हणुन नगर शहरामध्ये थकीत घरपट्टी पाणीपट्टीच्या विरोधामध्ये आयुक्त यशवंत डांगे यांनी थेट कारवाई हाती घेतली आहे. आत्तापर्यंत हजारो थकबाकीदारांवर कारवाई करत वेळप्रसंगी थकीत मालमत्तांना सील ठोकणे किंवा नळ कनेशन बंद करणे असे प्रकार केलेले आहे सुरू आहेत. कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेला आता या महागाईच्या
काळामध्ये पैसे कुठून आणि कसे आणायचे याची चिंता पडलेली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यावर कारवाई नको म्हणून वेळप्रसंगी व्याजाने किंवा उधारीवर पैसे घेऊन आज सर्वसामान्य माणूस कर रूपाचे पैसे महानगरपालिकेमध्ये जमा करत आहे. एक एक रुपया महानगर पालिकेला महत्वाचा आहे.
महानगरपालिकेच्या आयुक्त डांगे यांनी आमच्याकडे पैसे नाही  लाईट बिल भरायचे कसे असा  प्रश्न महापालिकेच्या समोर आहे  असे सांगितले आहे जर आयुक्त अशा प्रकारची महापालिकेची बिकट अवस्था जनतेसमोर मांडत असताना दुसरीकडे मात्र त्यांनी त्यांच्या दालनासाठी जवळपास २० लाख व त्या पेक्षा जास्त रुपये खर्च करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एक कोटी रुपयांचा खर्च आपल्या स्वतःच्या दालनासाठी केलेला
आहे. त्याबाबतच्या ठेका सुद्धा त्यांनी दिलेला आहे व सध्या हे काम प्रगतीपथावर चालू आहे.
एक प्रकारे शासकीय तिजोरीवर एक प्रकारे डल्ला मारण्याचा हा प्रकार नाही का? असा सवाल सुद्धा भुतारे
यांनी उपस्थित केला असून या सर्व प्रकरणाची चौकशी तात्काळ करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.
याकरता आपण मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, यांना या प्रकरणाची चौकशी
करावी व दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी माग णी सुद्धा केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.