नगर – धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय व्यवसाय करीत असताना डॉटर्स २४ तास ३६५ दिवस वैद्यकीय सेवा देत असतात. या कार्यात महिला डॉटरांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. महिला डॉटरांच्या कार्याची दखल घेऊन सावेडी डॉटर असोसिएशनने केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. रूपाली नेमाने यांनी केले आहे. सावेडी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावेडी डॉटर असोसिएशन व प्रिसिजन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर शहरातील २२ महिला डॉटरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.रूपाली नेमाने, डॉ.सुशील नेमाने, सावेडी डॉटर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भगवान कराळे, सचिव डॉ.नितीन झावरे, खजिनदार डॉ.सुरेंद्र खन्ना, होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.रणजीत सत्रे आदींच्या हस्ते महिला डॉटरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला व पुरुष डॉटरांकरिता उत्तम आरोग्यासाठी झुंबा डान्स चे आयोजन करण्यात आले होते. मानसी आडेप यांनी झुम्बा डान्स चे प्रात्यक्षिक करून दाखविले.
सन्मान झालेल्या महिला डॉटरांची नावे पुढील प्रमाणे- डॉ. संजीवनी कराळे, डॉ.योगिता सत्रे, डॉ.अलका घुगे, डॉ.कल्पना ठुबे, डॉ.श्वेता भापकर, डॉ.रश्मी कुलथे, डॉ.ज्योती तांबे, डॉ.मीनाक्षी हरिश्चंद्रे, डॉ.वैशाली महांडुळे, डॉ.पूनम भोजने, डॉ.माधुरी कुलकर्णी, डॉ.पुनम अनुभुले, डॉ.वैशाली राठोड, डॉ.तृप्ती कोठुळे, डॉ.शलाका राऊत, डॉ.दिपाली ढाकणे, डॉ.शिल्पा गायकवाड, डॉ.परिणीता झावरे, डॉ.स्नेहलता खराडे, डॉ.वर्षा सायकड, डॉ.अंजली शिंदे, डॉ. अर्चना सुरपुरीया आदींचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. रणजीत सत्रे यांनी केले. सूत्रसंचालन कु. रचना सत्रे हिने केले. तर आभार डॉ.सुरेंद्र खन्ना यांनी मानले.