जीवन चक्र-कर्म चक्र

0
96

इतिहासात पहिला मुघल बादशहा, बाबर याच्या जीवनातील एका घटनेचा उल्लेख मिळतो, एकदा त्याचा मुलगा हुमायुं आजारी पडला, त्याची वाचण्याची कोणतीही आशा नव्हती. बादशहाने करूणेने परमेश्वराची मुक प्रार्थना केली की, आपल्या पुत्राचा आजार स्वतःला लागु दे. हे काहीसे विचित्र वाटेल, परंतु त्याच क्षणी प्रार्थनेचा प्रभाव सुरू झाला. शहजादा हळु हळु बरा होवु लागला, तर सम्राटाचा त्याच आजाराने मृत्यु झाला. दुसर्‍यांचे दुःख झेलण्याचे अनेक घटनांमधील हे एक उदाहरण आहे. गुरू एक राजा आहे, जो दया व करुणेचा सागर आहे. त्यांच्या अनंत साम्राज्यात कर्माचा कोणताच हिशोब नसतो. प्रभुशी एकमेक असल्याने ते प्रत्येकाला त्यांच्या अंतरी प्रवाहित जीवन धारेशी जोडतात. जे संकटसमयी लंगर व आधाराचे काम करतात. आपली होडी जीवनाच्या वादळी लाटांमध्ये फसुन डामाडोल होवू शकते, परंतु तरंगत्या बोईशी बांधल्यामुळे वादळी वारे व मोठ्या लाटांना बळी पडूनही टिकून राहते.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)