१५ देशात कार्य करणार्या शांतीदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव यांच्या
वाढदिवसानिमित्त त्यांचा व शांतीदूत परिवाराचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल
जाधव यांचा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने युनिटी हॉस्पिटल, औंध येथे झालेल्या
कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी बी के शीतल दीदी, बी के अश्विनी दीदी, बी के डॉ. दीपक हरके व
कुस्ती संघटक व कुस्ती पंच पहिलवान विजयराव नखाते यांच्यासह शांतीदूत परिवाराच्या सौ. तृषालीताई जाधव,
डॉ. प्रीती दिलीप काळे, सौ. आरती घुले, सौ. मोनिका भोजकर, सौ. रोहिणी कोळेकर, सौ. विजया नागटिळक,
सौ. सीमा ठुबे, विजय ठुबे, सुरेश सकपाळ, मधू चौधरी, महेश पाटील, प्रा. इंद्रजीत भोसले, तानाजी भोसले,
तानाजी राठोड, संदीप जाधव, रमेश तांबाळे, मोहन बागमार, महेंद्र जूनवाने, राजेंद्र सोनार यांच्या सह शांतीदूत
परिवाराचे सदस्य उपस्थित होते
शांतीदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव यांचा ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे सत्कार
दोन कुळांचा उध्दार करणारी नारी सर्वश्रेष्ठ
नगर – आनंदधाम – राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी म सा हे अद्वितीय महापुरुष १९ व्या शतकात होऊन गेले. सर्व भक्तांच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान असलेले आचार्य भगवंत नेहमीच माता हुलसाच्या आठवणीने भावुक होऊन.
आई विषयी असलेले कृतज्ञतेचे भाव ते व्यक्त करत असत. ८ मार्च हा महिलांचा गोडवा गाणारा, नारी शक्ति ची महिमा
वर्णन करणारा दिवस| आनंदधाम येथे आनंद व्याख्यान माला अंतर्गत साध्वी श्री पुनीतदर्शनाजी म सा, यांनी सांगितले कि, आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगति करत आहे. स्त्री शक्ति ची अनुभूति ही राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, कल्पना चावला, किरण बेदी, मदर तेरेसा यांच्या रुपाने दुनिये समोर आहे. परंतु घर – परिवार – समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्त्रियांनी ४ बाजू सांभाळून घेणे आवश्यक आहे. बेअरिंग म्हणजे सहनशीलता वाढविली पाहिजे.
केअरिंग – घर – परिवारातील नात्यांची काळजी घेतली पाहिजे. शेअरिंग – आपल्या सद् भावना, सद् गुण सर्वांना वाटणे, म्हणजे शेअरिंग आहे. तर डेअरिंग करणे आवश्यक आहे कारण आपल्यात हिम्मत असेल तर आपली किम्मत वाढते. संस्कार दिवाकर श्री आलोकऋषिजी म सा नी आपल्या सुंदर मार्मिक प्रवचनातून नारी जाति करिता संदेश दिला. स्त्री फक्त अन्नदाता व जन्मदाता नसून जीवनदाता पण आहे. घर – समाजाच्या मर्यादेत राहून कार्य करणे, हा नारीचा आदर्श आहे. नारी शक्ति सेवा, स्नेह, समता, संस्कारांची सुंदर प्रतिमा आहे. माता हे स्त्री चे सर्वात उदात्त रुप आहे. फक्त फॅशनमध्ये, पार्ट्यांमधे महिलांनी आपला वेळ निरर्थक घालवू नये, तुलना करु नये व आपला आत्मविश्वास वाढवावा, या
तीन गोष्टी स्त्रियांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म सा, यांनी आपल्या उद् बोधनात सांगितले कि, दोन कुळांचा उध्दार करणारी नारी सर्वश्रेष्ठ आहे. तीर्थंकर भगवान सुध्दा स्त्री च्या कुक्षी मध्ये जन्म घेतात. महिलांनी आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. पूर्वी मुलाचा जन्म झाल्यावर आनंद
साजरा केला जात होता. तर मुलगी झाल्यावर दुःखी होत असत. परंतु आता बदल झाला आहे. मुलापेक्षा
मुलगी ही गुणवान मानली जाते. दीपक प्रमाणे ती दोन परिवारांचे नाव रोशन करते. महिला दिवसाचे औचित्य
साधून श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंन्स चतुर्थ झोन प्रांतीय महिला शाखेच्या वतीने वीरमातांचा सम्मान करण्यात आला. ज्या मातांनी आपल्या मुलींना किंवा मुलांना जिनशासन च्या सेवेत अर्पण केले आहे, त्यांच्या त्यागाचा
सपर्पणाचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म सा, यांचे लाडके शिष्य डॉ. श्री आलोकऋषिजी म सा यांना गुरु सेवेत अर्पण करणारी माता श्रीमती सुशिलाबाई अशोक बाफना तसेच श्री आराधनाजी म सांच्या आई श्रीमती कमलबाई बन्सीलाल मुनोत, श्री सुविज्ञाजी म सा व श्री भारवीजी म सा, या साध्वीजींच्या आई सौ. प्रतिभा नवनीत गांधी,
श्री श्रेयलश्रीजी म सा च्या आई सौ. त्रिवेणी संतोष बोरा यांचा सत्कार करण्यात आला. दररोज सकाळी ९ ते १० पर्यंत होत असलेल्या सुंदर मार्मिक प्रवचनांचा लाभ श्रावक – श्राविकांनी घ्यावा, असे श्री वर्धमान स्था. जैन श्रावक संघ व श्री तिलोकरत्न जैन स्था. धार्मिक परीक्षा बोर्डच्यावतीने करण्यात आले आहे.
विधानमंडळ संसदीय ऑनलाईन प्रणालीत अहमदनगरऐवजी अहिल्यानगर नाव करा
विधानमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांची मागणी
नगर – महाराष्ट्र विधानमंडळ संसदीय ऑनलाईन प्रणालित बदल करून जिल्ह्याचे व शहराचे नाव अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करावे. या बदलासाठी संबंधित अधिकार्यांना आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन आ.संग्राम जगताप यांनी विधानमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विधानभवनात दिले. यावेळी आ.विठ्ठल लंघे व आ.अमोल खताळ उपस्थित होते.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्यापूर्वी अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतर ’अहिल्यानगर’ करण्यात आले आहे. त्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिल्यानंतर
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र शासनाने राजपत्रित
अधिसूचना प्रसिद्ध करून अधिकृतरीत्या शहर व जिल्ह्याचे नाव ’अहिल्यानगर’ असे निश्चित केले आहे.
मात्र, अद्याप महाराष्ट्र विधानमंडळाच्या संसदीय ऑनलाईन प्रणालीत शहराचे व जिल्ह्याचे नाव अहमदनगर असेच दर्शवले जात आहे.
शासनाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, हे नामांतर झाले असल्याने आपल्या कामकाजात अहिल्यानगर असे अद्ययावत करणे आवश्यक आहे. तरी या बाबत तातडीने संबधित अधिकार्यांना आदेश द्यावेत
विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणार्या महिलांचा यशस्विनी पुरस्काराने सन्मान
ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क वेलफेअर असोसिएशन ट्रस्टचा उपक्रम
नगर – विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटावनार्या महिलांना यशस्वीनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगरच्या ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क वेलफेअर असोसिएशन ट्रस्ट व कमला
आयुर्वेद हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानेच्या या कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले. शहरात ब्राम्हण समाजातील
अनेक महिलांनी स्वबळावर उद्योग व व्यवसायासह विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. अशा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, न्यायव्यवस्था, राजकीय क्षेत्रातील २० महिलांचा विविध क्षेत्रातील यशस्वी व ज्येष्ठ महिलांच्या हस्ते यशस्विनी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय आयुर्वेद आणि जीवनशैलीवर या विषयावर डॉ. अंशू मुळे यांचे व्याख्यानही झाले.
या सन्मान सोहळ्यात राष्ट्रीय खेळाडू कु. गार्गी मोहोळे, बाल कीर्तनकार कु.रेणुका निसळ, जया देशपांडे, स्वाती देशमुख, डॉ.प्रीती भोंबे, डॉ. रेणुका जोशी, मोहिनी कुलकर्णी, अॅड.बागेश्री जरंडीकर, प्रांजली जागीरदार, वर्षा जोशी, सुचिता देवचके, भूपाली निसळ, अपर्णा बालटे, स्वाती रानडे, प्रिया जानवे, अॅड. प्रज्ञा हेंद्रे जोशी, रेणुका करंदीकर, केतकी जोगदे, जुई मुळे व धनश्री कुलकर्णी आदी महिलांना यशस्वीनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख
पाहुण्या डॉ.विद्या जोशी, उषा देशमुख, मानसी मुळे, प्रा. सविता काळे, प्रियेशा कुलकर्णी, स्नेहा रानडे, पद्मजा धोपावकर, धनश्री खरवंडीकर, अश्विनी भालेराव, डॉ. अंशू मुळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमात डॉ.अंशू मुळे यांनी आयुर्वेदातील
आदर्श जीवनशैली बाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, सध्याच्या सोशल मिडीया, फास्टफूडच्या काळात व्यायामाचा अभाव वाढत आहे. जठराग्नी मंदावला जात असल्याने मोठ्याप्रमाणात आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अकाली मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. हे टाळण्यासाठी दररोज सर्वांनी स्वतःच्या शरीरासाठी व मनासाठी थोडावेळ द्यावाच. आपल्या
पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेद शास्त्राचा शोध लावला आहे. आयुर्वेदात सांगितलेली आदर्शवत जीवनशैली
आपण सोडून परकीयांचे अनुकरण करत आहोत. हे अनुकरण आपल्यासाठी धोकादायक आहे, असे सांगून आदर्श जीवनशैली बाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक धनश्री कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन अपूर्वा काळे व शिल्पा सोमणी यांनी केले. आभार आसावरी नातू यांनी मानले. यावेळी ट्रस्टचे चिन्मय सुखटणकर, डॉ. महेश मुळे, ऋषिकेश धर्माधिकारी, अनिरुद्ध देवचक्के, संदीप भापकर, धनश्री कुलकर्णी, हेमंत लोहगावकर, निखिल कुलकर्णी, अमित काळे, रमा मोडक, दीप्ती चांदेकर कोअर कमिटी सदस्य मिलिंद कुलकर्णी, शैलेश राजगुरू, उमेश भालेराव, श्रीपाद पुणतांबेकर व अमित परंडकर आदी उपस्थित होत
नगर शहरात १५ मार्च रोजी ‘दिल की कलम से’ कार्यक्रम
नगर – नगरकरांसाठी १५ मार्च ‘दिल की क़लम से’ ही सांगितिक मेजवाणी मिळणार आहे. सन १९५० पासून ते आजपर्यंतच्या निवडक गितांचे सादरीकरण नगरचा युवा गायक गिरीराज जाधव करणार आहे. प्रत्येक दशकानंतर भारतीय संगीतात झालेल्या बदलांची माहितीही या वेळी रसिकांना दिली जाणार आहे. केडगाव परिसरातील ऊर्जा रंगभवन येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. ‘दिल की कलम से’ या गितांच्या कार्यक्रमात गिरीराज जाधव यांना
प्रसिद्ध कलाकारांची साथ लाभणार आहे. तबला वादक सार्थक डावरे, कीबोर्डिस्ट नरेंद्र साळवे, नाशिक येथील बासरीवादक सुधीर सोनवणे, तबला-ढोलक वादक ललित भूमकर हे कार्यक्रमात साथसंगत करतील. कार्यक्रमाचें निवेदन मुंबई येथील कवयित्री सिद्धी ढोके करतील. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ९१५६५३७५६५, ८३०८४९९३०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारीत मोठी वाढ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आला ऐरणीवर
बंद पोलीस चौया कार्यान्वित करून गस्त वाढविण्याची पोलिस अधिक्षकांकडे मागणी
नगर – अहिल्यानगर शहर व परीसरामध्ये रोजच नवनवीन गुन्ह्याच्या घटना पाहता शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, शहरातील नागरीकांम ध्ये असुरक्षिततेची भावना आहे. रोजच चेन स्नॅचिंग, घरफोडी, टोळीयुध्द, लुटमार, दमदाटी असे गुन्हे घडत असल्याने पोलिस यंत्रणेकडून ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
शहरातील बंद असलेल्या पोलीस चौया पुन्हा कार्यान्वित करून गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या कडे करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष
इंजि. केतन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस अधिक्षक ओला यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी चर्चा करताना त्यांनी सांगितले की, शहर परिसरात दररोज कुठे ना कुठे चेन स्नॅचिंग, चोर्या, घरफोड्या, रस्त्यात अडवून टमार, ताबेमारी, धमकावणे, हाणामारी, घातक शस्रांनी प्राणघातक हल्ले अशा घटना वाढत आहेत. शहर परिसरात मोठ्या
प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याने त्यातून या गुन्हेगारांमध्ये टोळी युद्ध ही होत आहेत. रोजच नवनवीन गुन्ह्याच्या घटना पाहता शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, शहरातील नागरीकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण
झाली आहे. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत असल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसरलेले असून त्यांना घराबाहेर पडावे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेने अधिक दक्ष होत ही वाढती गुन्हेगारी मोडून काढण्याची गरज आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शहर व परिसरात पोलिस गस्त वाढविण्यात यावी. तसेच बंद असलेल्या पोलीस चौया पुन्हा नव्याने कार्यान्वित करण्यात याव्यात असे या निवेदनात म्हंटले आहे.
तसेच उपनगरी भागात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असल्याने तपोवन रोड वर नव्याने पोलीस चौकी उभारण्यात यावी, तसेच गुलमोहोर रोडवरील चौकी पुन्हा कार्यान्वित करावी. गुन्हेगारांना कडक शासन करावे व गुन्हेगारी संपुष्टात आणावी. जेणेकरुन नागरिकांमधील पोलीसांबद्दल विश्वास वाढेल. असेही या निवेदनात म्हंटले आहे.
देयके लवकरात लवकर मिळण्याच्या मागणीसाठी ठेकेदारांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
नगर – महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, हॉट मिस असोसिएशन व ऑल इंडिया कॉन्ट्रॅटर वेल्फेअर असोसिएशन या संघटनेच्या वतीने कंत्राटदार ठेकेदारांचे देयके देण्याच्या
मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निदर्शन करण्यात आले व निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य अभियंता संघटनेचे विभागीय अध्यक्ष इंजि. समीर अमीन शेख, बिल्डर असिएशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष दीपक दरे, ऑल इंडिया कॉन्ट्रॅटर वेल्फेअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष इंजि. जुनेद शेख, महेश गुंदेचा, किरण पागिरे, रेपाळे, संदीप भगत, हर्षद भोरडे, अक्षय कराड, गणेश श्रीराम, मिलिंद बोगाणे, वैष्णव मिसाळ, फैयाज शेख, रंजीत फलके, अविनाश ओहोळ, अर्षद शेख, सोमनाथ शिंदे, अभिजीत बुधवंत, भागवत दाभाडे, राहुल राख आदीसह कंत्राटदार उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सुबे अभियंता छोटे-मोठे कंत्राटदार यांनी विविध लेखा शीर्षकाखाली अनेक केलेल्या कामाचे देयके अनेक महिन्यापासून मिळत नसून आता समोर मार्च महिना जवळ आला आहे यासाठी या विषयावर निर्णय होणे आवश्यक असून अन्यथा राज्यातील ३ लक्ष कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणारे करोडो घटक आर्थिक अडचणीत सापडतील तसेच राज्यातील
सर्व विभागाकडील विकासाची कामे विशेष निधीची कामे एका व्यक्तीला काम मिळावे यासाठी छोट्या-मोठ्या कामाचे
मुंबई हायकोर्टाच्या न्यायालयीन निर्णयाच्या विरोधात जाऊन व शासनाच्या निर्णय विरोधात जाऊन सदर कामाचे एकत्रिकरण
करीत आहे. यामुळे छोटे-मोठे कंत्राटदार अक्षरशः देशोधडीला लागत आहे व त्यांचे व्यवसाय बंद
होत आहे व राज्यातील निघणारे कामे शासन निर्णयानुसार ३३% कामे सुंबे अभियंता ३३% मजूर संस्था ३४% कामे ओपन कंत्राटदार यांना देणे बंधनकारक असताना सगळीकडे सदर सरसकट ग्रामपंचायत यांना देऊन १.५ कोटीच्या आतील कामांना नियमबाह्य अटी घातल्या जात आहे हे तातडीने बंद करावे व कंत्राटदार शासकीय काम करीत असताना सदर कामावर त्यांना जीवे मारणे, गावातील व शहरातील गावगुंडांचा त्रास होत आहे. यासाठी पत्रकार, अधिकारी, डॉटर याप्रमाणे कंत्राटदारी यास सुद्धा संरक्षण कायदा लागू करावा व सदर शासनाचे काम हे करीत असताना कंत्राटदार यास अधिकारी यांच्या अरेरावी, दमबाजी त्रास होतो तसेच साईडवर कंत्राटदार यांनी केलेल्या कामाचे देयके लवकर लिहिली जात
नाही. जाणीवपूर्वक वेळ काढला जातो यावर आता अंकुश राहणे आवश्यक असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता यांना १.५ कोटीचे नोंदणीकरण आहे परंतु ग्रामविकास विभागाने सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना फक्त ५० लक्षचे नोंदणीकरण दिले आहे. यामध्ये आता वाढ होऊन सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमाणे १.५ कोटीचे नोंदणीकरण घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘महावीर इंटरनॅशनल महिला विभागाच्या’वतीने आनंदऋषीजी नेत्रालयाला आरओ मशीनची भेट
नगर – महावीर इंटरनॅशनल अहिल्यानगरच्या महिला विभागाच्या वतीने आनंदऋषीजी नेत्रालयातील रुग्णांच्या सोयीसाठी अद्यावत आरओ जलशुद्धीकरण मशीन देण्यात आले. महिला दिनानिमित्त झालेल्या या लोकार्पण सोहळ्यात नेत्राल यातील महिला कर्मचार्यांचा सत्कारही करण्यात आला. ज्येष्ठ महिला श्रीमती सरला शेटिया, श्रीमती कलावतीबाई संचेती,
शकुंतला बाफ़ना व सुमनबाई कर्नावट यांच्या हस्ते मशीन देण्यात आले. यावेळी महिला विभागाच्या अध्यक्षा वैशाली शेटिया, सेक्रेटरी वर्षा बाफना, अर्पणा बोथरा, सुरेखा पारख, सुरेखा संचेती, सुनिता कर्नावट, अरुणा सुराना, उज्वला बोथरा, सजनबाई कटारिया, सरला बरमेचा आदींसह वीर व युवा विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. वैशाली शेटिया म्हणाल्या,
आपण समाजाचे काहीतरी देण लागतो या भावनेने महावीर इंटरनॅशनल अहिल्यानगरमध्ये काम करत आहे. समाजाभिमुख
उपक्रमातून विविध संस्थांना मदत करत आहोत. माजी अध्यक्ष मनोज शेटिया यांनी आनंदऋषीजी नेत्रालय या मानवतेच्या मंदिरात आम्हाला सेवेची संधी देऊन जागतिक महिला दिनाच्या येथील महिला कर्मचार्यांना शुभेच्छा देता आल्याबद्दल सर्वांचे
आभार मानले. यावेळी नेत्र रूग्णालयाचे प्रमुख डॉ.आनंद छाजेड यांनी नेत्र रूग्णालयातील सेवांची माहिती दिली व नेत्र रूग्णालयाला आरओ प्युरिफायरचा होणारा फायदेशीर वापर सांगितला.
अहिल्यानगर येथील आयकॉन पब्लिक स्कूलची आंतरशालेय विज्ञान स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
नगर – आयकॉन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आंतरशालेय विज्ञान स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी – अंडी उबविण्यासाठी आर्द्रता आणि तापमानाचे निरीक्षण आणि देखभाल करण्यासाठी डिझाइन केलेले अर्डुइनोय्आधारित इनयूबेटरला दुसरे पारितोषिक मिळाले. संकटात सापडलेल्या प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवण्याच्या उद्देशाने, विद्यार्थ्यांनी वन्यजीव संवर्धनातील तंत्रज्ञानाची क्षमता प्रदर्शित करून पूर्णपणे कार्यक्षम प्रोटोटाइप इनयूबेटर तयार केले. त्यांच्या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण राष्ट्रीय विज्ञान दिनी आले, जेव्हा ३० पैकी २९ अंडी यशस्वीरित्या उबली. ज्याने त्यांच्या डिझाइनची प्रभावीता सिद्ध केली. विजयाचा क्षण पूर्व- प्राथमिक ते वरिष्ठांपर्यंत सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी साक्षीदार केला, ज्यामुळे तो सर्वांसाठी एक प्रेरणादायी आणि शैक्षणिक अनुभव बनला. शाळेला या
कामगिरीचा अभिमान आहे, त्यांच्या तरुण नवोन्मेषकांच्या समर्पण आणि वैज्ञानिक भावनेचे कौतुक आह
लायन्स लब ऑफ अहमदनगर प्राईडच्यावतीने आयोजित मोफत होमिओपॅथी, दंत व नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद
नगर – लायन्स लब ऑफ अहमदनगर प्राईडच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मोफत होमिओपॅथी तपासणी तसेच मोफत दंत व नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद मिळाला. बुरूडगाव रोडवरील अहिंसा चौक, ईगल प्राईड
येथील नमो होमिओपॅथी लिनिक येथे शिबिर झाले. यात अनेकांनी रक्तदान करून महिला दिन साजरा केला.
होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. दीपाली भळगट, दंतरोग तज्ज्ञ डॉ. अरूण सांगळे, नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल चौधरी यांनी रूग्ण तपासणी
उपचार व मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. मुस्कान तलरेजा, डॉ. नेहा जाजू, डॉ. प्रिया भालसिंग, डॉ. रूपल माचवे, डॉ. पूर्वा
ढाकेफळकर, डॉ. सोनम मुथियान, डॉ. राजश्री वर्मा, डॉ. संजीवनी जरे, डॉ. प्रज्ञा कराळे, डॉ. प्रियंका म्हसे, डॉ. शिल्पा इंमुलवार, डॉ. प्राजक्ता झावरे, डॉ. सिमरनकौर वधवा आदींसह लायन्स लबचे हरिष हरवानी, हरजितसिंग वधवा, प्रोजेट चेअरमन समिक्षा खंडेलवाल, लायन्स लब ऑफ अहमदनगर प्राईडचे अध्यक्ष अनिकेत आवारे, सेक्रेटरी अक्षत झालानी, खजिनदार अक्षय तोडमल, सनी वधवा, अभिजीत भळगट, रोहन खंडेलवाल, रवी तुमनपल्ली, रितिका तोडमल आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी महिला डॉटरांचा विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी महिला दिनाच्या शुभेच्छा
देत सर्वांसाठी आरोग्य शिबिर घेण्याच्या लायन्स प्राईडच्या उपक्रमाचे कौतुक केले. शिबिरांचा १५० हून अधिक रूग्णांनी लाभ घेतला.












