80 टीटीबीची सवलत कशी मिळते?

0
56

कराचे नियोजन हे आर्थिक ध्येय गाठण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. या नियोजनाच्या आधारे करसवलत मिळवता येते आणि संपत्ती कशी वाढवता येईल, यादृष्टीनेही उपाययोजना करता येते. नोकरदार असो किंवा निवृत्त कर्मचारी किंवा उद्योजक सर्वांनाच कराबाबत सजग राहावे लागते. त्याचवेळी निवृत्त कर्मचार्‍यांना देखील कराचे नियोजन गरजेचे आहे. कारण ठराविक काळानंतर वैद्यकीय खर्च हा आवाक्याबाहेर राहू शकतो. 1961 च्या प्राप्तीकर कायद्यात अनेक तरतुदी असून ते ज्येष्ठांना पैसे वाचविण्यासाठी मदत करतात.

कलम 80 टीटीबी – कलम 80 टीटीबी हे ज्येष्ठ नागरिकांसाठीची विशेष तरतूद असून त्यानुसार 60 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींना 50 हजारांपर्यंत करसवलतीचा दावा करता येतो. 80 टीटीबीची कपात ही त्यांना कर वाचविणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची संधी देते. ज्येष्ठ नागरिकांना बँक, पोस्ट ऑफिससह अन्य आर्थिक साधनातील गुंतवणूकीतून व्याज मिळते. ंयावर ज्येष्ठ नागरिक कर कपातीचा दावा करु शकतात.

व्याज कोठून मिळते?

बँकेच्या ठेवी, आवर्ती ठेव योजना आणि बचत खाते.

पोस्टातील विविध गुंतवणूक योजना.

बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक करणार्‍या सहकारी बँकांतील गुंतवणूक

80 टीटीबीच्या मर्यादा – कलम 80 टीटीबी हे प्रामुख्याने व्याजातून मिळणार्‍या उत्पन्नावर करसवलतीचा दावा करण्याची मूभा देते. बँकांचे बचत खाते, मुदत ठेवी, रिकरिंग खाते, तसेच सहकारी बँक आणि पोस्टातील बचत खाते, बचत योजना जसे की नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना आदींपासून मिळणारे व्याज हे करसवलतीस पात्र ठरते. परंतु कंपनीच्या मुदत ठेवीवर मिळणार्‍या व्याजावर सवलत पात्र नसते.

कलम 80 टीटीए म्हणजे काय – कलम 80 टीटीबीच्या 80 टीटीए तरतुदीनुसार ज्येष्ठ नागरिकांना समान कपातीचा लाभ मिळतो. अर्थात ही करसवलत केवळ व्यक्तिगत करदाता किंवा एक हिंदू संयुक्त कुटुंब (एचयूएफ) च्या एकुण उत्पन्नातील बँक, सहकारी बँक आणि पोस्टातील गुंतवणुक योजनातून मिळणार्‍या व्याजावर दहा हजारांपर्यंत करसवलतीची मूभा देते. आता 80 टीटीबी नुसार कपात म्हणजे 50 हजारापर्यंत करसवलत मिळते. याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी करपात्र उत्पन्न 3 लाख 5 हजार रुपये होईल तर बिगर ज्येष्ठ नागरिकांसाठी करपात्र उत्पन्न हे 3,50,000 रुपये आहे. यात कलम 80 टीटीए नुसार संपूर्ण कपात झाल्यानंतर आणखी 5 हजार रुपयांची कपात झालेली असते. बिगर ज्येष्ठ नागरिक हा कलम 80 टीटीएनुसार कपातीस पात्र नाही. कारण हे कलम ज्येष्ठांसाठीच सादर करण्यात आलेले आहे.

आयटीआरमध्ये दावा करता येतो? आयटीआर भरताना ज्येष्ठ नागरिक कलम 80 टीटीबीनुसार कर सवलतीचा दावा करू शकतात. परंतु अन्य स्रोतांकडून मिळणारे उत्पन्न या कॉलमात व्याजापोटी मिळणार्‍या उत्पन्नाचा समावेश करायला हवा आणि नंतरच कलम 80 टीटीबीनुसार कपातीचा दावा करता येतो.

कर कपातीचे आकलन कसे करावे?

बचत व्याज: 5 हजार

मुदत ठेवीवरील व्याज: 2 लाख

अन्य उत्पन्न: दीड लाख रुपये

यानुसार एकूण उत्पन्न: 3,55,000