सारडा महाविद्यालयातील ‘रॅम्प वॉक’ वर थिरकली विद्यार्थिनी व प्राध्यापकांची पावले

0
27

छबीदार छबी मी तोर्‍यात उभी…., देसी गर्ल… गाण्यांवर धरला ठेका

नगर – फुग्यांची कमान व सजावट, रंगीबेरंगी लाईट्स, आई व महिलांची महिमा सांगणारे गाणे व पोवाडा अशा अनोख्या वातावरणात पेमराज सारडा महाविद्यालयात विद्यार्थिनींनी महिला दिन साजरा केला. यानिमित्त आयोजित सोहळ्यात
विद्यार्थिनींसह महिला प्राध्यापकांनीही सहभाग घेत कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये नृत्य, गायन, पोवाडा तसेच लाठीकाठी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच रॅम्प वॉकवर विद्यार्थिनिंसह प्राध्यापीकांची थीरकली
पावले हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. कायम अभ्यासाच्या ताणतणावात असलेल्या विद्यार्थिनी मात्र महिला दिनाच्या या कार्यक्रमात अगदी मनमोकळ्या पणे सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित
विद्यार्थी व प्राध्यापकांनी भरभरून दाद दिली. यात भारतीय व वेस्टर्न परंपरेचे पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थिनींची पावले रॅम्प वॉकवर थीरकली. रॅम्प वॉक मध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांच्यासह महिला प्रध्यापीकांनाही सहभागी होण्याचा मोह आवरला नसल्याने त्यांनीही आनंद घेतला.
प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित म्हणाल्या, महाविद्यालयातील वातवरण अत्यंत खेळीमेळीचे असते. त्यामुळे विद्यार्थिनी सर्व उपक्रमांमध्ये मनमोकळेपणाने सहभागी होतात. महिला दिन हा सर्व स्त्रीशक्तीसाठी महत्वाचा दिवस आहे. या
दिवसांचा अनोखा आनंद आज सर्वाना घेता आला आहे.
कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सत्यजित पाटील, प्रा.ओमकार भिंगारदिवे, प्रा. प्रसाद बेडेकर यांनी केले. यावेळी क्रांती बोरुडे हिने महिलांचा महिमेचा पोवाडा सादर केला. फरीन सय्यद, महिमा सोनार, कोयल चौधरी व सुहास गेरेंगे यांनी नवे जुने उत्कृष्ट गाणे सादर केले तर उत्कर्षा दगडे हिने पारंपारिक नृत्य सादर केले.