आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र- चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

0
51

इ) केस केसांमध्ये दोन-तीन पांढर्‍या बटा हीच तारुण्यावस्थेतून चाळिशी आल्याची खूण दाखवते. चाळिशीमध्ये डोक्यावरील केस पातळ, रूक्ष, कोरडे व काही प्रमाणात पांढरे दिसू लागतात. डोक्यावरील केस थोडे मागे जाऊन कपाळ मोठे दिसू लागते. आठवड्यातून दोन वेळेला शिकेकाईने केस धुवावेत. केस धुण्याआधी ब्राह्मी, माका, जास्वंदी, शंखपुष्पी, आवळा, हिरडा, बेहडा यांनीयुक्त तेलाने मसाज करावा. केस धुण्यापूर्वी कोमट टॉवल केसांभोवती गुंडाळावा. महिन्यातून एकदा हर्बल मेंहदी लावावी. पंचकर्मातील शिरोभ्यंग, शिरोधारा हे उपक्रम म हिन्यातून एकदा करावेत. आहारामध्ये लोणचे व पापड मसाल्याचे पदार्थ पूर्णपणे टाळून सकस आहार घ्यावा.

7) नियमित व्यायाम करावा – तारुण्य टिकवण्यासाठी जशी योग्य आहाराची गरज असते तसेच शरीर व मन स्वास्थ्यासाठी व्यायामाची गरज पडते. आजच्या काळात स्त्री नोकरीनिमित्त बाहेर पडते. त्यामुळे तिचा मानसिक ताणतणाव वाढलेला आहे. बरीचशी कामे यंत्राच्या किंवा मोलकरणीच्या साहाय्याने केली जातात. घरातील कामे करताना जी उठबस होते ती आताच्या काळात होत नाही. स्नायूचा वापर न झाल्यामुळे स्नायू शिथील होतात. त्यांच्यातील लवचीकता कमी होते. त्यामुळे गुडघेदुखी, मानदुखी व कंबरदुखी, अति वजन वाढणे हे आजार उद्भवतात. म्हणूनच शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, प्राणवायूचा जास्तीत जास्त पुरवठा शरीराला होण्यासाठी तसेच शरीरातील विषद्रव्ये धामाद्वारे बाहेर टाकण्यासाठी व्यायामाची गरज असते. योगासने, अनुलोमविलोम, प्राणायाम, ओंकार गुंजन, दीर्घ श्वसन यांची साधना रोज करावी. हे शक्य झाले नाही तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी 45 मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम करावा. व्यायाम केल्यामुळे वजन नियंत्रणात राहून शरीराचा आकार प्राकृत राहतो. शरीरातील रक्तप्रवाह सुधारल्याने नव्या त्वचापेशींची निर्मिती होते. सर्व सांध्यांमध्ये लवचीकपणा निर्माण होतो. एकूणच शरीराची कार्यक्षमता वाढते. चाळिशीनंतरचे उच्च रक्तदाब, मधुमेह हे सर्व आजार अति वजन वाढल्याने हे आजार होऊ नयेत याकरिता व्यायाम करावा. 8) प्रदूषण आणि व्यसनांपासून दूर राहा – सिगारेटचा धूर, वाहनांमधून येणारा धूर, कारखान्यांम धून बाहेर पडणारा धूर, कीटकनाशकांची फवारणी केलेल्या भाज्या व फळे, रासायनिक खतांवर तयार केलेली पिके अशा अनेक मार्गांनी प्रदूषण आपल्यापर्यंत पोहोचत असते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400