आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र- चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

इ) केस केसांमध्ये दोन-तीन पांढर्‍या बटा हीच तारुण्यावस्थेतून चाळिशी आल्याची खूण दाखवते. चाळिशीमध्ये डोक्यावरील केस पातळ, रूक्ष, कोरडे व काही प्रमाणात पांढरे दिसू लागतात. डोक्यावरील केस थोडे मागे जाऊन कपाळ मोठे दिसू लागते. आठवड्यातून दोन वेळेला शिकेकाईने केस धुवावेत. केस धुण्याआधी ब्राह्मी, माका, जास्वंदी, शंखपुष्पी, आवळा, हिरडा, बेहडा यांनीयुक्त तेलाने मसाज करावा. केस धुण्यापूर्वी कोमट टॉवल केसांभोवती गुंडाळावा. महिन्यातून एकदा हर्बल मेंहदी लावावी. पंचकर्मातील शिरोभ्यंग, शिरोधारा हे उपक्रम म हिन्यातून एकदा करावेत. आहारामध्ये लोणचे व पापड मसाल्याचे पदार्थ पूर्णपणे टाळून सकस आहार घ्यावा.

7) नियमित व्यायाम करावा – तारुण्य टिकवण्यासाठी जशी योग्य आहाराची गरज असते तसेच शरीर व मन स्वास्थ्यासाठी व्यायामाची गरज पडते. आजच्या काळात स्त्री नोकरीनिमित्त बाहेर पडते. त्यामुळे तिचा मानसिक ताणतणाव वाढलेला आहे. बरीचशी कामे यंत्राच्या किंवा मोलकरणीच्या साहाय्याने केली जातात. घरातील कामे करताना जी उठबस होते ती आताच्या काळात होत नाही. स्नायूचा वापर न झाल्यामुळे स्नायू शिथील होतात. त्यांच्यातील लवचीकता कमी होते. त्यामुळे गुडघेदुखी, मानदुखी व कंबरदुखी, अति वजन वाढणे हे आजार उद्भवतात. म्हणूनच शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, प्राणवायूचा जास्तीत जास्त पुरवठा शरीराला होण्यासाठी तसेच शरीरातील विषद्रव्ये धामाद्वारे बाहेर टाकण्यासाठी व्यायामाची गरज असते. योगासने, अनुलोमविलोम, प्राणायाम, ओंकार गुंजन, दीर्घ श्वसन यांची साधना रोज करावी. हे शक्य झाले नाही तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी 45 मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम करावा. व्यायाम केल्यामुळे वजन नियंत्रणात राहून शरीराचा आकार प्राकृत राहतो. शरीरातील रक्तप्रवाह सुधारल्याने नव्या त्वचापेशींची निर्मिती होते. सर्व सांध्यांमध्ये लवचीकपणा निर्माण होतो. एकूणच शरीराची कार्यक्षमता वाढते. चाळिशीनंतरचे उच्च रक्तदाब, मधुमेह हे सर्व आजार अति वजन वाढल्याने हे आजार होऊ नयेत याकरिता व्यायाम करावा. 8) प्रदूषण आणि व्यसनांपासून दूर राहा – सिगारेटचा धूर, वाहनांमधून येणारा धूर, कारखान्यांम धून बाहेर पडणारा धूर, कीटकनाशकांची फवारणी केलेल्या भाज्या व फळे, रासायनिक खतांवर तयार केलेली पिके अशा अनेक मार्गांनी प्रदूषण आपल्यापर्यंत पोहोचत असते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

आंतरिक बल (भाग – 1)-मन एक रेडीयो स्टेशन है

प्रत्येक मनुष्य के पास एक ऐसी शक्ति है जिससे कि वह अपने आसपास होने वाली चीजों का अंदाजा लगा सकता है। लोग इस शक्ति का इस्तेमाल करते रहते हैं परंतु इसे समझ नहीं पाते। किसी स्नेही व्यक्ति को जब कभी हम याद कर रहे होते हैं तो उसी समय उसका फोन आ जाता है। बच्चे को कहीं कुछ होता है तो माता तड़फने लगती है। कई बार आखिरी समय पर यात्रा का प्रोग्राम रद्द कर देते हैं और दुर्घटना से बच जाते हैं। यह सब छठी इन्द्रिय के कारण होता है। इसे छठी चेतना भी कहते हैं। मनुष्य अपनी छठी चेतना से अपने आसपास या आगे घटित होने वाली चीजों का पता लगा लेता है। लोगों से आने वाली खुशबू से उसके व्यक्तित्व का आंकलन कर लेते हैं। किसी व्यक्ति से पहली बार मिलने पर उसके बारे अंदाजा लगाते हैं। कि यह अच्छा व बुरा है। यह सब हम छठी इन्द्रिय के कारण उससे निकल रही खुशबू से लगाते हैं। कई अंधे लोग फोटो से सही से अंदाजा लगा सकते हैं। एक शोध में उदासी और खुशी के क्षणों की फोटो का एक अंधे व्यक्ति ने बिल्कुल सही आंकलन कर लिया। यह कला आज भी दिमाग में बनी है। कितना भी ज्यादा अंधेरा हो या रात का समय हो, अपना हाथ सामने आते ही आदमी उसे पहचान लेता है। घुप अंधेरे में रोटी का टुकड़ा उठाने के बाद सीधा मुँह में जाता है। इधर-उधर नहीं गिरता और यह सब उसकी छठी इन्द्रिय का ही कमाल होता है।

कपाल के नीचे प्रत्येक मनुष्य के मुँह के अंदर तालू में एक छोटा सा छेद है। इस छेद को ब्रह्मरंध्र कहते हैं। यही से एक नाड़ी जिसे सुषमना कहते हैं, रीढ़ की हड्डी से होती हुए आखिरी शक्ति केन्द्र मूल आधार तक अर्थात् रीढ़ के आखिरी मनके तक जाती है। यहीं से इडा और पिंगला नाम की दो नाड़ियां भी रीढ़ की हड्डी से होती हुई आखिरी मनके तक जाती हैं। बायें तरफ के नाक से जो सांस लेते हैं उसे इडा नाड़ी कहते हैं। दायें तरफ के नाक से जो सांस लेते हैं उसे पिंगला नाड़ी कहते हैं। सुषमना नाड़ी इन दोनों के बीच में होती है। एक नाक से बदलकर जब दूसरे नाक से सांस लेने लगते हैं तो थोड़ी देर दोनों नाक से सांस चलने लगता है। जब दोनों नाक से सांस ले रहे होते हैं तो उस समय सुषमना नाड़ी क्रियाशील रहती है। यह सुषमना नाड़ी सातों चक्रों और छठी इन्द्रिय का केन्द्र मानी जाती है। यहीं से सुषमना नाही सहस्त्रार चक्र से भी जुड़ी है। सहस्त्रार चक्र एक विशाल चक्र है जो ब्रह्मांड से जुड़ा हुआ है। सुषमना नाड़ी के जागृत होने से छठी इन्द्रिय जागृत हो जाती है। भक्ति मार्ग में प्राणायाम के अभ्यास से छठी इन्द्रिय को जागृत करते हैं, परंतु हम जितना-जितना ध्यान भृकुटी में ज्योति पर लगाते हैं उतना ही छठी इन्द्रिय अपने आप जागृत होती जाती है। दोनों नाकों के बीचों-बीच नाक के एक इंच आगे अगर बिंदू पर ध्यान लगाते हैं तब भी छठी इन्द्रिय जागृत होती रहती है। अगर मुख के अंदर तालू में जो छोटा सा छेद है वहॉं बिंदु प्रकाश को देखते रहे तब भी छी इन्द्रिय जल्दी जागृत हो जाती है। कोई भी ध्यान या साधना या अच्छी चीजों पर एकाग्रता करते हैं तो उसके प्रभाव से छठी इन्द्रिय अनजाने में जागृत होती रहती है। विश्व का प्रत्येक व्यक्ति कुछ-न-कुछ मात्रा में अंजाने में ही अपनी छठी इन्द्रिय को प्रयोग करता रहता है।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र-कर्म चक्र

मनुष्य बहुतेक पाप मनाच्या आधीन होऊन करतो. मग ते स्थूल असो की सुक्ष्म, सुक्ष्म पापांना संत क्षमा करण्यायोग्य दुर्बल मानतात. कारण ते परमात्म्याच्या दयेचे आणि प्रेमाचे जीवंत उदाहरण असतात. जोपर्यंत मनुष्यात अहंकार असतो तोपर्यंत तो निसर्गाचे नियम आणि त्यांच्या प्रभावापासून सुटू शकत नाही. परंतु कोणा संत सद्गुरूच्या इच्छेनुसार समर्पण केल्याने मनुष्य प्रभुच्या दये आणि प्रेमाच्या छत्रछायेखाली येतो. मानवाच्या घातक, अदृश्य रोगांमध्ये कर्म रोग सर्वात संक्रमिक आहे. आमचे कर्म मानवी पेशींम ध्ये पसरणार्‍या प्राणघातक आणि विषारी जंतूपेक्षा कितीतरी अधिक विध्वंसक आणि विनाशकारी आहेत. कर्म सर्व प्रथम तथाकथित समाज सुधारकांच्या विचारात आणि दृष्टीकोनात बदल घडवून आणतात आणि मग समाजात आपली पकड़ मजबूत करतात. त्यानंतर मनुष्याच्या दृष्टीकोन आणि स्वभावावर प्रभाव पाडून हळू हळू सवयीच्या रूपात मुळे खोलवर रूजवतात. या सवयी मनुष्याचा दुसरा बभाव बनतात म्हणून आपले वडिलधारे नेहमी वाईट संगत टाळण्याचा उत्तम सल्ला देत आले आहेत. ’चांगली संगत चांगल्याला आणि वाईट संगत वाईटाला जन्म देते’. अर्थातच व्यक्ती त्याच्या संगतीवरून ओळखली जाते. या सर्व अडचणींबरोबरच मनुष्याला आपल्या कुटूंबात जिथे तो वाढला आहे लहानाचा मोठा झाला आहे त्यांच्या कर्मफळांच्या परिणामांचा सुद्धा भागीदार व्हावे लागते. अतः सद्गुण व दुर्गुण, संस्कृती निर्माण करण्याकामी महत्त्वाची भुमिका बजावतात. दररोज आणि प्रत्येक क्षणी आम्ही आपल्या सभोवतालच्या पर्यावरणामधुन कर्म ग्रहण करत असतो. कर्माचा परिणाम टाळण्याचा एकमात्र उपाय म्हणजे आपण संतांना शरण जावून, प्रभु प्राप्तीच्या मार्गावर दृढतेने चालत रहावे, कारण संत परमात्म्याशी एकरूप असतात म्हणून ते कर्माच्या आवाक्याबाहेर असतात.

त्यांना कर्म बांधू शकत नाही. असे म्हटले जाते की, खर्‍या सद्गुरूच्या दरबारात कर्माचा हिशोब मागितला जात नाही. साधुची संगत केल्याने व्यक्ती चांगल्या मार्गाकडे वळते. परंतु मनुष्य संतांना शरण जाण्याऐवजी वाईटाकडे सहजपणे झुकतो. आमच्या सर्व दुर्गुणांचा नाश करण्यासाठी संतांची संगत खूप प्रभावशाली ठरते. संतांची बादशाहत इतकी विशाल आहे की मनुष्य त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. संत केवळ मनुष्याच्या भल्यासाठीच येत नाहीत तर ते सृष्टीच्या सर्व जीव, दृश्य – अदृश्य, चेतन अचेतन अशा सर्वांच्या भल्यासाठी जगात येतात. बिचार्‍या मनुष्याचा इथे कोणी खरा मित्र नाही. सत्व, रज आणि तम या तीन गुणांद्वारे त्याचे मन एखाद्या कपटी मित्रासारखे वागते आणि त्याच्याकडे असे पाहते जसे एखादे मांजर खूप आतुरतेने उंदराला पाहते. जे लोक मनाच्या इशार्‍यावर, सांगण्यावर चालतात ते त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांना खूप दुःख, पिडा व अडचणी सहन कराव्या लागतात. परंतु मन अशा लोकांकडे जाण्यास घाबरते, ज्यांच्यावर परमात्मा आपल्या संतांद्वारे, भक्तांद्वारे दया दृष्टी ठेवतो. प्रेमी भक्तांना विशेष सुट मिळत असते, त्यांच्यावर खास कृपा होते, दया होते. मन त्यांना कोणतीही अडचण निर्माण करण्याची हिंमत करत नाही, उलटपक्षी तो अशा लोकांना मदत करते, जसे एक छोटा कर्मचारी (शिपाई) मोठ्या ऑफिसरचे साहेबांचे म्हणणे ऐकतो. अग्निप्रमाणे मन जर आमचा नोकर बनून आज्ञेत राहिले तर खूपच चांगले असते परंतु आमचा मालक बनले तर फार वाईट घडते.

साध कै संगि नही कछु घाल ॥ दरसनु भेटत होत निहाल ॥

साधसंगि बिछुरत हरि मेला ॥ – आदिग्रंथ (गउड़ी म. 5, पृ. 272)

गुरू नानक देवजी खूप कळकळीने म्हणतात,

नानक कचड़िआ सिउ तोड़ि ढूंढि सजण संत पकिआ । एहि जीवंदे विछड़हि एड मुझिआ न जाही छोड़ि ॥

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

घरचा आहेर

तो महाकंजूष शेटजी शेजारी कोणी नाही, हे पाहून आपल्या तिजोरीतले पैसे मोजत होता. इतक्यात त्याचा पोपट पिंजर्‍यातून निसटून तेथे आला. त्यातील एक सोन्याची मोहोर चोचीत धरून त्याच खोलीतल्या कोनाड्यात दडवून ठेवू लागला. एकदा मोजलेले पैसे शेटजी पुन्हा मोजू लागला असता सोन्याची एक मोहोर कमी भरली. तेव्हा दुःखी होऊन उभा राहिला. समोर पाहतो, तर पोपट कोनाड्यात काहीतरी दडवीत असलेला दिसला. तेव्हा तो पोपटाला म्हणाला, ‘‘अरे चोरा तूच चोरलीस ना सोन्याची मोहोर. अरे पण तुला तिचा काही उपयोग तरी आहे का? उलट तुझ्या या चोरीबद्दल मी तुला चांगलीच शिक्षा मात्र करीन. जीवसुद्धा घेईन बघ.’’ हे ऐकून पोपट म्हणाला, ‘‘शेटजी उगीच संतापू नका. तुम्ही जे करता तेच मी केले. मी फक्त एक मोहोर लुबाडून दडवून ठेवली तर तुम्ही शिक्षा म्हणून माझा जीव घेईन म्हणता. मग तुम्ही या हजारो मोहोरा लुबाडून दडवून ठेवल्याबद्दल तुम्हाला कोणती जबर शिक्षा द्यावी हे सांगाल काय?’’ यावर शेटजीची दातखीळच बसली.

तात्पर्य – आपले दोष न पाहता दुसर्‍यांच्या दोषाला नावे ठेवणे हा काहींचा स्वभावच असतो.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- साप मनुष्याचा पाठलाग करतात का?

साप या प्राण्याविषयी समाजात खूप गैरसमज आहेत. की तो पाठलाग करतो का वगैरे वगैंरे ते दूर करण्याचा हा प्रयत्न… खरतरं असं नाही. उलट साप अतिशय भित्रा प्राणी असतो. त्याच्यापेक्षा 20 पट मोठ्या प्राण्याला तो नक्कीच घाबरेल. वास्तविक आपण सापाला जेवढं घाबरतो त्यापेक्षा तोच जास्त आपल्याला घाबरतो आणि पळतो. लपतो. तो आपल्याला तेव्हाच चावतो जेव्हा त्याला वाटत आपण त्याला इजा पोहोचवणार आहोत. खरतरं साप शांत पडून राहणारा प्राणी आहे. एकदे भक्ष झालं पकडून आणि ते खाऊन झालं की त्याच काम झालं. साप हालचाल पण करत नाही गरज नसतांना.. माणसाचा पाठलाग करणं दूरची गोष्ट आपण जसं ऐकतो तसं त्याला ऐकता येत नाही. सापाला पुर्ण आवाज ऐकायला येत नाही कारण त्याला कानच नसतात. साप प्राण्यांची हालचाल ते प्राणी चालल्यावर जे र्ींळलीरींळेपी होतात त्याने करतो. साप वाजवल्या जाणार्‍या पुंगीच्या आवाजावर न नाचता त्या पुंगीच्या आणि गारुड्याचा हालचालीवर इकडे तिकडे हालतो. कारण सापांना हालचाल अतिशय लवकर कळते. सापाची कोणाला लक्षात ठेवायची स्मरणशक्ती अजुनही विकसित व्हायची आहे. सापाला तिक्ष्ण स्मरणशक्ती नसतेच. मारणार्‍याला लक्षात ठेवण मग नंतर त्याला जाऊन मारणे ऐवढी स्मरणशक्ती तर नक्कीच त्याच्याकडे नसतो. सगळेच साप अंडे देत नाहीत. काही साप जिवंत पिल्लांना पण जन्म देतात. सापांना रंग आपले भक्ष आकर्षित करायला, नर-मादा सापांना विषयासाठी आकर्षित करायला, इतर प्राण्यांपासून गवतामध्ये दगडांमध्ये लपायला मिळालेला असतो. रंगाचा आणि ते किती विषारी आहेत यांच्याशी थेट असा संबंध नाही. मात्र चित्रपट व मालिकांमधून सापाविषयी अनेक गैरसमज पसरविले जातात.

हसा आणि शतायुषी व्हा!

आई  अरे राजू, आज उपवास आहे मी तुला साबुदाने आणायला सांगितले होते आणलेस का?

राजू  आई, तूच म्हणाली होतीस ना की, उपवासाच्या दिवशी साबुदाने चालतात!

म्हणून मी साबुदाने रस्त्यातच ठेउन आलो. आता ते मागुन चालत येतील.

सौंदर्य

लिंबूरस व आवळा पावडर एकत्र करून त्याचे मिश्रण केसांच्या मुळापर्यंत चोळावे. यामुळे केसगळती थांबते. केसांची चांगली वाढ होऊन केस काळे होतात. कडुलिंबाची पाने खाल्ल्यानेही केसांवर चांगला परिणाम होतो.

सल्ला

पनीर मऊ करण्यासाठी ते उकळत्या पाण्यात घालून नंतर फ्राय करा.

कार्यालयासाठी

ऑफिस किंवा दुकानात सकारात्मक उर्जेत वाढ करण्यासाठी, आपण बसतो तेव्हा पाठ भिंतीकडे असली पाहिजे. त्या भिंतीवर मोठ-मोठे पर्वत असलेले चित्र लावायला पाहिजे. टेबलावर क्रिस्टलचे पेपरवेट ठेवायला पाहिजे. घरात पूर्व दिशेस जास्त रिकामी जागा सोडावी. मुख्य दरवाजासमोर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे.

क्रिमी मँगो

साहित्य – गोडसर ताजा आंबा रस अर्धी वाटी, दूध अर्धी वाटी, फेसलेले क्रीम अर्धी वाटी, थोड्या आंबा फोडी व आईसिंग शुगर, दोन मोठे चमचे.

कृती – आंबा रस दूध एकत्रित मिसळून फेस येईपर्यंत चांगले घुसळून घ्या. फेसलेल्या क्रीममध्ये साखर टाकून फेसून एकजीव करा व आंबा रसात घाला. ढवळा. सर्व्ह करताना ग्लासामध्ये ओतून त्यात थोड्या आंबा फोडी टाका.