हसा आणि शतायुषी व्हा!

एका लग्नाच्या रिसेप्शनला बंड्या गेला होता

त्यावेळी तिथे आईसक्रीम कप देताना कपाळाला गंध लावायचे.

हे पाहून बंड्या अवाक झाला.

बंड्याने आइसक्रीम वाल्याला विचारले,

ही काय नवीन प्रथा आहे कां???? ते म्हणाले नाही…

प्रथा बिता काही नाही…

लोक येवून 10-10 आइसक्रीम कप उचलतात म्हणून ही आईडीया.

वास्तू

फेंगशुईनुसार काच, माती किंवा सिरॅमिकचे हंस व हंसिणीचा जोडा शयनकक्षात ठेवल्याने नवविवाहित दांपत्यामध्ये प्रेम व विश्‍वास यांच्यात वृध्दी होत असते. शयनकक्षाच्या नैऋत्य कोपर्‍यात ते ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल.

उजळ चेहर्‍यासाठी

संत्र्याची साले 100 ग्रॅम घेऊन वाळवून वाटून पूर्ण करावे. यात 100 ग्रॅम बाजरीचे पीठ आणि 12 ग्रॅम हळद मिसळून पाण्यात भिजवून चेहर्‍यावर लावावं. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. काही दिवसांत चेहरा उजळून निघेल.

मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू

साहित्य – 2 कप मुगाची डाळ स्वच्छ धुऊन, 10-15 मिनिटे भिजवून, फडक्यावर वाळवून घ्या व मग भाजा, रवाळ दळून घ्या.

कृती – साजूक तुपावर रवाळ पीठ भाजून घ्या. पीठ फार बारीक दळल्यास लाडू खाताना टाळ्याला चिकटतो, म्हणून ‘भुरी शक्कर’ घालून वळा. भुरी साखर अशी बनवा दीड कप साखर व 1 कप पाण्याचा पाक करत ठेवा. 2 थेंब लिंबाचा रस व 1 चमचा तूप घाला. पाक पक्का झाल्यावर गॅस बंद करा. ही साखर मिक्सरमध्ये दळून वापरा. या साखरेमुळे लाडू खमंग लागतो. मऊ केलेला गूळ घालूनही लाडू बनविता येतील.

हे पदार्थ लाभदायक

आवळा, गडद रंगांच्या लाल पिवळ्या भाज्या आणि फळं. पालेभाज्या, मोडाची कडधान्ये, मटार, मुळा यांमधून; व्हिटामिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंटस मिळतात. थंडीत केले जाणारे पारंपरिक पदार्थ तिळगुळ, गुळाची पोळी, अळीवाचे/ डिंकाचे/ मेथीचे/ खजुराचे लाडू योग्य प्रमाणात आवर्जून खा. गजर हलवा, उंधियो, सरसों का साग, पाया सूप यांचा आस्वाद नक्की घ्या.

काय होतं रडल्यामुळे?

आपल्याकडे रडणं हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. मनाने कमकुुवत असणारे लोक रडतात, असा सर्वसाधारण समज आहे. पण प्रत्यक्षात मानसिक आरोग्यासाठी रडणं चांगलं असतं. रडल्यामुळे मन हलकं होतं. ताण कमी व्हायला मदत होते. अश्रूंच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करणारे लोक इतरांच्या टिकेला घाबरत नाहीत. इतरांपुढे व्यक्त होतानाही त्यांना भीती वाटत नाही. छोट्या- छोट्या गोष्टींसाठी रडणार्‍या लोकांचं आपल्या भावनांवर पूर्ण नियंत्रण असतं. असे लोक इतरांच्या भावना लवकर समजून घेतात. अर्थात असं असलं तरी सतत रडत बसणं योग्य नाही. रडण्यालाही मर्यादा असायला हवी. सतत रडू येत असेल तर वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असते.

रक्त वाढवण्यासाठी…

शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अशक्तपणा येतो. यामुुळे छातीत दुखणं, थकवा, चक्कर येण्यासारख्या समस्या निर्माण होतात. पण काही सोप्या उपायांनी शरीरातली रक्ताची कमतरता दूर करता येते. हे उपाय घरगुती असून सहज करता येण्यासारखे आहेत. नियमितपणे पालकाचा रस घेतल्यास रक्ताची कम तरता दूर होऊ शकते. अन्न शिजवण्यासाठी लोखंडाच्या कढईचा वापर केल्याने शरीरातल्या लोहाची कमतरता दूर होऊ शकते. शरीरातील रक्त वाढावं अशी इच्छा असेल तर चहा-कॉफीचं सेवन कमी प्रमाणात करा. चहा-कॉफीच्या अतिसेवनामुळे शरीरात लोह योग्य प्रमाणात शोषलं जात नाही आणि ऍनिमियाची शक्यता वाढते.

निदान होईल झटपट!

एखाद्या विकाराचं निदान लवकर होणं गरजेचं असतं. निदानास विलंब लागल्यास उपचारांअभावी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. पण आता शास्त्रज्ञांनी एका चाचणीचा शोध लावला आहे. या चाचणीमुळे सुरूवातीच्या टप्प्यांमध्येच विकाराचं निदान करता येणं शक्य होणार आहे. पर्ड्यू विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केलं आहे. त्यांनी मायक्रो इलेक्ट्रोमॅकेनिकल रेसोनेटर्सची निर्मिती केली आहे. हे रेसोनेटर्स रक्तातल्या बायोलॉजिकल मार्कर्सची ओळख पटवू शकतात. यामुळे गंभीर विकार, जंतूसंसर्ग किंवा इतर वैद्यकीय स्थितीचं निदान सुरूवातीच्या टप्प्यांमध्ये करता येईल. ही चाचणी फारशी खर्चिकही नसेल. या चाचणीद्वारे आजारास कारणीभूत ठरणार्‍या विशिष्ट प्र्रथिनाचा शोध घेतला जातो. ही पद्धत वापरून विविध विकाराचं निदान करता येईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. शस्त्रक्रियेशिवाय विकार बरा करण्याचं उद्दिष्ट समोर ठेऊ न हे संशोधन केलं असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

कसा जडतो ‘हिमोफिलिया ए’

जखम, शस्त्रक्रिया किंवा अन्य कारणांमुळे होणार्‍या रक्तस्रावावर नियंत्रण मिळवण्यासाठी रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. पण काही घटकांच्या कमतरतेमुळे किंवा जनुकीय स्थितीमुळे अशा गुठळ्या तयार झाल्या नाहीत तर रक्तस्रावावर नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवणं शक्य होत नाही. हिमोफिलिया या आनुवंशिक विकारामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत. हिमोफिलियाचे ए, बी आणि सी असे तीन प्रकार आहेत. या विकाराची माहिती करून घेणं गरजेचं आहे. ‘हिमोफिलिया ए’ हा रक्तस्रावासंबंधीचा आनुवंशिक विकार आहे. रक्ताच्या गुठळ्या बनण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॅक्टर 8 या प्रथिनाच्या कमतरतेमुळे किंवा त्याच्या कार्यात दोष निर्माण झाल्याने हा विकार जडतो. हा आनुवंशिक विकार असला तरी अत्यंत दुमीर्र्ळ परिस्थितीत तो शरीरात होणार्‍या रोगप्रतिकाराच्या अनैसर्गिक प्रतिक्रियेमुळेही जडू शकतो. हा आजार जडणार्‍या रुग्णांच्या शरीरातून पटकन रक्तस्राव सुरू होतो. हा विकार पूर्ण बरा होत नसला तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. ‘हिमोफिलिया ए’ ला कारणीभूत ठरणार्‍या विशिष्ट जनुकामध्ये होणार्‍या बदलांमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या फॅक्टर 8 या प्रथिनाची कमतरता निर्माण होते. प्लेटलेट्स आणि फायब्रिन या घटकांमुळे रक्तात गुठळ्या तयार होतात. त्यामुळेे जखमेतून होणारा रक्तस्राव लवकर थांबतो आणि जखम लवकर भरते. पण फॅक्टर 8 च्या कमतरतेमुळे रक्तस्रावावर नियंत्रण मिळवणं शक्य होत नाही.

…या दिवशी येतो हृदयविकाराचा झटका!

हल्लीचे धावपळीचे जीवन आणि राहणीमान यामुळे कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा हृदयविकाराचा झटका आल्यावर ‘गोल्डन अवर’मध्ये म्हणजेच पहिल्या तासाभरात उपचार न मिळाल्याने माणसाचा मृत्यू होतो. आठवड्यामधील एखाद्या दिवशी हार्ट ऍटॅकचा धक्का तीव्र असू शकतो का, याविषयी नुकतेच एक संशोधन समोर आले आहे. हृदयविकारामुळे ऐन तारुण्यात अनेकांचे बळी जात आहेत. ‘आम्ही आठवड्यातील काही दिवसांचा अभ्यास केला. कोणत्या दिवशी तीव्र हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक असतो याची तुलना केली. या संशोधनाद्वारे डॉक्टरांना या गंभीर परिस्थितीचा अभ्यास करणे सोपे होईल’, असे ’ब्रिटिश हार्ट फाऊंडेशन’चे वैद्यकीय प्रोफेसर नीलेश समानी यांनी सांगितले. ‘एसटीईएमआय’ हा हार्ट ऍटॅकचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. हा ऍटॅक आठवड्यामधील अन्य वारांपेक्षा सोमवारी येण्याचा धोका अधिक असतो. आठवड्याची सुरुवातच सोमवारी हो- ते. पर्यायाने ताणतणावाची सुरुवातही सोमवारीच होते. विशेष तज्ज्ञांच्या मते हृदयविकाराचा झटाका येण्याचा धोका वाढण्याचा संबंध हार्मोन्सशी आहे. ‘ही परिस्थिती कामाला परतण्याच्या ताणातूनही निर्माण होऊ शकते‘ असे ‘बेलफास्ट हेल्थ अँण्ड सोशल केअर ट्रस्ट‘चे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जॅक लाफन यांनी सांगितले. तणाव वाढल्याने हॉर्मोन कोर्टिसोलचा स्तर वाढतो. त्यामुळे हार्ट ऍटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून तणाव टाळावा असेही लाफन यांनी सांगितले.