परेश बोगावत यांचे प्रतिपादन; मोफत बालरोग तपासणी शिबिराला प्रतिसाद
नगर – सर्वसामान्यांना आधार ठरलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटीलचा देशातभरात नावलौकिक आहे. हॉस्पिटल मध्ये गरजू रुग्णांना माफक दरात वैद्यकिय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरवर्षी विविध शिबीराच्या माध्यमातून हजारो
रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे काम जैन सोशल फेडरेशन, डॉटर्स व कर्मचारी सेवाभावी वृत्तीने करत आहेत. सकारात्मक उर्जा देण्याचे काम हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे, असे मत परेश बोगावत यांनी व्यक्त केले.
जैन सोशल फेडरेशन संचिलत श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा.यांच्या ३३ व्या पुण्यस्मृतीनिमित्त बालरोग तपासणी शिबीराचे उद्घाटन परेश बोगावत, संतोष बोगावत, सुनिल बोगावत, अरुणा बोगावत, प्रणय बोगावत, सुजाता गावत, पुजा बोगावत, पंकज गांधी, प्रकाश गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी संतोष बोथरा, माणकचंद कटारिया, सतिष लोढा, सुभाष मुनोत, डॉ. आशिष भंडारी, तज्ञ डॉ.रुपेश सिकची, डॉ.सोनाली कनसे,
डॉ.वैभवी वंजारे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सौ. सुजाता बोगावत म्हणाल्या की, आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या शिकवणीनुसार
गोर गरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा या विचाराने हॉस्पिटल चांगल्या प्रकारचे उपचार देण्याचे कार्य करत आहेत. महाराष्ट्रात
आनंदऋषीजी हॉस्पिटलचा चांगला नावलौकीक असून येथील विश्वस्त मंडळ व स्टाफ उत्तमरितीने रुग्णांना सेवा देण्याचे कार्य करत आहे. त्यांच्या या कार्यात आम्हाला योगदान देण्याची संधी मिळत आहे. हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
कार्यक्रमाचे सुत्रसंचान डॉ.अशिष भंडारी यांनी केले तर आभार सतिष लोढा यांनी मानले. या बालरोग शिबीरात १११ बालकांची तपासणी करण्यात आली.