जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ पुस्तकाच्या २५ व्या आवृत्तीचे प्रकाशन

नगर – येथील लेखिका डॉ. सुधा कांकरिया यांचे ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या पुस्तकाच्या २५ व्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा जागतिक महिला दिनी अर्थात ८ मार्च रोजी होत आहे. मानकन्हैय्या ट्रस्ट, आयोजित कार्यक्रम सकाळी १० वाजता पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. लोकशिक्षण आणि जनजागृतीच्या हेतूने प्रकाशित करण्यात येणार्‍या या पुस्तकाचे प्रकाशन भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी असणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, यशोवाणीच्या प्राची गुर्जर, अखिल भारतीय महिला जैन कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा
विमल बाफना यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी सदर पुस्तकाला भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटिल, महिला व  लविकास मंत्री महाराष्ट्र राज्य आदिती सुनिल तटकरे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव डॉ. नितिन करीर तसेच कुंदनऋषीजी म.सा. यांचे संदेश लाभले असुन, पद्मभूषण अण्णा हजारे व विचारवंत, माजी अध्यक्ष अ.भा. मराठी साहित्य संमेलन डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना लिहिली आहे. स्त्री जन्माचे स्वागत करा हे पुस्तक हा चळवळीचा भाग असुन त्यातील अनेक नाटिका, कविता, इत्यादी आकाशवाणीद्वारे प्रसारित झाल्या असुन गावागावातुन त्याचे शेकडो प्रयोगही गेल्या २५ वर्षात झाले आहेत. सदर पुस्तकात सहा मराठी, तीन हिंदी नाटिका असुन काही पथनाट्ये, कायदा व त्याचे स्पष्टीकरण देणारे लेख, ११ कलमी कृती कार्यक्रमाची माहिती, आठवा फेरा स्त्री
जन्माच्या स्वागताचा तसेच नकोशीला करूया हवीशी बाबत लेख, अनेक कविता तसेच घोषवायांचाही समावेश आहे. २५ व्या आवृत्तीसाठी कविवर्य चंद्रकांत पालवे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे विभागीय कार्यवाह, शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलूलकर यांचे सहकार्य लाभले आहे. प्रकाशन सोहळयास साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आय.एस.डी.टी.त संवाद उपक्रम

वाहतूक नियमांबाबत विशेष मार्गदर्शन : संचालिका पूजा देशमुख

नगर – आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने येथील आय.एस.डी.टी. या संस्थेत ८ मार्च रोजी सकाळी १० वा. संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे हे विद्यार्थ्यांना  वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या संचालिका पुजा देशमुख यांनी दिली.
याबाबत बोलताना संचालिका पुजा देशमुख म्हणाल्या, प्रामुख्याने शहरी भागात वाहतूक व्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा व गंभीर विषय बनला आहे. याबाबत पोलीस प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक या दोघांनीही समन्वयाने काम केल्यास वाहतूक व्यवस्था सुलभ होऊ शकते. त्या दृष्टीने आय. एस.डी.टी. या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वाहतूक नियमांची व नागरीकांनी काय दक्षता घ्यावी,  याबाबतची माहिती देण्यासाठी आय.एस.डी.टी. सभागृहात संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे हे यावेळी मार्गदर्शन करणार असुन विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे शंका निरसन देखील करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विनायक देशमुख हे राहणार आहेत.
याप्रसंगी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात मागील वर्षी इंटेरियर डिझायनिंग या अभ्यासक्रमात विद्यापीठात सर्वप्रथम आलेल्या आकांक्षा गाडे या विद्यार्थिनीचा तसेच संस्थेत सुरू असलेल्या अल्पमुदतीच्या एम्ब्रॉयडरी व आरि वर्कचे प्रशिक्षण घेऊन उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राचार्य आर्किटेट अरुण गावडे यांनी दिले.

महाआरोग्य शिबिरे ही रुग्णांसाठी मोठी पर्वणी

उद्योजक सतीश बोथरा यांचे प्रतिपादन; प्लास्टिक सर्जरी शिबिरास प्रतिसाद

नगर – आचार्य आनंदऋषीजींच्या आशीर्वादाने व आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने आरोग्य शिबिरे भरविले जातात. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. हे समजून या आरोग्य
शिबिरांच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब रुग्णांची सेवा घडत आहे. या शिबिराचे आयोजन करण्याची संधी बोथरा परिवाराला मिळाले आहे. हे मी माझे भाग्य समजतो. आनंदऋषीजी हॉस्पिटल मधील महाआरोग्य शिबिरे ही रुग्णांसाठी
मोठी पर्वणी ठरत आहे, असे प्रतिपादन उद्योजक सतीश बोथरा यांनी केले आहे.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३३ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटन उद्योजक सतीश बोथरा, सौ.अपर्णा बोथरा, परेश बोथरा, सौ.कोमल बोथरा, प्रबल बोथरा व अर्णव बोथरा व बोथरा परिवाराच्या वतीने दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी सुनील कोठारी, सौ.सुरेखा कोठारी, जैन सोशल फेडरेशनचे सदस्य डॉ.प्रकाश कांकरिया, संतोष बोथरा, मानकचंद कटारिया, सतीश
लोढा, अभय गुगळे, सुभाष मुनोत, प्रकाश छल्लाणी, डॉ.आशिष भंडारी, शिबिराचे तज्ञ डॉटर डॉ.माया
मरकड, डॉ.आदित्य दमानी आदी उपस्थित होते.
सौ.अपर्णा बोथरा म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सेवाभावी पद्धतीने रुग्णांची सेवा केली जाते. येथील डॉटर्स, नर्सेस, तसेच सर्व स्टाफ अत्यंत तळमळीने, निस्वार्थपणे व काळजीने रुग्ण सेवा करीत आहेत. हॉस्पिटलचे रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे. या शिबिराच्या माध्यमातून बोथरा परिवाराला खारीचा वाटा उचलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी केले. स्वागत डॉ.आशिष भंडारी यांनी केले. प्रकाश छल्लाणी यांनी
आभार मानले. प्लास्टिक सर्जरी शिबिरात ७७ रुग्णांची तपासणी करण्यात आली

श्रीमंत बालाजी गणेश मंदिरम्चा वर्धापनदिन उत्सव विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाने साजरा

नगर – श्रीमंत बालाजी गणेश मंदिरम्च्या १४ वा वर्धापनदिन उत्सवानिमित्ताने पंचरंग युवक मंडळाने विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवुन साजरा करण्यात आला. मुख्य दिवशी ५ मार्च रोजी गणेश पुजन, होमहवन, अभिषेक, महाआरती
आणि महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी पंचरंग गल्ली भागातील ज्येष्ठ नागरीकांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी भाविक महाप्रसादाचा व विविध कार्यक्रमांचा लाभ घेतला.
या वर्धापन दिनानिमित्त ४ ते ५ मार्च दरम्यान पंचरंग युवक मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये नुकताच प्रसिद्ध झालेला चित्रपट छावा मोठ्या एलईडी स्क्रिन वर दाखवण्यात आला. तसेच हनुमान चालिसा
पठण कार्यक्रम घेऊन हा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना धनंजय जाधव म्हणाले कि, मंडळाच्या माध्यमतून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. यामध्ये सामुदायिक तुलसी विवाह, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप, नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी सामुहिक दुर्गापाठ, गणोत्सवामध्ये तरुण आणि लहान मुलांच्या कलागुणाना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धाआयोजित करण्यात येतात. तसेच या उत्सवांच्या माध्यमातून गरजू नागरीकांसाठी विविध शिबीरांच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात करतात. त्यांचे धार्मिक आणि सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगिलते.
त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती तोफखाना पोलीस स्टेशनचे एपीआय मंगेश गोंटला, धनंजय जाधव, अजय चितळे, पद्मशाली पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, श्री मार्कंडेय देवस्थानचे अध्यक्ष गणेश विद्ये, प्रकाश भागानगरे, विष्णू कलागते, पो.राहुल गुंडू, पो.अभिजीत अरकल, दिनेश सुळ, सुरज जाधव, अक्षय डाके, सागर मुर्तुडकर, धिरज पोखरणा, लंकेश हरबा यांचा योगेश मिसाळ, बाळासाहेब आगळे, भाजपाचे सौ. श्वेताताई झोंड सत्कार मंदीराचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र
बोगा यांचा हस्ते करण्यात आला. वर्धापन दिन सोहळा यशस्वीतेसाठी अनिल बोगा, शंकर दंडी, चंद्रकांत दंडी, देविदास चिलका, शाम बोगा, सतिष चिलका, सागर गोंधळे, हर्षद आडेप, संजय बोगा, सागर दंडी, अमोल दंडी, महेश रोल्ला,
संतोष बोगा, गौरव चिलका, नरेश कोडम, प्रणव बोगा, शौनक बल्लाळ, आदित्य बोगा, संतोष आडेप, लखन कोटा, चंद्रकांत अल्ली, व्यंकटेश दंडी, यशवंत दंडी, जंयत बोगा, आनंद दंडी, पुरूषोत्तम बोगा, राकेश बोगा, चेतन दंडी, देवाक बोगा, अक्षय दंडी, ओम बोगा, रुद्राक बोगा, सिध्दू गोंधळे, निहाल बोगा, अर्थव कुंचन, गोरख बोगा, ओमकार बोगा, अथर्व येमुल, अभय रंगा, मुरली बिल्ला, निशांत गुरुड, साई बोगा, सोहम दंडी, अमन बोगा, अनुज बोगा, युवराज बोगा, सार्थक गोंधळे, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष विनोद बोगा आदींसह परिसरातील महिलांनी परिश्रम घेतले. हा उत्सव यशस्वी साजरा करण्यासाठी सर्व मंडळाचे हितचिंतक व वर्गणीदार यांच्या सहकार्याने सर्व  शय झाले असे मंडळाचे सदस्य सागर गोंधळे यांनी सांगितले

नगर शहरात सर्वप्रथम अहमदनगर महाविद्यालयाची सेंटर ऑफ एसलन्सचा ‘अ’ दर्जाचे सेंटर म्हणून घोषणा

नगर – अहिल्यानगर शहरात सर्वप्रथम अहमदनगर महाविद्यालयास ‘अ’ दर्जाचे सेंटर ऑफ एसलन्स म्हणून प्राप्त झाले. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे करिअर कट्टा अंतर्गत राज्यस्तरीय बक्षीस वितरण आणि सेंटर ऑफ एसलन्स प्रमाणपत्र व निधी वितरण कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये महाविद्यालयास सेंटर ऑफ एसलन्सचे प्रमाणपत्र व निधीचा धनादेश (चेक) महाविद्यालयाच्या वतीने करियर कट्ट्याचे अहिल्यानगर जिल्हा समन्वयक (शहर) प्रा.डॉ.भागवत परकाळ व अहमदनगर महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. प्रशांत फुगनर यांनी स्विकारला. या सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असणार्या सर्व सोयी सुविधा या सेंटर मार्फत उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या सुविधांचा उपयोग करून घ्यावा. तसेच करिअर कट्ट्याच्या माध्यमातून औद्योगिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमधून उद्योजक निर्माण व्हावे, या उद्देशाने स्टार्ट- अप कंपन्या सुरु करून स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरु करण्यासाठी प्रोत्साहनात्मक निधी सेंटरला प्राप्त झाला आहे. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे संस्थापक अध्यक्ष यशवंत शितोळे यांचे आभार मानले. या यशाबद्दल उपप्राचार्य प्रा.दिलीपकुमार भालसिंग, विनाअनुदान विभागाचे समन्वयक प्रा.डॉ. सय्यद रज्जाक, उपप्राचार्य डॉ. नोयाल पारगे, उपप्राचार्य डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, महाविद्यालयाचे प्रबंधक
पीटर चक्रनारायण यांनी धन्यवाद दिले.

स्पर्धेच्या माध्यमातून बालपणीच्या आठवणीला उजाळा मिळतो

उपायुक्त विजयकुमार मुंडे यांचे प्रतिपादन; अहिल्यानगर महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

नगर – महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना एकत्रित येण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते, त्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होत असते, व आपल्या बालपणीच्या आठवणीला उजाळा मिळत असतो. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून  एकोप्याचे दर्शन घडले जाते, या धकाधकीच्या जीवनामध्ये अधिकारी कर्मचारी अक्षरशः आपल्या
आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात, व्यायामाच्या माध्यमातून आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होत असते, व
आपल्या दैनंदिन कामकाज करत असताना उत्साह व आनंददायी दिवस जात असतो तरी प्रत्येकाने व्यायामाकडे वळावे असे प्रतिपादन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी केले.

अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विजयकुमार मुंडे, उपयुक्त प्रियांका शिंदे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, उपायुक्त निखिल फराटे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, लेखाधिकारी डॉटर सचिन धस, क्रीडा अधिकारी फिलिप्स ह्विन्सेंट, संगणक विभाग प्रमुख ए.डी.साळी, अनिल लोंढे आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिका क्रीडा  विभागाच्या वतीने अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने भाग घेत आपल्या आवडीच्या खेळामध्ये चांगले प्रदर्शन दाखविण्याचे काम कर्मचार्‍यांनी केले. कबड्डी स्पर्धेतील विजेता संघ प्रभाग समिती क्रमांक १ सावेडी उपविजेता संघ, शिक्षण विभाग मनपा, क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ मुख्य प्रशासकीय कार्यालय मनपा, उपविजेता संघ प्रभाग समिती क्रमांक १ सावेडी, याच बरोबर १०० मीटर, २०० मीटर, गोळा फेक, रिले, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेसह सांस्कृतिक कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण झाले
असल्याची माहिती क्रीडा अधिकारी फिलिप्स ह्विन्सेंट यांनी दिली. सूत्रसंचालन अनिल लोखंडे यांनी केले. तर मेहर लहारे यांनी आभार मानले.

वाढती वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी बंद सिग्नल सुरू करून पोलिस नेमण्यात याव

अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढलेली संख्या पाहता योग्य नियोजन होणे आवश्यक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाहतूक शाखेला निवेदन

नगर – शहरातील वाढती वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी प्रमुख चौका-चौकातील बंद सिग्नल सुरू करून वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहर वाहतूक शाखेकडे करण्यात आली आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी शहर वाहतूक
शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना निवेदन देऊन शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत होण्याबाबत
चर्चा केली. यावेळी दीपक वाघ, किरण घुले, ऋषिकेश जगताप, मंगेश शिंदे, राजू मकासरे, रोहित सरना, कृष्णा
शेळके, कुणाल ससाणे, गौरव हरबा, ओंकार मिसाळ, केतन ढवण आदी उपस्थित होते.
शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील अपघाताची संख्या देखील
वाढत आहे. शहरातील विविध प्रमुख चौकातील सिग्नल हे बर्‍याचदा बंद असतात, त्यामुळे नागरिकांना विशेषत:
वृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी व महिलांना वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रमुख चौकात बंद सिग्नल
कार्यान्वीत करुन व वाहतूक पोलिसांची नेमणूक केल्यास वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शहर वाहतूक शाखेने बंद सिग्नल यंत्रणा तातडीने सुरु करावी आणि प्रमुख चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, टेनिकल टीमची नेमणुक करुन शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढलेली संख्या पाहता वाहतूकीचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. अनेक चौकातील सिग्नल बंद अवस्थेत असल्याने
वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. वाहतूकीचे योग्य नियोजन होण्यासाठी शहर वाहतूक शाखेने तातडीने बंद सिग्नल सुरु करुन, नेहमी वाहतूक कोंडी होणार्‍या चौकात वाहतूक पोलिसांची नेमणुक करणे गरजेचे आहे, असे इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले.

निंबळक शिवारात दहशत करणारी टोळी गजाआड

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

नगर – निंबळक (ता. नगर) शिवारात दहशत करणार्‍या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले  आहे. या टोळीतील १२ जणांनी हातात तलवारी, लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेऊन कोतकर कुटुंबावर खूनी हल्ला केला
होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
संतोष रघुनाथ धोत्रे (वय २७), मट्टस उर्फ अजय सोमनाथ गुळवे (वय २६), अमोल गोरख आव्हाड (वय २३), विशाल भाऊसाहेब पाटोळे (वय २३), सुधीर प्रदीप दळवी (वय २४), आबा उर्फ राहुल नाथा गोरे (वय ३५), तुषार लहानू
पानसरे (वय १९), अक्षय बाबासाहेब ठुबे (वय २१), यश सुनील सरोदे उर्फ प्रेम (वय १८), सुरज अरविंद भिंगारदिवे उर्फ खंडू (वय २१),  करण गौतम अवताडे (वय २१), शरद जगन  पाटोळे (वय १९) अशी अटक केलेल्या संशयित
आरोपींची नावे आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद परदेशी, उपनिरीक्षक मनोज मोंढे, उपनिरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक देविदास भालेराव, अंमलदार नितीन उगलमुगले, साबीर शेख, राजु सुद्रीक, नंदकिशोर सांगळे, चौधरी, टेमकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे.

होमिओपॅथीचे शिक्षण घेण्यासाठी ब्राझीलची महिला डॉटर नगर शहरात

नगर – मानसिक व शारीरिक जीवन निरोगी बनविण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या होमिओपॅथीचे अद्यावत शिक्षण घेण्यासाठी ब्राझील येथील महिला डॉ. मिलीग्रीड बोरगस या शहरातील होलिस्टिक लासिकल होमिओपॅथी लिनिक अ‍ॅण्ड
रिसर्च सेंटर मध्ये आल्या आहेत. त्या रिसर्च सेंटरचे डॉ. प्रमोद लंके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष रुग्ण पाहून उपचार पद्धतीचा अभ्यास करत आहे. डॉ. मिलीग्रीड बोरगस यांना होमिओपॅथी शास्त्राची आवड असल्याने ब्राझीलची राजधानी
असलेल्या ब्रासलिआ शहरात मागील १० वर्षापासून होमिओपॅथीची प्रॅटिस करत आहे. अ‍ॅलोपॅथी उपचाराच्या दुष्परिणामाने नागरिक होमिओपॅथीकडे प्रभावीत होत असताना, होमिओपॅथीचे अद्यावत ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्या भारतात नुकत्याच आल्या आहेत. तर ग्रीस येथील इंटरनॅशनल अ‍ॅकडमी ऑफ लासिकल होमिओपॅथी स्कूल संलग्न असलेल्या शहरातील
होलिस्टिक लासिकल होमिओपॅथी लिनिक अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर मध्ये विविध आजारांवर प्रत्यक्ष रुग्णांच्या उपाचर पध्दतीचा अभ्यास करत आहे. डॉ. प्रमोद लंके यांनी आजारांना कायमचे मुळापासून नष्ट करण्यासाठी होमिओपॅथी या प्रभावी
शास्त्राचा उपयोग लोककल्याणासाठी होत आहे. जगभरातील डॉटर होमिओपॅथीकडे आकर्षिले जात असून, अनेक दिग्गज डॉटर होमिओपॅथीद्वारे रुग्णांचे उपचार देखील करत आहे. दुर्धर आजारांच्या रुग्णांना याचा फायदा होत असल्याने परदेशातही मोठ्या संख्येने नागरिक होमिओपॅथीकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्राझील मधून होमिओपॅथीच्या शिक्षणासाठी  नगर शहरात आलेल्या डॉ. मिलीग्रीड बोरगस यांनी भारतात मोठ्या लोकसंख्येच्या प्रमाणामुळे विविध आजारांचे प्रत्यक्ष अनुभव शिकण्यास मिळत आहे. अनेक गंभीर व जुनाट आजार होमिओपॅथीने बरे होत असल्याने व त्याचे दुष्परिणाम नसल्याने नागरिकांमध्ये जागृती होत आहे. भारतात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग ब्राझील मधील रुग्णांसाठी नक्कीच चांगल्या प्रकारे होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

रोटरी प्रियदर्शिनीतर्फे राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त नगरमध्ये ‘स्वसंरक्षण जागरूकता’ व्याख्यान

नगर – राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे औचित्य साधून रोटरी लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने मेहर इंग्लिश स्कूल,
आनंदी बाजार, अहिल्यानगर येथे स्वसंरक्षण जागरूकता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला.
यावेळी ज्युदो, कुस्ती, लाठी काठी या खेळात श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू सौ. अंजली देवकरय्वल्लाकट्टी यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे महत्त्व, आपत्कालीन परिस्थितीत कसे सामोरे  जायचे, आत्मरक्षणासाठी  आवश्यक तंत्रे व मूलभूत उपाययोजना याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घेत प्रात्यक्षिकांसह विविध स्वसंरक्षण तंत्रे शिकली, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. या कार्यक्रमाला रोटरी लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा रोटरीयन मीनल बोरा, सचिव रोटरीयन स्वाती गुंदेचा, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुरिता झगडे, विभावरी तांबडे, गीता गिल्डा, डॉ. अश्लेषा भांडारकर तसेच लबच्या सदस्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमाविषयी बोलताना मिनल बोरा यांनी सांगितले की, आजच्या काळात स्वसंरक्षणाचे शिक्षण ही काळाची गरज आहे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मरक्षणाची जागरूकता निर्माण करून त्यांना सक्षम बनवण्याचा आमचा उद्देश आहे. लब सामाजिक बांधिलकी जोपासत अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांचे व विद्यार्थ्यांचे
सशक्तीकरण करण्यासाठी कायम कटिबद्ध आहे. रोटरीने सामाजिक सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्याची परंपरा कायम ठेवत, महिलांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षणाच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम यशस्वीपणे पार
पाडला