अर्थजगत

जूनमध्ये भारताच्या घाऊक महागाईत सलग तिसर्‍या महिन्यात मोठा दिलासा दिला आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताचा घाऊक महागाई दर जूनमध्ये वार्षिक आधारावर उणे 4.12 टक्क्यांपर्यंत खाली आला, तर मे महिन्यात तो उणे 3.48 टक्के होता. भारताचा घाऊक महागाई दर 8 वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे. मासिक आधारावर जूनमध्ये घाऊक महागाई दर 0.40 टक्क्यांनी घसरला. जूनमध्ये घाऊक महागाई दरात घसरण मुख्यत्वे खनिज तेल, अन्न उत्पादने, मूलभूत धातू, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि कापड यांच्या किमती कमी झाल्यामुळे झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये तो 16.23 टक्के होता.अन्न निर्देशांकातील घाऊक महागाई जूनमध्ये वर्षभराच्या तुलनेत 1.24 टक्क्यांनी घसरली, जी महिन्यापूर्वी 1.59 टक्क्यांनी घसरली होती. जूनमध्ये प्राथमिक वस्तूंची महागाई 2.87 टक्क्यांवर आली.

आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र आरोग्यपूर्ण म्हातारपण

सुनंदामावशी 60 वर्षांच्या आहेत. शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. आयुष्यभर नोकरी व घर जबाबदारीने सांभाळले. आता या वयात त्यांना दोन सुना आल्या. परंतु तरीही घरातील प्रत्येक काम स्वतःच करण्याचा प्रयत्न करत असत. सुनेने केलेले काम त्यांना पटत नसे. एके दिवशी माळ्यावरील पापड्यांचा डबा काढायला त्या खुर्चीवर उभ्या राहिल्या. खुर्ची अचानक कलंडल्यामुळे खाली पडल्या. त्यांच्या मांडीच्या हाडाला फ्रेंक्चर झाले. कमरेतील तीन मणके सरकले. त्यानंतर हॉस्पिटलम ध्ये संपूर्ण एक महिना ऍडमिट राहावे लागले. वर्षभर घरी आराम करावा लागला. या काळात त्यांना दुसर्‍यावरच अवलंबून राहावे लागले. आता त्या सुनेने केलेला स्वयंपाक व मोलकरणीने केलेले काम या आधारावरच जीवन जगत आहेत. खरे तर सुनंदामावशींना या वयात माळ्यावरून डबा काढण्याची गरजच नव्हती. या वयामध्ये काम आपल्याला झेपेल का, याचा विचार करायला हवा होता. कारण काम करण्याचा उत्साह तारुण्यावस्थेप्रमाणेच असला तरी वाढत्या वयानुसार शरीरातील पेशींची, स्नायूंची कार्यक्षमता कमीकमी होत जाते. हाडे पोकळ होतात. त्यामुळे छोट्याशा अपघातानही हाड फ्रेंक्चर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे इतरांच्या सहकार्याने सर्वांशी प्रेमाने वागून वृद्धांनी आपली दिनचर्या आचरणात आणावी. या वयात शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मासिक पाळी बंद झाल्यामुळे कॅल्शिअम कमी होऊन हाडे ठिसूळ होतात. सांधे ढिले पडतात. पेशीचे आरोग्य खालावून त्याची वाढ मंद गतीने होते. एकूणच सर्व अवयवांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी त्वचेवर सुरकुत्या दिसतात. डोक्यावरील केस विरळ व पांढरे होतात. कमी दिसते, मोतीबिंदू होतो. कंबरदुखी, गुडघेदुखी बळावते. बरेचसे दात पडतात, कमी ऐकू येते, हात व पाय थरथर कापतात.

या शारीरिक लक्षणांबरोबरच मानसिक लक्षणेही दिसू लागतात. कारण मेंदूची कार्यक्षमता कमी होते. परिणामी विस्मरण होते. स्वयंपाकघरात आपण कशासाठी गेलो किंवा फ्रीज कशासाठी उघडला हे बर्‍याचशा स्त्रियांना आठवत नाही. सतत उदास वाटणे, छोट्याशा कारणांवरून चिडचिड होणे, उगीचच रहायला येणे, एकाकी वाटणे, झोप कमी लागणे, स्वतःचेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करणे, हेकेखोर वृत्ती वाढणे असे मानसिक बदलही होतात. या सर्व कारणांमुळे घरातील तरुण पिढी वृद्ध व्यक्तीकडे दुर्लक्ष करू लागते. हेकेखोर वृत्तीमुळे व चिडचिडीमुळे तरुण पिढी दूर राहण्याचा प्रयत्न करते. दोन पिढ्यांमधील प्रेमाचा व आपुलकीचा संवाद कमी व्हायला लागतो. त्यामुळे वृद्धांनी मनम ोकळी मनोवृत्ती ठेवून नवीन पिढीशी जुळवून घ्यायला हवे. नवीन पिढीनेही वृद्धांचा आदर करायला हवा. यामुळे आपोआपच घरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. सर्व जण एकमेकांची काळजी घेतात. गृहस्थाश्रमाची जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवून या वयात स्त्रियांनी सत्संगाचा मार्ग स्वीकारावा.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

आंतरिक बल (भाग – 1)-मन एक रेडीयो स्टेशन है

छठी इन्द्रिय जागृत होने पर पूर्वाभास की क्षम ता बढ़ जाती है। भविष्य की घटनाओं को जाना जा सकता है। दस वर्ष बाद आपकी सेहत कैसी होगी आपके बच्चे क्या काम-धंधा कर रहे होंगे। दस वर्ष बाद देश कहॉं होगा। देश का प्रधानमंत्री कौन होगा। इस तरह जिन चीजों से आपका जीवन प्रभावित होता है उनके बारे मनन करते रहा करो। इससे आपकी छठी इन्द्रिय की क्षमता का विकास होगा। छठी इन्द्रिय जागृत होने पर मीलों दूर बैठे व्यक्ति की बातें सुन सकते हैं। किसके मन में क्या विचार चल रहा है यह पता चल जाता है। आपके स्नेही व्यक्ति जो अलग-अलग शहरों में रहते हैं उनको मन में देखकर उन्हें सुनने की कोशिश करो वह क्या सोच रहे हैं। क्या बोल रहे हैं। आपके शहर का मेयर या डिप्टी कमिश्नर, आपका सांसद, विधायक क्या सोच रहा है। आपके राज्य का मुख्यमंत्री क्या सोच रहा है। उसे सुनने की कोशिश करो। उन्हें अच्छे कार्य करने की प्रेरणा दो। इससे आपकी छठी इन्द्रिय में निखार आयेगा। व्यक्ति से कुछ भी छिपा नहीं रहता। पूर्वाभास एक होशो-हवाश में आया विचार या भावना है जिसे हम देखने के साथ महसूस भी कर सकते हैं। घटित होने वाली बात से बचने के लिये प्रेरित करती है। दुनिया के एक तिहाई लोगों की इन्द्रिय काफी सक्रिय होती हैं परंतु उसे कोई मान्यता नहीं है, सिर्फ लोग अनजाने में ही करते रहते हैं। जब बच्चे घर से बाहर जाते हैं तो उन्हें बहनें कहती रहती हैं, सीधे आना सीधे जाना, बस की खिड़की पर खड़े मत होना। छठी इन्द्रिय जागृत कर प्रत्येक मनुष्य दूसरे के मन की बात जान सकता है। आपके विरोधी को एक निश्चित समय पर मन से सुना करो वह क्या कर रहा है। प्राचीन ऋषि इसी का प्रयोग करके दूसरे के मन की बात जानकर मन-ही-मन समाचार लिया दिया करते थे। एक निर्धारित समय पर मन से सुना करो आप की शिक्षक क्या सोच रही है। सूरज भाई, गीता बहन, आत्म भाई और दूसरे अनन्य रत्न क्या सोच रहे हैं। अंतरिक्ष में जाने वाले लोगों को इस विद्या में प्रशिक्षित किया जाता है। जब आपके क्षेत्र से कोई हवाई जहाज, हेलीकॉप्टर गुजरता है मन से उनसे सम्पर्क किया करो और देखो वह क्या सोच रहे हैं। उन्हें प्रणाम करो। हवाई जहाज में कोई दिक्कत हो जाये तो पायलट मन के द्वारा अपने संदेश को धरती पर अपने नियंत्रण कक्ष को भेज सकता है और उनसे निर्देश ले सकता है। जब आप स्कूटर या कार आदि चला रहे हैं तो उस समय जाने वाले स्थान के लोगों और अपने घर के लोगों को मानसिक संदेश लिया और दिया करो। इससे आपकी छठी इन्द्रिय में बहुत निखार आयेगा। आप जो सोच रहे हैं वह दूसरों तक पहुँच रहा है। यह सब ईथर के द्वारा होता है ऐसे ही अगर कोई आपके बारे सोचता है तो आप भी वह प्राप्त कर रहे होते हैं। अगर आपके विचारों में जरा सी भी नकारात्मकता है तो आप अंजाने में अपनी छठी इन्द्रिय को कमजोर कर रहे हैं। यदि आपके संकल्प सकारात्मक है तो आप अपनी छठी इन्द्रिय को शक्तिशाली बना रहे हैं। छ इन्द्रिय की शक्ति सभी में रहती है। आग बुझाने वाले लोग, मैडिकल के लोग, सेना के लोग, आपात स्थितियों में काम करने वाले लोगों की छठी इन्द्रिय तीव्र होती है।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र-कर्म चक्र

संतन मोकउ पूंजी सउपी तउ उतरिआ मन का धोखा ॥ धरमराइ अब कहा करैगो जड फाटिओ सगलो लेखा ॥ संतांचा मार्ग एकदम वेगळा आहे. संत सद्गुरूच्या अनुग्रहीत शिष्यांना कुठेच सुनावणीसाठी हजर रहावे लागत नाही. सद्गुरू प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांच्या दयेची विशालतेची आपण कल्पनाही करू शकत नाही. अगदी सृष्टीच्या अंतापर्यंत ते त्याच्या सोबत राहतात. ते आम्हाला विश्वास देतात, मैं तुम्हारे साथ चलूंगा और जरूरत पड़ने पर बनतात. एका दयाळू आणि कृपाळू वडिलांप्रमाणे चूक करणार्‍या आपल्या मुलाला ते स्वतः कोणतीही शिक्षा करतील परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात कधीच देणार नाहीत. स्वतःला मुक्त समजणार्‍या भ्रमात राहणारी व्यक्ती सर्वात अधिक बंधनात राहते. आम चा आत्मा नेहमीच मुक्त असतो परंतु इच्छा त्यांच्या बंधनाचे कारण . जे संसारिक दृष्टीने संपन्न आहे ते आपल्याला सुखी दिसतात असू शकते की त्यांनी काही चांगले बियाणे पेरले असावेत त्यामुळे त्याचे भरपूर पिके त्यांना या जन्मात मिळत आहे किंवा मग हिसका, ओढा आणि जमा करा या नितीवर चालून ते स्वतःसाठी संपत्ती जमा करत असतील, सुखाला भोगणारे हे लोक दुर्भाग्यवश हे विसरून जातात की, न दिसणारी सोन्याची बेडी घालून ते नकळत अडचणीत फसत आहे.

एक सामान्य म्हण आहे की, मोठ्या लोकांचा राजवाडा गरिबांच्या घाम पण अश्रूंनी बनतो. चांगले बियाणे पेरल्याशिवाय कोणी चांगली पिके कसे काढू कल ? हे संभव आहे की काही पापाचे ओझे त्याच्यावर असू शकते. यापुढे त्याने चांगले जर बियाणे पेरले नाही, तर भविष्यात त्याला चांगल्या फळाची अपेक्षा कशी आणि किती काळ करता येईल ? संतन मोकउ पूंजी सउपी तउ उतरिआ मन का धोखा ॥ धरमराइ अब कहा करैगो जड फाटिओ सगलो लेखा ॥ संतांचा मार्ग एकदम वेगळा आहे. संत सद्गुरूच्या अनुग्रहीत शिष्यांना कुठेच सुनावणीसाठी हजर रहावे लागत नाही. सद्गुरू प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांच्या दयेची विशालतेची आपण कल्पनाही करू शकत नाही. अगदी सृष्टीच्या अंतापर्यंत ते त्याच्या सोबत राहतात. ते आम्हाला विश्वास देतात, मैं तुम्हारे साथ चलूंगा और जरूरत पड़ने पर बनतात. एका दयाळू आणि कृपाळू वडिलांप्रमाणे चूक करणार्‍या आपल्या मुलाला ते स्वतः कोणतीही शिक्षा करतील परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात कधीच देणार नाहीत. स्वतःला मुक्त समजणार्‍या भ्रमात राहणारी व्यक्ती सर्वात अधिक बंधनात राहते. आम चा आत्मा नेहमीच मुक्त असतो परंतु इच्छा त्यांच्या बंधनाचे कारण . जे संसारिक दृष्टीने संपन्न आहे ते आपल्याला सुखी दिसतात असू शकते की त्यांनी

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

ऋषी अष्टावक्र

हिंदू धर्मशास्त्रामध्ये अष्टावक्र नावाचे एक विचारवंत होऊन गेले. असे म्हणतात की अष्टावक्र हे केवळ कुरुपच नव्हते तर त्यांचे शरीरही बेढब होते. त्यांचे शरीर आठ ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांना अष्टावक्र हे म्हटले जात होते. ही एक प्रसिद्ध कथा आहे. अष्टावक्र ऋषी एकदा राजा जनक यांच्या दरबारात गेले. दोन्ही बाजूंनी उंच आसनावर सभासद, ज्ञानी, पंडीत, ज्ञानकर्मी बसले आणि राजा जनकाचे सिंहासन होते. अष्टावक्र ऋषींना द्वारपालाने रोखले नाही. अष्टावक्र त्यावेळी किशोरवयीन होते. अष्टावक्राने जेव्हा राजा जनकाच्या मुख्य सभामंडपात प्रवेश केला तेव्हा त्याच्यावर नजर पडताच सर्वजण एकमेकांकडे पाहून हसू लागले होते. इतकेच नाही तर त्यांचे हसू थांबत नव्हते. हे पाहून अष्टावक्राला प्रथम काहीच समजले नाही, मात्र त्यानंतर त्याला आपल्यावर हे सर्वजण हसतात म्हणून लक्षात आले. हे पाहून तोही जोरजोरात हसू लागला. जनक राजाने सभेला शांत होण्याचे आवाहन केले, सभा शांत होताच राजा जनकाने अष्टावक्राला विचारले, ’’हे साधू, हे लोक तुमच्यावर हसतात हे माझ्या लक्षात आले पण तुम्ही का हसता आहात हे समजले नाही’’ अष्टवक्राने उत्तर दिले, ’’महाराज, मला वाटले की राजा जनक जो ज्ञानी, विचारवंत आहे त्याच्या सभेत ज्ञानी, विचारवंत, हुशार लोक असतील पण इथे तर सर्वच जण कातडीकडे व बाह्य स्वरूपाकडे पाहणारे लोक आहेत. माझ्या रूपाकडे पाहून हे लोक मला हसत होते हे पाहून मला यांच्या बुद्धीची कीव आली व हसू फुटले.’’ जनक राजासह सर्व सभा अष्टावक्र ऋषींच्या या उत्तराने शरमिंदी झाली.

तात्पर्य – माणसाचे महत्व त्याच्या शरीरावर नाही तर त्याचे ज्ञान, परिश्रम आणि कर्मावर आहे.

सौंदर्य

कॉफीमध्ये अनेक सौंदर्य उपकारक घटक आहेत. यात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आहेत. अँटी सेल्युलाइड क्रीमपासून बॉडी स्क्रबपर्यंत अनेक सौंदर्य प्रसाधनात कॉफीचा वापर होतो. याविषयी घ्या जाणून… कॉफी व नारळ तेल समप्रमाणात मिश्रण करा. याला मफीन बनवण्याच्या मोल्डमध्ये अथवा छोट्या वाटीत टाका. काही तास हे मिश्रण फ्रीझरमध्ये ठेवा. तुमचे एक्सफोलिएटिंग बार तयार होते. स्नानाच्या वेळी स्क्रबरप्रमाणे याचा वापर करा. यातील नारळतेलामुळे त्वचेचे पोषण होते.

सल्ला

घरासाठी वास्तूनुसार, बेड आणि कपाट सारखे जड फर्निचर दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे. नवीन घरासाठी एक द्रुत वास्तु टीप म्हणजे दक्षिण-पश्चिम दिशेने पायर्‍या बांधणे.

स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे

वास्तूनुसार स्वयंपाकघराची उजवी दिशा म्हणजे घराचा आग्नेय कोपरा, ज्यावर अग्निदेवता किंवा अग्निदेवतेचे राज्य असते. अशा प्रकारे वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे स्वयंपाकघरातील आदर्श स्थान आहे.

मसाला भेंडी

साहित्य – भेंडी, चौकोनी चिरलेली – साधारण 3-4 वाट्या, कांदा 1 मध्यम किंवा अर्धा मोठा, टोमॅटो – 1 मध्यम आकाराचा, सिमला मिरची – एक मध्यम किंवा फार मोठी असल्यास अर्धी पुरेल, धण्या-जिर्‍याची पूड दीड ते 2 चमचे, गरम मसाला (ऑप्शनल), कसुरी मेथी, हळद, तिखट, मीठ, फोडणीचे साहित्य.

कृती – भेंडी, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची चिरून घ्या. भेंडी फार बारीक चिरू नये. सिमला मिरचीचे देखिल मोठेच तुकडे असू द्यावे. कढईत तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी करा. त्यात कांदा परतावा. पारदर्शक झाला की टोमॅटोच्या फोडी घालून परताव्या. मिश्रण जरा मिळून आले की धणे जिरे पावडर, गरम मसाला (घालणार असल्यास), हळद, तिखट घाला. लगेचच भेंडी घालून जरा परतावी. 2-3 मिनिटांनी सिमला मिरचीचे तुकडे घालावे. सिमला मिरची थोडी नंतर घालण्याचे कारण म्हणजे ती फार गाळ शिजणे अपेक्षित नाही. आता मीठ घालावे, भाजी मध्यम आचेवर शिजू द्यावी. झाकण ठेवू नये. शिजत आल्यावर दोन तीन चिमुट कसुरी मेथी घालून मिक्स करा. कसुरी मेथीचा स्वाद फार छान लागतो. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला.

महिलांच्या ’फिटनेस’ साठी

महिलांना तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी एरोबिक्स हा एक उत्तम व्यायाम आहे. एरोबिक्स केल्याने वजन नियंत्रणात राहते, जर तुमचं वजन वाढलं असेल, तर त्याचा सराव वजन कमी करण्यासही मदत करतो.