जीवन चक्र-कर्म चक्र

0
64

मनुष्य बहुतेक पाप मनाच्या आधीन होऊन करतो. मग ते स्थूल असो की सुक्ष्म, सुक्ष्म पापांना संत क्षमा करण्यायोग्य दुर्बल मानतात. कारण ते परमात्म्याच्या दयेचे आणि प्रेमाचे जीवंत उदाहरण असतात. जोपर्यंत मनुष्यात अहंकार असतो तोपर्यंत तो निसर्गाचे नियम आणि त्यांच्या प्रभावापासून सुटू शकत नाही. परंतु कोणा संत सद्गुरूच्या इच्छेनुसार समर्पण केल्याने मनुष्य प्रभुच्या दये आणि प्रेमाच्या छत्रछायेखाली येतो. मानवाच्या घातक, अदृश्य रोगांमध्ये कर्म रोग सर्वात संक्रमिक आहे. आमचे कर्म मानवी पेशींम ध्ये पसरणार्‍या प्राणघातक आणि विषारी जंतूपेक्षा कितीतरी अधिक विध्वंसक आणि विनाशकारी आहेत. कर्म सर्व प्रथम तथाकथित समाज सुधारकांच्या विचारात आणि दृष्टीकोनात बदल घडवून आणतात आणि मग समाजात आपली पकड़ मजबूत करतात. त्यानंतर मनुष्याच्या दृष्टीकोन आणि स्वभावावर प्रभाव पाडून हळू हळू सवयीच्या रूपात मुळे खोलवर रूजवतात. या सवयी मनुष्याचा दुसरा बभाव बनतात म्हणून आपले वडिलधारे नेहमी वाईट संगत टाळण्याचा उत्तम सल्ला देत आले आहेत. ’चांगली संगत चांगल्याला आणि वाईट संगत वाईटाला जन्म देते’. अर्थातच व्यक्ती त्याच्या संगतीवरून ओळखली जाते. या सर्व अडचणींबरोबरच मनुष्याला आपल्या कुटूंबात जिथे तो वाढला आहे लहानाचा मोठा झाला आहे त्यांच्या कर्मफळांच्या परिणामांचा सुद्धा भागीदार व्हावे लागते. अतः सद्गुण व दुर्गुण, संस्कृती निर्माण करण्याकामी महत्त्वाची भुमिका बजावतात. दररोज आणि प्रत्येक क्षणी आम्ही आपल्या सभोवतालच्या पर्यावरणामधुन कर्म ग्रहण करत असतो. कर्माचा परिणाम टाळण्याचा एकमात्र उपाय म्हणजे आपण संतांना शरण जावून, प्रभु प्राप्तीच्या मार्गावर दृढतेने चालत रहावे, कारण संत परमात्म्याशी एकरूप असतात म्हणून ते कर्माच्या आवाक्याबाहेर असतात.

त्यांना कर्म बांधू शकत नाही. असे म्हटले जाते की, खर्‍या सद्गुरूच्या दरबारात कर्माचा हिशोब मागितला जात नाही. साधुची संगत केल्याने व्यक्ती चांगल्या मार्गाकडे वळते. परंतु मनुष्य संतांना शरण जाण्याऐवजी वाईटाकडे सहजपणे झुकतो. आमच्या सर्व दुर्गुणांचा नाश करण्यासाठी संतांची संगत खूप प्रभावशाली ठरते. संतांची बादशाहत इतकी विशाल आहे की मनुष्य त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. संत केवळ मनुष्याच्या भल्यासाठीच येत नाहीत तर ते सृष्टीच्या सर्व जीव, दृश्य – अदृश्य, चेतन अचेतन अशा सर्वांच्या भल्यासाठी जगात येतात. बिचार्‍या मनुष्याचा इथे कोणी खरा मित्र नाही. सत्व, रज आणि तम या तीन गुणांद्वारे त्याचे मन एखाद्या कपटी मित्रासारखे वागते आणि त्याच्याकडे असे पाहते जसे एखादे मांजर खूप आतुरतेने उंदराला पाहते. जे लोक मनाच्या इशार्‍यावर, सांगण्यावर चालतात ते त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांना खूप दुःख, पिडा व अडचणी सहन कराव्या लागतात. परंतु मन अशा लोकांकडे जाण्यास घाबरते, ज्यांच्यावर परमात्मा आपल्या संतांद्वारे, भक्तांद्वारे दया दृष्टी ठेवतो. प्रेमी भक्तांना विशेष सुट मिळत असते, त्यांच्यावर खास कृपा होते, दया होते. मन त्यांना कोणतीही अडचण निर्माण करण्याची हिंमत करत नाही, उलटपक्षी तो अशा लोकांना मदत करते, जसे एक छोटा कर्मचारी (शिपाई) मोठ्या ऑफिसरचे साहेबांचे म्हणणे ऐकतो. अग्निप्रमाणे मन जर आमचा नोकर बनून आज्ञेत राहिले तर खूपच चांगले असते परंतु आमचा मालक बनले तर फार वाईट घडते.

साध कै संगि नही कछु घाल ॥ दरसनु भेटत होत निहाल ॥

साधसंगि बिछुरत हरि मेला ॥ – आदिग्रंथ (गउड़ी म. 5, पृ. 272)

गुरू नानक देवजी खूप कळकळीने म्हणतात,

नानक कचड़िआ सिउ तोड़ि ढूंढि सजण संत पकिआ । एहि जीवंदे विछड़हि एड मुझिआ न जाही छोड़ि ॥

(कृपाल आश्रम, अहमदनगर)