धर्मासाठी मृत्यूलाही कसे कवटाळावे हे संभाजी महाराज यांनी दाखवून दिले

0
25

नगर – हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन त्यासाठी जीवन समर्पण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला  राज्यासाठी काय करावे? हे सांगतात तर त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज आपल्याला हिंदू धर्मासाठी मृत्यूलाही कसे कवटाळावे? हे स्वकृतीमधून दाखवून देतात, असे हभप योगेशबुवा कुलकर्णी यांनी नारदीय कीर्तनामधून सांगितले.
येथील बोरूडे मळ्यात नारदीय कीर्तन करताना ते बोलत होते. प्रवचनकार हभप मिलिंद चवंडके यांनी त्यांचा परिचय करून दिला. बोरूडे मळ्यात प्रथमच नारदीय कीर्तन होत असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. योगेशबुवा कुलकर्णी यांनी निरूपणासाठी देव करील दया…हा तंजावर येथील भगवत् भक्त गोपाळपंत अरणीकर यांचा अभंग घेतला होता. सृष्टी निर्माण करणारे भगवंत अत्यंत दयाळू आहेत. त्यांच्या दयेमुळे आपल्याला मानवी शरिर फुकट मिळते.
निसर्ग देवतेच्या कृपेने आपण ऑसिजन मनमुराद फुकट वापरतो. डॉटरने व्हेंटिलेटरवर ठेवल्यावर आपल्याला
ऑसिजनची किंमत कळते. जीवनात ईश्वराची कृपाप्राप्ती, खरा आनंद, खरे पुण्य कशाने प्राप्त होते? याचे उत्तर या अभंगात मिळते. भगवंताने माझ्यावर दया करावी असे नेहेमी वाटते त्यासाठी मी काय करावं? याचा मार्ग हा अभंग दाखवतो.
असे अनेक दाखल्यांआधारे सोप्या शब्दात सांगताना योगेशबुवांनी केलेले गायन उपस्थितांची ब्रह्मनंदी टाळी
लावणारे ठरले. गर्भवती माता अन्न खाते त्या अन्नातील पोषणद्रव्य बाळाला कोण पुरवते? आईच्या शरिरात दुध कोण
उत्पन्न करते? आपण डोळ्यांनी बघतो. कानांनी ऐकतो पायांनी चालतो. तोंडाने मधुर बोलतो हे कोणामुळे?
आपल्याला मधुर बोलण्यासाठी तोंड कोणी दिलं? साखर झोपेचा आनंद घेत आपल्याला कोण उठवतो?
याचे चिंतन केल्यास देवाने केलेली दया आपल्या लक्षात येते.
आपल्या डोळ्यांवर, कानांवर, दातांवर, पोटावर, पायांवर अशा शरिरातील कोणत्याही अवयवांवर तज्ज्ञ
डॉटर वैद्यकीय उपचार करण्यासाठी फी आकारतात तेव्हा आपल्याला देवाने हे संपूर्ण शरिर फुकट दिले,
ही देवाने केलेली दयाच आहे हे पटते. भगवंत वस्तुत्वाने पहायचा नाही तर अस्तित्वाने जाणायचा असतो. जे मुख भगवंताचे
नाम घेत नसेल त्याला मुख का म्हणावे? जे कान भगवंताचे गुणगान ऐकत नसतील तर त्यांना कान का म्हणावे? आपल्या मनामधून आपपरभाव दूर झाल्यास भगवंत कोठे हे कळेल? जे भक्त ते सर्व भगवंताचे अंश आहेत. भगवंताच्या भेटीसाठी संत नामदेवांसारखा निर्मल भाव तयार होईल तेव्हा देव आपल्यावर दया करील. भगवंताला अगोदरच सर्व समर्पण
करावं तो आपल्यासाठी धावून येतोच. या डोळ्यांनी निज पाहिला देव जेवला गं देव जेवला…हे नामदेवांनी देवाला जेऊ घातल्याचे सांगणारे भक्तिगीत योगेशबुवा गाऊ लागले तेव्हा तल्लीनतेने कीर्तनाचा आनंद घेणारांनी संगीताचे  थीने चांगलाच
ठेका धरला होता. कीर्तनासाठी अच्युतराब घबाडे यांनी तबल्याची आणि कल्याण मुरकुटे यांनी हार्मोनियमची
सुरेल साथसंगत केली. विक्रम बोरूडे व सौरभ बोरूडे यांच्या हस्ते या कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
कीर्तन सोहळ्यास दिनेश बोरूडे, सत्यम बोरूडे, गणेश दळवी, ओंकार बोरूडे, रमेश बोरूडे, अनिल शिंदे,
शरद बोरूडे यांच्यासह भाविक उपस्थित होते.