चित्रपट विम्याच्या अंतरंगात…

0
50

आजच्या अनिश्‍चिततेच्या काळात विमा ही एक अत्यावश्यक बाब बनली आहे. मग तो व्यक्तीचा विमा असो किंवा वाहन विमा असो. घर, कर्ज, कार्पोरेट कंपन्या आदीना विमा संरक्षण दिले जात आहे. एवढेच नाही तर विमान, बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांंचाही विमा उतरवला जात आहे. जेणेकरून दुर्दैवाने अपघात झाल्यास संबंधितांच्या नातेवाईकांना भरपाई मिळू शकेल. अशा स्थितीत अब्जावधींची उलाढाल असलेला चित्रपट उद्योग अपवाद कसा राहिल?

पूर्वी चित्रपट निर्मिती करताना विमा उतरवला जात नव्हता किंवा त्याची पद्धतही रुढ नव्हती. परंतु आजकालचे चित्रपट निर्मितीचे वाढलेले बजेट पाहता विमा उतरवणे ही निर्मात्यांसाठी गरजेची बाब बनलेली आहे. काही वर्षांपूर्वी टिपू सुलतान मालिकेची शुटिंग सुरू असताना सेटला अचानक आग लागली. त्यात निर्माते संजय खान यांचे कोट्यवधीचे रनुकसान झाले होते. अशा प्रकारच्या घटना नेहमीच होतील असे नाही, परंतु झाल्यास त्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी विम्याकडे निर्मात्याचा कल वाढला आहे. अप्रिय घटनांपासून होणारे नुकसान भरून येण्यासाठी विमा उतरवण्याचा आग्रह केला जात आहे. अनिल कपूर आणि ऐश्‍वर्या रॉय यांच्य ताल चित्रपटापासून भारतात चित्रपटांचा विमा उतरवण्याची प्रथा सुरू झाली. मात्र त्यानंतर दोन दशकाच्या कालखंडानंतर बाहुबली-2 चित्रपटाने विमा उतरवल्याचे निदर्शनास आले आहे. या चित्रपटाचा 200 कोटींचा विमा उतरवण्यात आला होता.

चित्रपट विमा हा चित्रपट निर्मितीशी झालेल्या नुकसानीसाठी कंपनीकडे कायदेशीर दावा करू शकतो. चित्रपट तयार करताना अनेक प्रकारची जोखीम पत्करावी लागते. शुटिंग सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत निर्मात्याचा जीव टांगणीला लागलेला असतो. इनडोअर-आउटडोअर शुटिंग व्यवस्थित पार पडेपर्यंत निर्मात्याच्या जीवात जीव नसतो. परदेशात शुटिंग करणे ही निर्मात्यासाठी सर्वाधिक जोखीम मानली जाते. कारण त्याठिकाणी करण्यात आलेली गुंतवणूक ही कोट्यवधीच्या घरात असते. अशा प्रकारच्या विम्याच्या हप्त्याची रक्कम ही कंपनीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असते. चित्रपटविम्याच्या संरक्षण कवचामध्ये कोणतकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव करायचा, यावर हप्त्याची रक्कम निश्‍चित होते. चित्रपटाच्या निर्मितीचा कालावधी किमान सहा महिने असतो. निर्मितीस्थळ हे एकाच ठिकाणी नसल्याने विविध शहरात, देशात शुटिंग केली जाते. यादरम्यान कधी कधी अप्रिय घटना होऊ शकतात. कलाकारांना दुखापत, सेटची हानी, शुटिंगच्या सामानाची ने आण करणार्‍या वाहनांचा अपघात, निर्मितीला चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या कर्मचार्‍यांचे संरक्षण आदींचा त्यात समावेश होतो.

कलाकारांचा विमा – चित्रपटात असंख्य पात्र काम करत असतात. मुख्य नायक, खलनायक, सहकलाकार, सहयोगी कलाकार आदी काम करत असतात. अशा स्थितीत एखाद्या कलाकाराचा अपघाती मृत्यू, शारिरीक इजा किंवा अपघात, गंभीर आजारपण उदभवल्यास विमा संरक्षणामुळे योग्य मोबदला मिळतो. शुटिंग सुरू असताना मग ती देशात असो किंवा परदेशात असो एखादी प्रॉपर्टी, सेट, वॉर्डरोब आणि साहित्याची हानी झाल्यास किंवा खराब झाल्यास विम्यातून भरपाई मिळू शकते. ङ्गिल्म निगेटिव्ह ः चित्रपटाची चित्रङ्गित किंवा साहित्याची हानी झाल्यास विमा संरक्षणामुळे त्याचा मोबदला चित्रपट निर्मिती करणार्‍या कंपनीला मिळतो.

निर्मितीनंतरचे संरक्षण – चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर चित्रङ्गित खराब झाल्यास किंवा हरवल्यास विमासंरक्षण मिळते. जोपर्यंत विम्याचा कालावधी असेल, तोपर्यंत निर्मात्याला विम्याचा लाभ मिळतो. अपघात, दुर्घटना, अपंगत्व: विम्याचा कालावधी असेपर्यंत शुटिंगदरम्यान अपघाती मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, जखमी यासारख्या घटना घडल्यास संबंधितांना नियमानुसार भरपाई मिळते.