सोशल मीडियाच्या मोहजालापासून महिला व मुलींनी सावध व्हाव

परवीन शाह यांचे प्रतिपादन; अहमदनगर उर्दू हायस्कूल आणि मिसगर ज्युनियर कॉलेजमध्ये महिला दिन साजरा

नगर – सोशल मीडियाच्या मोहजालात महिला व मुली अडकत असल्याने त्यापासून गंभीर धोके निर्माण झाले आहेत.
अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. महिलांवर अन्याय, अत्याचाराचे घडलेले अनेक गुन्हे हे सोशल मीडियाच्या ओळखीतून झाले असल्याचे पुढे आले आहे. यासाठी मुलींनी सोशल  मीडियापासून लांब राहण्याचे व सावधानता बाळगण्याचे परवीन बशीर शाह यांनी सांगितले.  शहरातील अहमदनगर उर्दू हायस्कूल
आणि मिसगर ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. सोशल मीडियापासून महिला आणि
मुलींना निर्माण झालेल्या धोयाबद्दल सांगून, समाजात सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तर महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख  पाहुण्या म्हणून महिला पोलिस परवीन बशीर शाह, शबनम आलेमा, जेबा शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका रुमाना खान, ऐम इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका नाजनीन शेख, उर्दू हायस्कूलचे प्र. मुख्याध्यापक मुनव्वर खान उपस्थित होते. शबनम आलेमा यांनी प्रत्येक समाजात
थोर महिला होऊन गेल्या असून, त्यांचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल करण्याची गरज आहे. हजरत आयशा (रझि), बीबी
फातेमा (रझि) आणि बीबी मरियम (अलै.) यांनी महिलांना धर्माचे योग्य आचरण सांगून, आदर्श जीवन पध्दती सांगितली आहे. त्यांचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले.
जेबा शेख यांनी मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून भवितव्य घडविताना करिअरच्या विविध वाटांची माहिती दिली.  महिला दिन  महिला सशक्तिकरण, शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, वेतन, मानधन, राजकारण, विज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये समानतेसाठी आवाज उठवण्याचा दिवस असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमात नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित शाळांमधील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त रेहान काझी, इनाम खान, वाजिद खान, इफ्तेखार खान यांनी सर्व उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम
घेतले. सूत्रसंचालन नौशीन खान यांनी केले. आभार फिरदोस खान यांनी मानले.

अहिल्यानगर महापालिका क्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात यावे

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे विनायक देशमुख यांची मागणी

नगर – अहिल्यानगर महापालिका क्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी कौशल्य विकास समितीचे सदस्य व भाजपचे विनायक देशमुख यांनी नूतन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली. डॉ. पंकज आशिया यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री. देशमुख यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना
शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. देशमुख यांनी डॉ. आशिया यांच्याशी प्रामुख्याने जिल्ह्यातील एकल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाबाबत चर्चा केली.
यावेळी श्री. देशमुख म्हणाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकल (विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या)
महिलांचे सर्वेक्षण झाले असून ही संख्या ९६००० पेक्षा जास्त आहे. अद्याप अहिल्यानगर महापालिका क्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण बाकी असून हे तातडीने होणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा श्री. देशमुख यांनी डॉ. आशिया यांचे कडे व्यक्त केली. यासंदर्भात लवकरात लवकर सर्व संबंधितांची बैठक बोलावण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले. यावेळी आशिष येरेकर व महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे हे उपस्थित होते.

आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांना आरोग्यासाठी आधार

परेश बोगावत यांचे प्रतिपादन; मोफत बालरोग तपासणी शिबिराला प्रतिसाद

नगर – सर्वसामान्यांना आधार ठरलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटीलचा देशातभरात  नावलौकिक आहे. हॉस्पिटल मध्ये गरजू रुग्णांना माफक दरात वैद्यकिय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरवर्षी विविध शिबीराच्या माध्यमातून हजारो
रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे काम जैन सोशल फेडरेशन, डॉटर्स व कर्मचारी सेवाभावी वृत्तीने करत आहेत. सकारात्मक उर्जा देण्याचे काम हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे, असे मत परेश बोगावत यांनी व्यक्त केले.
जैन सोशल फेडरेशन संचिलत श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा.यांच्या ३३ व्या पुण्यस्मृतीनिमित्त बालरोग तपासणी शिबीराचे उद्घाटन परेश बोगावत, संतोष बोगावत, सुनिल बोगावत, अरुणा बोगावत,  प्रणय बोगावत, सुजाता  गावत, पुजा बोगावत, पंकज गांधी, प्रकाश गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी संतोष बोथरा, माणकचंद कटारिया, सतिष लोढा, सुभाष मुनोत, डॉ. आशिष भंडारी, तज्ञ डॉ.रुपेश सिकची, डॉ.सोनाली कनसे,
डॉ.वैभवी वंजारे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सौ. सुजाता बोगावत म्हणाल्या की, आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या शिकवणीनुसार
गोर गरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा या विचाराने हॉस्पिटल चांगल्या प्रकारचे उपचार देण्याचे कार्य करत आहेत. महाराष्ट्रात
आनंदऋषीजी हॉस्पिटलचा चांगला नावलौकीक असून येथील विश्वस्त मंडळ व स्टाफ उत्तमरितीने रुग्णांना सेवा देण्याचे कार्य  करत आहे. त्यांच्या या कार्यात आम्हाला योगदान देण्याची संधी मिळत आहे. हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
कार्यक्रमाचे सुत्रसंचान डॉ.अशिष भंडारी यांनी केले तर आभार सतिष लोढा यांनी मानले. या बालरोग शिबीरात १११ बालकांची तपासणी करण्यात आली.

उपचार फक्त शारीरिक आजारांना बरे करण्यासाठी नव्हे तर मन व आत्म्याला देखील समाधानी करणारे असाव

डॉटर मिलग्रीड बोरगस यांचे प्रतिपादन; केडगावात रंगला महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, ब्राझील मधून आलेल्या परदेशी पाहुण्याची उपस्थिती

नगर – होमिओपॅथी, अनेकदा म्हणतो की योग्य उपाय, जेव्हा योग्यरित्या लिहून दिला जातो, तेव्हा तो रुग्णाला सौम्य आणि उत्साही पद्धतीने गुण देऊ शकतो, बरे होईपर्यंत आवश्यक बदल रुग्णात आणू शकतो. बरे वाटण्यासाठी तुम्हाला कधी-कधी उपचाराची देखील आवश्यकता नसते. फक्त वातावरणातील बदल तुम्हाला वेगळे समाधान देऊन जाते. परदेशी लोकांसाठी हे आश्चर्यकारक आणि औषधीपूर्ण आहे. इतर देशातून नागरिक भारतात होमिओपॅथी, आयुर्वेद व योग शिकण्यासाठी येतात. मी तुमच्या शहरात डॉ. लंके यांच्याकडे होमिओपॅथी शिकण्यासाठी आले आहे. उपचार फक्त शारीरिक आजारांना बरे करण्यासाठी नव्हे, तर मन आणि आत्म्याला देखील समाधानी करणारे असावे. यासाठी होमिओपॅथी प्रभावी असल्याचे डॉ. मिलग्रीड बोरगस म्हणाल्या. केडगाव येथील कायनेटिक कॉलनीतील गणेश मंदिर परिसरात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आपले कलागुण सादर केले. श्रद्धा रानडे, सुलभा भोसले व सविता मुळे यांच्या पुढाकाराने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ब्राझीलमधून  आलेल्या होमिओपॅथी डॉटर मिलग्रीड बोरगस विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रमोद लंके व रक्षा लंके यांच्यासह स्मीता मराठे, स्मिता घोडके, डॉ. शिल्पा इनमुलवार, सुनीता पाटेकर, साधना डागा,
स्नेहा भोसले, सारीका अकोलकर, सुचीता धामणे, स्वाती कुलट, शैला दहिफळे, बेबी काळे, शकुंतला पवळ, सान्वी इनमुलवार आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या.
प्रारंभी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात महिलांनी गीत, भजन, गवळण, लावणी आदींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मीता मराठे यांनी केले. स्मीता घोडके यांनी आभार मानले.

आडसूळ पॉलिटेनिकच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय यश

नगर – चास येथील सौ.सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेनिक महाविद्यालयातील. विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन आणि प्रोजेट स्पर्धेत सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय इनोव्हिजन २०२५ या स्पर्धेचे
आयोजन एस पी आय टी कुरुंद पॉलिटेनिक पारनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेत विविध पॉलिटेनिक महाविद्यालयां मधून विद्यार्थी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. सौ.सुंदराबाई माणिक आडसूळ पॉलिटेनिक कॉलेजच्या स्थापत्य विभागातील तृतीय वर्षात शिकणार्‍या प्रतिक्षा शशिकांत चोरमागे हिने स्मार्ट पॅव्हमेंट या विषयावर उत्कृष्ट  सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला आणि संगणक विभागातील द्वितीय वर्षात शिकणारे सर्वेश मिलिंद कदम, भोजने गायत्री आणि भावसार पायल यांनी ए.आय कंट्रोल प्रोग्राम या विषयावरती सादरीकरण करून कन्सुलेटेड बक्षीस मिळवले. दृष्टिकोन व नाविन्यपूर्ण माहिती त्यांनी सादर केली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले ज्ञान व संशोधन क्षमता
सादर करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना पोस्टर बनवण्यासाठी सर्व प्राध्यापकांनी विशेष प्रयत्न केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध आडसूळ, सेक्रेटरी सौ. लीना आडसूळ, खजिनदार परमेश्वर आडसूळ, संचालक कृष्णा आडसूळ, डॉ. प्रदीप पाटील व डॉ. संभाजी पठारे, प्राचार्य रमेश गडाख, प्राचार्य डॉ. धनंजय लांडगे व डॉ. संदेश
वायाळ आणि डॉ. पंडित प्रदीप, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विजेते व सहभागी विद्यार्थ्यांसाठी अभिनंदनाचा वर्षाव आनंदाचा वर्षाव करून त्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

२४ तास व ३६५ दिवस डॉटरांची अविरत सेवा

नगर – धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय व्यवसाय करीत असताना डॉटर्स २४ तास ३६५ दिवस वैद्यकीय सेवा देत असतात. या कार्यात महिला डॉटरांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. महिला डॉटरांच्या कार्याची दखल घेऊन सावेडी डॉटर असोसिएशनने केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. रूपाली नेमाने यांनी केले आहे.  सावेडी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावेडी डॉटर असोसिएशन व प्रिसिजन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर शहरातील २२ महिला डॉटरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.रूपाली नेमाने, डॉ.सुशील नेमाने, सावेडी डॉटर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भगवान कराळे, सचिव डॉ.नितीन झावरे, खजिनदार डॉ.सुरेंद्र खन्ना, होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.रणजीत सत्रे आदींच्या हस्ते महिला डॉटरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला व पुरुष डॉटरांकरिता उत्तम आरोग्यासाठी झुंबा डान्स चे आयोजन करण्यात आले होते. मानसी आडेप यांनी झुम्बा डान्स चे प्रात्यक्षिक करून दाखविले.
सन्मान झालेल्या महिला डॉटरांची नावे पुढील प्रमाणे- डॉ. संजीवनी कराळे, डॉ.योगिता सत्रे, डॉ.अलका घुगे, डॉ.कल्पना ठुबे, डॉ.श्वेता भापकर, डॉ.रश्मी कुलथे, डॉ.ज्योती तांबे, डॉ.मीनाक्षी हरिश्चंद्रे, डॉ.वैशाली महांडुळे, डॉ.पूनम भोजने, डॉ.माधुरी कुलकर्णी, डॉ.पुनम अनुभुले, डॉ.वैशाली राठोड, डॉ.तृप्ती कोठुळे, डॉ.शलाका राऊत, डॉ.दिपाली ढाकणे, डॉ.शिल्पा गायकवाड, डॉ.परिणीता झावरे, डॉ.स्नेहलता खराडे, डॉ.वर्षा सायकड, डॉ.अंजली शिंदे, डॉ. अर्चना सुरपुरीया आदींचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. रणजीत सत्रे यांनी केले. सूत्रसंचालन कु. रचना सत्रे हिने केले. तर आभार डॉ.सुरेंद्र खन्ना यांनी मानले.

स्त्री ही सृष्टीची जननी आहे तिचा सन्मान हा समाजाचा सन्मान

डॉ. राजीव चिटगोपेकर यांचे प्रतिपादन; महिला दिनानिमित्त प्रकाश नेत्रालयात नेत्र तपासणी शिबिरात महिलांचा सन्मान

नगर- प्रत्येक महिला समाजाचा आधारस्तंभ आहे. तिच्या सन्मानाशिवाय समाजाची प्रगती शय नाही. म्हणून प्रत्येकाने महिलांचा सन्मान करावा आणि त्यांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावे. काबाडकष्ट
करून कुटुंबाची जबाबदारी संभाळत असताना स्वतःच्या आरोग्याकडे  मात्र ती दुर्लक्ष करते. महिलांच्या आरोग्य विषयी जनजागृती महत्त्वाची आहे. स्त्री ही सृष्टीची जननी आहे. तिचा सन्मान हा समाजाचा सन्मान असल्याचे प्रतिपादन नेत्र तज्ञ डॉ. राजीव चिटगोपेकर यांनी केले. नगर मनमाड रोडवरील प्रकाश नेत्रालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. राजीव चिटगोपेकर यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करून मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये शंभर महिलांची नेत्र  तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. याप्रसंगी शगुप्ता शेख, अशोक तोरडमल, बाबासाहेब मोहिते आदींसह महिला उपस्थित होत्या. पुढे बोलताना डॉ. चिटगोपेकर म्हणाले की महिला ह्या कुटुंबाचा कणा आहेत. त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी. डोळ्यांची निगा राखण्यासाठी आहारामध्ये हिरवे पालेभाज्यांचा प्रमाण वाढवावे. विविध फळे आणि भाज्यांचा समावेश असावा, विशेषतः गडद पिवळ्या
आणि हिरव्या पालेभाज्या, ज्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन ए असते – निरोगी दृष्टी राखण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे. तुमचे डोळे तुमच्या सभोवतालच्या वस्तू पाहण्यासाठी आणि जाणवण्यासाठी दिवसरात्र काम करतात. त्यांनाही पुरेशी विश्रांतीची आवश्यकता असते. म्हणूनच, पुरेशी झोप घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. मोबाईलचा अतिवापर टाळावा असे ते म्हणाले.

केडगाव ते घोसपुरी रस्त्याची मोठमोठे खड्डे पडून झालीयं प्रचंड दुरावस्था; बुजविण्याचे काम अर्ध्यातच पडले बंद, तीव्र आंदोलनाचा नागरिकांचा इशारा

नगर – वाहनांची अतिशय वर्दळ असलेल्या केडगाव ते सोनेवाडी, अकोळनेर, सारोळा कासार ते घोसपुरी या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले मात्र ठेकेदाराने ते अर्धवट सोडले असल्याने परिसरातील अनेक गावांतील नागरिकांचे प्रचंड हाल
होत आहेत. या रस्त्याची येत्या ७ दिवसात दुरुस्ती न केल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा परिसरातील
नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. केडगाव घोसपुरी रस्त्यावर सोनेवाडी बायपास चौकापासून पुढे थेट घोसपुरीपर्यंत ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना
मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांचे पार्ट आणि वाहनचालकांची हाडे अक्षरश: खिळखिळे होत आहेत. मात्र या
रस्त्याच्या दुरावस्थेकडे सर्वच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर सोनेवाडी, अकोळनेर भोरवाडी, जाधव वाडी, सारोळा कासार, घोसपुरी, अस्तगाव आदी गावांतील नागरिक प्रवास करत असतात.
याशिवाय अकोळनेर येथील इंडियन ऑईल व भारत पेट्रोलियम या दोन कंपन्यांमधून दररोज शेकडो इंधन टँकरची ये-जा सुरु असते. याशिवाय खडी वाहतूक करणारे ढंपरही दररोज रात्रंदिवस धावत असतात. या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. त्याचा या परिसरातील गावांमधील नागरिकांना प्रचंड
मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या ४-५ वर्षात या रस्त्याच्या दुर्दशेकडे बांधकाम विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी कायमच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे अर्धवट स्थितीत बंद पडलेले काम तातडीने सुरु करून किमान मोठमोठे खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुतार यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ७ दिवसांत काम मार्गी लागले नाही तर परिसरातील विविध गावांमधील नागरिक रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी पंचायत
समिती सभापती रामदास भोर, विलास शेडाळे, विठ्ठल हंडोरे, राहुल जाधव, जीवन हजारे, अमोल वाव्हळ, प्रदीप झरेकर, नाना गाढवे, सोमनाथ मेहेत्रे आदींनी दिला आहे.

बदललेली जीवनशैली व तणावपूर्ण जीवनामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात

डॉ.सोनाली वहाडणे यांचे प्रतिपादन; आरोग्याचा जागर करुन महिला दिन साजरा, स्तन आणि सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण टाळण्यासाठी महिलांना मार्गदर्शन

नगर – बदलली जीवनशैली व तणावपूर्ण जीवना मुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे स्तन
आणि सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण महिलांमध्ये झपाट्याने वाढत आहे. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी आनंदी राहून नियमीत व्यायामाची गरज आहे. महिलांनी विशेषत: वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याकडे लक्ष द्यावे. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर महिलांमध्ये होणारे हार्मोन्स बदल हे आरोग्याशी निगडीत आहे. यासाठी महिलांना
आपल्यामध्ये होणारे बदल देखील ज्ञात असले पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी योग्य आहाराबरोबर झोप महत्त्वाची असल्याचे डॉ. सोनाली वहाडणे यांनी सांगितले. तर दिवसाची सुरुवात आनंदी पणाने करा, योग्य आहार, व्यायाम, तणावमुक्तीबद्दल मार्गदर्शन केले. ९ ते ४५ वयोगटातील महिलांना अँटी कॅन्सर व्हॅसीन घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने आरोग्याचा जागर करुन महिला दिन साजरा करण्यात आला. चाळीशीनंतर महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करुन महिलांना निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. महिलांमध्ये वाढत्या स्तन आणि सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण टाळण्यासाठी जागृती करण्यात आली. या कार्यक्रम
ासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सोनाली वहाडणे यांच्यासह माउंट लीटरा झी स्कूलच्या प्राचार्या शैलजा लोटके, विद्या कचरे, सुजाता कदम, एकता कदम, सुरेखा भोसले, सुशीला त्रिमुखे, सुरेखा चेमटे, जयाताई गायकवाड, प्रयासच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, विद्या बडवे, सोनी पुरनाळे, अर्चना बोरुडे, सुरेखा जंगम, अरुणा गोयल, अलका वाघ, सुनीता काळे, श्रद्धा उपाध्ये, सविता गांधी, हेमा पडोळे, प्रिया आठरे, अ‍ॅड. दीपिका दंडवते, शकुंतला जाधव,
हिरा शहापुरे, आरती थोरात, आशा गायकवाड, उषा सोनी, लीला अग्रवाल, नीलिमा पवार, रेखा मैड, उषा सोनटक्के, रेखा फिरोदिया, अ‍ॅड. ज्योत्सना कुलकर्णी, मेघना मुनोत आदींसह ग्रुपच्या सदस्या उपस्थित होत्या. प्रास्ताविकात अलका मुंदडा यांनी मागील अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरण व महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने ग्रुपच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
प्राचार्या शैलजा लोटके यांनी भावी सक्षम पिढी घडविताना महिलांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट केले. महिलांच्या विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा रंगल्या होत्या. विजेत्या महिलांना बक्षीसे देण्यात आली. दीपा मालू यांनी विविध खेळ घेतले. अश्विनी सावंत यांनी सर्व महिलांना आकर्षक पध्दतीने मोफत नेल आर्ट करून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार विद्या बडवे यांनी मानले.

 

सारडा महाविद्यालयातील ‘रॅम्प वॉक’ वर थिरकली विद्यार्थिनी व प्राध्यापकांची पावले

छबीदार छबी मी तोर्‍यात उभी…., देसी गर्ल… गाण्यांवर धरला ठेका

नगर – फुग्यांची कमान व सजावट, रंगीबेरंगी लाईट्स, आई व महिलांची महिमा सांगणारे गाणे व पोवाडा अशा अनोख्या वातावरणात पेमराज सारडा महाविद्यालयात विद्यार्थिनींनी महिला दिन साजरा केला. यानिमित्त आयोजित सोहळ्यात
विद्यार्थिनींसह महिला प्राध्यापकांनीही सहभाग घेत कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये नृत्य, गायन, पोवाडा तसेच लाठीकाठी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच रॅम्प वॉकवर विद्यार्थिनिंसह प्राध्यापीकांची थीरकली
पावले हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. कायम अभ्यासाच्या ताणतणावात असलेल्या विद्यार्थिनी मात्र महिला दिनाच्या या कार्यक्रमात अगदी मनमोकळ्या पणे सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित
विद्यार्थी व प्राध्यापकांनी भरभरून दाद दिली. यात भारतीय व वेस्टर्न परंपरेचे पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थिनींची पावले रॅम्प वॉकवर थीरकली. रॅम्प वॉक मध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांच्यासह महिला प्रध्यापीकांनाही सहभागी होण्याचा मोह आवरला नसल्याने त्यांनीही आनंद घेतला.
प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित म्हणाल्या, महाविद्यालयातील वातवरण अत्यंत खेळीमेळीचे असते. त्यामुळे विद्यार्थिनी सर्व उपक्रमांमध्ये मनमोकळेपणाने सहभागी होतात. महिला दिन हा सर्व स्त्रीशक्तीसाठी महत्वाचा दिवस आहे. या
दिवसांचा अनोखा आनंद आज सर्वाना घेता आला आहे.
कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सत्यजित पाटील, प्रा.ओमकार भिंगारदिवे, प्रा. प्रसाद बेडेकर यांनी केले. यावेळी क्रांती बोरुडे हिने महिलांचा महिमेचा पोवाडा सादर केला. फरीन सय्यद, महिमा सोनार, कोयल चौधरी व सुहास गेरेंगे यांनी नवे जुने उत्कृष्ट गाणे सादर केले तर उत्कर्षा दगडे हिने पारंपारिक नृत्य सादर केले.